Thursday, June 15, 2017

Phalasruti - fruits of reading Shri Vinayak Vijay Granth



श्री विनायक विजय हा स्कंद पुराणातील गणेश महात्म्यावर आधारित ग्रंथ आहे. श्री भास्कर जोशी ह्यांच्या आजोबांनी हा ग्रंथ लिहिला आहे. 

श्री विनायक विजय ग्रंथाची फलश्रुती 

श्री गणेश याच्या नुसत्या नामाने पातकांचा नाश होतो. हा सर्व चल अचल यांचा ईश आहे. जगाचा प्रारंभ याच्यापासून आहे. कार्यारंभी याचे स्मरण केल्यास कार्यात कुठलेही विघ्न येत नाही.

हा श्री विनायक विजय ग्रंथ जो मनोभावे ऐकेल त्याची सर्व पापांपासून मुक्तता होईल व त्याला मोक्षप्राप्ती होईल. 

सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्नान केल्याने जे पुण्य लाभते ते श्री विनायक विजय ग्रंथ वाचल्याने मिळेल. हा श्री विनायक विजय ग्रंथ जो नित्य पठण करेल व श्रवण करेल त्यास विनायकाची कृपा सदैव लाभेल. हा ग्रंथ घरी ठेवल्यास चोर, अग्नी यापासून भय राहत नाही. घरात सदैव लक्ष्मीचा वास राहील. 

हे व्रत करायचे असल्यास ह्या ग्रंथपठणास श्रावण शुद्ध चतुर्थीपासून सुरुवात करावी व भाद्रपद चतुर्थीला समाप्त करावा. ब्राह्मणाची पूजा करून त्यास यथाशक्ती दक्षिणा द्यावी. शक्य असल्यास सवत्स धेनु ब्राह्मणास दान द्यावी. पंचमीला दोन ब्राह्मणांसह पारणे करावे.

या व्रताने विनायक प्रसन्न होऊन सर्व मनोरथ पूर्ण करेल. पुत्रपौत्रादी संतती वाढेल, विविध सुखे प्राप्त होतील. त्रिभुवनात कीर्ती होईल व लक्ष्मीचे घरात सदैव वास्तव्य राहील. 

श्री विनायक विजय ग्रंथ नित्य श्रवण केल्यास चारही पुरुषार्थांचा (धर्म, अर्थ, काम, मोक्ष)) लाभ होईल. विद्यार्थी निपुण होईल. ज्ञानार्थीला ज्ञानाचा लाभ होईल. 

असा हा सर्व संकटांचा नाश करणारा श्री विनायक विजय ग्रंथ नित्य पठण वा श्रवण करावा.

हा श्री विनायक विजय ग्रंथ श्री शंकरांनी कार्तिकेयास सांगितला व व्यासमुनींनी ऋषीमुनींना सांगितला. 

No comments:

Post a Comment