Tuesday, October 16, 2018

नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - भाग ४

"नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - भाग " - सौ. उत्तरा धनंजय गोगटे

देवीचे सातव्या दिवशीचे रुप

७. देवी कालरात्रि  

एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलभ्यक्तशरीरिणी॥
वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी।।

सर्व दुर्गारुपात सर्वात उग्र रुप आहे - देवी कालरात्रि. क्रुष्णा म्हणजे काळा रंग असलेली, केस अस्ताव्यस्त,  गळ्यात वीजेप्रमाणे तळपती माळ धारण केलेली आणि गाढव हे वाहन असणारी भयंकारी देवी कालरात्रि. आपल्या भक्तांना मात्र कायम शुभ फलदायिनी आहे.

देवी कात्यायनीची पूजा नवरात्राच्या सातव्या दिवशी केली जाते. ह्या दिवशी साधकाचे मन सहस्त्रधार चक्रावर स्थीत असावे. ह्यामुळे साधकाला समस्त सिद्धींचे द्वार खुले होते. सर्व पापांचा नाश होवून साधकाला पुण्यलोकाची  प्राप्ती होते.

देवी कात्यायनीचं हे भयप्रद रूप इतर रूपांपेक्षा पूर्णतः वेगळं आहे. कदाचित सर्व भयांचाच समूळ नाश करण्यासाठी म्हणून देवीने स्वतः च एक भयंकर रूप धारण केले असावे.

देवी कालरात्रि ही दुष्ट शक्तींचा आणि भयाचा विनाश कळण्यासाठीच अवतरली आहे. जल, अग्नी, शत्रु, जन्तु, रात्र ह्यातील कुठलेच भय भक्तांना देवी कात्यायनीच्या उपासनेने उरत नाही. देवीकृपेने तो संपूर्ण भयमुक्त होतो.

काया, वाचा मनोभावे आणि यम, नियमांचे पालन करून देवी कालरात्रिची उपासना करणार्या भक्तांना मिळणार्या शुभफळांची गणतीच होणार नाही.

देवी कात्यायनीच्या उपासनेने भक्तांच्या सर्व ईच्छा पूर्ण होवून सर्वांना शुभ फळाची प्राप्ती होवो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

1 comment: