मागच्या अंकामध्ये तामिळ महिने आणि प्रत्येक महिन्यामध्ये साजरे होणारे प्रसिद्ध सण ह्यांची माहिती करून घेतली. आता ह्या अंकामध्ये शिव मंदिरांच्या समूहांबद्दल माहिती करून घेऊया. शिव मंदिरांचे काही प्रसिद्ध समूह आहेत. ऊदाहरणार्थ ६३ नायनमारांनी गायिलेल्या शिवस्तुतींमध्ये ज्या ज्या मंदिरांचा उल्लेख आहे त्या मंदिरांना एकत्रित "पाडल पेथ्र स्थळं" असं म्हणतात. तसेच जिथे जिथे नवग्रहांनी भगवान शिवांची उपासना केली त्या नऊ मंदिरांना नवग्रह स्थळं म्हणतात. अजून काही प्रसिद्ध समूहांची नावे इथे देत आहोत. ह्या समूहांतील प्रत्येक मंदिराची माहिती आम्ही पुढे देणार आहोत.
- दक्षिण भारतातील नवग्रह स्थाने
- ज्योतिर्लिंगे
- पंचभूत स्थळे
- अष्टविराट्ट्म स्थळे
- सप्तस्थानं
- सप्तमातृका स्थळे
- सप्तमंगै स्थळे
- सप्तविडंगम
- पंचारण्य स्थळे
- पंचमायनं स्थळे
- पाडल पेथ्र स्थळे
ह्या समूहांतील प्रत्येक मंदिराची माहिती आम्ही देणार आहोत.
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment