Thursday, March 30, 2023

Shri Aiyar-appar temple at Thiruvaiyar

This Shiva temple is the first in sapta-sthana temples around Thiruvaiyaru. The temple is located at Thiruvaiyaru and Tanjavur district of TamilNadu on the banks of the river Kaveri. The temple is also known as Pancha-nadishwarar temple as this place is surrounded by 5 rivers namely – Arisilaru, Venna-aru, Vetta-aru, Kudumurrutti-aru and river Kaveri. In Tamil, “ai” means five (i.e. Pancha). “Aru” means river that is “nadi”. So Pancha-nadishwarar means Swami of 5 rivers. This temple is about 2000 years old. 

Moolavar: Shri Aiyarappar, Shri Pancha-nadishwarar

Devi: Shri Dharma-samwardhini

Teertha: Surya pushkarini

Old name: Thiruvaiyaru

This place is as holy as Varanasi for taking holy dip. This is one of the 6 most sacred places (Shiva sthalas) on the bank of river Kaveri. The other 5 places are – Thiruvenkadu, Thiruchakkau (Chaya vanam), Mayil-adu-thurai, Thiruvidai-maruthur and Thiruvanchiam. The place is considered as Dakshin Kailash. The Shiva linga is swayambhoo. 

The Dhyana mandap in the temple is built with lime and palm jaggery known as Kuruppai in Tamil. We can still come across the four pits in which above material was stored and gold, silver coins were kept as wages for the workers when the temple was being built. The temple has about 5 corridors (prakarams) and the raja-gopuram is seven tiered. The temple spans about 14-15 acres land. We come across the shrine of Somaskandha and Japesa (Kuki) mandap in the 2nd corridor. The idol of Shri Dakshinamurti in this temple is known as Shiva-yoga-dakshina-murti. He has special significance as he is only guru, worshiped by Shri Vishnu (known as Perumal in Tamil) in TamilNadu. So, Shri Dakshinamurti is also known as Hari-ooru -Shiva-yoga-Dakshina-murti. At the feet of Shri  Dakshinamurti, we find a tortoise instead of the usual demon – Muyalagan (symbol of ignorance). 

It is believed that when Dharma is followed by women, the benefits are double than those done by men. To indicate this fact, the Godmother here is known as Dharma Samwardhini. There is no shrine for Maha Vishnu at this place (in this area) as mother Dharma Samwardhini is praised as Shri  Maha Vishnu. There is a general belief in south that ashtami tithi of new moon are not auspicious. In order to indicate that all days are auspicious and same, wedding festival of Ambika is performed on the night of Ashtami in this temple. This place is also considered as shakti peetha of Ambika. 

One cannot do pradakshina around sanctum sanctorum of Shri Shiva. It is believed that Shri Shiva has his hair spread on the floor of (at the back of) sanctum sanctorum. As one cannot tread over this, the pradakshina is prohibited. 

The sacred tirtha Surya Pushkarini has also a special significance. It is because, this is considered as a Surya sthala where Surya has worshiped Shri Shiva. He is facing the West. 

There is a separate shrine for Kala-samhara-murti known as Aalkondar. Outside this shrine, we have a homa-kunda (sacred fire pit) installed by Adi-Shankaracharya. 

There are spots in the temple which produce echos of primordial (nada-bramha) sound notes. In the 3rd prakara, if one stands in the southwest corner facing North and calls Aiyarappar loudly, the sound reverberates. The west facing temple has beautiful sculptures of deities of Ardha-narishwarar and Shri Dakshinamurti besides other koshta murtis. We also come across the shrines of Shri Ganesha, Shri Subramania, Shri Nandikeshwar and Saint Tyagaraja. 

Kshetra purana: Shaiva saint Thirunavukarasar when on a pilgrimage to mount Kailash, encountered lot of difficulties on the way. Shri Shiva made him to take a dip in a pond by submerging himself. When Thirunavukarasar emerged from the tank, he found himself at Thiruvaiyarur and Swami gave him darshana of Mount Kailash at this place (Thiruvaiyarur).

A devotee named as Sucharitan was saved by Shri Shiva from untimely death like sage Markendeya by appearing as a column of light at this place. He killed Yama in the process. So Shri Shiva is known as Aalkondeshwarar. People burn benzoin (Kungiliyam in Tamil) outside the shrine under the belief that they can get rid of the fear of Yama. It is believed that the Sage Agastya got his dwarf structure at this place. 

Ambika is believed to have worshiped Shri Shiva with 2 measures of grains. 

According to kshetra puran the chariot of the King who ruled this place got stuck while passing through this place. While excavating the land around the wheels of chariot, the workers found Shiva Linga. When they continued excavating further, they came across idols of Shri Ganesha, Shri Subramanya, Goddess Dharma Samwardhini and Shri Nandi-deva. They also came across a sage who was sitting in deep meditation. When the saint came out of meditation, he ordered the king to build the temple and utilize the wealth under Nandi-dev’s hoof. 

According to another kshetra puran, a priest was unable to be present for performing pooja at a particular time as he was away on a pilgrimage. It was reported to the king, who came personally to check the fact. He was surprised to find the priest performing the pooja. The priest returned to the temple next day and everyone including king were astonished. They realized that, Swami himself had come to perform the pooja as the priest for Himself. 

Near this Shiva temple is one room house of Saint Tyagaraja where he composed some great works of Karnatik music. On the bank of the river his samadhi was built. A number of people converge on a particular day (samadhi) at this place and perform the music festival of the Karnatik music composed by the great saint. Nearby this samadhi, there are the samadhis of saint Shiva Prakash Swamigal and Naga-ratna-amma. She was responsible for locating and renovating the samadhi of saint Tyagaraja. 

Festivals & worships at this place: 

1. Daily six pujas

2. New moon festival – On every new moon the utsav murti of Aiyarappar is taken to the bank of river Kaveri for worship

3. Nandi’s marriage known as Thirukalyanam in the Tamil month of Panguni is performed at Tirumazappadi

4. In the Tamil month of Chitrai (April-May) Bramhotsav is held

5. In the Tamil month of Chitrai (April-May) sapta sthana utsav is held 

6. In the Tamil month of Aavani (Sept-Oct) on mula nakshatra float festival is held

7. In the Tamil month of Aadi (Aug-Sept) Appar festival is held

8. Mahashivaratri festival is held in the Tamil month of Masi (Feb-Mar)

 

Courtesy: Various websites and blogs 

Sunday, March 26, 2023

श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग ४

मागच्या अंकात आपण श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग ३ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांच्या श्री सोमस्कंदर आणि श्री भैरवर ह्या रूपांबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री वीरभद्रर आणि श्री चंडिकेश्वरर ह्या रूपांबद्दल माहिती करून घेऊया.

 

श्री वीरभद्रर:


श्री वीरभद्रर हे भगवान
शिवांच्या गणांपैकी एक आहेत. भूतगण आणि शिवगण हे सहसा दफन आणि स्मशान भूमीमध्ये वास करतात असा समज आहे. भगवान शिवांचे ते परिचर आहेत आणि ते कैलास पर्वतावर पण त्यांची सेवा करतात.

जेव्हा राजा दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञामध्ये दक्षपुत्री श्री सती म्हणजेच भगवान शिवांची पत्नी ह्यांनी आपल्या पतीचा आपल्या पित्याने केलेला अपमान सहन न होऊन यज्ञकुंडामध्ये आत्मसमर्पण केलं तेव्हा भगवान शिवांना अति क्रोध आला आणि त्यांनी क्रोधाने आपल्या जटांमधील एक केस जमिनीवर आपटला तेव्हा त्यातून श्री वीरभद्रर निर्माण झाले. भगवान शिवांनी त्यांना सेनापतीपद प्रदान केलं आणि दक्ष यज्ञ उध्वस्त करण्याचा आदेश दिला. त्यांच्या बरोबर रुद्रकाली देवी पण निर्माण झाल्या आणि त्यांनी भद्रकालीचं रूप घेऊन श्री वीरभद्ररांना दक्ष यज्ञ उध्वस्त करण्यास मदत केली. म्हणूनच श्री
वीरभद्ररांना भगवान शिवांच्या क्रोधाचं मनुष्य रूप असं समजलं जातं. श्री वीरभद्ररांना वीरभद्रर स्वामि असं पण संबोधलं जातं कारण ते शिवगणांचे नायक आहेत.

असा समज आहे की दक्ष यज्ञ घटना उत्तर केरळ मधील कोट्टियूर ह्या स्थानात घडली. हे स्थान अतिशय निसर्गरम्य आहे. इथे दक्ष यज्ञामध्ये श्री सती देवींनी केलेल्याआत्म समर्पणास्मृत्यर्थ २७ दिवसांची मोठी पूजा आयोजित केली जाते. ह्या पूजेची रूपरेखा ही श्री आदि शंकराचार्यांनी आखून दिली आहे असा समज आहे.

तामिळनाडूमधील व कर्नाटकामधील पंच आचार्य आणि लिंगायत व वीरशैव ह्या समाजातील लोकं श्री
वीरभद्ररांची आराधना करतात. श्री वीरभद्ररांचं मुख्य स्वतंत्र मंदिर उत्तर काशीमधल्या हृषीकेश मध्ये आहे. काही नामांकित स्थळे जिथे श्री वीरभद्रांची मूर्ती बघावयास मिळते ती अशी - १) महाराष्ट्रामध्ये जेजुरी २) तामिळनाडू मधील पुडुकोट्टाई जिल्ह्यातील वेत्तनविधूथी ३) तामिळनाडूमधील वेल्लोर जिल्ह्यामध्ये मित्तुर गावातील विलंगुप्पम ४) तामिळनाडूमधील चेंगलपेठ जिल्ह्यातील हनुमंथपुरम येथील श्री अघोर वीरभद्रर स्वामी मंदिर ५) तामिळनाडू मधील थिरुवेंगाडू येथील श्री श्वेथारण्येश्वरर मंदिर (नवग्रह स्थळांपैकी हे श्री बुध ग्रहाचे स्थान आहे). ६) तामिळनाडूमधील पेरंबलूर जिल्ह्यातील पसुमबलूर

सिलोन आणि मलेशिया देशात पण श्री
वीरभद्ररांची मंदिरे आहेत. 

  
श्री चंडिकेश्वरर:


श्रेष्ठ शिव भक्त मानल्या जाणाऱ्या ६३ नायनमारां मधले पहिले नायनमार म्हणजेच श्री चंडिकेश्वरर.
श्री चंडिकेश्वरर हे बालपणापासूनच शिव भक्त होते. त्यांचं बालपणाचं नाव विचारशर्मन असं होतं. त्यांनी एकदा बघितलं कि एक गोप गाईंना चरायला नेताना गाईंना मारत होता. विचारशर्मनला हे बघवलं नाही. त्यांनी त्या गोपाला दरडावून समजावलं की गाय ही खूप पवित्र प्राणी आहे जी यज्ञासाठी लागणाऱ्या वस्तू देते. तिला मारणं म्हणजे महापाप आहे. त्यांनी गोपांकडून गायी हाकण्याचं काम स्वतः घेतलं. त्यांनी हाकण्याचं काम घेतल्यापासून गायी विचारशर्मन वर खूप प्रसन्न झाल्या आणि त्यांनी नेहमीपेक्षा अधिक दूध द्यायला चालू केलं. विचारशर्मन रोज एक मातीचं शिव लिंग तयार करायचे आणि त्यावर दुधाचा अभिषेक करायचे. गायी विचारशर्मन ह्यांच्या शिवाभिषेकासाठी पण दूध द्यायच्या आणि त्याशिवाय त्यांच्या मालकांसाठी पण त्यांच्या कामासाठी पुरून उरेल एवढं दूध द्यायच्या. एकदा एका गावकऱ्याने विचारशर्मन दूध मातीवर ओतत आहेत हे पाहून गावात तक्रार केली कि विचारशर्मन हे दुधाचा अपव्यय करत आहेत. हे जेव्हा विचारशर्मन ह्यांच्या पित्यांना कळलं तेव्हा खरी गोष्ट काय आहे हे पाहण्यासाठी ते विचारशर्मन चा पाठलाग करत आले. जेव्हा त्यांनी पाहिलं कि विचारशर्मन मातीच्या लिंगावर दूध ओतत आहेत त्यांनी रागाने त्या लिंगाला लाथ मारली. भक्ती मध्ये तल्लीन असलेल्या विचारशर्मनला समोर फक्त शिव लिंग दिसत होतं आणि शिव लिंगाच्या अभिषेकामध्ये कोणीतरी व्यत्यय आणला आहे एवढंच त्यांना जाणवलं आणि त्यांनी क्रोधामध्ये आपल्या बाजूला असलेली एक काठी भिरकावली. ती काठी त्यांच्या पित्यांच्या पायाला एका कोयत्याच्या स्वरूपात लागली आणि त्यामुळे त्यांचे पाय कापले गेले. हे ऐकून त्यांची माता त्वरित तेथे आली आणि आपल्या पुत्राचं क्रोधीत रूप बघून घाबरली आणि तिने तिच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी भगवान शिवांची प्रार्थना केली. भगवान शिव श्री पार्वती देवींसमवेत तेथे प्रकट झाले आणि विचारशर्मनच्या भक्तीची तल्लीनता पाहून त्यावर प्रसन्न होऊन त्यांनी त्याला कवेत घेतलं. विचारशर्मन ह्यांच्या पित्याचे पाय भगवान शिवांनी पूर्ववत केले. भगवान शिवांनी विचारशर्मन ह्यांना शिव मंदिराच्या खजिनदाराची पूर्ण जबाबदारी कायमस्वरूपी दिली आणि त्याच बरोबर त्यांना ईश्वरपद पण प्रदान केलं. आणि त्यांचं चंडिकेश्वर हे नाव प्रसिद्ध झालं. चंडिकेश्वर हे फक्त मंदिराच्या खजिन्याचंच नव्हे तर भगवान शिवांचं पण पालन करतात असा समज आहे. दक्षिण भारतातील सर्व शिव मंदिरांमध्ये अशी प्रथा आहे कि, प्रत्येक भक्त मंदिराचं दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर निघण्याच्या आधी श्री चंडिकेश्वरर ह्यांच्या मूर्तीसमोर आपले हात झटकून त्यांना हे दर्शवून देतात कि मंदिरातून त्यांनी प्रसादाशिवाय इतर कुठलीही गोष्ट घेतलेली नाही.

 

पुढच्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री दक्षिणामूर्ती  आणि श्री लिंगोद्भवर ह्या रूपांबद्दल माहिती करून घेऊया. 

 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

 

Friday, March 24, 2023

Saptasthanam Temples around Thiruvaiyarur

In the last article, we mentioned about clusters of seven temples called Saptasthanam. We listed 10 such clusters in Tamil Nadu. One of those clusters is Saptasthana temples around Thiruvaiyarur.

These Saptasthana temples around Thiruvaiyarur are also referred as temples associated with Lord Nandi’s marriage which was performed by Lord Shiva. He took the divine couple to these places as a sort of Thanksgiving for the help rendered by the people for Nandi’s marriage. 

Those seven temples are as follows:

  1. Shri Aiyar-appar temple at Thiruvaiyar
  2. Shri Apathsahyar temple at Thirupazhanam
  3. Shri Odhanavaneshwarar Temple at Thiruchotruthurai
  4. Shri Vedapurishwarar Temple at Thiruvedikudi 
  5. Shri Puvananathar Temple at Thiruppoonthruthi 
  6. Shri Brahmashirakandiswarar Temple at Thirukandiyur
  7. Shri Neyyadiappar Temple at Thillaisthanam   

 

In coming weeks we will be posting information about each of these seven temples.

 

Courtesy: Various websites and blogs

 

Sunday, March 19, 2023

श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग ३

मागच्या अंकात आपण शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग २ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांची पांच मुखें, ज्याला पंचशिव म्हणतात, त्यांबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री सोमस्कंदर आणि श्री भैरवर ह्या रूपांबद्दल माहिती करून घेऊया. 

 

श्री सोमस्कंदर:


ह्या रूपामध्ये भगवान शिव हे गृहस्थाच्या रूपात दाखवले आहेत. सोम (म्हणजे श्री पार्वती देवी म्हणजेच उमा समवेत भगवान शिव) आणि त्यांच्या समवेत त्यांच्या मध्यभागी त्यांचा पुत्र श्री कार्थिकेय (स्कंद) अशी मूर्ती असते त्या एकत्र मूर्तीला श्री सोमस्कंदर (सोम-सह-स्कंद) असं नाव आहे. पुराणांनुसार श्री विष्णूंनी अपत्यप्राप्तीसाठी भगवान शिवांची आराधना केली तेव्हा त्यांना मन्मथ नावाचा पुत्र झाला. पण श्री पार्वती देवींना हे आवडलं नाही कारण श्री विष्णूंनी त्यांना आराधना करताना वगळलं होतं. म्हणून त्यांनी श्री विष्णूंना शाप दिला कि भगवान शिवांकडून त्यांचा पुत्र चिताभस्म होईल. श्री विष्णूंना आपली चूक लक्षात आली म्हणून त्यांनी भगवान शिव आणि त्यांच्या समवेत श्री पार्वती देवी आणि त्यांचा पुत्र कार्थिकेय अशी मूर्ती बनवून त्याची आराधना केली. त्या आराधनेवर प्रसन्न होऊन श्री पार्वती देवींनी श्री विष्णूंना वरदान दिलं की भगवान शिवांनी चिताभस्म केलेला मन्मथ (काम) पुन्हा पुनरुज्जीवित होईल आणि त्याची पत्नी रतीदेवी समवेत तो स्त्री पुरुषांमध्ये आकर्षण निर्माण करण्यास कारणीभूत होईल जेणेकरून मनुष्य जात जीवित राहील.


श्री भैरवर:


श्री भैरवर भगवान शिवांचं एक रूप आहे. भैरवर ह्यांच्याकडे काळाच्या (टाइम) व्यवस्थापनेचं काम आहे. म्हणून त्यांना काळभैरव असं पण म्हणतात. त्यांना क्षेत्रपाल असं पण म्हणतात कारण ते भगवान शिवांच्या मंदिराची देखभाल करतात. दक्षिण मंदिरांमध्ये अशी प्रथा आहे कि दिवसाकाठी जेव्हां मंदिर बंद करण्याची वेळ येते त्यावेळी औपचारिकतेने मंदिराच्या किल्ल्या श्री भैरवर ह्यांच्याकडे सोपवल्या जातात आणि परत जेव्हां दिवसाच्या सुरुवातीला मंदिर उघडण्याची वेळ येते त्यावेळी औपचारिकतेने किल्ल्या श्री भैरवरांकडून घेतल्या जातात. कारण श्री भैरवर काळाचे व्यवस्थापक आहेत, ज्या भक्तांना आध्यात्मिक उपासनेमध्ये वेळेचं योग्य नियंत्रण करायचं असतं ते उपासनेच्या आरंभी श्री काळभैरवांना प्रार्थना करतात. श्री काळ भैरवांचं वाहन कुत्रा आहे. म्हणून पुराणांमध्ये कुत्र्याला भरवणे हे दैवी कर्म मानलं जातं. श्री भैरवर ह्यांना प्रवाशांचे रक्षणकर्ते असं पण म्हणतात. म्हणून सिद्ध मुनींच्या (शैव मुनी) मते प्रवास चालू करण्यापूर्वी, मुख्यतः रात्रीचा प्रवास चालू करण्यापूर्वी, श्री भैरवरांसमोर दिवा लावून मग प्रवास चालू करावा. श्री भैरवांची आठ रूपे आहेत. ही आठ रूपे आठ दिशांचं पालन करतात. ह्यांना अष्टभैरव असं म्हणतात.  त्यांची नावे अशी - असिथान्गभैरव, रुरुभैरव, चंडभैरव, क्रोधन भैरव, उन्मथभैरव, कपालभैरव, भीषणभैरव, संहारभैरव.  

 

पुढच्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री वीरभद्रर आणि श्री चंडिकेश्वरर ह्या रूपांबद्दल माहिती करून घेऊया. 

 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.



Thursday, March 16, 2023

Saptasthanam Shiva temples in TamilNadu

According to Sthala puranas, in bygone days, there was a tradition of worshiping a cluster of seven Shiva temples. Together they were considered to be one Shiva temple. They were considered as a one Shiva sthalam having seven Shiva lingas at different places very close to each other. This practice was considered to be the Siddha way of worshiping Lord Shiva. The practice is to worship at six other shiva temples first and finally the seventh one which was considered to be the main temple. It is believed that this practice existed even before the time of Shaiva saint Sambandhar. According to Sthala puranas, he had followed this procedure when he had visited the Sri Kapaleeswarar Temple at Mylapore.

We are giving below a list of ten such clusters of seven temples. For each cluster there is a main temple and six temples around the main temple.

  1. Saptasthana temples of Mylapore
    Around Mylapore near Chennai we have seven temples, of which Sri Kapaleeswarar Temple is considered to be the main temple. It is believed that
    sapta rishis Atri, Bhrugu, Kutsa, Vashishtha, Gautama, Kashyapa, Angirasa worshiped at these seven temples.
  2. Saptasthana temples of Thiruvaiyarur. Here Aiyarappar temple at Thiruvaiyaru is considered as the main.
  3. Saptasthana shiva temples around Nagapattinam. Here Naganathar temple at Nagora is considered as the main temple.
  4. Saptashatna temples around Mayiladuthurai. Here Mayuranathar temple at Mayiladuthurai is considered as the main temple.
  5. Saptasthana temples around Kumbhakonam. Here Adikumbheshwarar temple at Kumbhakonam is considered as the main temple.
  6. Saptasthanam temples around Kanjanur. Here Agneeswarar temple at Kanjanur (Suryanar Temple Kovil) is considered as main.
  7. Saptasthana Shiva temples of Chakrapalli. Here Shri Chakravageeshwarar temple at Chakrapall is main temple.
  8. Saptasthanam Shiva temple at Karanthattaangudi in Tanjavur district. Here Shri Vashishteshwarar temple at Karanthattaangudi is the main temple.
  9. Saptasthanam temples of Thirunallur (Kumbhakonam to Valangaiman route). Here Shri Panchavarneshwarar temple at Thirunallur is the main temple.
  10. Saptasthana Temples around Thirunilakkudi (Kumbhakonam to Kairaikkal main route). The main temple is Shri Neelakantheshwarar at Thiruneelakudi.

In upcoming weeks we will be providing information about each temple in each cluster.

 

Courtesy: Various websites and blogs




Sunday, March 12, 2023

श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग २

मागच्या अंकात आपण शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग १ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवाच्या श्री रुद्र आणि श्री एकादश रुद्र ह्या रूपांबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवाच्या पांच अवतार किंवा त्यांना एकत्र पंचशिव किंवा पंचब्रह्म असं पण म्हणतात त्याबद्दल माहिती करून घेऊया. 

ह्या सृष्टीमध्ये पांच कर्म ही कायमस्वरूपी म्हणजेच सनातन आहेत. त्यांना पंचकृत्य असं म्हणतात. ती कृत्ये म्हणजे - सृष्टीची निर्मिती (उप्तत्ती), सृष्टीचं पालनपोषण (स्थिती), सृष्टीचा संहार (लय). ही तीन प्रसिद्ध कर्म आहेत. ह्याशिवाय अजून दोन कर्मे आहेत ती म्हणजे - तिरोधान आणि अनुग्रह. ह्या प्रत्येक कर्माला एक अधिष्ठान देवता आहे. ह्या देवता म्हणजे शिव-शक्तींचीच रूपे आहेत. शिव आणि शक्ती हे एकत्रच वेगवेगळ्या रूपात ही पांच कर्मे करत असतात. ह्या भगवान शिवाच्या पांच रूपांना पंचब्रह्म किंवा पंचशिव किंवा पंचानन असं म्हणतात. भगवान शंकरांच्या मराठी आरतीमध्ये पंचानन हे नाव येतं.

पांच कर्मे दर्शविणाऱ्या भगवान शिवांच्या पांच रूपांची किंवा पांच मुखांची माहिती आम्ही इथे थोडक्यात देत आहोत. 


श्री सद्योजातमूर्ती:


भगवान शिवांचं हे रूप त्यांच्या सृष्टी निर्माण करणाऱ्या शक्तीचं रूप आहे. ह्या रूपाच्या मूर्तीमध्ये भगवान शिव ध्यानावस्थेत दाखवतात. हे पश्चिमाभिमुख रूप आहे. भगवान शिवांच्या ह्या रूपातून अजून काही रूपे निर्माण झाली ती अशी - श्री लिंगोद्भवर, श्री अर्धनारीश्वरर, श्री हरिहर, श्री सुखासन, श्री उमामहेश्वर


श्री वामदेवमूर्ती:


भगवान शिवांचं हे रूप त्यांच्या सृष्टीचं पालनपोषण करणाऱ्या शक्तीचं रूप आहे. हे त्यांचं उत्तराभिमुख रूप आहे. भगवान शिवांच्या ह्या रूपातून अजून काही रूपे निर्माण झाली ती अशी - श्री कंकाळ मूर्ती (ह्याला गंगाळ मूर्ती असं पण म्हणतात), श्री चक्रधर मूर्ती,  श्री चंडिकेश्वरर मूर्ती, श्री गजांतीक मूर्ती, श्री एकपाद मूर्ती


श्री अघोरमूर्ती:

 
भगवान शिवांचं हे रूप त्यांच्या सृष्टीचा संहार करणाऱ्या शक्तीचं रूप आहे. हे त्यांचं दक्षिणाभिमुख रूप आहे. भगवान शिवांच्या ह्या रूपातून अजून काही रूपे निर्माण झाली ती अशी - श्री गजसंहार मूर्ती, श्री वीरभद्र मूर्ती, श्री दक्षिणामूर्ती, श्री किराट मूर्ती, श्री नीलकंठ मूर्ती. 


श्री तत्पुरुषमूर्ती:

 
भगवान शिवांचं हे रूप त्यांच्या तिरोधान किंवा तिरोभाव शक्तीचं रूप आहे. संस्कृत मध्ये तिरो भवती म्हणजेच एखाद्यापासून एखादी गोष्ट किंवा माहिती गुप्त ठेवणे. जिवाच्या विकासासाठी जेवढं ज्ञान असणं आवश्यक आहे तेवढंच काही ज्ञान नसणं हे पण सहाय्यक ठरतं. सगळेच जीव आपल्या भूत भविष्याचं ज्ञान पचवू शकत नाहीत आणि म्हणून हे ज्ञान सगळ्यांना उपलब्ध नसतं. प्रत्येक जीवाला त्याच्या वर्तमान स्थितीला अयोग्य असणारं ज्ञान गुप्त ठेवण्याच्या ह्या भगवान शिवांच्या शक्तीला तिरोधान असं म्हणतात. भगवान शिवांचं हे रूप पूर्वाभिमुख आहे. त्यांच्या ह्या रूपातून अजून काही रूपे निर्माण झाली ती अशी - श्री भिक्षाटनर मूर्ती, श्री कामदहन मूर्ती, श्री कालसंहार मूर्ती (ह्या रूपामध्ये त्यांनी मार्कंडेयाचं मृत्त्यूपासून रक्षण केलं), श्री जालंधरसंहार मूर्ती, श्री त्रिपुरारी मूर्ती. 


श्री इशानमूर्ती:

 
भगवान शिवांचं हे रूप त्यांच्या अनुग्रह शक्तीचं रूप आहे. तिरोधानाच्या विरुद्ध अनुग्रह. तिरोधान शक्ती ज्ञान लपवते तर अनुग्रह शक्ती ज्ञान देते. जीव जसजसा विकास साधतो तसतसं जीवाची ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती वाढते. इथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. जेव्हा एखादा जीव तपश्चर्येने म्हणा किंवा निरंतर भक्तीने आत्मज्ञानासाठी योग्य स्थिती प्राप्त करतो तेव्हा भगवान शिवांच्या अनुग्रह शक्तीमुळे त्या जीवास आत्मज्ञानाची प्राप्ती होते. भगवान शिवांचं हे रूप ऊर्ध्वमुख आहे. त्यांच्या ह्या रूपातून अजून काही रूपे निर्माण झाली ती अशी - श्री सोमस्कंदर मूर्ती, श्री नटराज मूर्ती, श्री वृषभारूढ मूर्ती, श्री चंद्रशेखर मूर्ती, श्री कल्याणसुंदर मूर्ती. 

 

पुढच्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री सोमस्कंदर रूपाबद्दल माहिती करून घेऊया. 

 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
 
 

Friday, March 10, 2023

Shri Airawateshwarar Temple at Darasuram

This Shiva temple is one of the pancha kroshi sthala of Kumbhakonam. It is also one of the SaptaSthana temples around Kumbhakonam. This temple is classified as a Kalai (Art) Kovil. The temple was built by the king Rajarajeshwara and is about 1500 years old. It is located at Darasuram in Kumbhakonam taluka of Tamilnadu. It is very close to the Kollaidum river which is a tributary of Kaveri.

Mulavar: Shri Airatwateshwarar
Devi: Shri Vedanayaki
Kshetra Vruksha: Bilva


Kshetrapuran:
According to Purana, Airawat (the white elephant mount of Indra) due to its ego, misbehaved with Sage Durvasa by not paying any attention to him. The sage cursed the white elephant to lose all its grace, color, power and position. It became a bison and started roaming on the earth. When it heard about this place, it came here and worshiped Shri Shiva for atonement. Shri Shiva graced her and restored it to its original position in the Indra loka. Hence Shri Shiva is known as Shri Airawateshwarar.

According to the another incidence taken in the purana, Shri Yama angered the Sages by his behavior. They cursed him so that his body became very hot and he could not bear the heat generated in the body. He roamed far and wide for relief. Finally when he heard about this sacred teertha, created by Shri Shiva with his Trident, he came here for relief. He took bath in the teertha and worshiped Shri Shiva. He was relieved from the curse of the sages.

In this temple complex as well as in the temple, there are several sculptures which are very beautiful. As this temple was built by the king Rajarajeshwara Chola, place was earlier known as Rajarajeshwaram. It is believed that the demon Dharakan worshiped Shri Shiva at this place. And place was known as Darasuram. According to Kshetra Purana, the mount of Shri Indra, worshiped Shri Shiva at this place, hence the place is known as Shri Airatwateshwaram.

About the temple:
As soon as we enter, we come across Nandi mandap. There is a staircase leading to Balipeeth. If we tap on the stones of the steps, they give out musical notes. As we enter the temple, we come across a very beautiful marriage hall with a lot of captivating and mind blowing sculptures relating to past history. This mandap is in a form of a horse drawn chariot. The mandap has 16 highly sculptured pillars with about thousand sculptures in each pillar. The sculpture of Shri Nartana Vinayaka is about 2 centimeters in height, in addition to this there are sculptures for incidents from Ramayana, Mahabharata, as well sculptures of Shiva Parvati in Kailash, Shri Muruga with Valli and Deivayani, sages performing penance, Shri Brahma, Shri Vishnu, and Shri Muruga. There are no words to describe the beauty of these sculptures. The Shiva linga is very captivating. On the outer wall of the main sanctum, we have five sculptures on each side with the middle larger than the others.

Other shrines:
In the southwest corner of the main mandap, we come across sculptures - one of them is of Shri Yama, and then we have sculptures of Sapta Matrikas as well. Devi shrine is larger than the main shrine. There are lots of stone inscriptions which give an account of the renovation work done by various kings. 

We come across sculptures on the Gopurams as well. On the north face of the gopuram we have Adi Shankaracharya, Shri Ganga Devi, Shri Tanpurnaradar, Shri Vaisravana, Shri Chandra, Shri Mahashashta, Shri Nagaraja, and Shri Vayu. On the west face of the gopuram - Shri Ambika, Shri Rudrani, Shri Vaishnavi, Shri Brahmi, Shri Varunanai, Shri Nandi, Shri Periyadevar, Shri SanatDevi, Shri Vidyashakti, Shri Pratishtha Shakti, Shri Nivarti Shakti. On the south face of the gopuram - Shri Daksha Prajapati, Shri Yamuna Devi, Shri Rati Devi, Shri Kamdev. On the east face of the gopuram - Shri Agni, Shri Sridevi, Shri Durga Devi, Shri Indra, Shri Padmanidhi, Shri Surya, Shri Subramanya, Shri Kshetrapal, Shri Vishwakarma and Shri Ishandeva.

In this temple we come across, sculptures of Sage Shri Agastya, Shri Sarbheshwarar, Shri Narasimha, Shri Ardhanarishwarar, Shri Dakshinamurti, Shri Annapurni, Shri Vishnudurga Devi, Shri Chandikeshwarar, Shri Kannagi, and Shri Nardana Vinayaka. One sculpture is such that, when we view from one side, we observe an Oxen and from the other side of the same sculpture, it appears as an elephant.

Shri Vedanayaki Devi is housed at a distance away from the main shrine in a separate shrine on the right side.

Festivals:

Thai (Jan-Feb) - Thai Thaipusam festival for 10 days, Pongal

Masi (Feb-Mar) - Mahashivaratri

Chitrai (Apr-May) - 10 days brahmotsav

Vaikashi (May - June) - Divine marriage utsav on Vishakha nakshtra

Aadi (Jul-Aug): Aadi Pooram

Avani (August-Sept) - Ganesh chaturthi

Purattasi (Sept-Oct) - Annabhishek, Navaratri, arrow festival.

Aippasi (Oct-Nov) - Annabhishek and 10 days Skanda shashthi festival

Karthigai (Nov-Dec) - 10 days Festival of light known as Karthikeya Deepam.

Margazhi (Dec-Jan) Thiruvathira, 10 days Thiruvaduthurai, Arudra Darshan

Panguni (Mar-April) Uttara nakshatra festival
 

Besides this, pradosha puja every month, puja on full moon days and Shivaratri.

Prayers
People pray here for relief from sufferings from the past sins and for getting prosperity in life.

Timings:
7 am to 12 noon and evening 5 pm to 8 pm.
Temple address: Shri Airawateshwarar Temple, Darasuram, Kunbhakonam Taluka, Tamil Nadu. 

Courtesy: Various websites and blogs

Sunday, March 5, 2023

श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग १

मागच्या अंकात आपण शिव मंदिरातल्या मुख्य मुर्त्यांची माहिती करून घेतली. आता या अंकापासून आपण शिव मंदिरातल्या इतर मुर्त्यांची माहिती करून घेऊया. या अंकामध्ये श्री रुद्र आणि एकादश रुद्र ह्यांची माहिती करून घेऊया.

श्री रुद्र  

हिंदू संस्कृतीच्या उत्क्रांतीमध्ये दोन महत्वपूर्ण काळ नजरेस येतात आणि ते म्हणजे वैदिक काळ आणि पौराणिक काळ. देवांची प्रतीके किंवा देव मानण्याच्या समजुतींमध्ये ह्या दोन काळांमध्ये फरक दिसतो. वैदिक काळामध्ये निसर्गाचे घटक आणि नैसर्गिक भावना ह्यांच्याशी देवांची प्रतीके आणि समजुती निगडित होत्या. उदाहरणार्थ रुद्र ही वैदिक काळातील देवता आहे. रुद्र मध्ये रु म्हणजे भीती उत्पन्न करणारा आणि द्र म्हणजे खूप मोठा, प्रचंड शक्ती असलेला असा अर्थ होतो.
 

निसर्ग हा क्रमबद्ध आहे. निसर्गातल्या प्रत्येक क्रियेला एक क्रम आहे. ज्याला धर्म असं म्हणतात. म्हणजेच निसर्ग आपला धर्म व्यवस्थित पाळतो. उदाहरणार्थ मानवीशरीरामध्ये पचनक्रियेची एक क्रमबद्धता आहे. शरीराला तुम्ही काहीही खायला द्या पण पचन संस्था हि आपल्या धर्माप्रमाणे क्रमबद्ध कार्य करून ते अन्न पचवते आणि त्यातील प्रथिने शरीराच्या विविध भागांमध्ये पोचविण्याचे काम करते. पचनसंस्था हे बघत नाही की अन्न योग्य आहे का अयोग्य. त्या पचनसंस्थेला काय योग्य आणि अयोग्य पुरवावं हे ठरवणे मानवाचं काम आहे. त्याने अयोग्य अन्न पचनसंस्थेला दिलं तर त्याचं फळ पण अयोग्यच मिळणार. तसेच पर्जन्य योग्य प्रमाणात पडावा म्हणून त्यासाठी पोषक स्थिती निर्माण होण्यामध्ये एक क्रमबद्धता आहे. नैसर्गिक प्रक्रिया मधून आपल्याला अनुकूलता प्राप्त करायची असेल तर आपल्याला तशी कर्मे करायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला आपल्या शरीरामध्ये संतुलन राखायचं असेल तर आपण पचनसंस्थेला योग्य अन्न देणं अपेक्षित आहे. तसेच आपल्याला पर्जन्याची अनुकूलता मिळविण्यास म्हणजेच तो योग्य प्रमाणात पडावा अशी इच्छा असल्यास आपल्याला योग्य प्रमाणात झाडे लावणे आवश्यक आहे. पण जेव्हा मानव अनैसर्गिक किंवा अधर्मी कर्मे करतो तेव्हा त्यांचा परिणाम म्हणून निसर्ग प्रतिकूल फळे देतो. उदाहरणार्थ पर्जन्य अयोग्य प्रमाणात घडून वादळ, चक्रीवादळ, तुफान निर्माण होतात किंवा आरोग्यमय आहाराचं असंतुलन घडून महामारी सारख्या घटना निर्माण होऊन जीवन विस्कळीत होतं. ह्या सर्व नैसर्गिक क्रियांमधल्या असंतुलनामुळे निर्माण होणाऱ्या भीतीदायक घटना घडवून भीती निर्माण करणारी देवता म्हणजेच रुद्र. म्हणूनच आपण “निर्सगाने रौद्र रूप धारण केले आहे” अशासारखे वाक्प्रचार बघतो. ह्या सर्व भीतींमधून आपल्याला मुक्तता मिळवायची असेल म्हणजेच आपल्याला निसर्गाची अनुकूलता प्राप्त करावयाची असेल तर ह्या रुद्र शक्तीला प्रसन्न करणं आणि प्रसन्न ठेवणं आवश्यक आहे.

ह्या देवांना प्रसन्न करण्यामध्ये दोन गोष्टी कामाला येतात. त्या म्हणजे धर्माला अनुसरून केलेलं कर्म आणि योग्य ध्वनींचा उच्चार. ध्वनींच्या योग्य उच्चारामुळे नैसर्गिक संतुलन प्राप्त होण्यास मदत होते. आणि हाच वेदांमध्ये सांगितलेल्या यज्ञादी कर्मांचा पाया आहे. वेदांमधले देव म्हणजे सर्व निसर्गाचे घटक - आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. आणि ह्या घटकांची अनुकूलता प्राप्त करण्यासाठी म्हणून वेदांमध्ये ह्या घटकांच्या अधिष्ठान देवतांच्या स्तुतीपर सूक्त आहेत. स म्हणजे चांगले किंवा शुभ आणि उक्त म्हणजे उच्चार. यज्ञांमध्ये अग्नि प्रज्वलित करून देवांच्या स्तुतीपर सूक्त म्हणून
त्या देवतांना आवाहन केले जाते आणि परत सुक्तांच्या घोषामध्ये अग्निमध्ये आज्य म्हणजे तूप अर्पण करून त्यांना प्रसन्न केले जाते. ह्या सूक्तांच्या शास्त्रबद्ध उच्चारांमुळे ह्या देवता प्रसन्न होऊन अनुकूलता प्रदान करतात असा समज आहे.

वेदांमधला रुद्र देव म्हणजेच पुराणांमधले भगवान शिव. ब्रम्हा, विष्णू, महेश, देवी हे सगळे पौराणिक देव म्हणून प्रसिद्ध आहेत. पौराणिक देवांना सहसा पुराणांमधली  त्यांच्या स्तुतीपर स्तोत्रे म्हणून प्रसन्न केले जाते. पण ह्या देवांचा अभिषेक करताना किंवा मंत्रपुष्पांजली वाहताना वेदांमधली सूक्ते पण म्हणतात.

रुद्र देवाला म्हणजेच भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी वेदांमध्ये रुद्रस्तुतीपर सूक्त आणि मंत्र आहेत. ह्या सर्व रुद्र स्तुतीपर सूक्तांना आणि मंत्रांना एकत्रित शतरुद्रियं असं नाव आहे. ह्यापैकी रुद्र नमक आणि रुद्र चमक ही सूक्ते प्रसिद्ध आहेत. सर्व शिव मंदिरात विशषतः सोमवारी रुद्र नमक आणि रुद्र चमक ह्यांच्या घोषामध्ये शिव लिंगावर अभिषेक केला जातो.
 

श्री एकादश रुद्र

विष्णू पुराणानुसार ब्रह्मदेवाच्या क्रोधातून रुद्राचा जन्म झाला. रुद्राचं रूप अर्धनारीश्वर रूप होतं म्हणजेच अर्ध पुरुष आणि अर्ध नारी.

ह्यातील पुरुष रूपाचं विभाजन होऊन त्यातून अकरा रुद्र निर्माण झाले. त्यातील काही श्वेतवर्णीय आणि मृदूभावी होते तर काही श्यामवर्णीय आणि क्रूरभावी होते. त्यांची नावे १) मन्यु २) मनू ३) म्हामस ४) महान ५) शिव ६) ऋतुध्वज ७) उग्ररेतस ८) भाव ९) काम १०) वामदेव ११) धृतव्रत

रुद्राच्या स्त्री रूपाचं पण विभाजन होऊन त्यातून अकरा रुद्राणी निर्माण झाल्या. त्यांची नावे* - १) धी २) वृत्ती ३) उसान ४) उर्ण ५) नियुत ६) सर्पिस ७) इला ८) अंबिका ९) इरावती १०) सुधा ११) दीक्षा

* ही नावे वरील रुद्रांच्या नावाच्या क्रमांशी जुळलेली नाहीत.

पुराणानुसार रुद्रर हे रुद्राचे परिचर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे - १) अज २) एकपाद ३) अहिर्बुध्न्य ४) त्वस्त ५) रुद्र ६) हर ७) शंभू ८) त्र्यम्बक ९) अपराजित १०) ईशान ११) त्रिभुवन. महाभारतानुसार हे रुद्रर म्हणजे श्री इंद्रदेवाचे सहचर दर्शवले आहेत तर श्री शिव आणि श्री स्कंद यांचे परिचर दर्शवले आहेत. मत्स्य पुराणामध्ये रुद्ररांची वेगळी नावे आहेत आणि असा समज आहे कि ते क्रूरभावी होते आणि त्यांनी श्री विष्णूंना त्यांच्या राक्षसांबरोबरच्या युद्धामध्ये साहाय्य केलं. त्या रुद्ररांची नावे - १) कपाली २) पिंगल ३) भीम ४) विरुपाक्ष ५) विलोहित ६) अजेश ७) शासन ८) शास्त ९) शंभू १०) चंड ११) दुर्व.

पुढच्या अंकामध्ये आपण भगवान शिवांच्या पांच मुखांची माहिती करून घेऊया. 

 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy): ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.