Sunday, February 22, 2026

थिरुपांपूरं येथील श्री शेषपुरीश्वरर / श्री पांपूनाथर मंदिर

हे शिव मंदिर कुंभकोणम-कारैक्कल मार्गावर कुंभकोणम पासून ३० किलोमीटर्स वर असलेल्या थिरुपांपूरं ह्या गावात वसले आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत अप्पर आणि संबंधर ह्यांनी आपल्या काव्यांमध्ये इथल्या भगवान शिवांची स्तुती गायली आहे. हे मंदिर चोळा साम्राज्याच्या राजांनी ६व्या शतकाच्याही आधी बांधलं असावं. वर्तमान बांधकाम साधारण १३०० वर्षे जुनं आहे. इथे २८ शिलालेख आहेत ज्यामध्ये चोळा, पांड्या आणि मराठा राजांनी मंदिरासाठी केलेल्या कामाचे तसेच त्यांनी दिलेल्या देणग्यांचे उल्लेख आहेत.

मूलवर: श्री शेषपुरीश्वरर, श्री पाम्बीसर, श्री पांपुरेश्वरर (तामिळ मध्ये पांपु म्हणजे नाग किंवा साप)
देवी: श्री ब्रम्हाम्बिका, श्री मामलयत्ति, श्री वंदूपुंकुळली
क्षेत्र वृक्ष: शमी वृक्ष
पवित्र तीर्थ: आदिशेष तीर्थ, नाग तीर्थ
पुराणिक नाव: शेषपुरी, थिरुपांपूरं, पम्पारनंनगर

क्षेत्र पुराण:

१. अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, शंखपाल, कुलीग, पद्म, महापद्म हे अष्टनाग आहेत. एकदा भगवान विष्णू भगवान शिवांची पूजा करत असताना भगवान शिवांच्या गळ्यातील वासुकी नागाच्या मनात अभिमान जागृत झाला. त्याला असं वाटलं भगवान विष्णू त्याची पण पूजा करत आहेत. भगवान शिवांना ह्याची जाणीव झाली आणि त्यांनी सर्व नागांना शाप दिला कि त्यांची विषशक्ती लोप पावेल. तेव्हा अष्टनाग भगवान शिवांकडे आले आणि त्यांनी विनंती केली कि केवळ एका नागाच्या चुकीमुळे सर्व नागांना त्याचा परिणाम भोगायला लागू नये. त्यांनी भगवान शिवांना ह्या शापाचं विमोचन करण्यासाठी उपाय विचारला. भगवान शिवांनी त्यांना पृथ्वीवर जाऊन महाशिवरात्रीच्या रात्री चार प्रहारांमध्ये चार ठिकाणी - कुंभकोणम, थिरुनागेश्वरम, थिरुपांपूरं आणि नागोर - पूजा करण्याचा सल्ला दिला. आदिशेषांच्या नेतृत्वाखाली हे अष्टनाग पृथ्वीवर आले आणि त्यांनी भगवान शिवांच्या आज्ञेनुसार भगवान शिवांची चार ठिकाणी पूजा करून शापापासून मुक्ती मिळविली. आदिशेषांनीं श्री शेषपुरिश्वरांची महाशिवरात्रीच्या रात्री तिसऱ्या प्रहरामध्ये पूजा केली. त्या रात्री पूजा करण्यासाठी फुले उपलब्ध नव्हती म्हणून त्यांनी वडाच्या झाडाला अगस्तीची फुले बांधून त्याची पूजा केली. असा समज आहे की अष्टनागांनी दर महाशिवरात्रीला इथे पूजा केली. इथल्या स्थानिक लोकांच्या समजूतीनुसार अगस्ती फुले हि परत फुलत नाहीत आणि वडाच्या झाडाची देठे जमिनीला टेकत नाहीत आणि ह्या काळात ते आधार देतात.

२. असा समज आहे की गंगादेवी तुला ह्या तामिळ महिन्यामध्ये इथे आल्या आणि त्यांनी कार्थिगई महिन्यामध्ये कुंभकोणम इथे येऊन महामागम तीर्थामध्ये स्नान केलं. गंगेमध्ये सर्वजण आपली पापे धुवायला स्नान करतात जी अर्थातच गंगादेवी आपल्यामध्ये शोषून घेतात. म्हणून गंगादेवींनी इथे स्नान केल्यामुळे त्यांनी शोषून घेतलेल्या पापांचं क्षालन झालं.

३. दक्ष राजाने भगवान शिवांचा अपमान केल्याने वीरभद्रांनी त्याचा शिरच्छेद केला. पार्वती देवींच्या विनंतीवरून भगवान शिवांनी दक्षाच्या शरीराला मेंढीचे शीर लावून त्याला सजीव केलं. इथल्या स्थळ पुराणानुसार मेंढीचे शीर असलेला दक्ष राजा इथे आला आणि भगवान शिवांची पूजा केली ज्यामुळे त्याच्या पापांचे क्षालन झाले.

४. कोचेंगट चोळा राजाला रक्ताचा कर्करोग झाला होता. त्याने इथे येऊन इथल्या पवित्र तीर्थामध्ये स्नान केलं आणि भगवान शिवांची पूजा केली ज्यामुळे तो बरा झाला.

५. एका आधीच्या ब्लॉगमध्ये आम्ही आदिशेष आणि वायुदेव ह्यांच्यामधल्या द्वंद्वाबद्द्ल उल्लेख केला होता. त्यांच्या द्वंद्वामुळे सर्व देव त्रासले होते. शेवटी इंद्रदेवांच्या नेतृत्वाखाली सर्व देव आदिशेषांकडे आले आणि त्यांनी त्यांना हे द्वंद्व थांबविण्यासाठी मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण वायुदेवांनी द्वंद्व चालूच ठेवलं. भगवान शिवांना ह्याचा राग आला आणि त्यांनी दोघांना मेंढी होण्याचा शाप दिला. जेव्हा त्या दोघांनी भगवान शिवांकडे क्षमायाचना केली तेव्हा भगवान शिवांनी वायुदेवांना वैगाई नदीच्या उत्तरेला आणि मदुराईच्या पूर्वेला असलेल्या स्थळी तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली. आदिशेषांना भगवान शिवांनी १२ वर्षे तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली. आदिशेषांनी एक पवित्र तीर्थ निर्माण केलं आणि १२ वर्षे तपश्चर्या करून ते शापापासून मुक्त झाले. 

६. पुराणानुसार आदिशेष हे सर्व विश्वाचा भार आपल्या माथ्यावर घेतात. एकदा त्यांना हा भार सहन न होऊन ते आजारी पडले. भगवान शिवांना त्यांनी ह्यावर उपाय विचारला. भगवान शिवांनी त्यांना महाशिवरात्रीच्या रात्री कुंभकोणम येथील नागेश्वर मंदिरात तसेच इथल्या नागनाथर मंदिरामध्ये उपासना करण्याची आज्ञा दिली. तसे करून आदिशेष स्वस्थ झाले.

७. सुनीथन ह्या काशीच्या राजाला वशिष्ठ ऋषींनी स्वप्नांत येऊन ह्या स्थळी येऊन भगवान शिवांची पूजा करण्याची आज्ञा केली. त्या आज्ञेप्रमाणे पूजा करून सुनीथन अपस्मारापासून मुक्त झाला.

८. श्री ब्रह्मदेवांनी तिलोत्तमा ह्या स्वर्गीय अप्सरेला निर्माण केले. तिलोत्तमा श्री ब्रह्मदेव आपले पिता आहेत असे मानून त्यांच्याकडे गेली. पण ब्रह्मदेव तिच्यावर मोहित झाले. तिलोत्तमाने भगवान शिवांकडे धाव घेतली. भगवान शिवांनी श्री ब्रह्मदेवांना त्यांची सृष्टी निर्माण करण्याची शक्ती लोप पावेल असा शाप दिला. ऋषीमुनी आणि भगवान शिवांच्या सल्ल्याने श्री ब्रह्मदेव ह्या स्थळी आले. त्यांनी ब्रह्म तीर्थ निर्माण करून एक वर्ष इथे तपश्चर्या केली आणि ते शापापासून मुक्त झाले.

९. श्री इंद्रदेवानी गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिच्या बरोबर गैरवर्तन केले म्हणून गौतम ऋषींनी इंद्रदेवांना शाप दिला कि त्यांच्या शरीरावर १००० नेत्र निर्माण होतील. ह्या शापापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी भगवान शिवांच्या आज्ञेवरून इंद्रदेव इथे आले आणि त्यांनी १२ वर्षे तपश्चर्या केली. भगवान शिवांनी शिवरात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये दर्शन दिलं आणि शापापासून मुक्त केलं.

१०. एकदा खेळीमेळीच्या मनःस्थितीमध्ये श्री उमादेवींनी भगवान शिवांच्या डोळ्यावर आपले हात ठेवून ते बंद केले. त्यामुळे सर्व विश्वामध्ये अंधार झाला आणि विश्वातलं सर्व जीवन थांबलं. ह्या कृत्याबद्दल भगवान शिवांनी उमादेवींना त्यांच्यापासून विभक्त व्हायला सांगितलं. ह्या चुकीचा परिहार करण्यासाठी भगवान शिवांनी उमादेवींना ह्या स्थळी येऊन १२ वर्षे तपश्चर्या करण्याची आज्ञा केली. उमादेवींनी इथे १२ वर्षे तपश्चर्या केली. आणि भगवान शिवांनी त्यांना शिवरात्रीच्या चौथ्या प्रहरी दर्शन दिलं आणि शापापासून मुक्त केलं. 

११. एकदा कैलासावर अगस्त्य ऋषी आणि इतर ऋषी ह्यांच्यामध्ये तामिळ आणि संस्कृत ह्यामध्ये श्रेष्ठ भाषा कुठली ह्यावर वाद उठला. अगस्त्य ऋषींचं दोन्ही भाषा समान पातळीवर आहेत असं मत होतं. पण इतर ऋषींना ते मान्य नव्हतं म्हणून त्यांनी अगस्त्य ऋषींना मूक होण्याचा शाप दिला. भगवान शिव आणि भगवान विष्णू हे दोघेही अगस्त्य ऋषींशी सहमत होते पण त्यांनी ह्या वादामध्ये हस्तक्षेप केला नाही. अगस्त्य ऋषींनी भगवान शिवांकडे प्रार्थना केली. भगवान शिवांनी अगस्त्य ऋषींना त्यांची एक वर्ष सेवा करण्याची आज्ञा दिली. अगस्त्य ऋषी इथे आले आणि त्यांनी एक वर्ष भगवान शिवांची सेवा केली. महाशिवरात्रीच्या पहिल्या प्रहरी भगवान शिवांनी अगस्त्य ऋषींना दर्शन दिलं आणि त्यांची गेलेली वाचा त्यांना परत दिली. भगवान शिवांनी त्यांना पोडिगाई टेकडीवर जायला सांगितलं आणि तामिळ भाषेचा प्रसार करायची आज्ञा दिली.

१२. अग्निदेवांनी दक्ष यज्ञामध्ये सहभाग घेतला म्हणून वीरभद्रांनी त्यांना शिक्षा दिली. वीरभद्रांनी अग्निदेवांचे हात कापले आणि त्यांना लाथ मारली. अग्निदेवांनी भगवान शिवांकडे प्रार्थना केली. भगवान शिवांनी त्यांना इथे येऊन ३ वर्षे उपासना करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे उपासना करून अग्निदेव पूर्ववत झाले.

१३. एकदा सूर्यदेवांनी नैमिषारण्यामध्ये येऊन ऋषींकडे त्यांच्या तेजाचा स्रोत कुठे आहे ह्याची चौकशी केली. ऋषींनी त्यांना व्यासमुनींकडे पाठवले. व्यासमुनींनी सूर्यदेवांना इथे येऊन भगवान शिवांची उपासना करायला सांगितले. सूर्यदेव पहिल्यांदा काशीमध्ये गेले आणि तिथे त्यांनी गंगेमध्ये स्नान केलं. त्यानंतर त्यांनी मयीलादुथुराई येथे येऊन मयूरनाथर ह्यांची उपासना केली. त्यानंतर ते इथे आले आणि इथे त्यांनी १२ वर्षे रोज १००० फुले अर्पण करून भगवान शिवांची उपासना केली. १२ वर्षानंतर चित्राई ह्या तामिळ महिन्याच्या पौर्णिमेला भगवान शिवांनी त्यांना वरदान दिलं कि त्यांचं तेज अबाधित राहील.

१४. पुराणानुसार बृहस्पती ऋषी जेव्हा त्यांच्या आश्रमात नव्हते तेव्हा चंद्र देवांनी बृहस्पती ऋषींची पत्नी वनतारा हिच्याशी अवैधरित्या संबंध जोडला. ह्या संबंधातून त्यांना बुध हा पुत्र झाला. बृहस्पतींनी चंद्राला क्षयरोग जडेल अशा शाप दिला. इंद्रदेव आणि इतर देवांनीं बृहस्पतींकडे चंद्रदेवांना शापापासून मुक्ती कशी होईल हि विचारणा केल्यावर बृहस्पतींनी चंद्रदेवांना इथे येऊन भगवान शिवांची उपासना करण्याचा सल्ला दिला. चंद्रदेव इथे आले आणि त्यांनी १२ वर्षे दररोज १००० फुलांनी भगवान शिवांची उपासना केली. थै ह्या तामिळ महिन्याच्या पौर्णिमेला त्यांची शापातून मुक्ती झाली.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री ब्रह्मदेव, श्री इंद्रदेव, श्री पार्वती देवी, अगस्त्य ऋषी, श्री चंद्रदेव, दक्ष राजा, श्री गंगादेवी, श्री सूर्यदेव, श्री अग्निदेव, सुनीथन, कोचेंगट चोळा राजा, आदिशेष इतर सात नागांसमवेत.

वैशिष्ट्ये:

१. इथे राहू आणि केतूची एकच शरीर असलेली मूर्ती आहे. ह्या मूर्तीमध्ये ते भगवान शिवांची हात जोडून पूजा करत आहेत. हे स्थळ राहू-केतू परिहार स्थळ आहे.

२. ह्या मंदिरामध्ये रविवारी आणि मंगळवारी सर्प हिंडताना दिसतात. असा समज आहे की ते भगवान शिवांची पूजा करण्यासाठी येतात. 

३. असा समज आहे की ह्या मंदिराची पुढील मंदिरांबरोबर एकत्रित पवित्रता आहे - थिरुनागेश्वरम, नागोर, किळपेरूमपल्लम (केतू देवाचे मंदिर), कालहस्ती, कुंभकोणम येथील नागनाथर. म्हणून पुराणानुसार हे स्थळ सर्व-दिशा-निवारण-स्थळ आहे.

४. हे बहुतेक एकच मंदिर आहे जिथे आदिशेषांची उत्सव मूर्ती आहे. 

५. इथे गाभाऱ्यामध्ये आदिशेष भगवान शिवांची पूजा करत आहेत हे दृश्य अद्वितीय आहे.

६. इथे श्री पार्वती देवींची मूर्ती भगवान शिवांच्या डावीकडे आहे. ही विवाह मुद्रा दर्शवते.

७. इथे अनेक लोकांनी मोठ्या सर्पांना कात टाकताना बघितले आहे. ह्या दाव्याला पाठिंबा देणारी छायाचित्रे इथे आहेत. उदाहरणार्थ २१ मार्च २००२ दिवशी ७.५ फूट लांब सर्पाने श्री पार्वती देवींच्या मूर्तीवर कात टाकली. २६ मे २००२ला ८.३ फूट लांब सापाने भगवान शिवांवर कात टाकली. ह्या गावामध्ये सर्पाच्या दंशाने कोणी मृत्यू पावल्याची कुठेही नोंद नाही.

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि ह्या मंदिराला तीन स्तरांचं राजगोपुर आहे आणि दोन परिक्रमा आहेत. इथे आणि राहू आणि केतूंची स्वतंत्र देवालये नाहीत. ते एकाच मूर्तीमध्ये आहेत आणि हात जोडून भगवान शिवांची प्रार्थना करत आहेत असे चित्रित केले आहे. त्यांचं एकच शरीर असल्याकारणाने हे राहूदोष आणि केतूदोष ह्या दोन्ही दोषांचे परिहार स्थळ आहे. ही मूर्ती मंदिराच्या ईशान्येला आहे. इथे एक पंचलिंग आहे जे भगवान शिवांच्या पांच मुखांचं प्रतीक आहे (ईशान, वामदेव, सद्योजात, तत्पुरुष, अघोर).

प्रवेशाजवळ थोडेसे विस्कळीत झालेले ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदी आहेत. ध्वजस्तंभाच्या पायाशी श्री विनायकांची मूर्ती आहे जिचे नाव श्री कोडीमार विनायक असे आहे. इथे थिरुमलै (कैलास ईश्वरर) ह्यांचे देवालय आहे. भगवान शिवांचे देवालय पूर्वाभिमुख आहे आणि गाभाऱ्यामध्ये गाभारा, अर्धमंडप आणि महामंडप आहे. इथले शिव लिंग छोटे आहे पण सुंदर आहे. गाभाऱ्यामध्ये आदिशेषांची उत्सव मूर्ती आहे ज्यामध्ये ते भगवान शिवांची पूजा करत आहेत. महामंडपामध्ये पुढील उत्सव मूर्ती आहेत - श्री नटराज, श्री सोमस्कंद, श्री मुरुगन ज्यांच्या हातामध्ये वज्र आणि भाला आहे. अर्धमंडपाच्या उत्तरेला श्री दुर्गादेवींचे देवालय आहे. गाभाऱ्याच्या तीन बाजू खंदकाने आच्छादलेल्या आहेत. 

कोष्ट मूर्ती: श्री गणेश, श्री दक्षिणामूर्ती आणि श्री दुर्गादेवी

ह्याशिवाय इथे बऱ्याच नागांच्या मूर्ती आहेत. 

श्री पार्वती देवींचे देवालय पूर्वाभिमुख असून भगवान शिवांच्या डाव्या बाजूला आहे. त्या आपल्या चार हातांनी भक्तांवर कृपावर्षाव करतात. त्यांच्या चार हातांमध्ये कमल, वरद मुद्रा, अभय मुद्रा आणि रुद्राक्ष माला आहे. 

इतर मूर्ती आणि देवालये:

माड कोविलमध्ये जशी रचना असते त्याचप्रमाणे इथे श्री दक्षिणामूर्ती कोष्टाच्या दक्षिण भागात आहेत. माड कोविल सारखच इथे पण पायऱ्या चढून श्री सट्टाईनाथर ह्यांचे दर्शन घ्यायला लागते. हि मूर्ती स्टुक्कोची आहे. श्री स्थळ विनायकांचे देवालय पश्चिम भागात आहे. त्यांना राजराजा पिल्लैयार असे संबोधले जाते. श्री सुब्रह्मण्य ह्यांच्या मूर्तीमध्ये त्यांच्यासमवेत त्यांच्या दोन पत्नी आहेत. श्री चंडिकेश्वरर आणि श्री दुर्गा देवी ह्यांच्या मूर्ती मंदिराच्या कोपऱ्यात आहेत. इथले क्षेत्र वृक्ष २५० वर्षे जुने आहे. ह्या वृक्षाखाली पांच फणे असलेले आदिशेष आहेत. तसेच ह्या वृक्षाखाली मोरावर आरूढ झालेले श्री मुरुगन ह्यांची मूर्ती आहे. वृक्षाच्या बुंध्यामध्ये श्री आदिपांपुरेश्वरर ह्यांची मूर्ती आहे जिला श्री वनेश्वरर असे पण संबोधले जाते. मंदिराच्या पूर्वेला पुढील मूर्ती आहेत - श्री भैरव, श्री सूर्य, श्री विष्णू, श्री ब्रह्म, पंचलिंगे, आदिशेष, राहू आणि केतू, श्री शनीश्वरर आणि शैव संत नालवर. 

१२व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंतच्या अनेक मूर्ती इथे सुरक्षित ठेवल्या आहेत. त्यातील काही मूर्ती अशा आहेत - श्री विनायक (ज्यांना श्री कन्नी  विनायक असे संबोधले जाते), भगवान शिव आणि श्री पार्वती देवी, श्री नटराज, श्री सुब्रमण्य ह्यांच्या त्यांच्या पत्नींसमवेत दोन मूर्ती, भगवान शिवांची एक भव्य मूर्ती ज्यामध्ये ते उभ्या मुद्रेमध्ये आहेत आणि असूरसंहार करत आहेत, पालीयारै (शयनगृह) चोक्कर, श्री चंडिकेश्वरर, शैव संत नालवर, श्री योगशक्ती अंबिका, श्री चोळादेवर, श्री मरी अम्मन, श्री चेल्लीअम्मन, श्री आदिपांपुरेश्वरर आणि श्री सोमस्कंदर. ह्या सगळ्या मूर्ती महामंडपामध्ये आहेत.

प्रार्थना:

१. भाविक जन इथे पुढील दोषांच्या परिहारासाठी प्रार्थना करतात - कालसर्पदोष, राहूकेतूदोष, कलत्र दोष, पुत्रदोष, विवाहातल्या अडचणी, कळत नकळत घडलेले सर्पहत्या दोष. जेव्हा सर्प हे वारंवार स्वप्नात येतात तेव्हा संध्याकाळी पांच च्या आत विशेष पूजा करतात.

२. भाविक जन इथे पुढील काळांमध्ये पूजा करतात -  राहूमहादशा (१८ वर्षे), केतूमहादशा (७ वर्षे), लग्न राशीपासून दुसऱ्या किंवा आठव्या घरात राहू आणि केतू असताना आणि राहू आणि केतूची अंतर्दशा चालू असताना.

३. शांती आणि समृद्धीसाठी भाविक जन इथे भगवान शिव आणि श्री पार्वतीदेवींची पूजा करतात.

पूजा:

दररोज चार पूजा होतात. राहू आणि केतूच्या देवालयामध्ये राहुकाळामध्ये पूजा केली जाते. राहू आणि केतू एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जात असताना विशेष पूजा केली जाते. ह्याशिवाय नियमित प्रदोष पूजा, पौर्णिमा आणि अमावास्येच्या दिवशी पूजा केल्या जातात.

मंदिरामध्ये साजरे होणारे सण:

चित्राई महिन्यापासून पंगूनी महिन्यापर्यंत सर्व उत्सव इथे साजरे होतात - मुख्यत्त्वेकरून मासी महिन्यात मासीमाघम आणि महाशिवरात्री, मारगळी महिन्यात अरुद्रदर्शन. 

मंदिराच्या वेळा: सकाळी ७.३० ते दुपारी १२.३०, दुपारी ४ ते रात्री ८

मंदिराचा पत्ता:

श्री शेषपुरीश्वरर / श्री पांपूरेश्वरर मंदिर,
थिरुपांपूरं,
तालुका: कूडवासल,
जिल्हा: थिरुवारुर
तामिळनाडू ६१२२०३

दूरध्वनी: +९१-४३५२४६९५५५, +९१-९४४३९४३६६५, +९१-९४४३०४७३०२, +९१-९९४३८४८१०७   

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


  


Thursday, February 19, 2026

Shri Sheshapureeshwarar Temple at Thirupampuram

This temple is also known as Shri Pampunathar Temple (Pampu in Tamil means snake or serpent).

This is a Shiva temple situated in Thirupampuram, which is about 30 kms from Kumbhakonam on Kumbhakonam - Karaikkal road. This is a Padal Pethra sthalam on the southern bank of Kaveri. Shaiva Saint Appar and Sambandhar have sung sacred hymns in praise of Lord in this temple.
 
This temple was built by Chola kings somewhere before the 6th century. The present structure is about 1300 years old. There are 28 stone inscriptions which describe the work done and the donations made by Chola, Pandya, and Maratha kings.

Moolavar: Shri Sheshapureeshwarar, Shri Pambeesar, Shri Pampureshwarar
Devi: Shri Brahmambika, Shri Maamalayatti, Shri Vandupoonkuzhali
Kshetra Vruksha: Shami tree
Sacred Theertha: Adi Shesha Theertha, Naag Theertha
Puranic Name: Sheshapuree, Thirupampuram, Pumparnannagar, Urgapuram

Kshetra Puran:
1. The ashtanagas are Ananta, Vasuki, Takshak, Karkotaka, Sankhapal, Kuliga, Padma and Mahapadma. When Lord Vishnu was worshiping Lord Shiva, the serpent Vasuki around the neck of Lord Shiva became proud as it felt that Lord Vishnu is also worshiping him. Lord Shiva observed this attitude of the serpent and cursed all the snakes to lose their power (venom). All the eight serpents mentioned earlier approached Lord Shiva, pleading that all of them should not be punished for the mistake of one. They asked the method of atonement for the curse. Lord Shiva advised them to go to the earth and  worship him on a night of Mahashivaratri at four places namely Kumbhakonam, Thirunageshwaram, Thirupampuram and Nagore. The serpents led by Adi Shesha went to these four places and got rid of their curse by worshiping Lord Shiva. Adi Shesha worshiped Lord Sheshapureeshwarar on the third part of the night at this place. As the flowers were not available for performing pooja at night they tied Agasthi flowers to the stems of the banyan tree and completed the worship. It is believed that the serpents worshiped Lord Shiva in this method on every Mahashivaratri day. Again from the local people we hear that the Agasthi flowers do not bloom and the stems of banyan tree do not touch the ground and give support during this period. 

2. Goddess Gangadevi is believed to have come to this place in the Tamil month of Thula after taking bath at Kumbhakonam in the Mahamagham tank in the month of Karthigai. It is believed that in doing so, she purged the sins of others bathing in her water.

3. According to the Sthala Puran, Daksha came to this place with a goat's head fitted to him. He worshiped Lord Shiva as atonement for insulting Lord Shiva. He was graced by the Lord at this place.

4. Chola king Kochengatanan came to this place. He took bath in the sacred theertha and worshiped Lord Shiva. After that he got rid of Leukemia.

5. We have mentioned in our earlier blog the fight between Adi Shesha and Lord Vayu to prove their supremacy. By their dispute, the devas and others suffered a lot. Finally the devas led by Lord Indra approached Adi Shesha and persuaded him to stop this trial of strength. But Vayu continued to show his strength. This angered Lord Shiva and he cursed Adi Shesha and Vayu to become goats. When they asked for atonement Lord Shiva asked Vayu to do penance at the place which was north of river Vaigai and to the east of Madurai. He asked Adi Shesha to worship him for 12 years. Adi Shesha created the sacred theertha and did penance for 12 years and got rid of the curse.

6. According to the Puran, Adi Shesha supports the world on his head. Once he felt the burden to be unbearable and fell ill. He approached Lord Shiva for remedy. Lord Shiva directed him to worship him on Mahashivaratri night at Nageshwarar temple in Kumbhakonam and the Naganathar temple at this place. He did as directed by the Lord and got his strength back.

7. Sunithan, the king of Kashi, was advised by Sage Vasishtha in his dream to come to this place and worship Lord Shiva. He worshiped Lord Shiva and got rid of his epilepsy.

8. Lord Brahma created a celestial damsel Tilottama. She considered him as her father and went to worship him. When Lord Brahma made advances to her she ran to Lord Shiva. Lord Shiva cursed Lord Brahma to lose his power of creation. Acting on the advice of rishis and Lord Shiva, Lord Brahma came to this place for a relief from the curse. He created the Brahma Theertha and did penance for one year and got back his power of creation.

9. Lord Indra was cursed by Sage Gautama to have thousand eyes all over his body for his illicit relation with his wife Ahilya. As an atonement he came here and worshiped Lord Shiva for 12 years on the advice of Lord Shiva. Lord Shiva graced him in the first part of the night on Shivaratri day and relieved him of the curse. 

10. Once Goddess Uma closed the eyes of Lord Shiva playfully. The whole world became dark and life came to standstill. Lord Shiva cursed Uma for this act and asked her to leave him. As an atonement he directed her to this place and asked her to worship him for 12 years. At the end of 12 years on the fourth part of night of Shivaratri he graced her and relieved her of the curse.

11. Once in Kailash there was an argument between Sage Agastya on one side and Rishis and Devas on the other side regarding the greatness of the languages Tamil and Sanskrit. Sage Agastya claimed that both languages are equal. As Rishis did not agree they cursed him. Lord Shiva and Lord Vishnu were in agreement with Sage Agastya but they did not intervene. Rishis and Devas cursed Agastya to become dumb for contradicting them. Sage Agastya prayed to Lord Shiva and Lord Shiva advised him to pray and work for him for one year. Sage Agastya came to this place and prayed and worked for Lord Shiva for a year. In the first part of the night on Mahashivaratri day the Lord appeared before sage Agastya and gave him his voice back. Lord Shiva directed him to Podigai hills and asked him to spread the Tamil language. 

12. Lord Agni was punished by Veerabhadra for attending Daksha Yagnya by cutting Agni’s hand and kicking him. Agni prayed to Lord Shiva for relief. Lord directed him to this place and asked him to worship him for 3 years. Following Lord Shiva's advice for 3 years Lord Agni was relieved of the curse.

13. Lord Surya once went around Naimisharanya asking Rishis about the source of his light. He was directed by them to Sage Vyasa. Sage Vyasa directed him to this place and asked him to worship Lord Shiva. Lord Surya first went to Kashi and took a holy dip in river Ganga. He first came to Mayiladuthurai. After worshiping Lord Mayuranathar at that place he came to this place. He worshiped the Shiva Linga for 12 years with 1000 flowers every day. After 12 years on a full moon day in the Tamil month of Chitrai granted him the boon that he will be bright forever. 

14. According to the Puran, when Sage Bruhaspati was absent in the ashram, Lord Chandra had illicit relations with Vanatara. As a result, he got Budha as his son. Sage Bruhaspati cursed Chandra to fall ill with tuberculosis. When Lord Indra and other devas requested relief from the curse for Lord Chandra, Bruhaspati directed Chandra to this place and asked him to worship Lord Shiva. Chandra came to this place and worshiped Lord Shiva with 1000 flowers daily for 12 years. He was relieved of the curse on full moon day in the Tamil Month of Thai. 

Those who worshiped at this place:
Lord Brahma, Lord Indra, Goddess Pavati, Sage Agastya, Lord Agni, King Daksha, Goddess Gangadevi, Lord Surya, Lord Chandra, Sunithan, Kochengat Chola, Lord Adi Shesha along with other eight serpents.

Salient features:
1. In this temple, both Rahu and Ketu are as a single idol having one body and worshiping Lord Shiva with folded hands. This is a Rahu-Ketu parihara sthala.

2. It is stated that we come across serpents moving about in the temple on Sundays and Tuesdays. It is believed that they come here to worship Lord Shiva.

3. This temple has the combined sacredness of the temple at Thirunageshwatam, Nagore, Keezhperum Pallam (planet Ketu temple), Kalahasti, Naganathar temple at Kumbhakonam. Hence according to the Puran, this is a Sarva-Dosha-Nivaran-Sthala.

4. This may be the only temple in which the King of Serpents Adishesha has a Utsava Murti.

5. In the Sanctum-Sanctorum the presence of Adi Sesha worshiping Lord Shiva is very unique. 

6. In this place Goddess Parvati’s shrine is to the left of Lord Shiva which depicts wedding posture.

7. People very often have come across large serpents shedding their skin inside the temple. There are photographs to back up this claim. For example a 7.5 feet skin was shaded on 21-03-2002 on the idol of Goddess Parvati. 8.3 feet of skin was shaded on 26-05-2002 on Lord Shiva. There is no record of anyone dying because of snake bite in this village.

About the temple
This is an east facing temple and the main Rajagopuram is three tiered and has two prakarams. There are no separate idols of Rahu and Ketu. They are represented in a single body praying to Lord Shiva with folded hands. Since they are in a single body, this place is a parihar sthala for Rahu and Ketu. This shrine is located in the northeast corner of the temple. There is a panchalinga which represents the five faces of Lord Shiva (Ishan, Vamdeva, Sadyojata, Tatpurusha, Aghora).

At the entrance we come across a partially damaged Dhwajastambha, Balipeeth and Nandi. At the base of Dhwajastambha there is a Lord Ganesha idol known as Lord Kodimara Vinayaka. There is a shrine for Thirumalai (Kailash Ishwarar). Lord Shiva’s shrine is east facing, has three parts namely Sanctum-S, Ardhamandap and Mahamandap. The Shiva Linga is small but beautiful. The Utsava Murti in Sanctum-Sanctorum represents Lord Adi Shesha worshiping Lord Shiva. The Utsava Murtis in a Mahamandap are - Lord Nataraja, Lord Somaskandha, Lord Muruga with a Vajra and Spear in his hand. The shrine of Goddess Durga is on the north side of Ardhamandap. A moat covers three sides of the sanctum. 

Koshta murtis: Lord Ganesha, Lord Dakshinamurti and Goddess Durga. Besides this, we come across a number of Naga idols. 

Devi’s shrine is east facing and is to the left of Lord Shiva’s shrine. She graces the devotees with four hands holding Lotus, Varada Mudra, Abhaya Mudra, and Rudraksha Mala.  

Other shrines and idols:
The shrine of Lord Dakshinamurti is in the south part of Koshtha above the sanctum just like in Mada Kovils. We can see the shrine of Lord Sattainathar by climbing the steps just like in Mada kovils. It is a stucco idol. The shrine of Lord Sthala Vinayaka (Sacred vinayaka of this place) is in the western part. He is addressed as Lord Rajaraja Pillaiyar. Shrine of Lord Subramanya is with his consorts. Lord Chandikeshwar and Goddess Durga shrines are in the corner. The Kshetra Vruksha is presumed to be 250 years old. We come across a five headed serpent (believed to be Lord Adi Shehsa) under this tree. There is an idol of Lord Muruga with his peacock mount under this tree. The idol of Lord Adi Pampureshwar is in the trunk of the tree and is also addressed as Lord Vaneshwarar. On the east side we come across Lord Bhairava, Lord Surya, Lord Vishnu, Lord Brahma, Panchalingas, Lord Adi Shesha, Rahu and Ketu, Lord Shanishwarar and Shaiva Saint Nalvar. 

There are a number of idols dating between the 12th and 19th century and are kept in safe custody at this place. Some of them are Lord Vinayaka (worshiped as Lord Kanni Vinayaka), Lord Shiva and Goddess Parvati idols, Lord Nataraja, two sets of Lord Subramanya with his consorts, a large idol of Lord Shiva in standing position representing destruction of asura, Paaliyarai (shayanagraha) chokkar, Lord Chandikeshwar, Shaiva Saints Nalvar, Goddess Yogashakti Ambika, Choladevar, Mari Amman, Chelli Amman, Lord Adi Pampureshwarar and Somaskanda murti are in the Mahamandap.

Prayers:
1. Devotees worship here for relief from KalaSarpa Dosha, Rahu Ketu Dosha, Kalatra Dosha, Putra Dosha, Marriage obstacles, Dosha due to killing of serpents knowingly or unknowingly. And when they dream of serpents very frequently, they have to perform a special pooja before 5 pm.

2. Devotees perform pooja at this place when they are passing through Rahu Dasha (for 18 years), Ketu Dasha (7 years), when Rahu and Ketu are in the second or eighth house from the lagna or the lagna of their birth chart and during the sub-dashas of Rahu and Ketu.

3. Devotees worship Lord Shiva and Goddess Parvati for peace and prosperity.

Pooja
1. Pooja is performed daily, four times. 
2. In the shrine of Rahu and Ketu, pooja is done during Rahu kaal. 
3. Special pooja during transit of Rahu and Ketu,
4. Besides this, Pradosha pooja, pooja on New Moon Day and Full Moon Day are conducted regularly.

Festivals:
All festivals from the Tamil month of Chitrai and Panguni, especially, Masi-Magam, MahaShivratri and Margazhi Arudra-darshan are celebrated.

Timings: 7 am to 12:30 pm, 4 pm to 8 pm.

Address:
Shri Sheshapureeshwarar temple /
Pampureshwarar temple,
Thirupampuram,
Taluka: Kudavasal
District: Thiruvarur
Tamil Nadu 612203

Phone: +91-4352469555, +91-9443943665, +91-9443047302, +91-9943848107

Courtesy: Various websites and blogs

Sunday, February 15, 2026

सेथलपथी (थिरुथीलथैपथी) येथील श्री मधीमुक्तेश्वरर मंदिर

हे मंदिर मयीलादुथुराई-थिरुवारुर मार्गावर मयीलादुथुराई पासून २५ किलोमीटर्स वर वसले आहे. कुथनूर येथील श्री सरस्वती मंदिराच्या हे खूप जवळ आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर (अरिसिलारू ह्या कावेरी नदीच्या उपनदीच्या दक्षिण काठावर) वसले आहे. शैव संत संबंधर आणि अरुणागिरिनाथर ह्यांनी त्यांच्या रचनांमध्ये ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. अंत्यविधी जिथे केले जातात अशा विशेष सात स्थानांपैकी हे एक स्थान आहे. बाकीची सहा स्थाने अशी आहेत - काशी, रामेश्वर, गया, त्रिवेणी संगम, श्री वांचीअम आणि थिरुवेंगाडू. मूळ मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. विजयनगर साम्राज्याच्या राजांनी ह्या मंदिराची दगडी बांधकाम करून पुनर्निर्मिती केली. कालांतराने नट्टूकोट्टै चेट्टीयार ह्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. 

मूलवर: श्री मधीमुक्तेश्वरर, श्री मंदारवनेश्वरर
देवी: श्री स्वर्णवल्ली, श्री मरगदवल्ली, श्री पोरकोडीअम्माई
उत्सव मूर्ती: श्री सोमस्कंदर
क्षेत्र वृक्ष: मंदार वृक्ष
पवित्र तीर्थ: सूर्य पुष्करिणी, चंद्र तीर्थ, अरिसीलारू नदी, ब्रह्म तीर्थ
पुराणिक नाव: थिरुथीलथैपथी, टिलातरपंपूरी

क्षेत्र पुराण:

१. श्री ब्रह्मदेव स्वर्गीय अप्सरा उर्वशीच्या प्रेमात पडले. भगवान शिवांनी श्री ब्रह्मदेवांना शाप दिला. ह्या शापाचं विमोचन करण्यासाठी श्री ब्रह्मदेवांना पृथ्वीवर येऊन तपश्चर्या करण्याची आज्ञा झाली. त्या आज्ञेप्रमाणे श्री ब्रह्मदेव ह्या स्थळी आले आणि त्यांनी शापविमोचनासाठी तपश्चर्या केली. भगवान शिवांनी त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना शापापासून मुक्त केलं. 

२. प्रभू श्रीराम आणि श्री लक्ष्मण ह्यांना वनवासात असताना त्यांना त्यांचे पिता श्री दशरथ ह्यांचा निधनाबद्दल ज्ञात झालं. त्यांनी विविध स्थळांमध्ये त्यांचे अंत्यविधी केले. ह्या सगळ्या स्थळांमध्ये अंत्यविधी करताना पिंडांचं रूपांतर किड्यांमध्ये झालं. प्रभू श्रीरामांनी भगवान शिवांना ह्या समस्याबद्दल प्रार्थना केली तेव्हा भगवान शिवांनी त्यांना ह्या स्थळी येऊन नदीमध्ये स्नान करून मग पितृ तर्पण करण्याचा सल्ला दिला. जेव्हा प्रभू श्रीरामांनी भगवान शिवांच्या सल्ल्यानुसार इथे पितृतर्पण केलं तेव्हां पिंडांचें रूपांतर शिवलिंगांमध्ये झालं आणि त्या पिंडांना मुक्ती मिळाली. म्हणून इथे भगवान शिवांना श्री मुक्तेश्वरर असं संबोधलं जातं.

३. स्थळ पुराणानुसार प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण ह्यांनी ह्या स्थळी जटायूचे अंत्यविधी केले.

४. श्री नरमुख विनायक - पुराणानुसार श्री पार्वती देवींनी एकदा हळदीपासून एक मुलगा तयार केला. त्यांनी त्या मुलाला सजीव केले. त्या हरीसोल (अरसीलारू) ह्या महानदीमध्ये स्नान करत होत्या आणि म्हणून त्यांनी त्या सजीव केलेल्या मुलाला आपल्या स्नानगृहाच्या बाहेर द्वारपाल बनून थांबायला सांगितले. जेव्हा भगवान शिव तिथे आले तेव्हा त्या मुलाने भगवान शिवांना आत जाण्यापासून थांबवले. म्हणून भगवान शिवांनी त्या मुलाचा शिरच्छेद केला. जेव्हा पार्वती देवींनी हे पाहिलं तेव्हा त्यांना खूप रडू आलं कारण तो मुलगा त्यांचा पुत्र होता. त्यांचं सांत्वन करण्यासाठी भगवान शिवांनी शिवगणांना अशा जीवाचं शिर आणण्याची आज्ञा केली जो झोपला आहे आणि ज्याचे शिर उत्तरेकडे आहे. शिवगणांना एक हत्ती सापडला. ते त्याचे शिर घेऊन भगवान शिवांकडे आले. भगवान शिवांनी ते शिर त्या मुलाच्या शरीराला जोडले आणि त्याला परत सजीव केले. त्यांनी त्याला गणांचा सेनापती नेमले आणि त्याचे नाव गणपती ठेवले. आणि त्याला असा वर दिला कि कुठल्याही कार्याची सुरुवात करण्याआधी त्याची पूजा केली जाईल. श्री पार्वती देवींनी निर्माण केलेला तो प्रथम गणेश असल्या कारणाने त्याला श्री आदि-नरमुख-विनायक असं संबोधलं जातं.

५. काशीचा राजा नरचोधी ह्याला आपल्या पितांचे अंत्यविधी करायचे होते. त्याला आपल्या पूर्वजांना पिंड (भाताचे गोळे) प्रत्यक्षरित्या अर्पण करायची इच्छा होती. त्याने विविध स्थळी पिंडदाने केली पण ती स्वीकारली गेली नाहीत. शेवटी त्याने जेव्हा ह्या स्थळी पिंडदाने केली तेव्हा त्याच्या पूर्वजांनी ती स्वीकारली. म्हणून हे स्थळ पिंडदान करण्यासाठी योग्य मानलं जातं. 

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री पार्वती देवी, श्री लक्ष्मीदेवी, श्री ब्रह्मदेव, श्री सूर्यदेव, श्री शनीश्वरर, ऐरावत हत्ती, राजा नरचोधी

वैशिष्ट्ये:

१. इथल्या श्री गणेशांच्या मूर्तीला नरमुख आहे.

२. ह्या मंदिरामध्ये श्री महाविष्णू तीन ठिकाणी तीन मुद्रांमध्ये चित्रित केले आहेत.

३. इथे श्री पार्वती देवींना स्वर्णवल्ली असे संबोधले जाते. 

४. इथल्या सर्व मूर्ती सुंदर आहेत विशषतः श्री दक्षिणामूर्ती, प्रभू श्रीराम, श्री दुर्गादेवी आणि श्री विष्णू.

५. असा समज आहे की श्री सूर्य आणि श्री चंद्र ह्यांनी इथे भगवान शिवांची एकाच वेळी पूजा केली. म्हणून इथे सर्व दिवस अमावस्या मानले जातात. म्हणून त्यांच्या मूर्ती एकत्र ठेवल्या जातात. म्हणून इथे सर्व दिवस पितृ तर्पणासाठी योग्य दिवस मानले जातात. 

६. इथल्या परिक्रमेच्या भिंतींवर ६३ नायनमारांची चित्रे आहेत.

७. असा समज आहे की इथे पितृ तर्पण केल्याने भगवान शिव पूर्वजांना मुक्ती प्रदान करतात. म्हणून भगवान शिवांना इथे श्री मुक्तेश्वरर असं संबोधलं जातं आणि ह्या स्थळाला थिरुतर्पणपुरी असं संबोधलं जातं.

८. प्रभू श्रीरामांनी इथे जेव्हा तर्पण केलं तेव्हा त्यांनी माता, पिता, गुरु आणि देव अशी चार पिंडे केली. ही चार पिंडे शिवलिंगांमध्ये परिवर्तित झाली.

९. श्री अष्टभुजा देवीचा डावा पाय थोडासा पाठीमागे आहे.

१०. नवग्रह संनिधीमध्ये श्री सूर्यदेव बाकीच्या ग्रहांपेक्षा थोड्या उंचावर आहेत.

११. ह्या ठिकाणी अरिसिलारू नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. म्हणून ह्या नदीला इथे उत्तरवाहिनी असे संबोधले जाते.

१२. असा समज आहे की जे इथे उपासना करतात ते वैभवशाली होतात.

मंदिराबद्द्ल माहिती:

हे मंदिर छोटं आहे पण व्यवस्थित ठेवलेलं आहे. इथल्या राजगोपुराचे बांधकाम अगदी अलीकडेच झाले आहे. इथे ध्वजस्तंभ नाही. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्धमंडप आहे. बलीपीठ आणि नंदी गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. बाहेरील परिक्रमेमध्ये प्रभू श्रीराम पितृतर्पण करत आहेत असे दृश्य चित्रित केलेली मूर्ती आहे. ह्या मूर्तीच्या जवळ असलेल्या चार लिंगांना पितृ लिंग असे म्हणतात. इथले मुख्य दैवत श्री आदि-विनायक आहेत. त्यांना नरमुख-विनायक (नराचे मुख असलेले श्री गणेश). त्यांचे स्वतंत्र देवालय आहे. हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. विजयनगर साम्राज्याच्या राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. भगवान शिव स्वयंभू आहेत आणि द्वितल विमानाच्या (दोन स्तरांचे गोपुर) खाली आहेत. 

कोष्ट मूर्ती: श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मदेव आणि श्री अष्टभुजा-दुर्गा देवी. 

भगवान शिवांच्या उजव्या बाजूला श्री अंबिकादेवींचे देवालय आहे. 

परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री विनायक, श्री सुब्रमण्य त्यांच्या पत्नींसमवेत, श्री गजलक्ष्मी, नवग्रह, श्री चंद्र, श्री सूर्य, श्री भैरव, शैव संत नालवर, श्री नटराज, प्रभू श्रीरामांनी पुजीलेलं शिव लिंग, श्री काशी विश्वनाथ, श्री शिवगामींसमवेत श्री नटराज, 

क्षेत्र वृक्षाखाली श्री मंदारवनेश्वरर आहेत. 

ह्या मंदिरात श्री महाविष्णूंच्या तीन ठिकाणी तीन विविध मुद्रा असलेल्या मूर्ती आहेत.

प्रार्थना:

१. हे स्थळ पितृदोषांचे परिहार स्थळ असल्याकारणाने भाविक जन इथे पितृ तर्पण करतात.

२. समृद्धी साठी भाविक जन इथे श्री स्वर्णवल्ली देवींची पूजा करतात.

पूजा:

दररोज ४ वेळा पूजा केली जाते. तसेच प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी आणि प्रदोष दिवशी पूजा केली जाते. 

मंदिरात साजरे होणारे सण:

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरं (उत्तरा फाल्गुनी नक्षत्रा दिवशी पूजा)
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): अरुद्रदर्शन
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री, मासीमाघम 

मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते दुपारी १२, दुपारी ४.३० ते रात्री ८.३०

मंदिराचा पत्ता

श्री मधीमुक्तेश्वरर मंदिर,
सेथलपथी (पुंथोट्टम),
तालुका:नन्नीलम,
जिल्हा थिरुवारुर,
तामिळनाडू ६०९५०३

दूरध्वनी: ०४३६६-२३९८१८, ९४४२७१४०५५

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


Thursday, February 12, 2026

Shri Madhimuktheswarar Temple at Sethalapathi (Thiruthilathaipathi)

This temple is situated at a distance of 25 kms from Mayiladuthurai on Mayiladuthurai-Thiruvarur route. It is very close to Shri Saraswati temple at Koothanur. This is a Padal Pethra Sthalam on the southern bank of Kaveri (on southern bank of Arisilaru – a tributary of Kaveri). Shaiva Saint Sambandhar and Saint Arunagirinathar have revered this temple in their sacred hymns. This is one of the 7 places that is considered as special for performing last rights. The other 6 places are – Kashi, Rameshwar, Gaya, Triveni Sangam, Shri Vanchiam & Thiruvenkadu. The original temple must have existed even before the 7th century. It was reconstructed as a stone structure by Vijayanagar kings. Later on, it was renovated by Nattu Kottai Chettiar.

Moolavar: Shri Madhimuktheswarar, Shri Mandarvaneshwarar
Devi: Shri Swarnavalli, Shri Maragadavalli, Shri Porkodiammai,
Utsav Murti: Shri Somaskandar
Kshetra Vruksha: Mandar tree
Sacred Theertha: Suryapushkarini, Chandra Theertha, River Arisilaru, Brahma Theertha
Puranik Name: Thiruthilathaipathi, Tilatarpanpuri.

Kshetra Puran

1. Lord Brahma fell in love with the celestial damsel Urvashi. So he was cursed by Lord Shiva. As an atonement he was asked to do penance on earth. Lord Brahma came to this place and did penance to get rid of the curse. He was granted Darshan and relieved of the curse by Lord Shiva.

2. Lord Shriram and Laxman learnt about the death of their father Dasharath during their vanavaas. They performed the last rights of their father at various places. At all the places the pindas turned into worms. Lord Shriram prayed to Lord Shiva who advised him to do Pitru Tarpan at this place (Mandarvanam) after taking bath in the river. When Lord Shriram performed the pitru rights as per direction of Lord Shiva the pindas turned into Shivalingas i.e. they attained mukti. Hence Lord Shiva is praised as Muktishwarar. 

3. As per the Sthala Puran, Lord Shriram and Laxman performed last rites of Jatayu at this place. 

4. Naramukha-Vinayaka - According to the Puran, once Goddess Parvati created a boy with Turmeric powder. She gave life and kept him as a guard while she was taking bath in the Harysol (Arisilaru) Mahanadi. When Lord Shiva tried to enter the place, he was prevented by the boy. So Lord Shiva beheaded the boy. When Goddess Parvati saw this, she burst into tears as the boy was her son. In order to console her, Lord Shiva asked his Ganas to select the head of anyone who was sleeping with head towards the North. They found the head of the elephant and brought it to Lord Shiva. He attached that head to the boy and made him come back to life again. He made him the commander of his troops. He named him Ganapati. He granted him a boon that he will be worshiped first before starting any work or ceremony. As he is the first Ganesha created by Goddess Parvati, he is Aadi-Naramukha-Vinayaka. 

5. A King from Kashi named Narchodhi wanted to perform the last rites of his father. He wanted to offer the Pinda (rice bowls) to the ancestors directly. He did Pinda Daan at several places which were not accepted. Finally when he did Pinda Daan at this place, his ancestors accepted the offering. Hence this place is considered very auspicious for performing the Pinda Daan. 

Those who worshipped at this place: Goddess Parvati, Goddess Laxmi, Lord Brahma, Lord Surya, Lord Shanishwarar, Elephant Aairavat, King Narchodhi. 

Salient Features

1. The idol of Lord Ganesha is with a human face.

2. Lord Mahavishnu is depicted at 3 places in the temple in 3 positions

3. Goddess Parvati is praised as Swarnavalli.

4. All idols are very beautiful especially Lord Dakshinamurti, Lord Shriram, Goddess Durga and Lord Vishnu.

5. It is believed that Lord Surya and Lord Chandra worshipped Lord Shiva at this place at the same time. Hence all the days are considered as Amavasya. Hence their idols are kept together. Therefore all the days are considered as auspicious for conducting Pitru Tarpan at this place.

6. There are paintings of 63 Nayanmars on the walls of Prakaram.

7. It is believed that Lord Shiva bestows Mukti to ancestors when the rights are performed here. Hence he is addressed as Muktishwarar and the place is praised as Thirutarpanpuri.

8. When Lord Shriram did tarpan here, he made 4 Pindas representing Mother, Father, Guru and God. After worshipping them he made Tarpanam. Later the Pindas became 4 Shivalingas. 

9. Goddess Ashtabhuja-Durga has her left leg slightly behind.

10. In Navagraha shrine Lord Surya is on a higher pedestal than the others. 

11. At this place the river Arisilaru flows in a North-South direction. Hence she is praised as Uttara-vahini.

12. It is believed that when one worships at this place, he becomes prosperous.

About the Temple

This is a small temple and is well maintained. The Rajagopuram was constructed recently. There is no Dhwajastambha. The temple is facing East. The Sanctum Sanctorum consists of Sanctum, Antarala and Ardha mandap. Balipeetha and Nandi are facing the sanctum. In the outer prakaram, we come across an idol of Lord Rama performing Pitru Tarpan. The 4 lingas nearby are known as Pitru Linga. The main deity at this place is known as Lord AadiVinayaka. Also praised as Lord Naramukha-Ganapati (Lord Ganesha with human face). He is housed in a separate shrine. This temple existed even before the 7th century and was renovated by Vijayanagar kings. Lord Shiva is a Swayambhoo Murti and he is under a Dwi-tala-vimanam (2 storeyed gopuram). 

Kostha Murtis: Lord Vinayaka, Lord Dakshinamurti, Lord Lingodbhavar, Lord Brahma and Goddess Ashtabhuja-Durga. 

To the right side of Lord Shiva we come across Ambika’s shrine. In the prakaram we come across shrines and idols of Lord Vinayaka, Lord Subramanya with his consorts, God Gajalaxmi, Navagraha, Lord Chandra, Lord Surya, Lord Bhairava, Shaiva saints Naalvar, idol of Nagaraja, Shivalinga worshipped by Lord Shriram, Lord Kashi Vishwanath, Lord Nataraja with Goddess Shivagami. Shri Mandarvaneshwarar is under the Kshetra Vruksha. Idol of Lord Mahavishnu is found at 3 different places in the temple in 3 different postures. 

Prayers

1. Devotees perform Pitru Tarpanam as this is a Parihar sthala for Pitrudosha.

2. Devotees worship Goddess Swarnavalli for prosperity.

Poojas: Daily 4 times; Monthly Sankashta Chaturthi pooja and Pradosha pooja

Festivals

Aaipassi (Oct-Nov): Annabhishek,
Karthigai (Nov-Dec): Thirukarthigai,
Margazhi (Dec-Jan): Aarudra darshan
Maasi (Feb-March): Mahashivratra, Maasi-Magam
Panguni (March-April): Panguni Uttiram (pooja on Uttara Phalguni nakshatra)

Timings: 6 am to noon; 4.30 pm to 8.30 pm

Address

Shri Madhimuktheswarar Temple,
Sethalapathi At Poonthottam,
Taluka: Nanillam,
District: Thiruvarur,
Tamil Nadu 609503

Phone: 04366-239818; 9442714055

Courtesy: Various websites and blogs


Sunday, February 8, 2026

थिरुमीयचूर येथील श्री मेघनादस्वामी मंदिर आणि श्री सकलभुवनेश्वरर मंदिर

हे मंदिर श्री ललिताम्बिगाई मंदिर म्हणूनपण प्रसिद्ध आहे. ही मंदिरे तामिळ नाडू मधल्या थिरुमीयचूर ह्या गावात स्थित आहेत. मयीलादुथुराई-थिरुवारुर मार्गावर मयीलादुथुराई पासून हे मंदिर २० किलोमीटर्स वर आहे. इथे पोहोचण्यासाठी पहिले मयीलादुथुराई पासून १८ किलोमीटर्स वर असलेल्या पेरलम ह्या गावात पोचून मग तिथून थिरुमीयचूरला जाता येतं. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. ह्या मंदिराची स्तुती शैव संत संबंधर आणि अप्पर ह्यांनी गायली आहे. म्हणून हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. शक्ती पीठांमध्ये हे पहिलं शक्ती पीठ (आदि शक्तीपीठ) समजलं जातं. इथे देवींना आदिपराशक्ती असे संबोधले जाते. कोचेंगट चोळा राजाने बांधलेल्या माड कोविल मंदिरांपैकी पैकी हे एक मंदिर आहे. मूळ बांधकाम विटांचे होते. कालांतराने ह्या मंदिराचे दगडी बांधकाम राजेंद्र चोळा आणि सिम्बिअन महादेवी ह्यांनी केले. मंदिराचा विस्तार विविध चोळा आणि पांड्या राजांनी केला. श्री ललिताम्बिगाई मंदिराशिवाय इथे भगवान शिवांची दोन मंदिरे आहेत.

पहिलं मंदिर: श्री मेघनादस्वामी मंदिर

मूलवर: श्री मेघनादस्वामी, श्री मिहारअरुणेश्वरर
देवी: श्री ललिताम्बिगाई, श्री सौंदर्यनायकी, श्री शांतनायकी
क्षेत्र वृक्ष: बिल्व, जंगलीबदाम, पंगार
पवित्र तीर्थ: सूर्यपुष्करिणी 

दुसरं मंदिर: श्री सकलभुवनेश्वरर मंदिर

देवी: श्री विद्वानमेगलांबिका, श्री मिन्नूममेघालयाल
मूलवर: श्री सकलभुवनेश्वरर
क्षेत्र वृक्ष: मंदार वृक्ष
पवित्र तीर्थ: काली तीर्थ

क्षेत्र पुराण:

१. देवांच्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून श्री ललितादेवी चिदग्निकुंडातून प्रगट झाल्या आणि त्यांनी भंडासूराचा वध केला. भंडासूराचा वध केल्यानंतरपण देवीचा राग शमला नव्हता. ह्या रागाचं शमन होण्यासाठी भगवान शिवांनी त्यांना पृथ्वीवर येऊन मनोन्मनी रूपांत तपश्चर्या करायला सांगितली. ललितादेवींनी भगवान शिवांच्या सल्ल्यानुसार इथे येऊन तपश्चर्या केली. त्या नंतर त्या शांत आणि दयावान झाल्या. त्यांनी वाग्देवींना निर्माण केलं आणि त्यांना ललितादेवींच्या १००० नावांची स्तुती गाण्याची आज्ञा केली. ह्या घटनेतूनच ललितासहस्रनामाचा उगम झाला. सहस्रनामाची सुरुवात “श्रीमाता” ह्या नावाने होते ज्याचा अर्थ समृद्धीची किंवा लक्ष्मीची माता असा होतो. श्री हयग्रीव हे श्री ललिता देवींचे शिष्य आहेत. श्री ललिता देवींच्या आज्ञेवरून श्री हयग्रीवांनी अगस्त्य ऋषींना श्री ललितासहस्रनाम शिकवलं. जेव्हा अगस्त्य ऋषींनी श्री ललितासहस्रनामाचं पठण करण्यासाठी योग्य जागेबद्दल श्री हयग्रीवांना विचारलं, तेव्हा श्री हयग्रीवांनी अगस्त्य ऋषींना थिरुमीयचूर, जिथे श्री ललिता देवी श्री मनोन्मनी रूपांत वास्तव्य करून आहेत, तिथे येऊन पठण करायला सांगितलं. अगस्त्य ऋषी त्यांच्या पत्नी लोपमुद्रांसमवेत इथे आले आणि त्यांनी श्री ललितासहस्रनामाचं पठण केलं. श्री ललितादेवींनी अगस्त्य ऋषी आणि त्यांच्या पत्नींना नवरत्न रूपांत दर्शन दिलं. अगत्स्य ऋषींनी श्री ललिता नवरत्नमाला स्तोत्र रचून श्री ललितादेवींची उपासना केली.

२. पुराणानुसार कश्यप ऋषींच्या विनाता आणि कर्तृ नावाच्या दोन पत्नी होत्या. त्यांनी भगवान शिवांची अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना केली. भगवान शिवांनी प्रत्येकीला एक एक अंड दिलं आणि त्या अंड्याचं एक वर्षभर पालनपोषण करायला सांगितलं. विनाताला मिळालेल्या अंड्यातून पक्ष्यांचा राजकुमार गरुडाचा जन्म झाला. कालांतराने गरुड भगवान विष्णूंचे वाहन बनला. कर्तृने घाईघाईत तिला मिळालेलं अंड फोडलं आणि त्यातून विकृत आकाराचे अपत्य जन्माला आले. कर्तृने आपल्या कृत्याबद्दल भगवान शिवांकडे क्षमाप्रार्थना केली. भगवान शिवांनी तिला क्षमा केली आणि तो पुत्र अरुणा नाव प्राप्त करून सुर्यदेवाचा सारथी बनेल असा आशीर्वाद दिला. अरुणा भगवान शिवांचा कट्टर भक्त बनला. त्याला कैलासावर जाऊन भगवान शिवांचं दर्शन घ्यायची खूप इच्छा होती. सूर्यदेव त्याच्या अपंगत्वाची खिल्ली उडवत त्याला म्हणाले की त्याच्या अपंगत्वामुळे तो कैलासावर जाऊ शकणार नाही. अरुणाने एका सुंदर मोहिनी स्त्रीचे रुप धारण केलं आणि तो कैलासाकडे निघाला. वाटेमध्ये सूर्यदेवांनी त्याला सुंदर अशा मोहिनीच्या रूपांत पाहिलं आणि सूर्येंदेव त्यावर मोहित झाले आणि त्यांनी मोहिनीशी म्हणजेच स्त्री रूपातल्या अरुणाबरोबर गैरवर्तन केलं. जेव्हां अरुणाने भगवान शिवांकडे ह्याबद्दल तक्रार केली त्यावेळी भगवान शिवांनी सूर्यदेवांना त्यांचे तेज कमी होण्याचा शाप दिला. सूर्यदेवांनी इथे येऊन ७ महिने तपश्चर्या केली. त्यांनी हत्तीवर आरूढ असलेल्या भगवान शिवांची म्हणजेच गजारूढ मूर्तीची उपासना केली. तरीपण सूर्यदेवांचे तेज परत आले नाही. सूर्यदेवांनी तेज कमी झाल्यामुळे होणाऱ्या वेदनांमुळे खूप आक्रोश केला ज्यामुळे पार्वती देवींची शांतता भंग पावली. त्या सूर्यदेवांना ते पूर्णपणे कृष्णवर्ण होतील म्हणून शाप द्यायला निघाल्या पण भगवान शिवांनी त्यांना शांत केलं. त्यांनी पार्वतीदेवींना समजावलं की सूर्यदेव शापापासून मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणून त्यांना क्षमा करायला सांगितलं. ह्या मंदिरामध्ये भगवान शिव पार्वती देवींना शांत करत आहेत असे दृश्य क्षेत्रपुराणेश्वरर ह्या मूर्तीमध्ये चित्रित केले आहे. भगवान शिवांच्या कृपेने सूर्यदेवांना शापामधून मुक्ती मिळाली आणि त्यांना त्यांचे तेज परत प्राप्त झाले. म्हणून ह्या स्थळाला मेयचूर असे नाव प्राप्त झाले. असा उल्लेख आहे की सूर्यदेव आणि अगस्त्य ऋषींप्रमाणेच यमदेवांनीपण इथे भगवान शिवांची उपासना केली. यमदेवांनी १००८ शंखांनी इथे अभिषेक केला. 

३. पुराणानुसार हे स्थळ श्री शनीश्वरर, श्री यमदेव, वाली आणि सुग्रीव ह्यांचे जन्मस्थान आहे. 

४. आम्ही खूप अलीकडे म्हणजेच १९९९ साली घडलेल्या एका घटनेचा इथे उल्लेख करू इच्छितो. श्री अंबिकादेवींच्या एका भक्तिणीला वारंवार स्वप्ने पडत होती ज्यामध्ये श्री अंबिका देवी त्यांच्याकडे सोन्याच्या पैंजणांची मागणी करत होत्या. त्या महिलेनी बऱ्याच मंदिरांना भेट दिली पण त्यांना स्वप्नात दिसलेल्या देवी कुठे मिळाल्या नाहीत. जेव्हा त्या श्री कपालीश्वर मंदिराच्या जवळ होत्या त्यावेळी त्यांना स्वप्नात दिसलेल्या देवींचा फोटो दिसला. जेव्हा त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना कळले की तो फोटो थिरुमीयचूर येथील श्री ललिताम्बिकांचा फोटो होता. त्या इथे सोन्याची पैंजणे घेऊन आल्या आणि इथल्या पुजाऱ्यांना त्यांनी आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले. पुजारी त्यांना म्हणाले कि देवींच्या मूर्तीमध्ये पैंजण परिधान करण्यासाठी कुठेही सोय नाही. त्या पुजाऱ्याने हे पण सांगितले की त्याच्या अनेक पिढ्या इथे पुजारी म्हणून काम करत होत्या पण कधीही देवीला पैंजणे चढविल्याचे ऐकिवात नाही. त्या महिलेच्या आग्रहाखातर त्या पुजाऱ्याने मूर्तीमध्ये कुठे पैंजण चढविण्याची सोय आहे का ते बघायचे ठरवले. देवीच्या पाउलांवर अभिषेक करताना त्याला एक छिद्र दिसले जिथून पैंजणे बांधली जाऊ शकतात. पुढे त्यांना देवींच्या नाकात पण एक छिद्र दिसले जिथून नथ चढवली जाऊ शकते. ह्या घटनेनंतर भाविक जन आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यावर देवीला पैंजणे आणि नथ अर्पण करतात.  

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

कालीदेवी, अगस्त्य ऋषी आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा, यमदेव, सूर्यदेवांचे सारथी अरुणा, सूर्यदेव, सुग्रीव, वाली.

वैशिष्ट्ये:

१. ह्या स्थळी श्री ललितादेवींच्या आज्ञेवरून वाग्देवींनी ललितासहस्रनामाचं प्रथम पारायण केलं. 

२. इथे माता ललितादेवी श्रीचक्रावर बसून भक्तांवर कृपावर्षाव करतात. त्यांना दोन हात आहेत. एक हात अभय मुद्रेत आहे तर दुसरा हात वरद मुद्रेत आहे.

३. ह्या स्थळी श्री ललितादेवींनी अगस्त्य ऋषींना दर्शन दिलं. अगस्त्य ऋषींनी ललिता नवरत्नमला स्तोत्र रचून श्री ललितादेवींची पूजा केली कारण श्री ललितादेवींनी अगस्त्य ऋषींना नवरत्नरूपांत दर्शन दिलं. 

४. श्री ललिता देवी इथे सर्वालंकारभूषिता तसेच सर्वाभरणभूषिता रूपांत भक्तांवर कृपावर्षाव करतात. 

५. ह्या स्थळी श्री ललितादेवींनी तिच्या भक्तिणीकडून पैंजणांचा स्वीकार केला. श्री ललितादेवी ह्या भक्तिणीच्या १९९९ साली स्वप्नांत आल्या आणि त्यांनी पैंजणांची मागणी केली.

६. शक्तिपीठांची निर्मिती होण्याआधी इथे श्री ललितादेवी आदिपराशक्ती रूपांत प्रकट झाल्या. 

७. श्री सूर्यदेव इथे उपासना करून त्यांना प्राप्त झालेल्या शापांतून मुक्त झाले.

८. श्री सूर्यदेवांचे पुत्र शनिदेव आणि यमदेव ह्यांचे हे जन्मस्थान आहे.

९. दरवर्षी चित्राई (एप्रिल-मे) ह्या तामिळ महिन्याच्या २१व्या दिवसापासून ते २७व्या दिवस ह्या अवधीमध्ये सूर्याची किरणे मेघनादस्वामींवर पडतात. असा समज आहे की श्री सूर्यदेव ह्या अवधीमध्ये भगवान शिवांची उपासना करतात. 

१०. असा समज आहे की ह्या ठिकाणी श्री यमदेव दररोज माध्यान्ह समयी दीर्घायुष्यासाठी श्री मेघनादस्वामींची पूजा करतात. 

११. हे एकच ठिकाण असं आहे जिथे भगवान शिवांची दोन मंदिरे आहेत - श्री मेघनादस्वामी आणि श्री सकलभुवनेश्वरर. 

१२. असा उल्लेख आहे की श्री महालक्ष्मीनीं इथे श्री सकलभुवनेश्वरींची पूजा केली.

१३. सूर्यदेवांचा सारथी अरुणा आणि पक्ष्यांचा राजकुमार गरुड ह्यांचे हे जन्मस्थान आहे.

१४. मोहिनीचे रूप घेतलेला अरुणा आणि श्री इंद्रदेव ह्यांच्यापासून इथे वालीचा जन्म झाला. 

१५. मोहिनीचे रूप घेतलेला अरुणा आणि श्री सूर्यदेव ह्यांच्यापासून इथे सुग्रीवाचा जन्म झाला.

१६. श्री मेघनादस्वामींचा गाभाऱ्याचा आकार हत्तीच्या पृष्ठभागासारखा आहे.

१७. ह्या ठिकाणी श्री ब्रह्म, श्री विष्णू आणि श्री शिव (लिंगोद्भवर) ह्या तिघांचेही दर्शन होते.

१८. इथली श्री क्षेत्रपुराणेश्वरर मूर्ती विशेष आहे. ह्या मूर्तीमध्ये श्री अंबिकांचे मुख एका दिशेने पाहिलं तर ते हसतमुख दिसते आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर ते उग्र (क्रोधीत) दिसते. 

१९. इथे श्री दुर्गादेवींच्या हातामध्ये पोपट आहे. असा समज आहे की हा पोपट भक्तांच्या प्रार्थना श्री ललिताम्बिकांपर्यंत पोचवतो. 

२०. श्री सकलभुवनेश्वरर ह्यांच्या देवालयामध्ये श्री विष्णूंची मूर्ती हात जोडलेल्या मुद्रेमध्ये आहे.

२१. इथे श्री कालीदेवींनी श्री ललिताम्बिकांची पूजा केली.    

मंदिरांबद्दल माहिती:

श्री मेघनादस्वामी मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर थिरुमीयचूर पेरूनकोविल म्हणून पण प्रसिद्ध आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ, अर्धमंडप आणि महामंडप आहेत. गाभाऱ्यावरचे विमान (गोपुर) हे हत्तीच्या पृष्ठभागाच्या आकाराचे आहे. हा आकार देण्याचे कारण इथे श्री सूर्यदेवांनी हत्तीवर आरूढ झालेल्या भगवान शिव आणि पार्वती देवींची उपासना केली. इथे दोन पूर्वाभिमुख राजगोपुरें आहेत. मुख्य राजगोपुर पांच स्तरांचं आहे. दुसरं राजगोपुर तीन स्तरांचं असून ते मंदिराच्या आवाराच्या पुढे आहे. मुख्य राजगोपुरानंतर बलीपीठ, ध्वजस्तंभ आणि नंदी आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशाला द्वारपालकांची स्टुक्कोची चित्रे आहेत. येथील शिव लिंग स्वयंभू आहे. चित्राई ह्या तामिळ महिन्याच्या २१व्या दिवसापासून सात दिवस सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात. ह्या सात दिवसांच्या काळामध्ये इथे सूर्य पूजा केली जाते.

कोष्ठ मूर्ती:  श्री क्षेत्रभुवनेश्वरर, गंगाधरर आलिंगन मूर्ती (भगवान शिव पार्वती देवींचा क्रोध शांत करताना), श्री नर्तन विनायकर, श्री दक्षिणामूर्ती, श्री ब्रह्मदेव, श्री दुर्गादेवी, श्री चंद्रशेखर आणि श्री ऋषभरुढर.

परिक्रमेमध्ये आपल्याला पुढील मूर्ती आणि देवालये पाहावयास मिळतात: नालवर, शिव लिंगाची पूजा करत असलेल्या सप्त मातृका, पंचभूतलिंगे, श्री इंद्रदेवांनी पुजीलेलं शिव लिंग, श्री अग्निदेव, श्री यमदेव, श्री सूर्यदेव, श्री भैरव, श्री सूर्यदेव, श्री सिद्धिविनायक, श्री सुब्रमण्य त्यांच्या पत्नींसमवेत, निरूथीलिंग, वरुणलिंग, कुबेरलिंग, ईशानलिंग, अगत्स्यलिंग, नागलिंग, शैव संत सेक्कीळर, श्री नटराज, पाताळलिंग, श्री महालक्ष्मी, श्री विशालाक्षी समवेत श्री विश्वनाथ. 

मंदिरात प्रवेश केल्यावर उजवीकडे श्री ललिताम्बिका ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे. ह्या देवालयामध्ये स्वतंत्र गाभारा, अंतराळ आणि अर्धमंडप आहे. मूर्ती साधारण ५ फूट उंच असून ती श्री चक्रावर स्थित आहे. श्री ललिताम्बिका सुखासनेमध्ये आहेत. त्यांचा डावा पाय मोकळा असून उजवा पाय दुमडलेला आहे. ह्या स्वरूपाला मनोन्मनी म्हणतात आणि मूर्तीला शांतनायकी असे नाव आहे. हे पहिलं शक्तीपीठ मानलं जातं म्हणून इथे त्यांना आदिपराशक्ती असं संबोधलं जातं. असा समज आहे की श्री ललितासहस्रनामाचा उगम इथे झाला.

श्री दुर्गादेवींबद्दल माहिती:

इथे दुर्गादेवींना श्री शुकब्रह्मदुर्गादेवी असं संबोधलं जातं. त्या महिषासुरावर पाय ठेवून आहेत पण त्यांचं रूप शांत आहे. ह्या देवालयातून श्री ललिताम्बिका देवींच्या देवालयाकडे पोपट उडून जाताना दिसतात जणू काही ते भक्तांच्या प्रार्थना पोचवत आहेत.

श्री सकलभुवनेश्वरर मंदिराबद्दल माहिती:

ह्या मंदिराला एलांगकोविल असं म्हणतात. हे मंदिर पेरूनकोविलच्या उत्तरेला आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. श्री अंबिका देवी स्वतंत्र दक्षिणाभिमुखी देवालयामध्ये आहेत ज्यामध्ये स्वतंत्र गाभारा आहे. ह्या मंदिरातल्या मूर्ती आणि देवालये अशी आहेत: श्री दक्षिणामूर्ती, श्री महाविष्णू, श्री ब्रह्म, श्री चतुर्मुखीचंडिकेश्वरर, श्री भैरव, श्री सूर्य, आकाशलिंग, वायूलिंग, शैव संत अप्पर ह्यांनी त्यांच्या दिव्य स्तोत्रांमधे ह्या मंदिराची स्तुती गायली आहे.

प्रार्थना:

१. असा समज आहे की श्री ललिताम्बिकांच्या भक्तांनी देवींची पूर्ण कृपा प्राप्त करण्यासाठी एकदा तरी ह्या मंदिरात येऊन त्यांचे दर्शन घ्यावे.

२. रोगातून मुक्ती मिळविण्यासाठी भाविक जन इथे पिरंडाई मिश्रित भात नैवेद्य अर्पण करतात. पिरंडाई म्हणजे मराठीत कंदवेल किंवा घोलसवेल.

३. भाविक जन इथे विवाह संपन्न होण्यासाठी, अपत्य प्राप्तीसाठी तसेच अपत्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी इथे प्रार्थना करतात. 

४. भाविक जन त्यांच्या ६०व्या आणि ८०व्या जन्मदिवशी इथे दीर्घायुष्यासाठी विशेष पूजा करतात. 

५. भाविक जन इथे स्वास्थ्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. 

पूजा

नियमित दैनंदिन पूजा

मंदिरात साजरे होणारे सण:

थै (जानेवारी-फेब्रुवारी): रथसप्तमी 

ह्या शिवाय भगवान शिव आणि पार्वती देवींच्या आदरार्थ इथे सर्व मासिक आणि पाक्षिक सण साजरे होतात. 

मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते दुपारी १२.३०, दुपारी ४.३० ते रात्री ८.३०

मंदिराचा पत्ता:

श्री ललिताम्बिका / श्री मेघनादस्वामी मंदिर,
थिरुमीयचूर,
जिल्हा थिरुवारुर,
तामिळनाडू ६०९४०५

दूरध्वनी: +९१-४३६६२३९१७०, +९१-९४४४८३६२५६

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

Thursday, February 5, 2026

Shri Meghanadaswami Temple and Shri Sakalabhuvaneshwarar Temple at Thirumeeyachur

This temple is also known as Shri Lalitambigai temple. The temple is located at Thirumeeyachur in Tamil Nadu. This place is at a distance of about 20 kms from Mayiladuthurai on Mayiladuthurai-Thiruvarur route. First, travel to Peralam from Mayiladuthurai which is at a distance of about 18 kms, then travel to Thirumeeyachur from Peralam. This is a Padal Pethra Sthalam on the southern bank of Kaveri revered by Shaiva Saints Sambandhar and Appar. This temple must have existed even before the 7th century. This temple is considered to be the first (Adi) ShaktiPeeth and goddess is referred as Goddess AdiParaShakti. This is one of the Mada Kovil built by Kochengat Cholan. The original temple was of brick, it was later reconstructed into a stone structure by King RajendraChola and queen Sembian Mahadevi. Extensions to the temple were done by various Chola and Pandya kings. There are two shrines of Lord Shiva in this temple beside the shrine of Goddess Lalitambika.

First temple: Shri Meghanadaswami Temple
Moolavar: Shri Meghanadaswami, Shri MiharaAruneshwarar
Devi: Shri Lalitambika, Shri SaundaryaNayaki, Shri ShantaNayaki
Sacred Vruksha: Bilva, Jungli Badam, Pangara
Sacred Theertha: Surya Pushkarini

Second temple: Shri Sakalabhuvaneshwarar Temple
Moolavar: Shri Sakalabhuvaneshwarar
Devi: Shri VidvanMegalambika, Shri Minnummeghalayal
Sacred Vruksha: Mandar tree
Sacred Theertha: Kali Theertha.

Kshetra Purana:

1. Goddess Mother Lalitadevi, heeding to the prayers of Devas and Sages, rose from Chit-agni-kunda and slayed the demon Bhandasur. Her fury was unabated, even after slaying Bhandasur. Lord Shiva asked her to proceed to Bhoo-loka and perform penance under the name of Manonmani, to shed her fury. She came to this place and did penance as per the instructions. After that she became kind and merciful. She created the Vakdevatas and bade (commanded) them to sing her praise with 1000 words. Thus Lalitha Sahasranaam came into existence at this place. The Sahasranaam begins with the word ‘Shrimata’ meaning Mother of Prosperity. Lord Hayagriva is the disciple of Mother Lalitadevi. Under her orders, he taught Lalitha Sahasranaam to Sage Agastya. When Sage Agastya asked Lord Hayagriva for a suitable place to chant the Lalitha Sahasranaam, he directed him to Thirumeeyachur where Mother graces as Manonmani. The Sage came to this place with his wife Lopamudra and chanted the Lalitha Sahasranaam. Mother Lalita appeared before the Sage and his wife in the form of Navaratna. Sage Agastya worshiped her, by composing Lalita Navaratna Mala.

2. According to Puran, Vinata and Kartru were wives of Sage Kashyap. They prayed to Lord Shiva for getting a child. He gave each of them an egg and asked them to preserve it for a year. From the egg given to Vinata, prince Garuda took birth. Later on he became the mount of Lord Vishnu. Kartru broke open the egg in a hurry and begot a disfigured child for her hasty action. She asked for the pardon from Lord Shiva. Lord Shiva pardoned her and blessed the child to become the charioteer for Surya with the name Aruna. Aruna became a staunch devotee of Lord Shiva and performed penance so that he can go to Kailash for the darshan of the Lord. Surya mocked his disability and teased him that he can never go to Kailash. Finally Aruna reached Kailash by his severe penance and had the darshan of Lord Shiva. Surya misbehaved with Aruna when he was in the form of Mohini (a beautiful girl) on his way to Kailash. When Aruna complained to Lord Shiva, Surya was cursed to lose his luster. Surya did penance for 7 months at this place. He worshiped Shiva as seated on an elephant (Gajarudha murti) but he did not get his luster back. He cried loudly in anguish which disturbed Mother Parvati who was about to curse Surya to become dark. Lord Shiva pacified Goddess Parvati and stated that Surya was looking for relief from his curse, hence he asked Goddess Parvati to forgive Surya. This scene of Lord Shiva pacifying Goddess Parvati is depicted in a sculpture in this temple as Lord Kshetrapuraneshwarar. By Lord’s grace Surya was saved from the curse and got his luster back at this place. It is stated that Yama worshiped Lord Shiva at this place just like Surya and Sage Agastya. The place got the name Meeyachur as Surya got His luster back. Yama did abhishek of Lord Shiva with 1008 conch shells.

3. According to puran, this is the birth place of Lord Shaneeshwar, Lord Yama, Vali and Sugreev.

4. We would like to mention an incident that took place in 1999. A woman devotee of Goddess Ambika, was having recurring dreams in which a Goddess was demanding golden anklets from her. The lady was unable to identify the Goddess even after searching in various temples. When she was near Kapaleeshwarar temple, she saw a photograph which she identified as the Goddess whom she was seeing in her dream regularly. On further enquiry, she came to know that the Goddess was none other than Goddess Lalitambika of Thirumeeyachur. When she informed the priest about her dream and offered the anklets, the priest explained to her that there was no provision for the anklets on the legs of the Goddess. He also explained to her that his family was the priest of that temple for several generations but he has never heard of the Goddess wearing anklets. After persistence from the lady, the priest decided to explore whether there was any provision for the anklets. While performing abhishek on the feet of the idol, he came across a hole on the legs through which the anklets could be tied to the legs. Later they also found a hole in the nose for a nose-ring and they were able to tie a waistband on the idol. Following this incident, devotees offer anklets, nose-rings to the Goddess when their boons are fulfilled.

Those who worshiped here:

Goddess Kali, Sage Agastya and his wife Lopamudra, Lord Yama, Lord Aruna (charioteer of Lord Surya), Lord Surya, Sugreeva and Vali.

Special Features:

1. This is the place where Lalitha Sahasranaam was first recited by Vakdevtas as ordered by Shri Lalitadevi.

2. Mother Lalitadevi graces the devotees seated on a Shrichakra peetha with 2 hands (Abhaya and Varada mudra).

3. This is the place where Goddess Lalitambika gave darshan to Sage Agastya. He worshiped her by composing Lalita Navaratna Mala as he perceived Goddess Mother in the form of Navaratna.

4. Goddess Lalitadevi graces her devotees as Sarva Alankaar Bhooshita, Sarva Abharana Bhooshita and bestows all their wishes with kindness.

5. This is the place where she obtained an anklet from her devotee by appearing in her dream in 1999.

6. This is the place where she manifested first as Goddess AdiParashakti before the 54 Shakti Peethas were formed.

7. Lord Surya was freed from his curse after doing penance at this place.

8. Sons of Lord Surya, namely Yama and Shani, were born here.

9. Every year in the Tamil month of Chitrai (April-May) from 21st to 27th Sun’s rays fall on Lord Meghanadaswami. The belief is that Sun worships the Lord on these days at this place.

10. It is believed that Lord Yama worships Lord Meghanadaswami daily at noon in this place in order to increase his lifespan.

11. This is the only place where there are 2 shrines of Lord Shiva namely Lord Meghanadaswami and Lord Sakalabhoovaneshwarar.

12. It is stated that Goddess Mahalakshmi worshiped Goddess Sakalabhoovaneshwari (Parvati) at this place.

13. Lord Aruna (charioteer of Surya) and prince of birds Garuda were born here.

14. Vaali was born at this place to Lord Indra and Aruna (who had taken the form of beautiful lady Mohini)

15. Sugreeva was born to Surya and Aruna (who was as Mohini)

16. The gabhara (sanctum) of Lord Meghanadaswami is in the form of the hind part of an elephant.

17. At this place, we can have darshan of Brahma, Vishnu and Shiva (Shiva as Lord Lingodbhavar)

18. The idol of Shri Kshetrapuraneshwarar is a typical example of sculpture. Goddess Ambika’s face when viewed from one side appears smiling whereas on the other side, it shows anger.

19. There is a parrot perched on the hand of Goddess Durga idol. It is believed that the messages of devotees are carried to the Goddess Lalitambika by this parrot.

20. In the shrine of Shri Sakalabhoovaneshwarar, the idol of Lord MahaVishnu is with folded hands.

21. Goddess Kaali worshiped Goddess Lalitambika in this shrine.

About the Shri Meghanadaswami Temple:

This temple is also known as Thirumeeyachur Perunkovil. The main Sanctum-Sanctorum consists of Sanctum, Antarala, Ardha-mandap and Maha-mandap. The vimana (Gopur) over the sanctum is like the hind part of an elephant (GajaprushthaVimana). It is believed that this shape was given to the vimana as Lord Surya worshiped Lord Shiva and Goddess Parvati who were mounted on an elephant. There are two RajaGopurams facing the east and the main RajaGopuram is 5-tiered. The second RajaGopuram is 3-tiered and is in front of the temple complex. After the main RajaGopuram, we come across Balipeeth, DhwajaSthambha and Nandi. There are stucco images of dwara-palakas at the entrance of the sanctum. The Shiva Linga is a Swayambhu Linga. The rays of the Sun fall on the Shiva Linga for seven days from the 21st of Tamil month of Chitrai. Surya pooja is performed during this period.

Koshta-murtis: Lord Kshetrabhuvaneshwarar, Lord Gangadharar/Alinganan murti (i.e. Lord Shiva pacifying the anger of Goddess Parvati), Lord Narthana Vinayaka, Lord Dakshinamurti, Lord Brahma, Goddess Durga, Lord Chandrashekhar and Lord Rishabarudhar. 

At the entrance of Maha-mandap we come across the idol of Lord Vinayakar. 

In the parikrama, we come across the idols and shrines of Naalvar, Sapta-Matrika worshiping Shiva Linga, Pancha-Bhootalingas, Shivalingas worshiped by Lord Indra, Lord Agni, Lord Yama, Idol of Lord Surya, Lord Bhairava, Lord SiddhiVinayakar, Lord Subramanya with his consorts, NiruthiLinga, VarunaLinga, KuberaLinga EshanaLinga, AgatsyaLinga, NagaLingas, Shaiva Saint Sekkizhar, Lord Nataraja, PatalaLinga, Goddess Mahalakshmi, Lord Vishwanath with Goddess Vishalashi.

Goddess Lalitambika is in a separate shrine to the right of the main entrance. This shrine has separate Sanctum, Antarala and Ardha-mandap. The idol is about 5 feet tall on a Shree-Chakra. She is in a sitting position (Sukha-asana) in a majestic appearance with right leg folded. This swarupa is known as Manonmani swarupa, hence she is praised as ShantaNayaki. This temple is considered as the first Shaktipeeth hence she is praised as Goddess AdiParaShakti. It is believed that Lalita Sahasranam originated at this place.

About Goddess Durgadevi:

She is praised as Goddess ShukaBrahmaDurgadevi. She is standing on Mahishasura but in a Shanta Swarupa. Parrots are seen flying from this shrine to the shrine of Goddess Lalitambika as if conveying the message of the devotees.

About the Shri Sakalabhuvaneshwarar Temple:

This temple is praised as Elangkovil. This temple is to the north of Perunkovil. This temple faces the east. ShivaLinga is a SwayambhuLinga. Goddess Ambika is in a separate, south facing shrine with a separate sanctum. The idols and shrines in the temple are - Lord Dakshinamurti, Lord MahaVishnu, Lord Brahma, Lord ChaturMukhaChandikeshwarar, Lord Bhairava, Lord Surya, AkashaLinga, VayuLinga.

This temple was praised by Shaiva Saint Appar in his sacred hymns.

Prayers:

1. We believe a person who is a devotee of Goddess Mother should at least once visit this place to get her full grace.

2. Devotees worship at this place with a naivaidya (offering) of rice mixed with pirandai (Kandavel in Marathi, Gholasvel in Marathi) for relief from diseases.

3. Devotees worship at this place for marriage boon, child boon and for education of children. 

4. Devotees perform special poojas on their 60th and 80th birthday for longevity.

5. People worship here for good health and prosperity.

Pooja:

Regular rituals, special pooja.

Festivals:

Ratha-Saptami festival is held in the Tamil month of Thai.

Besides this, all monthly and weekly festivals are held in honor of Lord Shiva and Goddess Parvati.

Temple Timings: 7 am to 12:30 pm, 4:30 pm to 8:30 pm.

Courtesy: Various blogs and websites

Address:

Shri Lalitambika / Shri Meghanadaswami Temple,
Thirumeeyachur,
District Thiruvarur,
Tamil Nadu 609405.

Phone: +91-4366239170, +91-9444836256

Courtesy: Various blogs and websites


Sunday, February 1, 2026

अंबर मक्कलम येथील श्री महाकाळनाथस्वामी मंदिर

हे शिव मंदिर कुंभकोणम-कारैक्कल मार्गावर थिरुवारुर जिल्ह्यातील पुंथोट्टम (फुलांचे वन) जवळ असलेल्या थिरुमक्कलम ह्या गावी आहे. मयीलादुथराई-थिरुवारुर मार्गावर हे मंदिर पेरलम पासून ६ किलोमीटर्स वर आहे. अंबरपेरूमथिरुकोविल पासून १ किलोमीटर्स वर आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावरील ह्या पाडळ पेथ्र स्थळाची स्तुती शैव संत संबंधर ह्यांनी केली आहे. कोचेंगटचोळा राजाने बांधलेल्या माडकोविल मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. मूळ मंदिर ६व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. इथल्या शिलालेखांनुसार ह्या मंदिराचे दगडी बांधकाम कुलोथंग I राजाने केले आणि कालांतराने ह्या मंदिराचा विस्तार विक्रम चोळा राजाने केला.

मूलवर: श्री महाकाळनाथस्वामी, श्री काळकंडेश्वर
देवी: श्री राजमातंगी, श्री इयनअम्माई, श्री भयअक्षयअंबिका
पवित्र तीर्थ: अमृत वावी (विहीर), महाकाळ तीर्थ
क्षेत्र वृक्ष: मरुद वृक्ष (मराठी मध्ये खैर), कारुंगकाली, मरूर (मराठीमध्ये किंजल)
ऐतिहासिक नाव: इंद्रपुरी
पुराणिक नाव: कोविलथिरुमक्कलम, थिरु-अंबल-मक्कलम

क्षेत्र पुराण:

१. पुराणानुसार दुर्वास ऋषींना मधलोला ह्या स्वर्गीय अप्सरेकडून दोन पुत्र प्राप्त झाले होते - अंबन आणि अंबरसुराल. ह्या पुत्रांनी भगवान शिवांची प्रखर तपश्चर्या केली आणि वरदाने मिळविली. ह्या वरदानांमुळे ते देव, ऋषी आणि इतरांना त्रास देऊ लागले. जेव्हां देव, ऋषी आणि इतर जन भगवान शिवांकडे मदतीसाठी गेले तेव्हां भगवान शिवांनी त्यांना श्री पार्वती देवींकडे पाठवलं. पार्वती देवींनी कालीदेवींकडे कटाक्ष टाकला. कालीदेवींनी एका सुंदर तरुण मुलीचं रूप धारण केलं. कालीदेवी इथे आल्या आणि त्यांच्याबरोबर भगवान विष्णू एका वृद्ध माणसाचं रूप घेऊन आले. जेव्हां दुर्वास ऋषींच्या पुत्रांनी ह्या तरुण मुलीला पाहिलं ते तिच्या प्रेमात पडले आणि तिला प्राप्त करण्यासाठी दोघांमध्ये भांडण चालू झाले. ह्या भांडणांमध्ये ज्येष्ठ पुत्र मरण पावला आणि नंतर कालीदेवींनी कनिष्ठ पुत्राला म्हणजेच अंबनला पण मारून टाकले. जिथे तिने अंबनला मारले त्या जागेला अंबकरथुर असे नाव प्राप्त झाले. अंबनला मारल्यामुळे कालीदेवींना ब्रह्महत्येचा दोष जडला. ह्या दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी कालीदेवींनी इथल्या पवित्र तीर्थाजवळ एक शिवलिंग निर्माण करून त्याची बिल्व पत्रांनी पूजा केली. त्यांच्या हाताची चिन्हे अजूनही लिंगावर पाहावयास मिळतात. कालीदेवींनी इथे असुरांचा संहार केला आणि भगवान शिवांची पूजा केली म्हणून ह्या स्थळाला अंबरमक्कलम असं म्हणतात. 

२. स्थळ पुराणानुसार मातंग महर्षींनी अपत्यप्राप्तीसाठी इथे भगवान शिवांची उपासना केली. ह्या उपासनेचे फळ म्हणून त्यांना पुत्रीप्राप्ती झाली. त्यांनी तिचे नाव राजमातंगी असे ठेवले. असा समज आहे की योग्य वेळी भगवान शिव तिच्यापुढे प्रकट झाले आणि तिच्याशी विवाह केला. राजमातंगीने इथे भगवान शिवांसमवेत विवाह पोषाखात राहण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच त्यांनी अशी पण इच्छा व्यक्त केली कि इथे जे कोणी त्यांच्या समस्यांचा परिहार करण्यासाठी प्रार्थना करतील त्यांच्या समस्यांचा परिहार व्हावा.

३. अजून एक पुराण आहे जे महाकाळ महाऋषींशी निगडित आहे. असा उल्लेख आहे कि महाकाळ महाऋषींनी इथे भगवान शिवांची उपासना केली. म्हणून ह्या स्थळाला मक्कलम असे नाव पडले. आणि भगवान शिवांना श्री महाकाळनाथर असे नाव पडले.

४. स्थलपुराणानुसार काशीमध्ये विमलन नावाचा ब्राह्मण रहात होता. त्याला अपत्य नव्हते. त्याने विविध शिव स्थळांना भेट दिली आणि अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना केली. त्याने दक्षिण भारताची तीर्थयात्रा करावयास सुरुवात केली. त्याने बऱ्याच शिव मंदिरांत जाऊन भगवान शिवांना अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना केली. एकदा भगवान शिवांनी विमलनला एका वृद्धाच्या रूपांत दर्शन दिलं आणि त्याला ह्या ठिकाणी येऊन श्री महाकाळनाथर ह्यांची उपासना करण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्याला हे पण सांगितलं कि इथे त्याला मनुष्याचे शिर असलेले श्री विनायक आणि किशोर वयातले श्री मुरुगन ह्यांचे पण दर्शन होईल. त्यांची पण उपासना करण्याचा भगवान शिवांनी विमलनला सल्ला दिला. भगवान शिवांनी विमलनला हे पण सांगितलं कि त्याला पुत्रप्राप्ती होईल आणि त्याचे नाव त्याने महादेवन असे ठेवावे. विमलनने भगवान शिवांच्या सल्ल्यानुसार उपासना केली आणि त्याला पुत्रप्राप्ती झाली.

५. स्थळ पुराणानुसार हे ठिकाण सोमयाजी मर नायनार (सोमसी मर नायनार) ह्यांचे जन्मस्थान आहे. ते इथे सुशीला ह्या त्यांच्या पत्नीसमवेत वास्तव्य करून होते. त्यांना भगवान शिवांच्या भक्तांना अन्नदान करण्याची खूप आवड होती. एकदा त्यांना भव्य सोमयाग साजरा करण्याची आणि ह्या यागासाठी थिरुवारुर येथील त्यागराजांना आमंत्रित करण्याची इच्छा झाली. त्यांना माहित होतं कि शैव संत सुंदरर हेच फक्त त्यागराजांना यागासाठी आमंत्रित करण्यास समर्थ आहेत. सुंदरर ह्या ठिकाणी जेव्हा आले तेव्हा ते त्यांना भेटायला गेले. त्यांना कळलं की सुंदरर हे सर्दी आणि खोकल्याने पीडित आहेत. त्यांनी सुंदरर ह्यांना थूडूवलर ह्या वनस्पतीपासून बनवलेले औषध दररोज द्यायला सुरुवात केली. जेव्हां सुंदरर पूर्ववत झाले तेव्हा ते सोमसी नायनार ह्यांचे आभार मानण्यासाठी आले. तेव्हां सोमसी नायनार ह्यांनी सुंदरर ह्यांच्या यज्ञामध्ये त्यागराजांना आमंत्रित करण्यासाठी मदत मागितली. सुंदरर ह्यांनी ती विनंती मान्य केली. सुंदरर ह्यांनी भगवान शिवांना विनंती केली की त्यांनी वैकासि ह्या तामिळ महिन्यातील आश्लेषा ह्या नक्षत्र दिवशी यज्ञामध्ये येऊन दर्शन द्यावे. सुंदरर ह्यांनी केलेल्या विनंतीची बातमी वणव्यासारखी पसरली आणि विविध ठिकाणाहून सर्व ऋषी, मुनी आणि संत ह्या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी अंबर येथे आले. भगवान शिव, पार्वती देवी, श्री विनायक आणि श्री मुरुगन हे पारधी कुटुंबाच्या रूपांत तेथे आले. त्यांच्याबरोबर चार वेद चार श्वानांच्या रूपांत आले. भगवान शिवांच्या खांद्यावर एक मृत वासरू होते. त्या काळी पारधी हे समाजातून बहिष्कृत मानले जायचे. पारधी कुटुंबाला पाहून तिथे जमलेले विद्वान आणि ऋषी ह्यांना यज्ञ साजरा करण्यामधे घोडचूक झाली आहे असे मानून निघून गेले. पण सोमसी नायनार ह्यांनी पारधी कुटुंबाचं स्वागत केलं आणि पारधी कुटुंबाने पण त्यांचं आदरातिथ्य आनंदाने स्वीकारलं. ह्या घटनेच्या स्मृत्यर्थ इथे एक श्री विनायकांचं देवालय आहे जिथे श्री विनायकांना अच्चू तीर्थ विनायक असे संबोधले जाते. इथे त्यांचे शिर हत्तीचे नसून मानवी आहे. यज्ञाचे हवीस स्वीकारल्यावर पारधी कुटुंबाने आपल्या मूळ रूपांत दर्शन दिलं. इथे एक छोटा मंडप आहे जिथे हा सोमयज्ञ साकार झाला असा समज आहे. हा यज्ञकुंड अंबरमक्कलम आणि अंबरपेरूनथिरुकोविल ह्या स्थळांच्या मध्यभागी आहे. प्रत्येक वर्षी ह्या ठिकाणी सोमयज्ञ साजरा केला जातो. ह्या यज्ञाच्या समयी थिरुवारुर येथे त्यागराजांची पूजा होत नाही कारण असं मानलं जातं की त्यागराज ह्या यज्ञासाठी ह्या ठिकाणी आले आहेत.

६. असा समज आहे की वासुकीने इथे भगवान शिवांची पूजा करून ब्रह्महत्या दोषातून मुक्ती प्राप्त केली.

७. नागकन्नीकांनी इथे भगवान शिवांची पूजा केली. सर्पांनी (तामिळ मधे कालम) इथे पूजा केली म्हणून ह्या स्थळाला मक्कलम असे नाव प्राप्त झाले.

८. पुराणानुसार संहारशीलन ह्याने इंद्रदेवांना पराभूत केले. इंद्रदेवांनी भगवान शिवांची इथे प्रार्थना करून त्यांची मदत मागितली. भगवान शिवांनी श्री भैरवांच्या रूपांत (श्री सट्टाईनाथर) संहारशीलन ह्याचा पराभव करून इंद्रदेवांना त्यांचे मूळ पद प्राप्त करून दिले. 

९. पुराणानुसार जेव्हा विश्वामित्र ऋषी तपश्चर्या करत होते त्यावेळी देवांनी मन्मदांच्या मदतीने त्यांच्यावर बाण फेकून त्यांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. क्रोधीत झालेल्या विश्वामित्रांनी मन्मदांना शाप दिला. मन्मदांनी  इथे भगवान शिवांची उपासना करून शापातून मुक्ती प्राप्त केली.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

हे स्थळ नैमिषारण्यांपैकी एक मानलं जातं म्हणून असं मानलं जातं की व्यास ऋषी, दुर्वास ऋषी आणि सप्त ऋषींनी इथे उपासना केली. तसेच इंद्रदेव, सोमसी नायनार, सुंदरर, मन्मद, कालीदेवी, मातंग महर्षी, महाकाळ महर्षी ऋषी, विमलन, वासुकी, नागकुमारिका आणि विश्वामित्र ऋषी ह्यांनी उपासना केली.

वैशिष्ट्ये:

१. हे कोचेंगट चोळा राजाने बांधलेल्या माड कोविल मंदिरांपैकी एक आहे. 

२. इथे मोहिनीदेवींना अलंकार करताना इथले ब्राह्मण त्यांना स्पर्श करत नाहीत कारण मोहिनी देवी अस्पर्शित आहेत (तामिळ मधे थिंदाथिरुमेनिं). मोहिनीदेवींना अलंकार चढविण्यासाठी आणि हार अर्पण करण्यासाठी काठीचा वापर केला जातो.

३. श्री विनायक आणि श्री बालमुरुगन ह्यांच्या मूर्तींमध्ये त्यांची मुखे मानवी आहेत. 

४. श्री कालीदेवींच्या मूर्तीमध्ये त्यांच्या हातात शिवलिंग आहे.

५. श्री सुब्रह्मण्य ह्यांनी इथे धनुष्य आणि बाण घेतले आहे असे चित्रित केले आहे.

६. श्री महाकाळनाथर ह्यांची तीन मंदिरे आहेत जिथे महाकाळ ऋषींनी शिवलिंग प्रस्थापित केले आहे. १) हे मंदिर २) विल्लूपुरम येथील इरुम्बाई ३) उज्जैन

मंदिराबद्दल माहिती:

मंदिराचा आवार साधारण सहा एकर वर पसरलेला आहे. इथे अनेक गोपुरे आहेत ज्यावर आकर्षक स्टुक्कोची चित्रे आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे आणि आणि दोन परिक्रमा आहेत. इथले शिवलिंग स्वयंभू असून ते पूर्वाभिमुख आहे. अंबर आणि अंबर मक्कलम ह्यांच्या मध्यभागी सोमसी मार नायनार ह्यांनी बांधलेली यागशाळा आहे. इथे भगवान शिवांची पारधी रूपांतली मूर्ती आहे. उजव्या बाजूला अलंकार मंडप आहे ज्यामध्ये श्री मरुदप्पर ह्यांचे देवालय आहे. श्री पार्वती देवी त्यांच्या पूर्वाभिमुख देवालयातून भक्तांवर कृपावर्षाव करतात. इथे त्यांना श्री बयाक्ष्यअंबिका ह्या नावाने पूजले जाते. 

परिक्रमेमधील इतर मूर्ती आणि देवालये: श्री विनायक, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत, श्री निलोथ्थपलमअंबळ समवेत भगवान शिव, श्री नटराज, श्री कालीदेवी, मातंग महर्षी, श्री दक्षिणामूर्ती, श्री महालक्ष्मी, श्री चंडिकेश्वरींसमवेत श्री चंडिकेश्वरर, श्री वाल्मिकनाथर, श्री शनीश्वरर, श्री विश्वनाथ, श्री दंडपाणी, मोक्ष लिंग, श्री नागनाथर, ईशान्य लिंग, ज्वरनिवृत्ती लिंग, अगस्त्य लिंग, बाण लिंग, श्री ब्रह्मदेव, श्री योग सुब्रह्मण्य, नाग (सर्प), ६३ नायनमार, शैव संत नालवर, संत सोमयाजी मार नायनार त्यांच्या पत्नीं सुशीला ह्यांच्या समवेत, नवग्रह. इथे वासुकी ह्यांचे देवालय आहे तसेच श्री सट्टाइनाथर ह्यांचे देवालय आहे. श्री सुब्रमण्यम ह्यांच्या हातामध्ये धनुष्य बाण आहेत. 

इथल्या मिरवणुकीच्या मूर्ती खूप सुंदर आहेत. त्या मूर्ती अशा आहेत: काट्चिकुथौ नायनार, भगवान शिव पारधी रूपांत आणि श्री पार्वती देवी त्यांच्या पत्नींच्या रूपांत, हातामध्ये शिवलिंग असलेल्या श्री कालीदेवी, सोमस्कंद आणि श्री नटराज. ह्या मूर्ती मंडपामध्ये ठेवल्या आहेत. 

मुख्य देवालयाच्या जवळ भगवान विष्णूंची श्री वेट्रीरुंध पेरुमल ह्या नावाची मूर्ती आहे.

ह्या मंदिरामध्ये श्री विनायकांचे नाव आदिविनायक तर श्री बाल मुरुगन ह्यांच हे नाव आदिस्कंद असे आहे. ह्या शिवाय श्री विनायकांचे इथे अजून एक देवालय आहे जिथे त्यांना श्री पडीक्कासु पिल्लैयार असे संबोधले जाते. 

उत्तर दिशेला श्री पाताळेश्वरर ह्यांचे देवालय आहे. पुन्नाग वृक्षाखाली श्री पुन्नागवननाथर ह्यांचे देवालय आहे. इथे वासुकी आणि मोहिनीदेवी ह्यांची पण देवालये आहेत. इथे भगवान शिवांची एक मूर्ती आहे ज्यामध्ये भगवान शिव पारधी रूपांत आहेत, श्री पार्वती देवींच्या माथ्यावर एक मडकं आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र श्री विनायक आणि श्री कार्थिकेय आहेत.

प्रार्थना:

१. विवाहातल्या अडचणींचा परिहार करण्यासाठी इथे भाविक जन श्री पार्वती देवींना दोन लाल कण्हेर फुलांचे हार अर्पण करतात. ह्यातील एक हार भक्तांना परत दिला जातो. असा समज आहे कि हा परत मिळालेला हार परिधान केल्यावर विवाहातल्या अडचणी दूर होतात. 

२. मृत्यूशय्येवर असलेल्यांसाठी इथे मोक्ष लिंगावर अभिषेक केल्यास त्यांना मोक्ष प्राप्त होतो असा समज आहे.

पूजा:

दैनंदिन पूजा, प्रदोष पूजा, इतर साप्ताहिक आणि पाक्षिक पूजा. 

मंदिरात साजरे होणारे महत्वाचे सण:

वैकासि (मे-जून): आश्लेषा ह्या नक्षत्र दिवशी इथे सोमयाजी मर नायनार यज्ञ उत्सव भव्य प्रमाणावर साजरा केला जातो. ह्या दिवशी भगवान शिव त्यांच्या खांद्यावर एक मृत वासरू अशा रूपांत, त्यांच्या बरोबर चार वेद चार श्वानांच्या रूपांत, श्री पार्वती देवी त्यांच्या डोक्यावर एक मडके आहे अशा रूपांत अशा मूर्तींची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक यज्ञशाळेपर्यंत जाते. नंतर त्यांना यज्ञाचे हवीस अर्पण केले जाते. नंतर भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ऋषभावर आरूढ होऊन भक्तांना दर्शन देतात.

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी

पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंद षष्ठी, अन्नाभिषेक

मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): थिरुवथीरै

थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते दुपारी १२, संध्याकाळी ५ ते रात्री ८

मंदिराचा पत्ता:

श्री महाकाळनाथस्वामी मंदिर,
ऍट पोस्ट कोविल थिरूमलम (पुंथोट्टम मार्गे),
तालुका: नन्नीलम,
जिल्हा: थिरुवारुर,
तामिळनाडू ६०९५०३

दूरध्वनी: +९१-४३६६२९१४५७, +९१-९४४२७६६८१८      

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.