Thursday, February 28, 2019

नवग्रह मंदिरे - केतु

केतु ग्रह मंदिराची माहिती:


मंदिराची माहिती:


मंदिराचे नांव: किलपेरुम्पळ्ळम् केतु कोविल
स्थल देवता: श्री किलपेरुम्पळ्ळम्
शंकराचे नाव: नागनादर
देवीचे नांव: नागवल्लि
ग्रहाचे नांव: केतु
गावाचे स्थान: किलपेरुम्पळ्ळम्, तामिळनाडू ६०९१०५, भारत
ऐतिहासिक / पौराणिक नांव:  नागनादर स्वामी

मंदिराकडे जाण्याचा मार्ग:

हे मंदिर मयीलाडुदुराई - पुम्पूहार मार्गावर आहे.


केतू ग्रह मंदिराचा इतिहास:

पुराणांनुसार ह्या स्थळाला खूप महत्व आहे. समुद्र मंथन प्रक्रियेमध्ये वासुकी नाग जेव्हा बेशुद्धावस्थेत गेला तेव्हा असुरांनी त्याच्या शरीराचे तुकडे करून ह्या प्रदेशातील बांबूच्या वनात टाकले. भगवान शंकरांच्या कृपेने वासुकी नाग परत जिवंत झाला. त्याने ह्या स्थळी तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना इथे येऊन राहण्याची आणि जे कोणी त्यांची उपासना करतील त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवण्याची विनंती केली.

येथील क्षेत्रवृक्ष बांबू आहे.

केतु ग्रहाचा इतिहास:

केतु पुराण:  समुद्र मंथनामध्ये जीव गमावलेले राहू आणि केतु जेव्हा परत जिवंत झाले तेव्हा त्यांना कोणीच आपलंसं करायला तयार नव्हतं. केतुला एका ब्राह्मणाने आश्रय दिला आणि त्याला वाढवलं. केतुने आपल्या मानलेल्या पित्याकडून ज्ञान ग्रहण केलं. त्याने ह्या स्थळी तपश्चर्या केली आणि ग्रह होण्याचं वरदान मिळवलं. केतुच्या पत्नीचं नाव आहे चित्रलेखा. आणि त्यांच्या पुत्राचं नाव अवमृत. केतुचं ह्या शिवाय अजून एका ठिकाणी मंदिर आहे.

ह्या स्थळातील तीर्थे: इथे नागतीर्थ नावाचं तीर्थ आहे. असा समज आहे कि हे तीर्थ वासुकी नागाने निर्माण केलं. ह्या तीर्थाच्या पश्चिम दिशेला एकमेकात मिसळलेले पिंपळ आणि नीम वृक्ष आहेत. ह्या ठिकाणी नागपूजा केली जाते.

केतु ग्रहाचे महत्व:

ज्योतिष शास्त्रानुसार केतु हा मोक्षकारक ग्रह आहे. वृश्चिक राशीमध्ये तो उच्चेत असतो तर वृषभ राशीमध्ये तो निचेत असतो. मेष, कर्क, सिंह आणि कुंभ राशींचा केतु शत्रू आहे. ग्रहांमध्ये केतु शुक्राचा मित्र आहे तर सूर्य, चंद्र आणि मंगळ ग्रहांचा तो शत्रू आहे.

केतू महादशा ७ वर्ष चालते.

केतुची अधिदेवता चित्रगुप्त आहे तर प्रत्याधिदेवता गणपती आहे. त्याचं वाहन बेडूक आहे.

कुंडलीमध्ये केतुच्या प्रभावामुळे अकस्मात मृत्यू, गुप्त धनप्राप्ती अशा गोष्टी घडतात. गुन्हेगारीच्या संदर्भात पण त्याचा प्रभाव असतो.

केतु ग्रहदोषांपासून निवृत्ती:

प्रत्येक चतुर्थीला गणपतीवर दुर्वांचा अभिषेक केल्याने केतु दोषांपासून निवृत्ती होते. केतुचे प्रिय अन्न उडद डाळ. केतूला रंगबिरंगी कपडे प्रिय.

संतांना नारळ, शिजवलेला भात आणि फळांची भिक्षा दिल्याने पण केतु ग्रहदोषांपासून निवृत्ती होते.  

केतु ग्रहाची वैशिष्ठ्ये:


#
वैशिष्ठ्य
केतु ग्रह
पत्नी
चित्रलेखा
कपड्यांचा रंग
विविध रंगांच्या पुष्पांची आखणी
लिंग
पुरुष
पंच महाभूतातील घटक
पृथ्वी
देव
गणेश
वाहन
बेडूक
अधिदेवता
चित्रगुप्त
धातू
पारा
रत्न (खडा)
वैडूर्य
१०
अवयव
त्वचा
११
चव
आंबट
१२
धान्य
कुळीथ  
१३
ऋतू
शरद  
१४
ग्रहाच्या मुखाची दिशा
पूर्व मध्य
१५
पुष्प
लाल कमळ
१६
क्षेत्र वृक्ष
बांबू
१७
आठवड्यातला दिवस
मंगळवार आणि रविवार
१८
ध्वनी
-

केतु ग्रहाची रांगोळी:

केतुची पूजा करताना काढावयाची रांगोळी:



केतु ग्रहाचा श्लोक :

केतु ग्रह देवाला प्रसन्न करण्यासाठी ह्या श्लोकाचा जप करावा

पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रहमस्तकम्  |

रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् ||

No comments:

Post a Comment