Sunday, June 9, 2024

अष्ट विराट्ट स्थलंगल

तामिळनाडूमधल्या तंजावूर जिल्ह्यात कावेरी नदीच्या तीरावर ८ शिव मंदिरे आहेत जी साधारण १००० वर्षांपूर्वी बांधली आहेत. ह्या सर्व स्थळांमध्ये भगवान शिवांनी असुरांचा, वाईट शक्तींचा तसेच अहंकार, हिताच्या गोष्टींकडे दुर्लक्षता, अनियंत्रित कामवासना, मृत्यूचे भय अश्या नकारात्मक वृत्तींचा संहार केला आहे म्हणजेच वीरकृत्ये केली आहेत. ह्या वीरकृत्यांचं स्मारक म्हणून हि शिव मंदिरे बांधली. म्हणून ह्या स्थळांना एकत्रितपणे अष्ट विराट्ट स्थलंगल असं संबोधलं जातं. उदारहर्णार्थ एके स्थळी भगवान शिवांनी श्री ब्रह्मदेवांचा शिरच्छेद केला आणि त्यांना पुनर्जीवित पण केलं. श्री ब्रह्मदेव हे सृष्टीचे जनक असल्याकारणाने त्यांच्या मध्ये अहंकारासारख्या नकारात्मक वृत्तींचा अभाव असणे जरुरीचे आहे. म्हणूनच भगवान शिवांनी त्यांचा शिरच्छेद म्हणजेच अहंकाराचा नाश केला आणि त्यांना परत कार्यरत केलं.


ह्या घटना दर्शवितात कि अहंकारासारख्या वृत्ती मग त्या कोणातही उद्भवोत पण त्यांना शिक्षा हि होणारच. 


ह्या सर्व शिव मंदिरांमधल्या भगवान शिवाच्या मूर्त्यांना संहारमूर्ती म्हणतात.


पुढील तक्त्यामध्ये ह्या आठ मंदिरांची संक्षिप्त माहिती देत आहोत. येणाऱ्या सप्तांहांमध्ये ह्या प्रत्येक मंदिराची सविस्तर माहिती आम्ही प्रकाशित करण्याचा प्रयत्न करणार आहोत.


मंदिर

स्थळ

भगवान शिवांचे नाव 

देवीचे नाव

स्थलवृक्ष

संहारमूर्तीचे नाव

स्थळाचे महत्व

थिरुवडिगाई विराट्टनेश्वरर् मंदिर 

थिरुवडिगाई, पंरुत्ती

श्री विराट्टनेश्वरर्

श्री पेरियानायकी

बहावा(सारा कोण्ड्रै)

त्रिपुरान्तक मूर्ती

त्रिपूर संहारक स्थळ

थिरुकोविलूर विराट्टेश्वरर् मंदिर 

थिरुकोविलूर

श्री विराट्टेश्वरर्

श्री शिवानंदावल्ली

बहावा(सारा कोण्ड्रै)

गांगल मूर्ती

अंधकासूर संहारक स्थळ

अमृतघटेश्वरर मंदिर

थिरुकडैयुर

श्री अमृतघटेश्वरर

श्री अभिरामी अम्मन

बिल्व, पिंजलं (गुलाबी चमेली)

कालसंहार मूर्ती

मार्कंडेयाचे श्री यमदेवापासून रक्षण

वळूवूर विराट्टेश्वरर् मंदिर 

वळूवूर मईलादुथुराई 

श्री कृतिवासर

श्री इलंकिलाई नायकी

शमी, देवदार (साग), कापुरीमदुरा (जडी)

गजसंहार मूर्ती

दारुकवनातल्या ऋषींनी निर्माण केलेल्या उन्मत्त हत्तीचा संहार

थिरुपरियलूर मंदिर

किलपरसलूर, नागपट्टीनं 

श्री विराट्टेश्वरर् (दक्ष-कुरीश्वर)

श्री इलं कोबनायल -बालांबिका

बिल्व, फणस

दक्षसंहार मूर्ती

दक्षसंहार स्थळ

थिरुकं डीश्वरर मंदिर

थिरुक्कंडीयूर

श्री ब्रह्मशिरकं डीश्वरर

श्री मंगळ नायकी

बिल्व

ब्रह्मशिरच्छेद मूर्ती, हरसभा विमोचन मूर्ती

ब्रह्माचे पांचवें मुख भगवान शिवांनी छेदले

थिरुवीरकुडी

थिरुवीरकुडी, थिरुवरुर

श्री विराट्टनेश्वरर्

श्री परिमल नायकी

तुलसी

जालंधरासूर संहार मूर्ती

जालंधरासूर संहार स्थळ

थिरुक्कूरक्काइ मंदिर

कोरुक्काई, नागपट्टीनं

श्री योगेश्वरर

श्री ज्ञानाम्बिका

हरडा, पुंनीआई (अलेक्झांड्रिअन लौरेल)

कामदहन मूर्ती

कामदहन (मन्मद दहन) स्थळ 

    

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment