Friday, October 26, 2018

Importance of Puranas

This article is a simple summary of an article in Tamil Spiritual magazine Dhyanabhoomi written by Dr Sheshadrinathan Shastry in 1991.

The main aim of Vedas was, for the people to have peaceful and happy life. In order that the principles involved in Vedas reach one and all at an early age, small stories explaining them were created. This forms basis of puranas. Hence we find that these stories tell a moral and spiritual value in a simple way. During the stage of young children these may be just stories but the same stories when read in an adult age makes us realize and understand the principles, teachings and moral values involved in them. As we become older, these values take a deep root in our mind as we have been listening them as stories from a very early age.

If we take the theory of evolution, Darwin explains the stages in which the evolution took place. 1st stage of evolution starts from water; 2nd stage starts from aquatic animals like fish in water; then animals like tortoise which can live on land and water came into existence and in the 3rd stage animals like wild boar which can live in water and land which is very close to the water and in 4th stage they developed into animals like monkey. Finally Darwin concludes human beings were evolved from apes.

This is stated as a finding by Darwin in the recent past.

But when we glance through the Vedas, we come across an analogy to this Darwin’s theory. Thus we can conclude that Darwin's findings from his research were already present in Vedas and puranas.

For example let us look at Dashavatars - ten incarnations of Lord Vishnu. The order of Dashavatars is  – Matsya, Kurma, Varaha, Narsimha, Vaman, Parshuram, Balaram, Sriram, Krishna and Kalki.

According to purana, Bramha created water first. Hence first avatar represents Matsya (fish). 2nd is Kurma avatar which explains the 2nd stage where the animal lives on land and water. The 3rd avatar is Varaha which corresponds to wild boar which can stay on land and very close to water. The 4th avatar is Narasimha which is half animal and half human which indicated of more animal instincts. In this part the brain functions like an animal whereas physical part is human i.e. intellectual power is not developed fully. In the next avatar i.e. Vaman avatar, the animal part disappears completely and we find that the body part is developed but with childishness. In the Parashuram avatar the brain functions under the command i.e. it has not developed the power of discretion. He obeys the order of father and chops of the head of his mother without any thought i.e. obeys order. In Balaram avatar the indecision follows to a lesser extent. When we come to Ram avatar, we find the full development with the coordination of brain and action and full of Satva guna. Finally in the Krishna avatar there is full development of the human being. It shows intelligence and atma chintan. In this avatar the intelligence is to such an extent that he gives upadesh to other human beings. This shows how the puranas have indicated the evolution of human beings before it was told as a theory of evolution by Darwin.

Similarly to Dashavatar we have an analogy of fetus from the conception till birth. The fetus is formed in the liquid (water). Then it is similar to a worm (fish). Then slowly it develops small limbs like a human. In the 8th month it develops all the human organs. Finally in the 10th month, it is fully developed at the time of birth, similar to Dashavatar. Before Darwin’s theories, they have explained this phenomenon as Garbhavas. 

Thus as elders we should understand the Tatva (principles), moral values from Puranas and explain them to youngsters in simple way. We must not dismiss the stories in Puranas as mere stories. We must consider them to be as guidelines for living, teaching of basic qualities and moral values.

Wednesday, October 17, 2018

नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - भाग ५

"नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - भाग ५" - सौ. उत्तरा धनंजय गोगटे


देवीचे आठव्या दिवशीचे रुप

८. देवी महागौरी

श्र्वेते वृषे समारूढा श्र्वेताम्बरधरा शुचि:।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।।

चंद्र किंवा शंखाप्रमाणे गौरवर्ण असलेली देवी महागौरी. देवी शुभ्र वस्त्रे परिधान करून तीचे वाहन असणार्या  पांढर्या  बैलावर स्वार आहे.

अती गौर वर्णामुळे हिचे नाव महागौरी पडले आहे. अशी आख्यायिका आहे की अती कठोर तपाने काळ्या पडलेल्या देवीँला श्रीशंकरानी गंगाजलाने धुवून स्वच्छ केले. तेंव्हा विद्युल्लतेप्रमाणे प्रकाशमान असा हा गौरवर्ण तीला प्राप्त झाला. 

हे देवीचे रुप आठ वर्षीय बालिकारुप मानले गेले आहे. देवीच्या विविध रुपांत हे बालिकारूप समाविष्ट केले आहे. सर्वच वयातील आणि सर्व रुपातील स्त्रीशक्तीचेच महत्त्व नाही का ?

नवरात्राच्या आठव्या दिवशी हिची उपासना होते. देवीच्या अमोघ शक्तीने भक्तांचे जन्मजन्मांचे पापक्षालन होते. भविष्यातही कुठल्या प्रकारच्या पाप,  संताप किंवा दुःखाची बाधा भक्तांना होत नाही. देवीच्या क्रुपेने अलौकीक सिद्धींची प्राप्ती होवून साधक सर्व प्रकारे पुण्यवान आणि पवित्र होतो. त्याला सदैव सत्याचीच प्रेरणा मिळून असत्याचा विनाश होतो.

देवीचं हे रुप बालिकेचं आहे. लहान मुलीसारखच पवित्र आणि निर्मळ. शुभ्र वस्त्रे, शुभ्र व्रुषभ हे वाहन, शुभ्र गौरवर्ण ही सर्व ह्या निर्मळतेचीच प्रतिके.

देवी महागौरीच्या क्रुपेने आपणासही शुचीपूर्ण जीवन लाभो आणि आपणास सर्व प्रकारच्या पुण्यांची प्राप्ती होवो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

Tuesday, October 16, 2018

नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - भाग ४

"नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - भाग " - सौ. उत्तरा धनंजय गोगटे

देवीचे सातव्या दिवशीचे रुप

७. देवी कालरात्रि  

एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलभ्यक्तशरीरिणी॥
वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी।।

सर्व दुर्गारुपात सर्वात उग्र रुप आहे - देवी कालरात्रि. क्रुष्णा म्हणजे काळा रंग असलेली, केस अस्ताव्यस्त,  गळ्यात वीजेप्रमाणे तळपती माळ धारण केलेली आणि गाढव हे वाहन असणारी भयंकारी देवी कालरात्रि. आपल्या भक्तांना मात्र कायम शुभ फलदायिनी आहे.

देवी कात्यायनीची पूजा नवरात्राच्या सातव्या दिवशी केली जाते. ह्या दिवशी साधकाचे मन सहस्त्रधार चक्रावर स्थीत असावे. ह्यामुळे साधकाला समस्त सिद्धींचे द्वार खुले होते. सर्व पापांचा नाश होवून साधकाला पुण्यलोकाची  प्राप्ती होते.

देवी कात्यायनीचं हे भयप्रद रूप इतर रूपांपेक्षा पूर्णतः वेगळं आहे. कदाचित सर्व भयांचाच समूळ नाश करण्यासाठी म्हणून देवीने स्वतः च एक भयंकर रूप धारण केले असावे.

देवी कालरात्रि ही दुष्ट शक्तींचा आणि भयाचा विनाश कळण्यासाठीच अवतरली आहे. जल, अग्नी, शत्रु, जन्तु, रात्र ह्यातील कुठलेच भय भक्तांना देवी कात्यायनीच्या उपासनेने उरत नाही. देवीकृपेने तो संपूर्ण भयमुक्त होतो.

काया, वाचा मनोभावे आणि यम, नियमांचे पालन करून देवी कालरात्रिची उपासना करणार्या भक्तांना मिळणार्या शुभफळांची गणतीच होणार नाही.

देवी कात्यायनीच्या उपासनेने भक्तांच्या सर्व ईच्छा पूर्ण होवून सर्वांना शुभ फळाची प्राप्ती होवो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

Monday, October 15, 2018

नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - भाग ३

"नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - भाग ३" - सौ. उत्तरा धनंजय गोगटे

देवीचे सहाव्या दिवशीचे रुपे 

६. देवी कात्यायनी

चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना।
कात्यायनी शुभं दद्यादेवि दानवघातिनी॥॥

देवीचे सहावे रूप आहे कात्यायनीकत नामक ऋषीकुलात कात्यायन ऋषींची प्रार्थना स्विकारुन त्यांची पुत्री म्हणून जन्म घेणारी - कात्यायनी.

कालिन्दी तटावर श्रीक्रुष्णाकडून आपला उद्धार व्हावा ह्या हेतूने गोपींनी कात्यायनी देवीची उपासना केली. तेव्हापासून ब्रजवासींची ईष्टदेवता म्हणून हिची स्थापना झाली. देवीचे रूप अतिशय भव्य-दिव्य असे आहे. देवीची कांती सुवर्णासमान प्रकाशमान आहे. चतुर्भुजा देवीच्या चार हातांपैकी उजवा एक हात वरमुद्रेत आणि एक अभय मुद्रेत आहे. तर डाव्या एका हातात तलवार आणि एका हातात कमळ आहे.

देवीचे वाहन सिंह आहे. देवी कात्यायनीची पूजा नवरात्राच्या सहाव्या दिवशी केली जाते. ह्या दिवशी साधकाचे मन आज्ञा चक्रावर स्थीर असावे. ह्या चक्राचे योगसाधनेतील महत्त्व अनन्य साधारण आहे. आज्ञा चक्रावर स्थीर अवस्थेत साधक देवीला सर्वस्व अर्पण करून संपूर्ण शरणागतीने स्वतःला समर्पित करतो. आणि ह्या साधनेचे फळ म्हणजे साधकाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अश्या चारही फळांची प्राप्ती होते. 
देवी कात्यायनीच्या भक्तांची रोग, चिंता आणि सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्तता होते.

सिंहावर आरुढ झालेली देवी कात्यायनी भक्तांच्या सर्व दुःखांचा नाश करुन भक्तांना निर्भय करतेच आणि संपन्नतेसाठी वर प्रदान करते. देवी कात्यायनीच्या उपासनेने भक्तांच्या सर्व ईच्छा पूर्ण होवून सर्वांना निर्भयता आणि संपन्नता लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

Sunday, October 14, 2018

नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - 2

"नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - भाग २" - सौ. उत्तरा धनंजय गोगटे

देवीची चौथ्या आणि पाचव्या दिवशीची रुपे 

४. देवी कूष्माण्डा

सुरासम्पूर्णकलशम् रुधिराप्लुतमेव च।
दधाना हस्तपद्माभ्याम् कूष्माण्डा शुभदास्तु मे।।

स्रुष्टीच्या निर्मितीच्याही आधी हिचे अस्तित्व मानले जाते. आपल्या मंद हास्यातून संपूर्ण स्रुष्टी निर्माण करणारी आदिमाया आदिशक्ती - देवी कूष्माण्डा. 

आठ हात असलेली ही अष्टभूजा. आठ हातात अनुक्रमे कमण्डलु, धनुष्य, बाण, कमळ, अम्रुतकलश, चक्र, गदा आणि जपमाळ आहे.

किती परिपूर्ण असं हे रूप आहे नाही का? एकाच वेळी विविध शस्त्रे - शौर्याचं प्रतिक, कमलपुष्प - कोमलता आणि सम्रूद्धीचं प्रतिक, कलश - दीर्घायुष्य आणि मांगल्याचं प्रतिक, आणि जपमाळ हे योगाचं प्रतिक. 

देवीचे तेज अतुलनीय आहे.  ब्रम्हांडातील सर्वच तेजाचा स्त्रोत कूष्माण्डादेवी आहे. असं म्हणतात की प्रत्यक्ष सूर्यमंडलाचा गाभा हीचे  निवासस्थान आहे. येवढे तेज इतर कुणाचेही अगदी सूर्याचेही नाही.

नवरात्राच्या चवथ्या दिवशी हिची उपासना होते आणि साधक आपले मन अनाहत चक्रावर एकाग्र करतात. अत्यंत तेजोमयी असणारी कूष्माण्डा भक्तांचे मनोरथही अती शिघ्रतेने पुरवते. आई कूष्माण्डेच्या उपासनेने भक्तांच्या सर्व रोग आणि दुःखांचा विनाश होतो. हीची उपासना आयुरारोग्य, यश आणि बल, शक्ती असे  फळ देणारी आहे. देवी कूष्माण्डेच्या क्रुपेने आपले आयुष्य सर्व व्याधिमुक्त आणि सुखसम्रुद्धीने युक्त होवो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

५. देवी स्कन्दमाता

सिंहासनगता नित्यम् पद्माश्रितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी।।

स्कंद म्हणजे कार्तिकेय. अत्यंत पराक्रमी,  देवगणांचा सेनापती स्कंद. आणि त्याची माता म्हणून स्कंदमाता. स्वतःच्या  मुलाच्या नावाने प्रसिध्द असे हे मात्रुरुप. ह्या मात्रुरुपात देवी चतुर्भुजा असून आपल्या एका हाताने बालस्कंदाला धरले आहे. दुसऱ्या आणि आणि तिसऱ्या हातात कमलपुष्प असून एक हात वरमुद्रा स्थितीत आहे. ही पद्मासना असून सिंह हे देवीचे वाहन आहे.

स्कन्दमातेची पूजा नवरात्राच्या पाचव्या दिवशी केली जाते. ह्या दिवशी साधकाचे मन विशुध्द चक्रावर स्थीर  असावे. ह्या अवस्थेतील साधकाच्या समस्त चित्तव्रुतींचा लोप होवून मन विशुध्द आणि सर्व बंधनातून मुक्तीचा अनुभव घेते.

अशी ही सिंहासनी, पराक्रमी रणरागिणी, हातातील कमळाने कोमलतेची आणि बालस्कंदाच्या अस्तित्वाने हळव्या तरीही कर्तव्यकठोर आणि वत्सल मात्रुशक्तीची प्रत्यक्ष मूर्ती नव्हे का?

स्कन्दमातेच्या उपासनेने भगवान कार्तिकेयाचीही उपासना आपसूकच घडते आणि हा घोर भवसागर पार करण्याचा मार्ग अधिक सुलभ होतो.

देवी स्कन्दमातेच्या उपासनेने भक्तांच्या सर्व ईच्छा पूर्ण होवून सर्वांना शांती आणि सुखसमाधान लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

Saturday, October 13, 2018

नवरात्रीमधले कुमारीकापूजन

दुर्गादेवीच्या आराधनांमध्ये नवरात्रीमधील आराधनेला विशेष महत्व आहे. ह्या आराधने मध्ये दोन महत्वाच्या पूजा आहेत - कुमारीका पूजन आणि सुवासिनी पूजन.

अंबिकेची कृपा प्राप्त होण्यासाठी बाला त्रिपुरसुंदरीची उपासना श्रेष्ठ मानली जाते. हे तात्पर्य आपल्याला ललितासहस्रनामामधील पुढील ओवीमुळे कळते.

“भण्डपुत्र वधोद्युक्त बालाविक्रमनन्दिता” - बाला ही ललितादेवीची पुत्री. आपल्या आईने खूप थांबवण्याचा करून पण ९ वर्षाच्या बाला त्रिपुरसुंदरीने युद्धभूमीवर जाऊन भंडासुराच्या सर्व पुत्रांचा नाश केला. म्हणूनच अशा ह्या पराक्रमी पुत्रीचे पूजन केले जाते.

नवरात्रीमध्ये आपल्या ऐपतीनुसार ९ दिवसांत ९ कुमारिकांचे पूजन केले जाते. कुमारिकांचं वय २ ते १० मध्ये असायला हवं.

कुमारीकापूजनाचा विधी:

मंगलस्नान
प्रथम कुमारीकेला आसनावरती (पीठावरती) बसवून प्रथम तिला मंगल स्नान घालावे.
वस्त्रार्पण
नंतर तिला नवीन वस्त्र परिधान करून, अलंकार करून, अलंकारांनीं सुशोभित केलेल्या पाटावर बसवावे
पुष्पाभिषेक
नंतर कुमारीकेला पुष्पाभिषेक करावा

अभिषेक मंत्र
ॐ क्लीं कुलकुमारीकायै नमः पाद्यं समर्पयामि - पायावर पाणि वहायचं
ॐ क्लीं कुलकुमारीकायै नमः अर्घ्यं समर्पयामि - हातावर पाणि वहायचं
ॐ क्लीं कुलकुमारीकायै नमः अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि  - हातावर तीन वेळा पाणि वहायचं
ॐ क्लीं कुलकुमारीकायै नमः वस्त्रं समर्पयामि - नवीन वस्त्र अर्पण करावीत
ॐ क्लीं कुलकुमारीकायै नमः गन्धं समर्पयामि - गन्ध लावायचं
ॐ क्लीं कुलकुमारीकायै नमः भूषणादि समर्पयामि - अलङ्कार अर्पण करायचे
ॐ क्लीं कुलकुमारीकायै नमः पुष्पाणि समर्पयामि - पुष्प अर्पण करायचं

षोडशोपचार

*प्रत्येक दिवशी त्या त्या देवीचा मंत्र म्हणावा

दिवस १) ॐ शैलपुत्र्यै नमः
दिवस २) ॐ ब्रह्मचारिण्यै नमः
दिवस ३) ॐ चन्द्रघण्टायै नमः
दिवस ४) ॐ कुष्माण्ड्यै नमः
दिवस ५) ॐ स्कन्दमात्रे नमः
दिवस ६) ॐ कात्यायन्यै नमः
दिवस ७) ॐ कालरात्र्यै नमः
दिवस ८) ॐ महागौर्यै नमः
दिवस ९) ॐ सिद्धिदात्र्यै नमः  
नंतर कुमारीकेचं षोडशोपचारांनी पूजन करावं. डावीकडल्या रकान्यामधील सूचनेनुसार प्रत्येक दिवशी त्या त्या दिवशीच्या देवीचे मंत्र म्हणावेत. उदाहरणार्थ पहिल्या दिवशी सर्व उपचार प्रत्येक उपचाराच्या सुरुवातीला ॐ शैलपुत्र्यै नमः जोडून करावेत. तसेच दुसऱ्या दिवशी सर्व उपचार ॐ ब्रह्मचारिण्यै नमः मंत्र जोडून करावेत.

षोडशोपचार:
ॐ शैलपुत्र्यै* नमः ध्यायामी - कुमारीकेमध्ये शैलपुत्रीचे ध्यान करावे

ॐ शैलपुत्र्यै नमः आवाहयामि - कुमारीकेमध्ये शैलपुत्रीचे आवाहन करावे
ॐ शैलपुत्र्यै नमः आसनं समर्पयामि - कुमारीकेला आसनावर बसवावे
ॐ शैलपुत्र्यै नमः पाद्यं समर्पयामि - कुमारीकेचे पाय धुवावेत
ॐ शैलपुत्र्यै नमः अर्घ्यं समर्पयामि - कुमारीकेच्या हातावर पाणी वहावं
ॐ शैलपुत्र्यै नमः स्नानं समर्पयामि - कुमारीकेला स्नान घालावं

ॐ शैलपुत्र्यै नमः स्नानानन्तरं आचमनीयं समर्पयामि - कुमारीकेला तीन वेळा पाणी अर्पण करावं

ॐ शैलपुत्र्यै नमः गन्धं धारयामि - कुमारीकेला गंध लावावं

ॐ शैलपुत्र्यै नमः हरिद्रा कुंकुमं समर्पयामि - कुमारीकेला हळद कुंकुम लावावं

ॐ शैलपुत्र्यै नमः वस्त्रं समर्पयामि - कुमारीकेला वस्त्र अर्पण करावं
 
ॐ शैलपुत्र्यै नमः पुष्पमालां समर्पयामि - कुमारीकेला पुष्पांचा हार अर्पण करावा

ह्यानंतर खाली दिलेल्या प्रत्येक नावांनी पुष्पार्चन करावं (पुष्प वहावं)

ॐ क्लीं कौमार्यै नमः
ॐ क्लीं त्रिपुरार्यै नमः
ॐ क्लीं कल्याण्यै नमः
ॐ रोहिण्यै नमः
ॐ कामिन्यै नमः
ॐ चण्डिकायै नमः
ॐ शाङ्कर्यै नमः
ॐ दुर्गायै नमः
ॐ सुभद्रायै नमः

ह्यानंतर उर्वरित उपचार म्हणजे धुप, दीप, नैवेद्य करावेत

ॐ शैलपुत्र्यै नमः धूपं समर्पयामि - कुमारीकेवरून अगरबत्ती ओवाळावी

ॐ शैलपुत्र्यै नमः दीपं समर्पयामि - कुमारीकेवरून निरांजन ओवाळावे
ॐ शैलपुत्र्यै नमः नैवेद्यं समर्पयामि - कुमारीकेला जेवण घालावं


जेवण झाल्यावर कुमारीकेवरून आरती ओवाळावी

पूजा समाप्त करताना ॐ तत् सत् ब्रह्मार्पणमस्तु म्हणून पाणि ताम्हणात सोडावे.


ही पूजा पद्धत दक्षिणेकडे प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकेमधील लेखावर आधारित आहे. नियतकालिकाचे नाव “ज्ञानआलयं” म्हणजे ज्ञानाचे देऊळ (ऑक्टोबर १९९९).   

Friday, October 12, 2018

नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - १

आपल्या संस्थेचे ट्रस्टी श्रीयुत धनंजय गोगटे ह्यांच्या पत्नी सौ. उत्तरा धनंजय गोगटे ह्यांनी नवरात्री निमित्ताने लिहिलेला जगन्मातेच्या विविध रुपांची माहिती देणाऱ्या लेखमालेतील हा पहिला लेख.

"नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव" - सौ. उत्तरा धनंजय गोगटे

दुर्गेची तीन मुख्य रूपे महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी ह्यांच्या महापूजेचा उत्सव. हिंदू धर्मातील सर्वच शाखांमधे कुठल्या ना कुठल्या प्रकारात ह्या शक्तीरुपाची उपासना आढळते.

देवी पार्वतीने दुष्टांचा संहार करण्यासाठी विविध दुर्गारुपे धारण केली. देवी भागवत ह्या ग्रंथात समग्र देवीचरित्र संग्रहीत केले आहे.

देवी पार्वतीचे वर्णन अल्लड बालिका, ध्येयासक्त प्रेमिका, परिपूर्ण, संयत, कुटुंबवत्सल ग्रुहिणी, पत्नी, माता आणि अंतिमतः संपूर्ण शक्तीरुप अश्या विविधरुपात आले आहे.

दुष्टशक्तींपुढे इतर सर्व देवता निष्प्रभ ठरल्यावर आणि सर्व सामान्यांप्रमाणे त्यांची त्राही माम् ही स्थिती आल्यावर  ही कोमलांगी आपले शांतरुप झुगारून कठोर दुर्गारूप धारण करते. घरादाराला सम्रुद्धी आणणारी ही अष्टलक्ष्मी त्यासाठी नवदुर्गारूप धारण करते. हाती शस्त्र घेत सतत अविश्रांत लढून असूरांचा समूळ नाश करूनच थांबते.

दुष्टांचे निर्दालन करताना सहनशीलता सोडून, हाती शस्त्र धरावे आणि हार न स्विकारता सर्व शक्तीनिशी प्रतिकार  करावा आणि त्यांचे निर्दालन करावे हीच शिकवण आई जगदंबा आपल्याला देत आहे. आई अंबाबाई आपणासही शक्ती प्रदान करो ही प्रार्थना.

नवरात्रीच्या निमित्ताने आईच्या विविध रूपांची माहिती करुन देण्याचा हा एक प्रयत्न.  


१. शैलपुत्री

वन्दे वान्छीतलाभाय चन्द्रार्धक्रुतशेखराम्।
व्रुषारुढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्।।

आई जगदंबेच पहिलं  दुर्गारूप आहे - शैलपुत्री.

व्रुषभावर आरुढ, एका हातात त्रिशूल आणि दुसर्या हातात कमळ धारण केलेल्या रुपातील हीचे वर्णन मनोवान्छीत फळ देणारी असे आहे.

हिमालयाची कन्या म्हणून हिचा अवतार असल्याने नाव आहे शैलपुत्री. पती श्रीशंकराचा पित्रुग्रुही झालेला अवमान सहन न होवून सतीने योगाग्नीद्वारे देहत्याग केला. आणि पुढील जन्मी  हिमालयाच्या घरी जन्म घेतला. ह्या जन्मीसुद्धाघोर तप करून पती म्हणून श्रीशंकराची प्राप्ती करून घेतली. अतिशय भावूक पण मानी, कोमल पण कठोर, ईप्सित सिद्धीसाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देणारी ही शैलपुत्री.

नवरात्रीच्या उपासनेला शैलपुत्रीच्या पूजनाने प्रारंभ होतो. या उपासनेत योगी मूलाधार चक्रावर मनाला स्थित करून त्यांच्या योगसाधनेस प्रारंभ करतात. शैलपुत्रीक्रुपेने आपणा सर्वांचे मनोवांछीत साध्य होवो हीच आई जगदंबेकडे प्रार्थना.

२. ब्रम्हचारिणी

दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलू ।
देवी प्रसिदतु मयि ब्रम्हचारिण्यनुत्तमा।।

आई दुर्गेच दुसरं रूप आहे ब्रम्हचारिणी. ब्रम्ह शब्दाचा अर्थ आहे - तप. तपाचरण करणारी -  ब्रम्हचारिणी।
"वेदस्तत्वं तपो ब्रम्ह" अस म्हटलच आहे. वेद, तत्व आणि तप म्हणजे ब्रम्ह.

देवीच्या उजव्या हाती जपमाळ आणि डाव्या हाती कमण्डलु आहे. श्री शंकर पती हेच लाभावे म्हणून पार्वतीदेवीने कित्येक हजार वर्षे कठोर तप केले. असे तप कुणालाही कधीही शक्य झाले नाही. अभूतपूर्वच असे हे पुण्यकृत्य केवळ देवीलाच शक्य झाले.

देवीचे हे रूप भक्तांना आणि साधकांना अनन्त फळे देणारे आहे. हिच्या उपासनेमुळे तप, त्याग, वैराग्य , सदाचार आणि संयमाची व्रुद्धी होते. 

नवरात्रातील दुसर्या दिवशी हिचे पूजन होते. साधकाचे मन स्वाधिष्टान चक्रावर स्थीत असते. ज्यायोगे आपल्याला क्रुपा आणि भक्ती प्राप्त करता येते. 

आई ब्रम्हचारिणी क्रुपेने जीवनातील कठीण क्षणांतही विचलीत न होण्याचे धारिष्ट्य आणि मन कर्तव्य मार्गावरच एकाग्र करण्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होवो हीच प्रार्थना.

३. देवी चन्द्रघण्टा

पिण्डजप्रवरारूढा चन्दकोपास्त्रकैर्युता।
प्रसादं तनुते मह्यम् चन्द्रघण्टेति विश्रुता॥

मस्तकावर अर्धचन्द्र धारण करणारी आणि घण्टानाद करीत आगमन करणारी ती चन्द्रघण्टा। सुवर्णकांती असलेली, दशभूजा आणि दहाही हात विविध अस्त्रांनी विभूषित असणारी माता चन्द्रघण्टा हिचे वाहन आहे सिंह आणि मुद्रा युध्दाला तयार असलेली तरीही सौम्य अशी आहे.

नवरात्रीच्या तिसर्या दिवशी हिची उपासना होते आणि साधक आपले मन मणिपूर चक्रावर एकाग्र करतात. युध्दासाठी तत्पर असणारी ही चन्द्रघण्टा भक्तांचे मनोरथही शिघ्रतेने पुरवते. देवीचे हे रूप भक्तांना कायम  निर्भयता आणि शौर्य प्रदान करते. 

चन्द्रघण्टा देवी सदैव युद्धासाठी सज्ज आहे. दुष्टशक्तींना घंटानाद करत युध्दासाठी ललकारते आहे. पण तरीही हे रुप भितीदायक मात्र नाही. सौम्य आणि प्रसन्न देवीरूप भक्तांमधे निर्भयता आणि शौर्याबरोबरच विनम्रता आणि सात्विकतेचा विकास करते. 

काया, वाचा आणि मनोभावे शुध्द होवून देवीची संपूर्ण शरणागत होत उपासना करावी. असे चन्द्रघण्टेचे भक्त जिथे जातील तिथे लोक सुख आणि पावित्र्याचा अनुभव घेतात. विनम्रता आणि सात्विकता ही भक्तांची कमजोरी नाही तर धैर्य आणि शौर्यामुळे प्राप्त झालेला देवीचा क्रुपाप्रसादच नव्हे का? 

अशी चन्द्रघण्टा देवी आपणा सर्वांसाठी परमकल्याणकारी होवो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना।

Thursday, October 11, 2018

नवरात्री मधले देवीचे अलंकार


नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी देवीचे कुठले रूप असते आणि तिला अलंकार कुठले आणि त्या रूपाची
पूजा केल्याने काय फलप्राप्ती होते त्याची माहिती



दिवस
देवीचा अंश
शक्ती
अवताराचे कारण
देवीचे रूप
हातातले अलंकार
फलप्राप्ती
दुर्गा
इच्छाशक्ती
मधुकैटभ
वध
महेश्वरी
अभयहस्त,
वरदहस्त,
पुस्तक,
अक्षमाला.
देवी कुमारी
दुर्गेसारखी
दिसते
आयुष्य
वृद्धी,
दारिद्र्य
निवारण
दुर्गा
इच्छाशक्ती
महिषासुर
वध करायला निघते
कौमारी
ऊस,
धनुष्य,
फुलांचा गुच्छ.
पाश धारण
करणाऱ्या
राजराजेश्वरीचे
रूप
रोग
निवारण
दुर्गा
इच्छाशक्ती
महिषासुर
वध
वाराही
त्रिशूल घेऊन
महिषासुराच्या
डोक्यावर
विराजमान
झालेली
कल्याणी दुर्गा
धन,
धान्य,
आयुष्य
वृद्धी
लक्ष्मी
क्रियाशक्ती
देव देवतांनी स्तुती करण्यासाठी
महालक्ष्मी
सिंहासनावर
बसलेली
जय दुर्गा रूप
वैर
निवारण
लक्ष्मी
क्रियाशक्ती
सुग्रीव दूत संवाद
वैष्णवी
सुखासनावर
विराजमान
झालेली काळी दुर्गा
ऐश्वर्य
प्राप्ती
लक्ष्मी
क्रियाशक्ती
धुम्रलोचन
वध
इंद्राणी
सर्पसनावर
विराजमान
झाली आहे.
हातात खड्ग,
कमळ.
डोक्यावर चन्द्रकोर
असलेली
चण्डिका देवी.
धनप्राप्ति,
दु:ख-निवारण,
तंटामुक्ती  
सरस्वती
ज्ञानशक्ती
चंडमुंड वध
ब्राह्मी
सोन्याच्या
पिठावर बसलेली.
एक पाय
कमळावरती.
वीणा वाजवणारी
शांभवी दुर्गा.  
मुक्ती
आणि
सिद्धी प्राप्ती
सरस्वती
ज्ञानशक्ती
रक्तबीज वध
नारसिंही
हातात उसाचं
धनुष्य.
करुणा दुर्गेचा
अवतार.
तिच्या भोवती
अष्टसिद्धी आहेत.
सर्वइच्छा
पूर्ती
सरस्वती
ज्ञानशक्ती
शुंभनिशुंभ
वध
चामुंडी
हातात धनुष्य,
बाण,
अंकूश,
त्रिशूल धारण
केलेली सुभद्रादेवी
इच्छा
केलेली
सिद्धी प्राप्ती
१०
महाशक्ती
महाशक्ती
विजयादशमी
शिवशक्ती
स्थूलरूप
सगळ्या
प्रकारचे
सौभाग्य
आणि
आनंद प्राप्ती

देवीला प्रत्येक दिवशी कुठलं फुल, कोणत्या रंगाची साडी, कुठला नैवेद्य समर्पित करायचे ह्याबद्दल माहिती :
दिवस
१०
कुठलं
फुल
मोगरा
जाई
-जुई
चाफा
दोन
पदरी
मोगरा
लता
कण्हेर
जासवंद
केतकी
गुलाब
कमळ
कमळ
साडीचा
रंग
हिरवा
हिरवा
पिवळा
निळा
निळसर
जांभळा
लाल
पोपटी
हिरवा
लाल
अथवा
केशरी
गडद
झालर
असलेला
हिरवा
फिकट
गुलाबी
नैवेद्य
वेण
पोंगल
मटकी
उसळ
गोड
पोंगल
सांबार
भात
दही
भात
नारळी
भात
(चित्रान्न)
लिंबू
घातलेला
फोडणीचा
भात
भात
आणि
दुधाची
खीर  
पायसम
(खीर)
दुधाचे
पायसम
(खीर)