Sunday, February 17, 2019

गणपतीच्या ३२ मूर्ती

भक्तीविषयक ग्रंथांमध्ये गणपतीच्या ३२ रूपांचा उल्लेख आढळतो. सर्वप्रथम ह्या रूपांचा उल्लेख मुद्गल पुराणामध्ये आढळतो. ह्या रूपांची सविस्तर माहिती १९व्या शतकात लिहिलेल्या श्रीतत्वनिधी ह्या कन्नड ग्रंथातील शिवनिधी ह्या अध्यायामध्ये आहे. ह्या ३२ रूपांमधली पहिली १६ रूपे “षोडश गणपती” ह्या नावांनी प्रसिद्ध आहेत. ह्या ३२ रुपांची संक्षिप्त माहिती आम्ही इथे देत आहोत.

१. बाळ गणपती - लहान बांधा असलेलं, लहान मुलासारखं हे रूप आहे. म्हणून ह्याला बाळ-गणपती असं नाव आहे. हे रूप चतुर्भुज आहे. चेहरा हत्तीचा आहे. रंग सूर्योदयाच्या वेळेचा लालसर आहे. हातांमध्ये  - केळी, आंबा, फणस, ऊसाचा तुकडा आणि सोंडेमध्ये मोदक.

२. तरुण गणपती - हे गणपतीचं यौवन रूप आहे. हे रूप अष्टभुज आहे. चेहरा हत्तीचा. हातांमध्ये - पाश, अंकुश, मोदक, कवठ, जांभूळ, तुटलेला दात, ऊसाचा तुकडा, भाताचा तुरा. रंग दुपारच्या सूर्याप्रमाणे लाल.

३. भक्ती गणपती - भक्तांचा गणपती म्हणून ह्याला भक्ती गणपती असे नाव आहे. रंग शरद ऋतूच्या पांढऱ्या ढगासारखा. चतुर्भुज. चेहरा हत्तीचा. हातांमध्ये - खोबरं, आंबा, केळी आणि खिरीचं भांडं.

४. वीर गणपती - हातांमध्ये - वेताची छडी, धनुष्य, बाण, भाला, चक्र, तलवार, ढाल, चाबूक, गदा, अंकुश, नाग, त्रिशूल, कुदळ, इत्यादी. १६ अस्त्र १६ हातांमध्ये. रंग लालसर. चेहरा रागीट. हातात वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी.

५. शक्ती गणपती - रंग शेंदुरी. हिरव्या रंगाच्या देवीला आलिंगन देत आहे असं हे रूप आहे. एक हात अभय मुद्रा दाखवतआहे. उरलेल्या हातांत पाश, अंकुश आणि फुलांचा हार.

६. द्विज गणपती - चार हात आणि चार मुखं असलेलं हे रूप आहे. हातांमध्ये - पुस्तक, अक्षमाला, दंड आणि कमंडलु आहे. दोन हातांमध्ये विजेसारखे चमकणारे कडे. रंग चंद्रासारखा पांढरा.

७. सिद्धी गणपती - चार हात आणि सोंड. चार हातांमध्ये - आंबा, फुलांचा गुच्छ, ऊसाचा तुकडा आणि परशु. ह्या गणपतीच्या रुपाला तिळाचा लाडू खूप आवडतो. रंग सोन्यासारखा चमकणारा आणि हिरवी छटा.

८. उच्छिष्ट गणपती - ह्या रुपाला सहा हात आहेत. हातांमध्ये डाळिंब, वीणा, भाताचा तुरा, अक्षमाला, नीलकमळ, गुंजेची बोरं. रंग निळा.

९. विघ्न गणपती - हे अष्टभुज रूप आहे. हातांमध्ये शंख, ऊसाचा धनुष्य, पुष्पबाण, कुऱ्हाड, पाश, चक्र, फुलांचा गुच्छ, बाण. रंग सोन्याचा. भरपूर अलंकार.

१०. क्षिप्र गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. नावाप्रमाणे त्वरित पावणारा (क्षिप्र). रंग लालसर. दिसायला सुंदर. हातांमध्ये - अंकुश, पाश, दंत, कर्पग कुडी. सोंडेच्या टोकावर रत्नकलश.  

११. हेरंब गणपती - हे पाच मुखांचं आणि दशभुज असं रूप आहे. एक हात अभय मुद्रा आणि एक हात वरद मुद्रा. उरलेल्या हातांमध्ये - पाश, दंत, अक्षमाला, माळ, परशु, चाबूक, मोदक, फळ. रंग गडद हिरवा. वाहन - सिंह

१२. लक्ष्मी गणपती - हे अष्टभुज रूप आहे. हातांमध्ये - पोपट, डाळिंब, कलश, अंकुश, पाश, कर्पग कुडी, खड्ग, वरद हस्त. रंग अमृताच्या प्रवाहासारखा पांढरा. बाजूला दोन देवी - रिद्धी सिद्धी

१३. महागणपती - हे दशभुज रूप आहे. हातांमध्ये - डाळिंब, गदा, ऊस, धनुष्य, चक्र, कमळ, पाश, नीलकमळ, भाताचा तुरा, दंत. सोंडेच्या टोकावर रत्नकलश. रंग सकाळचा लाल रंगाचा सूर्यकिरण. तीन डोळे. डोक्यावरती चंद्र कला. मांडीवर देवी आणि देवीच्या हातात कमळ. एकमेकाला आलिंगन दिले आहे.

१४. विजय गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. हातांमध्ये - पाश, अंकुश, दंत, आंबा. मूषक वाहन. रंग लालसर.

१५. नृत्य गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. बोटामध्ये अंगठ्या. हातांमध्ये - पाश, अंकुश, कुऱ्हाड, दंत वगैरे. रंग सोन्याचा. कल्पवृक्षाच्या खाली विराजमान.

१६. ऊर्ध्व गणपती - हे अष्टभुज रूप आहे. हातांमध्ये - निळ्या रंगाचे फुल, भाताचा तुरा, कमळ, कल्हार, ऊसाचा धनुष्य, बाण, दंत आणि शेवटच्या हाताने देवीला आलिंगन दिले आहे. रंग चमकणारा सोनेरी आणि हिरवी छटा.

१७. एकाक्षर गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. रंग लाल. लाल रंगाचं सोवळं नेसले आहे. लाल रंगाचा फुलांचा हार. कपाळावर चंद्रकोर. त्रिनेत्र. हाताची लांबी कमी. पाय लहान. हातांमध्ये - डाळिंब, पाश, अंकुश आणि वरदहस्त. हत्तीचा चेहरा. पद्मासन घालून बसलेले आहेत. वाहन मूषक.

१८. वर गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. रंग लाल. त्रिनेत्र. हातांमध्ये - पाश, अंकुश, मधाने भरलेले पात्र, मानवी कवटीचा खालचा भाग. डोक्यावर चंद्रकोर.

१९. त्र्याक्षर गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. कान हलतात (चामरासारखे). रंग सोन्यासारखा. हातांमध्ये - पाश, अंकुश, दंत, आंबा. सोंडेच्या टोकाला मोदक.

२०. क्षिप्रप्रसाद गणपती - हे षडभुज रूप आहे. त्वरित प्रसाद देणारा. हातांमध्ये - पाश, अंकुश, दंत, कल्पलता, कमळ, लिंबू धारण केले आहे. अलंकार घातलेले आहेत. पोट मोठे आहे. वेगळ्या प्रकारची गदा पण धारण केली आहे.  

२१. हरिद्रा गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. रंग पिवळा. हातांमध्ये - पाश, अंकुश, दंत, मोदक. भक्तांना अभय देणारे.

२२. एकदंत गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. पोट मोठे (पेटाऱ्या सारखे). रंग निळा. हातांमध्ये - कुऱ्हाड, अक्षमाला, लाडू, दंत.

२३. सृष्टी गणपती - मूषकावर आरूढ झालेलं चतुर्भुज रूप आहे. रंग लाल. हातांमध्ये - पाश, अंकुश, दंत, आंबा.

२४. उदंड गणपती - हे बारा हातांचं रूप आहे. रंग लाल. हातांमध्ये - नीलकमळ, डाळिंब, गदा, दंत, ऊसाचा धनुष्य, रत्नकलश, पाश, अंकुश, भाताचा तुरा, हार (रत्नहार), कमंडलू  आणि शंख. हिरव्या रंगाची देवी डाव्या मांडीवर बसली आहे. तिच्या हातामध्ये कमळ आहे. तिला आलिंगन दिले आहे.

२५. ऋणमोचन गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. हातांमध्ये - पाश, अंकुश, दंत, जांभूळ. रंग स्फटिकासारखा पांढरा. लाल रंगाचं सोवळं.

२६. धुंडी गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. हातांमध्ये - अक्षमाला, कुऱ्हाड, रत्नकलश, दंत. रंग लाल.    

२७. द्विमुख गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. हातांमध्ये - दंत, पाश, अंकुश, रत्नकलश. रंग फिका निळा. रत्नाचा मुकुट धारण केला आहे. लाल रंगाचं सोवळं. दोन मुखं आहेत.  

२८. त्रिमुख गणपती - ह्या रुपाला तीन मुखं आहेत. उजव्या बाजूच्या हातांमध्ये अंकुश, अक्षमाला, वरदहस्त. डाव्या बाजूच्या हातांमध्ये पाश, अमृताचा कलश, अभयहस्त. कमळाच्या आसनावर बसलेले आहेत.  रंग लाल.

२९. सिंह गणपती - हे अष्टभुज रूप आहे. उजव्या बाजूच्या हातांमध्ये - वीणा, कल्पवृक्षलता, चक्र, वरदहस्त. डाव्या बाजूच्या हातांमध्ये - कमळ, रत्नकलश, फुलांचा गुच्छ, अभयहस्त. रंग पांढरा. वाहन सिंह.

३०. योग गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. योगमुद्रा आसन. रंग - कोवळ्या सूर्याच्या किरणासारखा. वस्त्र - इंद्रनील रंगाचं वस्त्र धारण केलं आहे. हातांमध्ये - पाश, अक्षमाला, योगदंड, ऊस.  

३१. दुर्गा गणपती - हे अष्टभुज रूप आहे. रंग - सोन्याला तापवल्यावर जो रंग येतो तो. स्थूल शरीर. उजव्या बाजूच्या हातांमध्ये - अंकुश, बाण, अक्षमाला, दंत. डाव्या बाजूच्या हातांमध्ये - पाश, धनुष्य, वेल, जांभूळ. लाल रंगाचं वस्त्र.

३२. संकटहर गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. रंग सूर्याच्या कोवळ्या किरणांसारखा. डाव्या बाजूला - हिरवा रंग असलेली देवी. जिच्या हातात निळ्या रंगाचे फुल आहे. ती डाव्या मांडीवर बसली आहे. डाव्या बाजूच्या हातांमध्ये - पाश, खिरीची वाटी. उजव्या बाजूच्या हातांमध्ये  -अंकुश, वरदमुद्रा. लाल कमळावरती उभे आहेत. निळ्या रंगाचे वस्त्र धारण केले आहे.

No comments:

Post a Comment