दक्षिण भारतामध्ये तामिळनाडूमध्ये अशी पांच स्थळं आहेत जिथे भगवान शंकरांनी तांडव नृत्य केले आहे. ह्या स्थळांना एकत्रितपणे पंचसभइ स्थळंगल असं म्हणतात. तामिळ मध्ये सभइ म्हणजे मंच. येथील शिव मंदिरे १००० वर्षाहून अधिक जुनी आहेत. असा समज आहे कि ह्या मंदिरांच्या जागीच भगवान शिवांनी तांडव नृत्य केले.
खालील कोष्टकामध्ये ह्या पांच मंदिरांची माहिती नमूद केली आहे. येणाऱ्या सप्ताहांमध्ये आम्ही ह्या प्रत्येक मंदिराची विस्तारित माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ह्या शिवाय अजून पण काही स्थळे आहेत जिथे भगवान शिवांनी तांडव नृत्य केले आहे. उदाहरणार्थ श्री पार्वती देवींच्या विनंतीवरून भगवान शिवांनी मयीलादुथुराई येथे तांडव नृत्य केले ज्याचे नाव आहे गौरीतांडव आणि ह्या सभेला आदिसभइ असं म्हणतात. तसेच भगवान शिवांनी अजून पण काही नृत्ये केली आहेत ज्याची नावे अशी आहेत - लक्ष्मीतांडव, कालीतांडव, संध्यातांडव, त्रिपुरतांडव, आनंदतांडव आणि मुनीतांडव. ह्या सर्व तांडव नृत्यांमध्ये भरतनाट्यम नृत्यशैलीच्या मूलभूत मुद्रा आढळतात.
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment