आधीच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे हे मंदिर थिरुपुगलूर येथील श्री अग्नीश्वरर मंदिराच्या आवारामध्ये आहे. हे मंदिर नन्नीलं पासून १२ किलोमीटर्सवर, थिरुवारुर पासून २१ किलोमीटर्सवर, नागपट्टीनं पासून २७ किलोमीटर्सवर, मयीलादुथुराई पासून ३२ किलोमीटर्सवर आणि कुंभकोणम पासून ४१ किलोमीटर्सवर. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे. शैव संत संबंधर, सुंदरर आणि अप्पर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. १०व्या आणि ११व्या शतकामध्ये चोळा राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि विस्तारही केला. ह्या मंदिराच्या आवारात ६७ शिलालेख उपलब्ध आहेत.
मूलवर: श्री वर्धमानेश्वरर, श्री निगळकालनाथर
देवी: श्री मनोन्मनी अम्माई
पवित्र तीर्थ: अग्नी तीर्थ, बाल तीर्थ
क्षेत्र वृक्ष: पुन्नाग
क्षेत्र पुराण:
हे थिरुमुरुगनायनार ह्यांचे जन्मस्थान आहे. त्यांनी दररोज तीन वेळेला वनस्पती आणि फुले पुरवून ह्या मंदिराची सेवा केली. शैव संत संबंधर ह्यांनी त्यांच्या रचनांमध्ये थिरुमुरुगनायनार ह्यांची स्तुती केली आहे. अचलापूरम (नल्लूर पेरुमानम) ह्या स्थळी संबंधरांच्या विवाहसमयी त्यांना मुक्ती प्राप्त झाली.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री अग्नीदेव, १८ सिद्ध, भारद्वाज ऋषी, नळ राजा, अप्पर, सुंदरर आणि संबंधर
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पूर्वाभिमुख असून इथे पांच स्तरांचं राजगोपुर आहे आणि दोन परिक्रमा आहेत. बलीपीठ आणि नंदी गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. भगवान शिवांचं देवालय श्री अग्नीश्वरांच्या देवालयाच्या शेजारी आहे. हे थिरुमुरुगनायनार ह्यांचे जन्मस्थान आहे. अचलापूरम (नल्लूर पेरुमानम) ह्या स्थळी संबंधरांच्या विवाहसमयी त्यांना मुक्ती प्राप्त झाली. इथले शिव लिंग स्वयंभू आहे.
मंदिरातल्या इतर मूर्ती आणि देवालये:
श्री बालगणपती, श्री दंडपाणी, श्री चंद्रशेखरर आणि श्री चंडिकेश्वरर. थिरुमुरुगनायनार ह्यांचे देवालय गाभाऱ्यासमोर आहे.
श्री अंबिका देवींचे दक्षिणाभिमुखी स्वतंत्र देवालय आहे.
शैव संत संबंधर ह्यांनी रचलेली स्तोत्रे मंदिराच्या भिंतींवर कोरली आहेत.
प्रार्थना:
१. भाविक जनांचा असा समज आहे कि श्री वर्धमानेश्वरर ह्यांची पूजा केल्याने धन, आरोग्य, ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होतात.
२. ह्या ठिकाणी पूजा केल्याने पितृदोषांचे निवारण होते असा पण समज आहे.
पूजा:
नियमित त्रिकाल पूजा, प्रदोष पूजा, संकष्टी, पौर्णिमा. दिवाळी आणि पोंगल सणांच्या वेळी विशेष पूजा केल्या जातात. तसेच तामिळ नववर्ष दिन आणि इंग्लिश नववर्ष दिनी विशेष पूजा केल्या जातात.
मंदिरामध्ये साजरे होणारे महत्वाचे सण:
वैकासि (मे-जून): श्री मुरुग नायनार ह्यांची गुरुपूजा
आनी (जून-जुलै): थिरुमंजनं
आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम - पूर्वा फाल्गुनी नक्षत्रदिवशी पूजा
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): कार्थिगई दीपम, प्रत्येक सोमवारी विशेष पूजा
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
मंदिराच्या वेळा: सकाळी ६.३० ते दुपारी १२.३०, दुपारी ४ ते रात्री ९
मंदिराचा पत्ता:
श्री वर्धमानेश्वरर मंदिर,
थिरुपुगलूर वर्धमानीचरम,
थिरुकन्नपुरम मार्गे,
तालुका: थिरुमारुगल,
जिल्हा: नागपट्टीनं,
तामिळ नाडू ६०९७०४
दूरध्वनी: +९१-९४४३११३०२५, ०४३६६२३७१९८
मंदिराच्या पुजाऱ्याचा संपर्क: श्री रामनाद गुरुकल: +९१-९४८७८६४४८५
No comments:
Post a Comment