Sunday, April 28, 2024

पंच मयानं

मयानं ह्या तामिळ शब्दाचा अर्थ आहे स्मशानभूमी. साधारणतः असा समज आहे कि भगवान शिवांना स्मशानभूमी हि प्रिय आहे. तिथे ते आपल्या गणांसह निवास करतात. तामिळनाडू राज्यात पांच स्मशानभूमींमध्ये भगवान शिवांची मंदिरे आहेत. ह्यांना एकत्रित पंच मयानं असं संबोधलं जातं. असा समज आहे की ह्या पांच ठिकाणी भरपूर प्रमाणात वैश्विक ऊर्जा अनुभवयास येते. 


तसेच इथे मयानंचा अर्थ फक्त स्मशानभूमी म्हणजे प्रेत जाळणे हा नसून आपले दुर्गुण जाळणे असा आहे. म्हणजे ह्या स्थळांमध्ये आराधना केल्याने आपले दुर्गुण जाळले जातात.


पंच मयानं स्थळांची माहिती 


नाव

मंदिराचे नाव

भगवान शिवांचे नाव

श्री पार्वती देवींचे नाव

स्थळ वृक्ष

स्थळाचे नाव

कांची मायनं

श्री एकांबरेश्वर

श्री एकांबरनाथ

श्री कामाक्षी अम्मन

आंबा

कांचीपुरम

काळी मायनं

श्री ब्रह्मपुरीश्वरर

श्री पेरिया-नायकर (श्री थोनी अप्पर)

श्री पेरिया नायकी

पारिजात

सिरकाळी (तंजावूर)

वीली मायनं 

श्री नेथ्रबाणेश्वरर 

श्री नेथ्रबाणेश्वरर (वीली-नाथर)

श्री ब्रहत सुंदर कुसांबीकाई

चंदन, फणस, चंपक

तंजावूर (थिरुवीलीमलई ) 

नल्लूर मायनं 

श्री कल्याण-सुन्दरेश्वरर 

श्री कल्याण-सुन्दरेश्वरर

श्री कल्याणसुन्दरी

बिल्व

कुंभकोणम

कडवूर मायनं 

श्री अमृतकडेश्वरर

श्री अमृतकडेश्वरर

श्री अबीरामी अम्मन

गुलाबी चमेली (जाथी मल्ली)

थिरुक्कदैयुर


एके काळी ह्या ठिकाणी चंदन, फणस, चंपक आणि विली (कवठ) ही झाडे असलेलं घनदाट वन होतं. म्हणून ह्या स्थळाला वीली असं नाव पडलं.

ह्या स्थळाच्याजवळ अजून एक मंदिर आहे ज्याला मायनं तसेच श्री ब्रह्मपुरीश्वरर मंदिर असं स्थानिक नाव आहे. ह्या मंदिरातल्या तीर्थातले पाणी थिरुक्कदैयुर येथील अभिषेकासाठी रोजी नेले जाते. थिरुक्कदैयुर पासून हे मंदिर साधारण १० मिनिटांवर आहे. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment