Thursday, January 31, 2019

नवग्रह मंदिरे - शनि

शनि ग्रह मंदिराची माहिती:


मंदिराची माहिती:


मंदिराचे नांव: थिरुनल्लार शनी कोविल
स्थल देवता: श्री शनीश्वरन
देवीचे नांव: श्री भोगमार्ता पूनमुलैयाल   
ग्रहाचे नांव: शनि  
गावाचे स्थान: थिरुनल्लार, तामिळनाडू ६०९६०७, भारत
ऐतिहासिक / पौराणिक नांव:  दर्भारण्येश्वरर (दर्भ + अरण्य + ईश्वर)

मंदिराकडे जाण्याचा मार्ग:

हे मंदिर कुंभकोणम - कारैकल मार्गावर आहे. नागपट्टीनं पासून २५ किमी वर आहे.

शनि ग्रह मंदिराचा इतिहास:

पुराणांनुसार सृष्टी निर्माण केल्यावर, ब्रह्मा सृष्टीमध्ये भ्रमण करण्यासाठी निघाला. जेव्हां तो दर्भाच्या अरण्यामध्ये आला तेव्हा त्या अरण्याच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला. आणि त्या अरण्यामध्ये त्याने तपश्चर्या केली आणि स्वयंभु शिवलिंगाची उपासना केली.

शिव ब्रह्माच्या उपासनेवर प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रह्माला सर्व शास्त्रांचं ज्ञान दिलं आणि वेदांचं मर्म सांगितलं. ब्रह्माने ह्या अरण्यामध्ये बराच काळ वास्तव्य केलं आणि शिवपार्वतीची उपासना केली आणि त्यांची मंदिरे पण बांधली.  ब्रह्माने ब्रह्मतीर्थ तर सरस्वतीने वाणीतीर्थ निर्माण केलं. ह्याच ठिकाणी इंद्र, अष्टदिक्पाल (आठ दिशांचे स्वामी) आणि पवित्र अशा हंसाने पण इथे त्यांची त्यांची शिवलिंगे स्थापन करून त्यांची तपश्चर्या केली.

ह्या ठिकाणाला विविध नावे आहेत. ती अशी. ब्रह्माने ह्या ठिकाणी तपश्चर्या केली म्हणून ह्या ठिकाणाचे नाव आदिपुरी (आदि म्हणजे सुरुवात जिथून झाली) असे पण आहे. ह्या ठिकाणी पवित्र दर्भ भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ह्या ठिकाणाला दर्भारण्य असे पण नाव आहे. इथे नळ राजाने तपश्चर्या केली म्हणून ह्या ठिकाणाला नल्लार असे पण म्हणले जाते आणि म्हणूनंच इथल्या शंकराचे नाव नल्लेश्वर आहे.  

शनि ग्रहाचा इतिहास:

संचिका (उषा देवी) हि सूर्यदेवाची पत्नी. तिच्यापासून सूर्यदेवाला दोन पुत्र (वैवस्वत मनू आणि यम) आणि एक पुत्री (यमुना) झाली होती. संचिकादेवीला सूर्यदेवाची उष्णता सहन झाली नाही म्हणून तिने स्वतःच्या छायेतून छायादेवी निर्माण केली आणि तिला सूर्यदेवाबरोबर राहायला सांगून ती आपल्या पित्याकडे गेली. पण तिचा पिता ह्या कृत्यामुळे तिच्यावर रागावला आणि त्याने तिला परत सूर्यदेवाकडे पाठवले. पण पतीच्या भीतीपोटी संचीकादेवी उत्तरध्रुवावर गेली आणि तिथे घोडीच्या रूपात राहून तपश्चर्या करू लागली. इकडे छायादेवीपासून पण सूर्याला दोन पुत्र (सावर्णि मनू आणि शनी) आणि एक पुत्री (भद्रा) झाली.

छायादेवी आपल्या सावत्र पुत्राला म्हणजेच यमदेवाला खूप त्रास द्यायची. म्हणून यमदेवाने एकदा छायादेवीला लाथ मारली. छायादेवीने यमाला पंगू होण्याचा शाप दिला. जेंव्हा सूर्यदेवाला हे माहित झालं तेंव्हा त्याने यमाची पंगूतेतून सुटका केली. त्याचवेळी त्याला संचीकादेवी सोडून गेल्याची पण माहिती कळली. त्याने उत्तरध्रुवावर जाऊन संचीकादेवीला परत आणले. म्हणूनंच सूर्याला इथे उत्तरायण म्हणलं जातं. परत आल्यावर सूर्यदेव त्याच्या दोन्ही पत्नींसह राहू लागला.

छायादेवीच्या त्रासाने आतमध्ये धुमसत असलेल्या यमदेवाने तिच्या पुत्राला म्हणजेच शनीदेवाला लाथ मारली आणि त्यामुळे शनिदेव पंगू झाले. सूर्यदेवाने शनिदेवाला ग्रह होण्याचं वरदान दिलं. शनिदेव काशीस गेले आणि त्यांनी तेथे शक्ती संपादन करण्यासाठी  तपश्चर्या केली.

शनि ग्रहाचे महत्व:

शनिदेव हा मकर आणि कुंभ राशींचा स्वामी आहे. तूळ राशीसाठी तो उच्चेत आहे तर मेष राशीसाठी तो नीचेत आहे.

कुंडलीमध्ये शनिदेव हा आयुष्याच्या अवधी बद्दल निर्णय देतो. शनिदेवाचा प्रभाव पुढील गोष्टींवर पडतो - व्यवसाय, शीलभ्रष्टता आणि अपमान यांचे भय, निद्रानाश, जीवहत्या. पुढील अवयवांवर शनिदेव नियंत्रण ठेवतो - नाडी, त्वचा, केश, नखे, गुद (आतडे).

कुंडलीमधील ३, ७ आणि १०व्या घरांवर शनिदेवाची दृष्टी असते. शनिदेवाला एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यास २ १/२ वर्ष लागतात. स्वराशीपासून १२व्या राशीमध्ये जेव्हा शनिदेव प्रवेश करतो तेव्हा त्या राशीच्या व्यक्तींची पुढची ७ १/२ (साडेसात) वर्ष ही अनिष्ट फळं देणारी असतात. ह्यालाच साडेसाती असे म्हणतात.

शनी महादशा ही १९ वर्ष चालते.

शनि ग्रहदोषांपासून निवृत्ती:

शनिदेव ग्रहादोषाच्या निवृत्तीसाठी ((विशेषतः साडेसाती चालू असताना) पुढील उपाय उपयोगी ठरतात
  1. श्री हनुमानाची उपासना
  2. श्री हनुमान स्तोत्राचे पठण
  3. शनिदेव स्तोत्राचे पठण
  4. प्रत्येक शनिवारी शनिमहात्म्य वाचणे
  5. प्रयेक शनिवारी उपवास करणे (उपवास करताना मीठ खाऊ नये)
  6. शनिदेवाच्या मंत्राचा जप
  7. पुढील गोष्टींचे दान करणे - काळे तीळ, काळे कपडे, लोखंडाचा खिळा, निळे फुल (गोकर्ण).
  8. मंदिरामध्ये काळ्या कापडाची वात आणि तिळाचे तेल वापरून दिवा प्रज्वलित करणे   

शनि ग्रहाची वैशिष्ठ्ये:


#
वैशिष्ठ्य
शनि ग्रह
पत्नी
निळादेवी
कपड्यांचा रंग
काळा / निळा    
लिंग
नपुंसक
पंच महाभूतातील घटक
वायू
देव
ब्रह्म  
वाहन
कावळा
अधि देवता
यम
धातू
लोखंड
रत्न (खडा)
नीलम
१०
अवयव
स्नायू
११
चव
तुरट
१२
धान्य
काळे तीळ
१३
ऋतू
सर्व ऋतू  
१४
ग्रहाच्या मुखाची दिशा
पश्चिम
१५
पुष्प
शंख पुष्प   
१६
क्षेत्र वृक्ष
दर्भ  
१७
आठवड्यातला दिवस
शनिवार
१८
ध्वनी

शनि ग्रहाची रांगोळी:

शनिची पूजा करताना काढावयाची रांगोळी:



शनि ग्रहाचा श्लोक :

शनि ग्रह देवाला प्रसन्न करण्यासाठी ह्या श्लोकाचा जप करावा

नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् |
छायामार्तण्डसंभूतं तं नमामि शनैश्चरम् ||

No comments:

Post a Comment