Sunday, August 11, 2024

सप्त मातृकांची ओळख

सप्त मातृका म्हणजे श्री आदी पराशक्तीच्या सेनानी. सहसा सर्व शिव मंदिरांमध्ये सप्त मातृकांच्या मुर्त्या दिसतात. ह्या सर्व मुर्त्या एका दगडामध्ये कोरलेल्या असतात आणि त्या सहसा बसलेल्या मुद्रेमध्ये असतात. काही मंदिरांमध्ये ह्या मुर्त्या पृथक पृथक म्हणजेच प्रत्येक मूर्ती स्वतंत्र दगडामध्ये कोरलेली अशा पण बघायला मिळतात. ह्या मूर्त्यांना २ किंवा ४ हात असतात. जेव्हां त्यांना दोन हात असतात तेव्हां एक हात अभय मुद्रेमध्ये तर दुसरा हात वरद मुद्रेमध्ये असतो. जेव्हां त्यांना चार हात असतात तेव्हां पुढचे हात मुद्रे मध्ये असतात तर मागच्या हातांमध्ये शस्त्रे असतात. असा समज आहे कि शिव मंदिरामध्ये भगवान शिवांचं दर्शन घेतल्यानंतर सप्त मातृकांचे दर्शन घेतल्यावरच दर्शनाची फळे प्राप्त होतात. 


प्रकटीकरण: पुराणांनुसार भगवान शिवांचे जेव्हां अंधकासुराबरोबर युद्ध चालू होते त्यावेळी अंधकासुराच्या रक्तामधून अनेक राक्षस प्रकट होत होते. त्यांचा नाश करण्यासाठी भगवान शिवांनी आपल्या मुखातल्या अग्निमधून श्री योगेश्वरी शक्ती निर्माण केली. पुढे श्री योगेश्वरी शक्तीने आपल्यामधून श्री माहेश्वरी शक्ती निर्माण केली. ह्या शक्तींना सहायक म्हणून श्री ब्रह्मदेवांनी श्री ब्राह्मी शक्ती निर्माण केली, तसेच भगवान विष्णूंनी श्री वैष्णवी शक्ती, श्री इंद्रदेवांनी श्री इंद्राणी शक्ती, श्री कार्तिकेयांनी श्री कौमारी शक्ती, श्री वराहांनी श्री वाराही शक्ती, श्री यमदेवांनी श्री चामुंडी शक्ती निर्माण केली. 


मार्कंडेय पुराणानुसार ह्या शक्तींची निर्मिती शुंभ आणि निशुंभ राक्षसांबरोबरच्या युद्धामध्ये श्री देवीला सहाय्य करण्यासाठी झाली. 


सप्त मातृकांचा उल्लेख मत्स्य पुराण, देवी पुराण, विश्वकर्म सूत्र तसेच शिल्पशास्त्राशी निगडित पुराणांमध्ये पण आढळतो. शिल्पशास्त्रामध्ये सप्त मातृका, त्यांचे अलंकार, त्यांची शस्त्रे, त्यांचे पोषाख ह्यांची विस्तृत माहिती आढळते. ज्या ज्या देवांपासून ह्या शक्ती निर्माण झाल्या त्या त्या देवांची शस्त्रे ह्या शक्तींचीपण आहेत. 


देवी पुराणामध्ये ह्यांचा उल्लेख अष्ट मातृका असा आढळतो. श्री नारसिंही हि आठवी मातृका समजली जाते. अष्ट मातृकांची आराधना नेपाळ मध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. 


शिव पुराणामध्ये असा उल्लेख आहे कि राक्षसांची हत्या केल्याने प्राप्त झालेल्या पापांचं क्षालन करण्यासाठी सप्त मातृका भगवान शिवांकडे गेल्या. भगवान शिवांनी त्यांना मयीलादुथुराई येथील ऋषभ तीर्थामध्ये स्नान करून ह्या तीर्थाच्या जवळच्या शिव मंदिरांमध्ये तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला. ज्या ठिकाणी सप्त मातृकांनी तपश्चर्या केली त्या ठिकाणांना एकत्रितपणे सप्त स्थानं असं नाव प्राप्त झालं. कालांतराने ज्या ठिकाणांमध्ये सप्त मातृकांनी तपश्चर्या केली त्या ठिकाणांमध्ये शिव मंदिरे बांधली गेली. खालील तक्त्या मध्ये ह्या सर्व मंदिरांची संक्षिप्त माहिती दिली आहे. जिथे श्री माहेश्वरी देवींनी भगवान शिवांची आराधना केली ते मंदिर सोडल्यास बाकी सर्व मंदिरे ह्या तक्त्यामध्ये आहेत. हि सर्व मंदिरे कावेरी नदीच्या काठावर मयीलादुथुराईच्या जवळ आहेत. 



मंदिराचे नाव

स्थळ

सप्त मातृका देवीचे नाव

भगवान शिवांचे नाव

श्री पार्वती देवींचे नाव

स्थळ वृक्ष

श्री थान-थोंड्री-ईश्वरर

थिरु-ईण्डलुर

श्री ब्राह्मी

श्री थान-थोंड्री-ईश्वरर 

श्री ओप्पीला-नायकी

बिल्व

श्री पशुपती-श्वरर

सेंथनं-कुडी

श्री वैष्णवी

श्री पशुपती-श्वरर

श्री परम-कल्याणी

बिल्व

श्री शक्ति-पुरी-श्वरर

करून-कुईल-नाथन पेट्टई

श्री माहेश्वरी

श्री शक्ति-पुरी-श्वरर

श्री आनंद-वल्ली

बिल्व

श्री धर्मपूरीश्वरर 

धर्मपूरम

श्री इंद्राणी

श्री धर्मपूरीश्वरर

श्री अभयांबिका

आवळा

श्री पंचवटी-श्वरर

आनंद-तांडव पुरम 

श्री कौमारी

श्री पंचवटी-श्वरर

श्री कल्याण-सुंदरी, श्री पेरिया-नायकी

पीपल, पळस

श्री वझुवुर शिव मंदिर

वझुवुर

श्री वाराही

श्री कृत्ती-सागर

श्री बाला-गुजांबिका

देवदार

श्री वडारण्ये-श्वरर मंदिर

वल्ललर कोविल (मयीला-दुथुराई)

श्री चामुंडी

श्री वडारण्ये-श्वरर

श्री ज्ञानां-बिका

बिल्व


आभार: https://tamilnadu-favtourism.blogspot.com/ and

https://temple.dinamalar.com/en/


No comments:

Post a Comment