Sunday, April 30, 2023

श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग ९

मागच्या अंकात आपण श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग ८ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांच्या श्री नंदिकेश्वरर ह्या रूपाबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री भिक्षाटनर ह्या रूपाबद्दल माहिती करून घेऊया. 

पुराणांनुसार एकदा श्री पार्वती देवींनी श्री ब्रम्हांना भगवान शिव समजून त्यांची पाद्यपूजा केली. भगवान शिवांना हे श्री ब्रम्हांचं वर्तन आवडलं नाही. त्यांच्या मते श्री ब्रम्हांनी श्री पार्वती देवींना फसवलं आणि म्हणून क्रोधामध्ये त्यांनी श्री ब्रम्हांचं एक शिर छेदलं. पण ह्यामुळे भगवान शिवांना ब्रह्महत्येचा दोष प्राप्त झाला. ह्या दोषांचं निवारण करण्यासाठी भगवान शिवांनी एका भिक्षाटनर (भिक्षा मागणारा तपस्वी) रूपात  थिरुकरम्बूर येथे श्री विष्णूंची आराधना केली. ह्या आराधनेमुळे त्यांना ह्या शापापासून थोड्या प्रमाणामध्ये मुक्ती मिळाली. पुढे त्यांनी जेव्हां कमलपुष्करिणी ह्या तीर्थात स्नान करून परत श्री विष्णूंची आराधना केली तेव्हा त्यांना ह्या शापापासून पूर्ण मुक्ती मिळाली. म्हणून येथे भगवान शिवांनी श्री विष्णूंचं मंदिर बांधलं. इथे श्री विष्णूंचं श्री हर-शाप-विमोचन असा नाव आहे. 

अशी पण आख्यायिका आहे कि भगवान शिवांनी ब्रह्महत्या दोषाचं निवारण करण्यासाठी भिक्षा मागणाऱ्या तपस्वीचं रूप धारण केलं. आणि त्यांनी जेव्हा वाराणसी मधे श्री अन्नपूर्णी (श्री पार्वती देवींचं एक रूप) कडे भिक्षा मागितली तेव्हा त्यांच्या ब्रह्महत्या दोषाचं निवारण झालं.

अजून एक आख्यायिका आहे कि त्यानंतर भिक्षाटनर रूपात त्यांनी दारुकवनात जाऊन तेथील ऋषींच्या गर्वाचा नाश केला.

पुढच्या अंकात आपण सनातन कुरवर (गुरुवर) ह्यांच्या बद्दल माहिती करून घेऊ या. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment