Monday, May 15, 2023

तामिळ महिने आणि त्यातील काही प्रमुख सण

मंदिरांच्या माहितीमध्ये तिथे साजरे केले जाणारे सण आणि उत्सव ह्यांची माहिती असते. हे सण आणि उत्सव तामिळ पंचांगानुसार साजरे केले जातात. तामिळ पंचांग हे सौर पंचांग आहे जे महाराष्ट्रामध्ये अनुसरीत होणाऱ्या चांद्र पंचांगापेक्षा वेगळं आहे म्हणून त्याबद्दल आम्ही इथे माहिती देत आहोत. 

सौर पंचांग हे सूर्याच्या प्रत्येक राशीतून होणाऱ्या संक्रमणावर आधारित आहे आणि त्यांची नावे पण त्या त्या महिन्यातील राशींवर आधारित आहेत. उदाहरणार्थ पहिला महिना, जेव्हा सूर्य मेष राशीतून संक्रमण करतो त्या महिन्याला मेष असं नाव आहे. तशीच पुढे वृषभ, मिथुन, कर्क अशी बारा राशींच्या नुसार बारा महिन्यांची नावे आहेत. 

सौर पंचांगातील महिन्याचा पहिला दिवस सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा चालू होतो. साधारणतः ग्रेगोरियन दिनमानामधल्या (कॅलेंडर) एका महिन्याचा अर्धा भाग आणि पुढील महिन्याचा अर्धा भाग मिळून तामिळ पंचांगातला एक महिना होतो. 

खालील कोष्टकामध्ये तामिळ महिन्यांची नावे, त्यांचे समतुल्य इंग्लिश महिने, आणि त्या महिन्यात साधारणतः साजरे होणारे सण आणि उत्सव ह्यांची माहिती दिली आहे. 


तामिळ महिना

समतुल्य इंग्लिश महिने 

साधारणतः  साजरे होणारे सण 

चित्राई 

एप्रिल - मे

ब्रह्मोत्सव, चैत्र पौर्णिमा

वैकासि 

मे - जून 

वैकासि विशाखं,  कल्याण महोत्सव 

आनी 

जून - जुलै 

थिरुमंजनं  

आडी 

जुलै - ऑगस्ट 

आडीपुरं 

आवनी  

ऑगस्ट - सप्टेंबर 

विनायक (गणेश) चतुर्थी 

पुरत्तासी

सप्टेंबर - ऑक्टोबर 

नवरात्री 

ऎप्पासी 

ऑक्टोबर - नोव्हेंबर 

अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी

कार्तीगै 

नोव्हेंबर - डिसेंबर 

थिरुकार्तीगै, कार्तीगै दीपं  

मारगळी

डिसेंबर - जानेवारी 

थिरुवदिराई  

थै

जानेवारी - फेब्रुवारी 

मकर संक्रांति, पोंगल  

मासी

फेब्रुवारी - मार्च 

महाशिवरात्रि

पंगूनी 

मार्च - एप्रिल 

पंगूनी उत्तरं

No comments:

Post a Comment