Wednesday, August 7, 2024

Nandinatheshwarar Temple at North Poigai Nallur, Nagapattinam Velankanni

This Shiva temple is located at Vakkupoigainallur near Nagapattinam town in Nagapattinam district of Tamil Nadu. This place is also known as Poiyyur. This is a Thevaravaippu sthala as it finds a mention in sacred hymns of Selva saint Appar. This temple is situated on the Nagapattinam Velankanni route via Akkaraipettai. The place is also known as Siddhashram. It is at about 6 kms from Nagapattinam new bus stand, 7 kms from Velankanni and very near to Gorakhasiddha jeeva samadhi. 

Mulavar: Shri Nandinadeshwarar

Devi: Shri Soundaryanayaki

Puranik name: Siddhashram

Much details of this place are not available. We will add more details after visiting the place. This is a very beautiful, well kept small temple. The Shiva linga is a swayambhoo linga. There is no Rajagopuram but at the top of the entrance we come across stucco images of Shri Parvati Devi, Bhagwan Shiva and Shri Ganesha. Shri Soundaryanayaki Devi is in a separate shrine. 

Kshetra puran: 

Once Sage Vishwamitra entered the inner chamber of Kailash without permission from Nandi who was at the entrance. Nandi was unaware of this. Vishwamitra got several boons from Bhagwan Shiva. By his divine vision, Bhagwan Shiva came to know that Nandi has failed in his duty. As a punishment, he ordered Nandi to do penance for 1000 years on earth. Nandi requested Bhagwan Shiva, to suggest a place for his penance and Bhagwan directed him to this place. He reached this place and did penance. 

2) The place got the name Sidhashram as several siddhas did penance at this place. 

3) Bhagwan Shiva gave darshan to Gorakhasiddha.

Those who worshiped at this place:

Nandi, Sage Kaala, Gorakhasiddha & several other siddhas. 

Festivals:

Main festival: Pradosha pooja is considered as the main festival. This is supposed to be most auspicious pradosha pooja than any other place. 

Address: Shri Nandinadeshwarar temple, Nagapattinam, Valankanni road, via Akkraipetthai, Vadakkupoigainallur, Nagapattinam 611106

Temple timing: 9 -10 am, 4 - 8 pm


Courtesy: various blogs and website

Sunday, August 4, 2024

थिरुक्कडयूर येथील विराट्टेश्वरर मंदिर

अष्टविराट्ट स्थळांमधलं हे आठवं मंदिर आहे. मार्कंडेय ऋषींना मृत्यूपासून वाचविण्यासाठी भगवान शिवांनी श्री यमदेवांचा वध केला त्या घटनेशी हे मंदिर निगडित आहे. 

मंदिराचे नाव श्री अमृतघटेश्वरर आहे. मयीलादुथुराई पासून साधारण ३२ किलोमीटर्स वर मयीलादुथुराई-कारैक्कल मार्गावर थिरुक्कडैयुर ह्या गावात हे मंदिर स्थित आहे. २७६ पाडळ पेथ्र स्थळांमधलं पण एक स्थळ आहे. श्री अप्पर आणि श्री सुंदरर ह्या नायनमारांनी इथे भगवान शिवांची स्तुती गायली आहे. हे शक्ती पीठांपैकी पण एक पीठ आहे. 

मुलवर: श्री अमृतघटेश्वरर 

देवी: श्री अभिरामी अम्मन

क्षेत्र वृक्ष: बिल्व, गुलाबी चमेली (पिंजलम किंवा तमिळ मध्ये जथी मल्ली)

पवित्र तीर्थ: अमृत पुष्करिणी, गंगा तीर्थ, शिव गंगा तीर्थ, मार्कंडेय तीर्थ आणि कला तीर्थ

पुराणिक नाव: थिरुक्कडैयुर, बिल्ववनं, पिंजलवनं

वर्तमान नाव: थिरुक्कडैयुर

जिल्हा: नागपट्टीनं, तामिळनाडू


क्षेत्र पुराण:

एकदा ज्ञानोपदेश मिळविण्यासाठी श्री ब्रह्मदेव भगवान शिवांकडे गेले. तेव्हां भगवान शिवांनी त्यांना काही बिल्वझाडाची बीजे दिली आणि सांगितलं कि ज्या ठिकाणी हि बीजे पेरल्यावर एक प्रहरामध्ये ती उगवतील त्या ठिकाणी ते उपदेश देतील. जेव्हा श्री ब्रह्मदेव इथे आले आणि त्यांनी बीजे पेरली त्यावेळी एक प्रहरामध्ये तिथे बिल्वाचे झाड उगवले. भगवान शिवांनी श्री ब्रह्मदेवांना इथे ज्ञानोपदेश दिला. ह्या जागेला बिल्ववनम म्हणतात आणि येथील शिव लिंगाला बिल्ववननादर असं म्हणतात. 


अजून एका आख्यायिकेनुसार समुद्रमंथनाच्या वेळेस भगवान शिवांनी देवांना अमृत कलश दिला. देव अमृत प्राशन करण्याच्या आधी श्री गणेशांचं स्मरण करण्यास विसरले. श्री गणेशांनी तो अमृत कलश देवांकडून घेतला आणि ह्या जागी तो लपवून ठेवला. तो अमृत कलश बराच खोलवर गेला जिथून तो काढता आला नाही. कालांतराने त्या अमृत कलशाचे शिव लिंगामध्ये रूपांतर झाले ज्याचे नाव श्री अमृतघटेश्वरर असे प्रसिद्ध झाले.


अजून एका आख्यायिकेनुसार मृकण्डु ऋषी आणि त्यांची पत्नी मरुद्मति ह्यांना तपश्चर्येनंतर पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव त्यांनी मार्कंडेय असे ठेवले. भगवान शिवांनी त्यांना आशीर्वाद दिला होता कि त्यांना ज्ञानी पुत्र होईल पण तो १६ वर्षेच जगेल. जेव्हां मार्कंडेयांना आपल्या प्रारब्धाचं ज्ञान झालं ते शैव स्थळांच्या तीर्थयात्रेला गेले. ते ह्या स्थळी आले जे त्यांच्या यात्रेतलं शेवटचं म्हणजेच एकशे आठाव्व स्थळ होतं आणि त्याच दिवशी त्यांच्या आयुष्याची १६ वर्षे पूर्ण झाली होती. ते जेव्हा भगवान शिवांची पूजा करत होते तेव्हा श्री यमदेव त्यांना नेण्यासाठी आले. तेव्हा मार्कंडेयांनी शिव लिंगाला आलिंगन देऊन त्याला घट्ट धरून ठेवले. जेव्हां श्री यमदेवांनी त्यांचा पाश मार्कंडेयांवर फेकला तेव्हा त्याने शिव लिंग पण आच्छादलं गेलं. भगवान शिव लिंगातून बाहेर आले आणि त्यांनी आपल्या त्रिशुळाने श्री यमदेवांचा वध केला. त्यांनी मार्कडेयांना दीर्घायुष्याचे वरदान दिलं. म्हणून इथे भगवान शिवांचे नाव श्री मृत्युंजय मूर्ती तसेच श्री कालसंहार मूर्ती असे आहे. 


श्री यमदेवांचा संहार झाल्यामुळे पृथ्वीवर कोणी मृत्यू पावणं बंद झालं. श्री भूदेवींनी ह्याबद्दल भगवान शिवांकडे समस्या बोलून दाखवली आणि श्री यमदेवांना पुनर्जीवित करण्याची विनंती केली. भगवान शिवांनी श्री भूदेवींच्या विनंतीला मान देऊन श्री यमदेवांना पुनर्जीवित केलं. जेव्हां आपण भगवान शिवांचं श्री यमदेवांशिवाय दर्शन घेतो तेव्हां त्या दर्शनाला संहार दर्शन असं म्हणतात तर जेव्हा श्री यमदेवांसमवेत दर्शन घेतो त्या दर्शनाला जीवित दर्शन असं म्हणतात (तामिळ मध्ये उईरपीठ). 


अजून एका आख्यायिकेनुसार भगवान विष्णूंना समुद्र मंथनातून मिळालेलं अमृत प्राशन करण्याआधी भगवान शिवांची पूजा करायची इच्छा होती. पूजा करण्याच्या वेळेस आपले अलंकार काढून ठेवावेत अशी प्रथा आहे. त्या प्रमाणे भगवान विष्णूंनी आपले अलंकार काढून ठेवले. त्या अलंकारांतून श्री अंबिका देवी श्री अभिरामी देवींच्या रूपात प्रकट झाल्या. असा समज आहे कि भगवान विष्णूंच्या अलंकारांमध्ये श्री महालक्ष्मी निवास करतात. श्री अंबिका देवी भगवान विष्णूंच्या अलंकारांमधून प्रकट झाल्या म्हणून इथे भगवान विष्णू श्री अंबिका देवींचे पिता म्हणून पुजले जातात.


अजून एका आख्यायिकेनुसार सुब्रमण्यम नावाचा श्री अभिराम देवीचा भक्त होता. एकदा तो श्री अभिराम देवींच्या पूजेमध्ये मग्न असताना त्याने तो दिवस अमावास्येच्या ऐवजी पौर्णिमा आहे असे उच्चारण केले. तंजावूरचे राजे सरभोजी महाराज ह्यांना ह्याचा खूप राग आला. त्यांनी सुब्रमण्यमला आव्हान केलं कि त्याने तो दिवस पौर्णिमा आहे असे सिद्ध करावं नाहीतर मृत्यूला सामोरं जावं. सुब्रमण्यम, ज्याला अभिरामभट्टर असे पण म्हणायचे, त्याने अभिराम अंतादी हे स्तोत्र म्हणायला चालू केलं. ह्या स्तोत्रामध्ये एका श्लोकाच्या अंतिम अक्षराने पुढील श्लोकाची सुरुवात होते. सुब्रमण्यम जेव्हा ह्या १०० श्लोकांच्या स्तोत्रातील ७९वा श्लोक म्हणत होते त्यावेळी श्री अभिराम देवीने आपल्या कानातील कुंडल आकाशामध्ये फेकले ज्याच्या प्रकाशामुळे तो दिवस पौणिमा भासू लागला. थै ह्या तामिळ महिन्यातल्या ह्या अमावास्येच्या दिवशी इथे खूप मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. 


क्षेत्राचे महत्व:

१) पंगूनी ह्या तामिळ महिन्याच्या अश्विनी नक्षत्र दिवशी जवळच असलेल्या श्री ब्रह्मपुरीश्वरर ह्या मायनं मंदिरातल्या तीर्थामध्ये गंगा देवी प्रकट होते. हा दिवस सोडून बाकीच्या दिवशी ह्या तीर्थातले पाणी येथील शिवलिंगावर अभिषेक करण्यास वापरले जाते. पण ह्या दिवशी सर्व भाविक जनांना ह्या तीर्थामध्ये स्नान करण्याची परवानगी दिली जाते.

२) जर भगवान शिवांची पिंजलवनामधल्या एका पुष्पाने पूजा केली तर १००८ वेळा पूजा केल्याचे फळ मिळते.

३) पुराणानुसार इथे श्री पापकारेश्वर ह्यांची पूजा प्रथम केली जाते आणि मग श्री पुण्यकारेश्वरर ह्यांची पूजा होते. जेणेकरून सर्वे पापे प्रथम धुतली जातात आणि पुण्य प्राप्त होते.

४) ६३ नायनमारांपैकी करी नायनार आणि कुंगीला कलय नायनार ह्यांनी इथे वास्तव्य केलं आणि शेवटी मुक्ती प्राप्त केली. 

५) श्री सुब्रमण्यम ह्यांनी अभिराम अंतादी स्तोत्र रचलं म्हणून त्यांना श्री अभिराम भट्टर असं नाव प्राप्त झालं. त्यांनी पण इथे वास्तव्य केलं. 


मंदिराबद्दल माहिती:

ह्या पश्चिमाभिमुख असलेल्या मंदिरामध्ये पांच प्रकारम, पांच परिक्रमा आणि सात स्तरांचं राजगोपुर आहे. येथील शिव लिंग स्वयंभू आहे. हे मंदिर साधारण २००० वर्षे जुनं आहे. इथे जवळ जवळ ५४ शिलालेख आहेत ज्यावर चोळा, पांड्य आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी केलेल्या देणग्यांचे उल्लेख आहेत. येथील क्षेत्र वृक्ष पिंजलं हे २००० वर्षे जुनं आहे. त्याला वर्षभर फुले येतात आणि ह्या वृक्षाची फुले फक्त भगवान शिवांच्या पूजेसाठीच वापरली जातात. हे वृक्ष आतल्या परिक्रमेमध्ये आहे.


मंदिरातील इतर देवता आणि देवालये:

बाहेरील परिक्रमेमध्ये श्री नंदिदेवांच्या उजव्या बाजूला श्री गणेशांचे देवालय आहे. श्री गणेशांचे नाव श्री कल्लवरण विनायक असे आहे. जशी श्री मुरुगन ह्यांची सहा स्थळे आहेत तशीच श्री विनायकांची पण सहा स्थळे आहेत. हे स्थळ त्या सहा स्थळांपैकी तिसरं स्थळ आहे. श्री गणेश हे आपल्या सोंडेमध्ये अमृत कलश नेत आहेत अशी मूर्ती आहे. ह्या मंदिरामधल्या उत्सवमूर्तीचे नाव श्री काल संहारमूर्ती असे आहे. परिक्रमेमध्ये श्री पार्वती देवींचे देवालय आहे. त्यांच्या मांडीवर श्री मुरुगन बसले आहेत अशी मूर्ती आहे. श्री पार्वती देवींचे इथे श्री गुहांबिका असे नाव आहे.


ह्या शिवाय श्री गणेशांची अजून एक मूर्ती, श्री मुरुगन ह्यांची त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांसमवेत मूर्ती, तसेच श्री सोमस्कंद आणि श्री शिवगामी देवींसमवेत श्री नटराजांची मूर्ती पण आहे. परिक्रमेमध्ये श्री महालक्ष्मी देवी, श्री बिल्ववनेश्वरर, श्री दुर्गा देवी, श्री अर्धनारीश्वरर, श्री भैरवर ह्यांच्या मुर्त्या आणि कोष्ठ मुर्त्या आहेत. ह्या मंदिरामध्ये नवग्रह संनिधी नाही. परिक्रमेमध्ये ह्या शिवाय श्री अगस्त्य मुनींनी पूजिलेली श्री पापकारेश्वरर मूर्ती आहे. तसेच श्री पुलस्ती ऋषींनी पूजिलेली श्री पुण्यवरदानर ही मूर्ती आहे. 


गाभाऱ्याच्या आतील बाजूस उजवीकडे यंत्र आहे. त्या यंत्राचे नाव थिरुकडीयुर रहस्य असे आहे. असा समज किंवा प्रथा आहे कि प्रथम श्री पापकारेश्वरर ह्यांचं दर्शन घ्यायचं मग भगवान शिव आणि शेवटी यंत्र. असं केल्याने आयुष्य वृद्धी होते. श्री कालसंहार मूर्तीच्या समोर श्री यमदेवांची विनम्र मुद्रेतील मूर्ती आहे ज्यामध्ये त्यांचे वाहन पण आहे. 


इथे श्री कालसंहार म्हणजेच भगवान शिव ज्यांनी श्री मार्कंडेय ऋषींचे श्री यमदेवांपासून रक्षण केले त्यांची भव्य मूर्ती आहे. ह्या मूर्तीमध्ये भगवान शिवांचा डावा पाय श्री आदिशेषांवर आहे, त्यांचे त्रिशूल हे श्री यमदेवांच्या दिशेने आहे आणि दुसऱ्या पायाखाली श्री यमदेव आहेत. ह्या मूर्तीच्या बाजूला भूत गण आहेत जे श्री यमदेवांना खेचत आहेत. भगवान शिवांच्या पायाखालची श्री यमदेवांची मूर्ती ही सहसा लोखंडी पट्टीने झाकलेली असते जी फक्त पूजेच्या समयी काढली जाते. श्री पार्वती देवी ह्या श्री लक्ष्मी देवी आणि श्री सरस्वती देवींच्या समवेत लहान मुलीच्या रूपात आहेत. त्यांचे इथे श्री बालांबिका असे नाव आहे. येथील शिवलिंगावर एक व्रण आहे जो फक्त अभिषेकाच्या समयीच दिसतो. हा व्रण जेव्हा लिंगाला आलिंगन देऊन पकडून ठेवलेल्या मार्कंडेय ऋषींना नेण्यासाठी जेव्हा श्री यमदेवांनी त्यांचा पाश फेकला त्यावेळी उमटला आहे असा समज आहे.         


वैशिष्ट्ये:


१) जेव्हां आपण इथल्या शिवलिंगाकडे निरखून बघतो त्यावेळी त्याच्या मागे अजून एक लिंग दिसतं. 

२) मार्कंडेय ऋषींनी स्वतःला मृत्यूपासून वाचविण्यासाठी शैव स्थळांची तीर्थयात्रा केली. त्या तीर्थयात्रेतील हे शेवटचं म्हणजे १०८व स्थळ आहे. 

३) असा समज आहे की बऱ्याच सिद्ध मुनींचं ह्या स्थळा जवळ वास्तव्य होतं उदाहरणार्थ पम्बट्टी सिद्धर.


मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री ब्रह्मदेव, श्री यमदेव, श्री दुर्गा देवी, श्री वासुकी, श्री अगस्त्य मुनी, श्री पुलस्ती मुनी, श्री मार्कंडेय ऋषी, सप्त मातृका आणि शैव संत श्री अप्पर आणि श्री संबंधर.


मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): माघ नक्षत्र उत्सव, १८ दिवसांचा यमसंहार उत्सव. ह्यातील सहाव्या दिवशी श्री कालसंहार मूर्तीची मिरवणूक निघते.

आडी (जुलै-ऑगस्ट): आडीपुरं

पूरत्तासी ( सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम. दर सोमवारी १००८ शंखांचा शंखाभिषेक, पौर्णिमेला प्रदोष पूजा

थै (जानेवारी-फेब्रुवारी): अमावास्येला पूजा

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तरं


तामिळ नववर्ष आणि इंग्लिश नववर्ष दिनी विशेष पूजा केली जाते. भाविक जन इथे साठाव्वा वाढदिवस म्हणजेच षष्ट्यपूर्ती, सत्तराव्वा वाढदिवस म्हणजेच भीमरथी शांती, ऐंशीव्वा वाढदिवस म्हणजेच शताभिषेक शांती तसेच नव्वदाव्वा वाढदिवस म्हणजेच कनकभिषेक साजरे करतात. तसेच जन्मनक्षत्र शांती आणि अडचणींवर मात करण्यासाठी आयुष्य होम आणि महामृत्युंजय होम करतात. ह्या शिवाय इथे अपत्य प्राप्ती आणि ऐश्वर्यप्राप्तीसाठी पण पूजा केली जाते.


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):


ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

Sunday, July 28, 2024

थिरुकुरक्कई येथील विराट्टेश्वरर मंदिर

अष्टविराट्ट स्थळांमधलं हे सातवं मंदिर आहे. हे पुराणातील मन्मददहन (कामदेव) कथेशी निगडित आहे. मयीलादुथुराई-मनलमेडू मार्गापासून १२ किलोमीटर्स अंतरावर आहे. २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण हे एक स्थळ आहे. थिरुनवुक्करसर ह्या नायनमारांनी ह्या मंदिरामध्ये भगवान शिवांची स्तुती गायली आहे. कावेरी नदीच्या उत्तरेकडील काठावर साधारण २.५ एकर वर हे मंदिर पसरलेलं आहे.


मुलवर: श्री विराट्टेश्वरर, श्री योगेश्वरर

देवी: श्री ज्ञानांबिका

क्षेत्र वृक्ष: हरितागी (मराठी मध्ये हरडा वृक्ष)

पुराणिक नाव: कामदहनपुरं, कंपक्कपुरं, योगेश्वरपुरं, थिरुकुरक्कई

वर्तमान नाव: कुरक्कई

जिल्हा: नागपट्टीनं, तामिळनाडू


क्षेत्र पुराण:

पुराणांनुसार कामदेवदहन ह्या कथेशी हे स्थळ निगडित आहे. पौराणिक कथेनुसार सुरपद्मन आणि धारकन हे दोन राक्षस देव, ऋषी, गंधर्व, मनुष्य ह्यांच्यावर अत्याचार करत होते. त्यांना वरदान मिळालं होतं कि त्यांचा वध फक्त भगवान शिवांच्या पुत्राच्या हातूनच होईल. ध्यानमग्न असलेल्या भगवान शिवांकडें सर्व देव मदतीसाठी धावले. पण त्यांना भीती होती कि भगवान शिवांच्या ध्यानामध्ये व्यत्यय आल्यास त्यांच्या क्रोधाला त्यांना सामोरं जायला लागेल. शेवटी त्यांनी श्री कामदेवांची मदत घ्यायची ठरवली. त्यांनी श्री कामदेवांना भगवान शिवांना ध्यानामधून बाहेर काढण्याची विनंती केली जेणेकरून भगवान शिवांमध्ये काम जागृत होऊन त्यांना पुत्र होईल जो राक्षसांचा वध करू शकेल. कामदेवांनी त्यांचे मदन बाण भगवान शिवांवर सोडले. भगवान शिव ध्यानामधून बाहेर आले. पण ते कामदेवांवर क्रोधीत झाले आणि त्यांनी आपले तिसरे नेत्र उघडून कामदेवांना भस्मसात केले. श्री कामदेवांच्या पत्नी श्री रतीदेवी ह्यांना खूप शोक झाला. त्यांनी भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांना श्री कामदेवांना पुनर्जीवित करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊ भगवान शिवांनी श्री कामदेवांना पुनर्जीवित केलं पण ते फक्त रतीदेवींनाच दिसतील असं सांगितलं. 


येथील शिवलिंगावर अजूनही पांच बाणांची चिन्हे दिसतात. म्हणूनच इथे भगवान शिवांचे नाव श्री कामांगनाशन तसेच श्री कामदहनमूर्ती असे आहे. ह्या मंदिराच्या आजूबाजूला अजूनही काही अशा जागा आहेत ज्या ह्या कथेशी निगडित आहेत.


जिथे श्री कामदेवांनी भगवान शिवांना ध्यानामधून बाहेर काढण्यासाठी बाण सोडायचं ठरवलं त्या जागेचं नाव कनंगपुथूर असे आहे. जिथे श्री कामदेवांनी दूध प्यायलं त्या जागेचं नाव पलकुडी असे आहे. जिथे श्री कामदेवांनी हातामध्ये बाण घेतला त्या जागेचं नाव विल्लीनूर असे आहे. जिथे त्यांनी बाण धनुष्याला लावला त्या जागेचं नाव कवलमेडू असे आहे. जिथे सर्व जणांनी बाण घ्यायला जमले त्या जागेचं नाव आहे जवनल्लूर. जिथे त्यांनी शेवटी बाण धनुष्यातून सोडला त्या जागेचं नाव मेट्टूकुरुक्काई असं आहे. 


असा समज आहे की भगवान शिवांनी इथे हरितागी ह्या झाडाखाली ध्यान केलं. मराठीमध्ये ह्या झाडाला हरडा झाड म्हणतात. तमिळमध्ये ह्या झाडाला कडुक्कई म्हणतात. म्हणून भगवान शिवांचं येथे श्री योगेश्वरर असे नाव आहे. असा समज आहे की भगवान शिव ध्यानात असताना त्याच्या नयनांतून आनंदाश्रू बाहेर पडले आणि ते पळवरु नदीत मिसळले. ह्या नदीला आता ज्ञानतीर्थ असे नाव आहे. 


श्री कुरुक्कई विनायकांचे पुराण:

तामिळ मध्ये कई म्हणजे जमीन आणि कुरुकी म्हणजे आकसणे. तिर्थवाहू नावाचे ऋषी श्री गंगेला आवाहन करून विविध शिव मंदिरांमध्ये भगवान शिवांची आराधना करायचे. ते जेव्हां इथे आले तेव्हां त्यांना गंगा प्राप्त नाही झाली कारण इथे शुलतीर्थ हे जास्त पवित्र मानलं जात होतं. जेव्हां त्यांनी गंगेचे पाणी आणण्याचा प्रयत्न केला तेव्हां त्यांचे हात आकसले. जेव्हां त्यांनी श्री विनायकांच्या कृपाप्रसादाने भगवान शिवांची आराधना केली तेव्हां त्यांचे हात मूळ स्थितीमध्ये आले. म्हणून ह्या स्थळाला कुरुक्कई नाव प्राप्त झालं. आणि श्री विनायकांना श्री कुरुक्कई असं नाव प्राप्त झालं कारण त्यांचे हात खूप छोटे आहेत. श्री विनायकांच्या मूर्ती शेजारी तीर्थवारू ऋषींची मूर्ती आहे. 


मंदिराबद्दल माहिती:


साधारण १५०० वर्षे जुनं असलेलं येथील शिव लिंग स्वयंभू आहे. मंदिर पश्चिमाभिमुख आहे. ह्या मंदिराला दोन परिक्रमा आणि पांच स्तरांचं राजगोपुर आहे. येथील शिलालेखांमध्ये चोळा आणि विजयनगर साम्राज्यातल्या राजांनी केलेल्या कामाची माहिती आढळते. गाभारा अर्धवर्तुळाकार तलावाच्या रूपात आहेत. तामिळ मध्ये ह्याला अगळी असं म्हणतात. गाभाऱ्यासमोर असलेल्या मंडपाचा आकार वटवाघुळाच्या कपाळासारखा आहे. तामिळ मध्ये वटवाघूळाला वव्वल असं म्हणतात तर कपाळाला नेथी असं म्हणतात. म्हणून ह्या मंडपाला वव्वल-नेथी-मंडप असे म्हणतात. 


मंदिरामधल्या मुर्त्या आणि इतर देवालये:

शिव लिंगाच्या मुळाला कमळ पुष्प स्थापित केले आहे. 


श्री मन्मद (कामदेव) आणि त्यांच्या पत्नी श्री रतीदेवी ह्यांच्या इथे उत्सवमुर्त्या आहेत. श्री गणेशांना इथे कुरुंगाई (छोटे हात असलेला) असे नाव आहे. भगवान शिवांची  इथे श्री कामदहन नावाची मूर्ती आहे. त्यांचा उजवा पाय  मोकळा आहे तर डावा पाय मांडीवर दुमडलेला आहे. उजवा हात अभय मुद्रेमध्ये आहे तर डावा हात डाव्या पायावर स्थित आहे. भगवान शिव येथे अनुग्रह मूर्ती आहेत. श्री कामदहन मूर्ती स्वतंत्र देवालयामध्ये आहे. श्री पार्वती देवींचे पण स्वतंत्र देवालय आहे. श्री गणेशांच्या देवालयावर गजपृष्ठ गोपुरं (विमान) आहे. भगवान विष्णूंचे इथे श्री सोहा हरेश्वरर (सोहा म्हणजे दुःख) असे नाव आहे. असा समज आहे की भगवान विष्णू त्यांच्या पुत्राचे म्हणजेच श्री कामदेवांचे दहन झाल्याने शोकमग्न झाले. भगवान विष्णूंचे इथे स्वतंत्र देवालय आहे. ह्याशिवाय इथे श्री मुरुगन त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्यासमवेत, श्री महालक्ष्मी, श्री सूर्य, श्री चंद्र आणि श्री भैरवर ह्यांच्या मुर्त्या आहेत. 

कोष्टामध्ये श्री महागणपती, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म, श्री दुर्गा देवी, आणि श्री चंडिकेश्वर ह्यांच्या मुर्त्या आहेत. 


परिक्रमेमध्ये नालवर ह्यांच्या मुर्त्या आहेत. गाभाऱ्याच्या मागे श्री अन्नमलै ह्यांची मूर्ती आहे. श्री अन्नमलै ह्यांच्या दोन्ही बाजूला श्री भैरव आणि श्री विष्णू ह्यांच्या विनम्र मुद्रेमध्ये मुर्त्या आहेत. मुख्य मंदिरापासून अर्ध्या किलोमीटर्स वर विभूतीकुट्टाई नावाची जागा आहे. असा समज आहे की ह्यां स्थळी श्री कामदेवांचे दहन झाले. भगवान शिवांनी श्री नटराज रूपामध्ये इथे वीरतांडव नावाचे नृत्य केले. म्हणून इथल्या सभेला कामनाशनसभा आणि शंभूविनोथासभा अशी नावे आहेत.


ह्या मंदिरामध्ये ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री ब्रह्म, श्री विष्णू, श्री लक्ष्मी देवी, श्री मुरुगन आणि श्री रतीदेवी


मंदिरामध्ये साजरे होणारे सण:

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): ३ दिवसांचा अरुद्र उत्सव

मासी(फेब्रुवारी-मार्च): १० दिवसांचा कामदहन उत्सव, माघ नक्षत्र उत्सव, महाशिवरात्री उत्सव, पंच मूर्तींची रथयात्रा

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

कार्थिगई (ऑक्टोबर-नोव्हेंबर): सोमवारी रात्री विशेष पूजा केली जाते आणि गाभाऱ्यामध्ये यंत्र पूजा केली जाते.

आडी (जुलै-ऑगस्ट): पुरम उत्सव

पंगूनी (मार्च-एप्रिल): उथिरम उत्सव, महाशिवरात्री, अमावास्येची प्रदोष पूजा


पोंगल, तामिळ नववर्ष  आणि इंग्लिश नववर्ष ह्या दिवशी विशेष पूजा केली जाते. 


भाविक जन येथे अपत्य प्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ करतात.


हे वर्गदोषांसाठी परिहार स्थळ आहे.


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):



ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

Monday, July 15, 2024

Saptasthanam Shiva temples of Naagapatteenam, TN

There are 7 Shiva temples around Naagapatteenam which are known as Sapta sthana Shiva temples of Naagapatteenam. They are

1) Shri Nandinatheshwarar temple, North-poigainallur (Naagapatteenam Valankanni road)

2) Shri Kadambavananathar temple at Pappakovil 

3) Shri Navaneedhishwarar temple at Sikkal (Poravacheri) Naagapateenam road.

4) Shri Kaayarohanswami temple at Palur in Nagapateenam.

5) Shri Thirumeniazhagar temple at Vadakudi

6) Shri Agneeshwarar temple at Thetti

7) Shri Naganathar temple at Malakottaivasal at Nagore

In the subsequent blogs we will try to give an account of these temples.

Shri Vaidyanatheshwarar temple at Poomalai Tanjavur

This is a Shiva temple located at Kadakadappai and is one of the 7 Sapta sthanam Shiva temples of Tanjavur belonging to the Tanjavur palace devasthanam. 

Mulavar: Shri Vaidyanathar

Devi: Shri Balambika

There are 2 entrances and 2 mandaps. One to the mulavar shrine, and other to the devi’s shrine.

Koshtamurtis: Shri Dakshinamurti, Shri Lingotbhavar

Not much of the details are available about this temple. In the inner mandap we come across Shri Surya, Shri Shaneeshwar and Shri Bramha. Shri Shiva is on a yogapeetha. There is a sculpture of Shri Kaumari Devi. (Courtesy from Wikipedia) We will update once we visit the temple.

Address: Shri Vaidyanatharswami temple, Poomalai, Ravuthan Street, Ramaswami Pillai nagar, Sundar Pillai nagar, Tanjavur, TN 613001

Sunday, July 14, 2024

वळूवूर येथील विराट्टेश्वरर मंदिर

अष्टविराट्ट स्थळांमधलं हे सहावं मंदिर आहे. मयीलादुथुराई-थिरुवरुर मार्गावर हे मंदिर स्थित आहे. इथे भगवान शिवांनी उन्मत्त हत्तीचा म्हणजेच गजासुराचा संहार केला. ज्या मंदिरांमध्ये नायनमारांनी शिवाची स्तुती केली त्या मंदिरांना एकत्रित पाडळ पेथ्र स्थळं म्हणतात. आणि ज्या मंदिरांचा उल्लेख ह्या स्तुतींमध्ये आढळतो त्या मंदिरांना थेवर वैप्पू स्थळं असं म्हणतात. अशा स्थळांमधलं हे स्थळ आहे. सप्त मातृकां पैकी श्री वाराही देवी ह्यांनी भगवान शिवांच्या आज्ञेवरून इथे भगवान शिवांची आराधना केली. 

प्रलयामध्ये हे मंदिर बुडालं नाही म्हणून ह्या स्थळाला वळूवूर असं नाव प्राप्त झालं. हे स्थळ चार वनांनी आच्छादलेलं आहे - पिप्पली वन, शमी वन, दारुका वन आणि बद्री वन. 


मुलवर: श्री विराट्टेश्वरर, श्री कृथीवासर, श्री गजसंहारर, श्री गजरी, श्री ज्ञानसबा

देवी: श्री बालांबिका, श्री बालगुजांबिका, श्री एलंकीयै नायकी

क्षेत्र वृक्ष: शमी, देवदार, कापुरी मदुरा (जडी)

पवित्र तीर्थ: पाताळ गंगा, पंचमुख तीर्थ

स्थळ: थिरुवळूवूर

जिल्हा: नागपट्टीनं (तामिळनाडू)

पुराणिक नाव: दारुका वन


क्षेत्र पुराण:

एकदा दारुका वनामध्ये तपश्चर्या करणाऱ्या ऋषींना अशी भावना निर्माण झाली कि त्यांच्या तपश्चर्येमुळे आता ते सहज मुक्ती मिळवू शकतील. त्यांच्या मध्ये अशी भावना निर्माण झाली कि त्यांना वाटायला लागलं कि आता त्यांना मुक्तीसाठी देवाच्या कृपेची गरज नाही. त्यांचा आणि त्यांच्या पत्नींचा अहंकार एवढा वाढला की भगवान शिवांनी त्यांना शिक्षण द्यायचा ठरवलं. भगवान शिव आणि भगवान विष्णू रूप बदलून दारुका वनात आले. भगवान शिवांनी भिक्षाटनर रूप घेतलं तर भगवान विष्णूंनी मोहिनी म्हणजेच मोहात पडणाऱ्या लावण्यवती स्त्रीचं रूप घेतलं. मोहिनीला बघून सर्व ऋषी तिच्यावर मोहित झाले तसेच भिक्षाटनरचे रूप बघून ऋषींच्या स्त्रिया त्यांच्यावर मोहित झाल्या. त्यांचं आपल्या दैनंदिन कर्तव्यामध्ये लक्ष लागेनासं झालं. भिक्षाटनर आणि मोहिनी ह्यांच्या मिलनातून श्री अय्यप्पा जन्माला आले आणि त्यानंतर भगवान विष्णू तेथून अदृश्य झाले. त्यामुळे सगळे ऋषी भिक्षाटनरवर क्रोधीत झाले. त्यांनी भिक्षाटनरचा नाश करण्यासाठी यज्ञ करून त्यातून मायावी अग्नी, वाघ, हरीण, कुऱ्हाड, साप आणि मुयालगन नावाचा राक्षस निर्माण करून ते भिक्षाटनरवर धाडले. पण ते कोणी भिक्षाटनरला हानी पोचवू शकले नाहीत. शेवटी ऋषींनी यज्ञातून उन्मत्त हत्ती म्हणजेच गजासुर निर्माण करून त्याला भिक्षाटनरला मारण्यासाठी धाडलं. भिक्षाटनर गजासुराच्या पोटामध्ये शिरले आणि ते फाडून बाहेर आले. बाहेर येताना ते ऊर्ध्व तांडव करत बाहेर आले. ऋषींना जेव्हां लक्षात आले कि भिक्षाटनर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः भगवान शिव आहेत तेव्हा त्यांना आपली चूक ध्यानात आली आणि त्यांनी भगवान शिवांकडे क्षमायाचना केली. भगवान शिवांनी येथे गजासुराचा संहार केला म्हणूनच त्यांना गजसंहार मूर्ती असे नाव प्राप्त झाले.


अजून एका आख्यायिकेनुसार श्री शनीश्वरांनी सूर्यमंडळामध्ये विक्रम राजाच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. राजा पराभूत झाला आणि इथल्या तीर्थामध्ये पडला. राजाने तीर्थामध्ये स्नान केले आणि भगवान शिवांची आराधना केली. भगवान शिवांनी त्याच्या आराधनेवर प्रसन्न होऊन त्याच्यावर कृपा केली. जेव्हा श्री शनीश्वरांना कळलं कि विक्रम राजा भगवान शिवांचा भक्त आहे तेव्हां त्यांनी भगवान शिवांकडे क्षमायाचना केली. भगवान शिवांनी त्यांना क्षमा केली पण त्यांनी श्री शनीश्वरांना एका पायाने अपंग केलं. 


अजून एका आख्यायिकेनुसार इथे ४८००० ऋषींनी तपश्चर्या केली आणि ज्ञान मिळवले. 


मंदिराबद्दल माहिती:


ह्या मंदिराला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. ह्या मंदिराची रचना बाकीच्या मंदिरांपेक्षा वेगळी आहे. इथे श्री नंदि आणि गाभाऱ्याच्या मध्ये तीर्थ (तलाव) आहे. येथील शिव लिंग स्वयंभू आहे. भगवान शिवांच्या पादकमलांचं दर्शन फक्त इथेच होतं. इथल्या तीर्थामध्ये पांच विहिरी आहेत. ह्या तीर्थाचे नाव पंचमुख किनारु विहीर असे आहे. ह्या तीर्थाचे दुसरे नाव पंचब्रह्म तीर्थ असे पण आहे. मंदिर साधारण १५०० वर्षे जुनं आहे. 


मंदिरातील इतर मुर्त्या आणि देवालये:

इथे श्री गणेशांचं श्री सेल्व-विनायक असं नाव आहे. श्री गजसंहार मूर्ती हे ह्या क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे. हि मूर्ती खूप भव्य आहे. ह्या मूर्तीमध्ये भगवान शिवांचा एक पाय गजासुराच्या डोक्यावर आहे. त्यांचा अविर्भाव गजासुराचं कातडं काढून ते परिधान करत आहेत असा आहे. ह्या मूर्तीच्या जवळ श्री पार्वती देवी बाल्य रुपातले श्री मुरुगन ह्यांना आपल्या कंबरेवर बसवून नेत आहेत अशी मूर्ती आहे. त्यांच्या चेहेऱ्यावर भय आहे आणि ह्या दृश्यापासून त्या दूर जात आहेत असा त्यांचा अविर्भाव आहे. बाल्यरूपातले श्री मुरुगन श्री पार्वती देवींना भगवान शिवांकडे म्हणजेच आपल्या पित्याकडे बोट करून तिकडे बघायला सांगत आहेत असा त्यांचा अविर्भाव आहे. चिदंबरम मंदिराप्रमाणे इथे पण गजसंहार मूर्तीच्या मागे यंत्र स्थापित केले आहे. ज्या मंडपात श्री गजसंहार मूर्ती आहे त्याचे नाव ज्ञानसबा असे आहे. भगवान शिवांनी इथे ऊर्ध्व तांडव नृत्य केले. श्री शनीश्वरांचे स्वतंत्र देवालय आहे. ते धनुष्यबाण घेऊन उभे आहेत असा त्यांचा अविर्भाव आहे. गाभाऱ्याच्या समोरील तीर्थाचे नाव पाताळ गंगा किंवा ईशान तीर्थ असे आहे. मुलवर मूर्तीच्या हातात अत्यंत आकर्षक आणि सुंदर नागभुषण आहे. गाभाऱ्याच्या भिंतींवर अष्टविराट्ट कथा भित्तिचित्रांवर चित्रित केल्या आहेत. जवळ जवळ १० शिळांवर विविध माहिती कोरलेली आहे. इथे श्री वीरभद्रांचे श्वान हे वाहन आहे. असा समज आहे कि ते भगवान शिव आणि मोहिनी रुपातले भगवान विष्णू ह्यांचा पुत्र श्री अय्यप्पा ह्यांचे रक्षण करण्यासाठी येथे आले. ह्या मंदिराला ध्वजस्तंभ आहे. 


मंडपामध्ये ६३ नायनमारांच्या मुर्त्या आहेत. तसेच श्री गजलक्ष्मी, श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्या समवेत श्री मुरुगन ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. परिक्रमेमध्ये श्री सूर्य, श्री चंद्र, श्री शनी आणि श्री भैरव ह्यांच्या मुर्त्या आहेत. इथे स्वतंत्र नवग्रह संनिधी आहे. 


मंदिरात साजरे होणारे सण:

मासी (फेब्रुवारी-मार्च): मघा नक्षत्रावर १० दिवसांचा गजसंहार उत्सव. प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी पूजा करून मूर्तींची मिरवणूक काढली जाते. ९व्या दिवशी श्री गजसंहार मूर्तीची मिरवणूक निघते. १०व्या दिवशी “तीर्थवारी” नावाचा उत्सव साजरा होतो ज्यामध्ये तीर्थामधल्या मंडपामध्ये देवांना त्यांची पूजा करण्यासाठी नेले जाते

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): ३ दिवसांचा अरुद्र दर्शन उत्सव साजरा होतो. 

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री उत्सव

कार्थिगई (ऑक्टोबर-नोव्हेंबर): सोमवारी रात्री विशेष पूजा केली जाते आणि गाभाऱ्यामध्ये यंत्र पूजा साजरी होते

आडी (जुलै-ऑगस्ट): पुरम उत्सव

पंगूनी (मार्च-एप्रिल): उथिरम उत्सव, महाशिवरात्री, अमावस्या प्रदोष पूजा


पोंगल च्या वेळेस इथे विशेष पूजा केली जाते तसेच तामिळ नववर्ष आणि इंग्लिश नववर्षदिनी पण विशेष पूजा केली जाते. 


भाविक जन इथे अपत्यप्राप्ती आणि विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करतात. असा समज आहे की इथल्या यंत्राची पूजा केल्याने वाईट शक्ती आणि वाईट करणींच्या परिणामांवर मात करता येते. मनःशांतीसाठी भाविक जन इथे श्री कृथीवासर ह्यांची पूजा करतात.


Shri Kailashnathar temple at Mariamman kovil at Punnainallur in Tanjavur

This Shiva temple is one the seven Sapta sthana temples of Tanjavur. It is located at Punnainallur near Tanjavur. It is one of the 88 Tanjavur Palace Devasthana temples. It is located to the south of the famous Punnainallur Maariamman temple. This temple was rebuilt by the Maratha king Shri Vyankoji maharaj of Tanjavur. The present structure is about 500 years old. This is a very small beautiful temple. 

Mulavar: Shri Kailashnathar

Devi: Shri Kalyansundari

Koshtamurtis: Shri Ganesha, Shri Dakshinamurti, Shri Bhairava, Shri Bramha & Shri Durga Devi.

To the left of Shri Shiva’s shrine, we find the shrine of Shri Kalyansundari Devi. In the parikrama we find the shrines and idols of Shri Ganesha, Shri Aiyappa, Shri Subramanya with his consorts, Shri Gajalakshmi Devi, Shri Anjaneya, Navagrahas, Shri Shaneeshwar, Shri Bhairava, Shri Surya and Shri Chandra.

We will post further details once we visit this temple.

Address: Shri Kailashnathar temple, Naagpateenam road, Near Maariammankovil, 

Phone: + 91-4362267740