Sunday, September 20, 2026

अरुरपरवैयुन मंडळी (थिरुवारुर) येथील श्री थूवैनाथर मंदिर

हे मंदिर थिरुवारुर मधील थिरुवारुर ईस्ट स्ट्रीट वर स्थित आहे. तंजावूर पासून ७० किलोमीटर्स, कुंभकोणमपासून ४२ किलोमीटर्स, नागपट्टीनंपासून २६ किलोमीटर्स आणि कारैक्कलपासून ४१ किलोमीटर्सवर आहे. ह्या मंदिराला थूवैनायनार मंदिर / दुर्वासर मंदिर असं पण म्हणतात. ह्या स्थळाला अरुरपरवैयुन मंडळी असं नाव आहे. शैव संत सुंदरर आणि वल्लाळर ह्यांनी स्तुती केलेल्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. 

हे मंदिर कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. ७व्या शतकाच्याही आधीपासून हे मंदिर अस्तित्वात असावं. चोळा राजांनी ह्या मंदिराची पुनर्बांधणी केली आणि नायक राजांनी जीर्णोद्धार केला. इथल्या शिलालेखांमध्ये विविध राजांनी मंदिरासाठी केलेल्या कामांचे उल्लेख आहेत. स्थळ पुराणानुसार हे मंदिर समुद्राच्या खाली वाळूचे मंदिर होते.

मूलवर: श्री थूवैनाथर, श्री थूवैनायनार, श्री परवायुल मंडळेश्वरर
देवी: श्री मृदपाद नायकी, श्री पंजीं मेन्नदयाळ, श्री अल्लीअनगोथै
उत्सव मूर्ती: श्री शक्ती वागेश्वरर
पवित्र तीर्थ: आकाश तीर्थ
पवित्र वृक्ष: फणस (जॅकफ्रुट)
पुराणिक नाव: थिरु अरुरपरवैयुन मंडळी
वर्तमान नाव: थूवैनायनार कोविल

क्षेत्र पुराण:

१. स्थळ पुराणानुसार शैव संत सुंदरर ह्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीला आश्वासन दिले होते कि ते तिच्यापासून कधी दूर जाणार नाहीत. त्यांना एकदा आपली पहिली पत्नी परवै नाचियार हिला भेटण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी थिरुवारुरला प्रस्थान केले. त्यांनी दुसऱ्या पत्नीला दिलेलं आश्वासन मोडल्यामुळे शिक्षास्वरूप त्यांना आपली दृष्टी गमवावी लागली. दृष्टी गमावलेल्या अवस्थेत ती परत मिळविण्याच्या इच्छेने त्यांनी शिव स्थळांना भेट देण्यास सुरुवात केली. कांचीपुरम येथे श्री एकांबरेश्वरर ह्यांच्या कृपेने त्यांच्या डाव्या डोळ्याची दृष्टी पूर्ववत झाली. थिरुवारुरला पोचल्यावर  त्यांनी भगवान शिवांकडे त्यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी पूर्ववत करण्याची प्रार्थना केली. भगवान शिवांनी त्यांना ह्या मंदिरातील तीर्थामध्ये स्नान करून त्यांची पूजा करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे स्नान करून पूजा केल्यानंतर सुंदरर ह्यांच्या उजव्या डोळ्याची पण दृष्टी पूर्ववत झाली. इथे अभिषेक जेव्हा होतो तेव्हा शिव लिंगावरील डोळ्याचे चिन्ह ह्या घटनेचे प्रतिक दर्शवते.

२. स्थळ पुराणानुसार पूर्वी हे समुद्राखाली वाळूचे मंदिर होते. प्रलय समयी देव आणि ऋषींनी भगवान शिवांकडे आसरा मागितला. भगवान शिवांनी दुर्वास ऋषींना सूचित केले कि ह्या मंदिराच्या आग्नेय दिशेला तीर्थ निर्माण करून भगवान शिवांची आराधना केली तर प्रलय ओसरून सगळ्यांचे जीव वाचतील. दुर्वास ऋषींच्या नेतृत्वाखाली सर्व देवांनी आणि ऋषींनी भगवान शिवांची आज्ञा पाळली. त्यांनी तीर्थ निर्माण करून भगवान शिवांची आराधना केली. ह्या आराधनेला प्रतिसाद देऊन भगवान शिवांनी समुद्राचा प्रकोप थांबविला आणि सगळ्यांचे जीव वाचले. इथे दुर्वास ऋषींनी भगवान शिवांची आराधना केली म्हणून दुर्वास ऋषींना दुर्वास नायनार असे नाव प्राप्त झाले.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री इंद्रदेव, दुर्वास ऋषी, शैव संत सुंदरर आणि इतर देव.

वैशिष्ट्ये:

१. असा समज आहे कि पूर्वी हे मंदिर समुद्राखाली वाळूचे मंदिर होते.

२. स्थळ पुराणामध्ये असा उल्लेख आहे कि ह्या मंदिरातल्या सर्व मूर्ती स्वर्गीय स्थपती विश्वकर्मा ह्याने घडविल्या.

३. इथे अभिषेकाच्या वेळेस शिव लिंगावर डोळ्याची चिन्हे दिसतात.

४. आग्नेय दिशेला मंदिराचे तीर्थ आहे.

५. इथे श्री शनीश्वरर त्यांच्या देवालयामध्ये दक्षिणाभिमुख आहेत. त्यांना इथे श्री अनुग्रह शनीश्वरर असे संबोधले जाते.

मंदिराबद्दल माहिती:

मुख्य मंदिरामध्ये गर्भगृह, अंतराळा आणि मंडप आहेत. मंदिर रथांच्या जवळ किळविधी वर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याला तीन स्तरांचं राजगोपुर आहे. हे राजगोपुर सध्या जीर्ण अवस्थेत आहे. राजगोपुराच्या समोर नंदी आणि बलीपीठ आहेत. 

मूलवर शिव लिंग चौकोनी चौथऱ्यावर (आवूडयार) आहे. शैव संत सुंदरर ह्यांची इथे उजव्या डोळ्याची दृष्टी पूर्ववत झाली. शिव लिंगावर जेव्हा अभिषेक केला जातो त्यावेळी जे डोळ्याचं चिन्ह शिव लिंगावर दिसतं ते ही घटना दर्शवतं.

कोष्ठ मूर्ती: श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मा आणि श्री दुर्गा देवी.

श्री अंबिका देवींचे स्वतंत्र दक्षिणाभिमुखी देवालय राजगोपुरानंतर लगेचच आहे. 

प्रकारामधल्या मूर्ती आणि देवालये: श्री आंजनेय, श्री विनायक, श्री वल्ली आणि दैवानै ह्यांच्या समवेत श्री सुब्रह्मण्य, श्री शनीश्वरर, श्री चंडिकेश्वरर.

मंदिराचे तीर्थ वास्तूशास्त्राच्या नियमांप्रमाणे मंदिराच्या आग्नेय दिशेला आहे. 

श्री शनीश्वरर दक्षिणाभिमुख आहेत आणि ते श्री अनुग्रह शनीश्वरर ह्या रूपांत आपल्या भक्तांवर कृपावर्षाव करतात. श्री विनायकांना श्री सिद्धीविनायक असे संबोधले जाते.

प्रार्थना:

१.   गेलेली दृष्टी परत मिळविण्यासाठी आणि दृष्टीमधले दोष दूर करण्यासाठी भाविक जन इथे रविवारी तीर्थामध्ये स्नान करून लाल फुलांनी भगवान शिवांची आराधना करतात.

२. ज्यांच्या प्रार्थनां सफल झाल्या आहेत असे भाविक जन इथे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दुधाचा अभिषेक तसेच अन्नदान करतात.

पूजा:

नियमित पूजा तसेच प्रदोष पूजा.

मंदिरात साजरे होणारे सण:

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते ११, संध्याकाळी ५ ते ८

मंदिराचा पत्ता:

श्री थूवैनाथर मंदिर,
थिरुवारुर इस्ट स्ट्रीट,
जिल्हा थिरुवारुर,
तामिळनाडू ६१०००२

दूरध्वनी: +९१-४३६६२४०६४६ 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

Thursday, September 17, 2026

Shri Thuvainathar Temple at Arurparavaiyun Mandali (Thiruvarur)

The temple is located at Thiruvarur East Street at Thiruvarur. This temple is at a distance of 70 kms from Tanjavur, 42 kms from Kumbhakonam, 26 kms from Nagapattinam, and 41 kms from Karaikkal. This temple is also known as Thuvainayanar Temple / Durvasar Temple. The place is known as Arurparavaiyun Mandali. This is one of the Padal Pethra Sthalam revered by Sundarar and Vallalar.

This is on the southern bank of Kaveri and must have existed even before the 7th century. It was reconstructed by Chola kings and was renovated by Nayaks. There are stone inscriptions in the temple. According to the Sthala Puran, this temple was under the sea in the form of a sand temple. 

Moolavar: Shri Thuvainathar, Shri Thuvainayanar, Shri Paravayul Mandaleshwarar

Devi: Shri Mrudapada Nayaki, Shri Panjin Mennadayal, Shri Alliangothai

Utsav Murti: Shri Shakti Vageshwarar

Sacred Theertha: Akash Theertha

Sacred Vruksha: Jackfruit Tree

Puranik Name: Thiru Arurparavaiyun Mandali

Present Name: ThuvaiNayanar Kovil

Kshetra Puran:

1. As per the Sthala Puran, Shaiva Saint Sundarar had made a promise to his second wife that he will never part with her. As he wanted to see his first wife, Paravai Nachiyar, he proceeded to Thiruvarur. As a punishment for breaking the promise made to his first wife, he lost his vision. Without vision, he began his journey to Shiva sthalams praying to Lord Shiva for restoring his vision. At Kanchi Puram, by the grace of Lord Ekambareshwarar, he regained vision in the left eye. He reached Thiruvarur and prayed to Lord Shiva for vision in his right eye. Lord Shiva advised him to take bath in the temple tank and worship him. He regained vision in the right eye also when he took bath in the temple tank. This incident is indicated during the abhishek when we observe eye symbol on the Shiva Linga.

2. According to the Sthala Puran, once this was a sand temple under the sea. During Pralay, Gods and Sages sought refuge of Lord Shiva. Lord Shiva told the Sage Durvasa that if a tank could be dug at the Southeast (Agneya) corner of the land and if prayers are offered to him, the tide will subside and all the lives will be saved. Under the leadership of Sage Durvasa they carried out the instruction of Lord Shiva. They dug a tank and worshiped Lord Shiva. Lord Shiva aborted the fury of the sea and saved them. As Sage Durvasa worshiped Lord Shiva at this place he is praised as Durvasa Nayanar.  

Those who worshiped here: Lord Indra, Sage Durvasa, Shaiva Saint Sundarar and other gods.

Special Features:

1. It is believed that this temple was under the sea as a sand temple. 

2. It is stated in Sthala Puran, that all the idols in this temple were made by divine sculptor Vishwakarma.

3. During abhishek, the symbol of an eye is visible on the Shiva Linga.

4. The temple tank is in the Southeast corner.

5. Lord Shanishwarar is facing the south in a shrine. He is praised as Lord Anugraha Shanishwarar.

About the Temple:

The main temple consists of Sanctum Sanctorum, Antarala and a Mandap. The temple is on Keezhaveedhi near chariots. The temple is east facing with a three tiered Rajagopuram in damaged condition. Nandi and Balipeeth are after the Rajagopuram.

Moolavar Shiva Linga is on square Avudayar. At this temple Shaiva Saint Sundarar got vision in his right eye which is evident when we observe the eye symbol on the Shiva Linga during abhishek. 

Koshta Murtis: Lord Vinayaka, Lord Dakshinamurti, Lord Lingodbhavar, Lord Brahma and Goddess Durga.

Goddess Ambika is in a separate shrine immediately after Rajagopuram facing south. 

Idols and shrines in the prakaram:  Lord Anjaneya, Lord Vinayaka, Lord Subramanya with Valli and Deivanai, Lord Shanishwarar and Lord Chandikeshwarar.

The temple tank is located in the Southeast corner as per the vastu rules.

Lord Shanishwarar faces the South and graces as Lord Anugraha Shanishwarar. Lord Vnayaka is praised as Lord Siddhi Vinayaka.

Prayers:

1. Devotees bathe in the temple tank and worship Lord Shiva with red flowers on Sunday for restoration of eyesight and cure for impairment of eyes.

2. Devotees whose prayers are answered show their gratitude by performing abhishek with milk and annadaan.

Pooja:

Regular pooja and pradosha pooja

Festivals:

Aippasi (Oct-Nov): Annabhishek

Margazhi (Dec-Jan): Thiruvathirai 

Maasi (Feb-Mar): Mahashivaratri

Temple Timings: 6 am to 11 am, 5 pm to 8 pm

Address:

Shri Thuvainathar Temple
Thiruvarur East Street
District Thiruvarur
Tamil Nadu 610002

Phone: +91-4366240646

Phone of priest: Shri Sridhar Gurukkal - +91-9942520479

Courtesy: Various websites and blogs

Sunday, September 13, 2026

थिरुवारुर येथील श्री वान्मिकनाथर मंदिर

थिरुवारुर येथील श्री त्यागराजा मंदिर हे साधारण ३० एकरवर पसरले आहे. हे भारतातील मंदिरांपैकी भव्य मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर थिरुवारुर शहराच्या मध्यभागी आहे. तंजावूर पासून ७० किलोमीटर्सवर, कुंभकोणम पासून ४२ किलोमीटर्सवर, नागपट्टीनं पासून २६ किलोमीटर्सवर आणि कारैक्कल पासून ४१ किलोमीटर्सवर आहे. ह्या मंदिराच्या संकुलामध्ये अनेक देवालये आहेत. ह्या सर्व देवालयांमध्ये सर्वात प्राचीन देवालय श्री वान्मिकनाथर ह्यांचे आहे. 

त्यागराजा मंदिराच्या संकुलामध्ये दोन पाडळ पेथ्र स्थळे आहेत - एक श्री त्यागराजा आणि दुसरे श्री वान्मिकनाथर. ही दोन देवालये प्रमुख मानली जातात.

श्री त्यागराजा मंदिर हे ६व्या शतकामध्येही अस्तित्वात असावे असा समज आहे. ह्या मंदिराची स्तुती शैव संत नालवर (चार श्रेष्ठ नायनमार) ह्यांनी गायली आहे. थेवरं स्तोत्रांमधे श्री वान्मिकनाथर ह्यांना आरुरन असे पण संबोधले आहे. 

श्री त्यागराजा मंदिरामध्ये आटकेश्वरम नावाचे जे देवालय आहे ह्या मंदिरातून भगवान शिव वारुळातून प्रगट झाले असा समज आहे.

मूलवर: श्री वान्मिकनाथर, श्री आरुरन, श्री पुत्रीदामगोंदर, श्री थिरुमूलत्तन मुदियार

देवी: श्री फोगनअम्मन, श्री पिरियाविदाई अम्मन, श्री पडीथंडपथीनी

पवित्र वृक्ष: पडारी वृक्ष (ट्रम्पेट फुलांचे वृक्ष)

क्षेत्र पुराण:

१. पुराणानुसार भगवान विष्णू इथे एका श्रेष्ठ धनुष्याच्या प्राप्तीसाठी इथे आले. ते प्राप्त झाल्याने त्यांना प्रचंड सामर्थ्य प्राप्त झाले. त्यामुळे भगवान विष्णूंना अहंकाराने व्यापलं. अहंकारामुळे भगवान विष्णू सर्व देवांवर वर्चस्व गाजविण्यासाठी त्यांचा पाठलाग करू लागले. देव सर्व दिशांना पळू लागले आणि शेवटी ते थिरुवारुर येथे आले. त्यांनी भगवान शिवांची आराधना केली आणि त्यांच्याकडे मदतीची याचना केली. देवांचा पाठलाग करता करता भगवान विष्णूपण थिरुवारुर येथे आले. थिरुवारुर इथे पोहोचताच भगवान विष्णूंचे सामर्थ्य नाश पावले. असा समज आहे की ते स्थगित अवस्थेत उभे राहिले. त्यांचे धनुष्य जमिनीवर रोवले गेले आणि त्यांचे शिर धनुष्यावर रेलले होते. देवांनी पांढऱ्या मुंग्यांचे रूप धारण केले आणि त्यांनी धनुष्य जमिनीवर जेथे टेकले होते तेथे एक वारूळ निर्माण केले. त्यांनी धनुष्य कुरतडले ज्यामुळे धनुष्याची दोरी तुटली आणि ती विष्णूंच्या शिरावर जोरानी आपटली ज्यामुळे विष्णूंचे शिर छेदले गेले. विश्वाचे पालनकर्ता असलेल्या भगवान विष्णूंची ही अवस्था बघून देव हताश झाले. त्यांनी परत भगवान शिवांची आराधना केली. भगवान शिव इथे तत्परतेने प्रगट झाले. त्यांनी भगवान विष्णूंना पूर्ववत केले. देवांनी भगवान शिवांना वारुळामध्येच वास्तव्य करण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन भगवान शिव वारुळामध्येच राहिले. म्हणून त्यांना इथे श्री वान्मिकनाथर असे संबोधले जाते. 

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे: राजा मुचुकुंद, भगवान विष्णू, देव, राजा विक्रम चोळा, सोमसी नायनार, कळर सिंघर नायनार, दंडी अडिगल नायनार

वैशिष्ट्ये:

१. इथले शिव लिंग वारुळाच्या आकाराचे आहे.

२. असा समज आहे की क्षेत्र वृक्षाच्या जवळ भगवान शिवांचे म्हणजेच श्री आटकेश्वरांचे अजून एक देवालय होते. 

३. इथे एक भूमिगत मार्ग आहे जो सध्या बंद आहे.

४. असा समज आहे की श्री आटकेश्वरर भगवान विष्णूंना पूर्ववत करण्यासाठी श्री वान्मिकनाथर रूपांत आले.

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. ह्या मंदिरातील राजगोपुराला अळगियन गोपुरम असे नाव आहे. मंदिराच्या प्रवेशावर द्वारपालांची स्टुक्कोची चित्रे आहेत. गोपुराच्या मध्यभागी अधिकार नंदी आहेत. 

वान्मिकनाथर ह्यांना फुलांनी आणि विभूतीने सुशोभित केले आहे. त्यांच्या माथ्यावर चंद्रकोर आहे. 

शैव संत अप्पर ह्यांनी त्यांच्या पवित्र स्तोत्रांमधे इथल्या भगवान शिवांची पुत्रीदामगोंदर ह्या नावाने स्तुती केली आहे. (तामिळ मध्ये पुत्रीदामगोंदर म्हणजे वारुळामध्ये वास्तव्य करणारे असा आहे).

श्री अंबिका देवींची मूर्ती कास्याची आहे. त्या त्रिभंग मुद्रेमध्ये असून त्यांचा एक हात पृथ्वीवर आहे. असा समज आहे की त्यांनी पृथ्वीला केलेल्या स्पर्शाने थिरुवारुर ह्या क्षेत्राला पंच भूत स्थळांपैकी भूमी क्षेत्र मानलं जातं. त्या मुख्य देवालयामध्ये आहेत. त्यांना श्री पडीथंडपथीनी असे संबोधले जाते.

प्रकारामध्ये पुढील देवालये आहेत: श्री प्रदोष नायकर, श्री चंडिकेश्वरर, चोळा राजा, माणिक्कवाचगर, त्रिपुर संहार मूर्ती आणि श्री विनायक.

प्रार्थना:

भाविक जन इथे इच्छापूर्तीसाठी तसेच समृद्धी आणि संपत्ती प्राप्तीसाठी प्रार्थना करतात.

पूजा:

नियमित दैनंदिन पूजा, प्रदोष पूजा

मंदिरात साजरे होणारे सण:

श्री त्यागराजा मंदिरामध्ये साजरे होणारे सर्व सण इथे पण साजरे केले जातात.

मंदिराच्या वेळा

इथे श्री त्यागराजा मंदिराच्या वेळाच अनुसरल्या जातात.

मंदिराचा पत्ता:

श्री वान्मिकनाथर मंदिर,
श्री त्यागराजा मंदिराचे आवार,
थिरुवारुर,
तामिळ नाडू ६१०००१


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

Thursday, September 10, 2026

Shri Vanmiknathar Temple at Thiruvarur

The Thyagaraja temple at Thiruvaur is spread over 30 acres and it is one of the largest temples in India. This temple is at the center of Thiruvarur town. It is at a distance of 70 kms from Tanjavur, 42 kms from Kumbakonam, 26 kms from Nagapattinam, 41 kms from Karaikkal. In this temple complex, there are numerous shrines. Amongst all these shrines in the temple complex, the primary and the most ancient temple is that of Lord Vanmiknathar.

Thyagaraja temple complex has two Padal Pethra sthalams namely that of Lord Thyagaraja and Lord Vanmiknathar which are considered as main shrines. 

The Thyagaraja temple is supposed to have existed even in the 6th century. This temple was revered by the Shaiva Saints Naalvar. Lord Vanmikanathar is also praised as Lord Aaruran in Thevaram hymns. Aatakeshwaram shrine in the Thyagaraja temple complex is believed to be the shrine from which Lord Shiva appeared from the anthill. 

Moolavar: Shri Vanmiknathar, Shri Aaruran, Shri Putridamgondar, Shri Thirumoolattana Mudiyar

Devi: Shri Phogan Amman, Shri Piriya Vidai Amman, Shri Padithandapathini

Sacred Vruksha: Padari Tree (trumpet flower tree)

Kshetra Purana:

According to the Puran, Lord Vishnu came in possession of a great bow. It gave him tremendous strength. Lord Vishnu was seized with ego and it is believed that he chased Gods through all the universe. The gods ran everywhere and finally came to Thiruvarur. They worshiped Lord Shiva and requested him to save them. Lord Vishnu who was following Gods, also reached Thiruvarur. As soon as he reached Thiruvarur, his strength vanished. It is believed that he stood still with a grounded bow and with a head resting on the bow. The Gods took the form of white ants and built an anthill at the end of the bow that rested on the ground. They gnawed at the end of the bow resulting in the string getting cut off from the bow. The string of the bow struck Lord Vishnu with such a force that his head was cut off. The Gods were dismayed at the loss of Lord Vishnu who was the protector of the universe. They again prayed to Lord Shiva, who appeared immediately. He restored Lord Vishnu to life. The Gods requested Lord Shiva to take his abode within the anthill. Lord Shiva stayed back in the anthill and he is praised as Lord Vanmiknathar. 

Those who worshiped at this place

King Muchugunda, Lord Vishnu, Gods, King Vikram Chola, Somasi Nayanar, Kazhar Singhar Nayanar, Dandi Adigal Nayanar

Special Features:

1. The Shiva Linga is in the form of an anthill.

2. It is believed that there was another shrine of Lord Shiva at Aatakeshwaram near the kshetra vruksha. 

3. There is subterrain (underground passage) which is closed now. 

4. It is believed that Lord Aatakeshwarar appeared as Lord Vanmiknathar to restore the life of Lord Vishnu. 

About the Temple:

This is an east facing temple. The rajagopuram on the way to this temple is praised as Azhagiyan Gopuram. There are stucco images of Dwarapal at the entrance. At the center of the gopuram we come across Adhikar Nandi. 

Lord Vanmiknathar is bedecked with flowers and holy ash. He wears a crescent moon on his head. Shaiva Saint Appar has praised the main deity as Putridamgondar (one who resides in anthill) in his sacred hymns. 

Ambika’s idol is made of bronze. She is seated in Tribhanga posture with her hand on the earth (Pruthvi). It is believed that her contact with the earth anchored Thiruvarur as Bhumi (Pruthvi) kshetra of Pancha Bhuta Sthalams. She is present in the main shrine and hence she is represented as Padi Thanda Pathini. 

In the prakaram we come across shrines of Lord Pradosh Nayakar, Lord Chandikeshwarar, Chola King, Manikkavachagar, Tripura Samhar Murti and Lord Vinayaka. 

Prayers:

Devotees worship for fulfillment of their boons, prosperity and wealth.

Pooja: Regular pooja, Pradosha pooja

Festivals:

Same as festivals celebrated in other shrines of Thyagaraja temple

Timings: Same timing as Thyagaraja temple

Address:

Shri Vanmiknathar Temple, 
At Shri Thyagaraja Temple,
Thiruvarur,
Tamil Nadu 610001

Courtesy: Various websites and blogs


Sunday, September 6, 2026

अरनेरी येथील श्री अरनेरी अचलेश्वरर मंदिर

हे मंदिर थिरुवारुर येथील प्रसिद्ध त्यागराजा मंदिराच्या आवारात वसले आहे. थिरुवारुर ह्या स्थळाचे ऐतिहासिक नाव अरनेरी आणि अचलेश्वरम असे आहे. हे मंदिर श्री त्यागराजा मंदिरातील दक्षिणेकडील परिक्रमेमध्ये आहे. कावेरी नदीच्या काठावरील २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक आहे. ह्या मंदिराची स्तुती शैव संत अप्पर ह्यांनी गायली आहे. म्हणून हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. ह्या मंदिरात शिलालेख आहेत ज्यातून हे समजतं कि हे मंदिर मध्ययुगातील चोळा राजांनी बांधलं असावं. सिम्बिअन महादेवी ह्या चोळा राणीने ह्या मंदिराची पुनर्बांधणी केली. शिलालेखांमध्ये विविध नायक आणि चोळा राजांनी मंदिराच्या विस्ताराच्या कामांचे तसेच त्यांनी दिलेल्या देणग्यांचे उल्लेख आहेत.

मूलवर: श्री अचलेश्वरर, श्री अरनेरी अप्पर
देवी: श्री वंदार कुळली, श्री अंबल अचलेश्वरी
पवित्र तीर्थ: शंख तीर्थ, कमल तीर्थ
पवित्र वृक्ष: पडारी वृक्ष (पिवळ्या रंगाचे ट्रम्पेट फुलांचे वृक्ष)
पुराणिक नाव: अरुर अरनेरी
वर्तमान नाव: अरनेरी 

क्षेत्र पुराण:

१. स्थळ पुराणानुसार कळर सिंघर नावाचा पल्लव राजा आपल्या राणीसमवेत इथे भगवान शिवांची आराधना करण्यासाठी आला. राणीने भगवान शिवांच्या आराधनेसाठी ठेवलेली फुलं पाहिली. त्या फुलांकडे आकर्षित झाल्याने तिने त्या फुलांचा वास घेतला. पण हे कृत्य पवित्र वस्तूंचा अपमान असं समजलं जातं. त्यावेळी इथे सेरुथोंडर नायनार उपस्थित होते. त्यांनी शिक्षा म्हणून राणीचे नाक कापले. पण भगवान शिवांच्या कृपेने राणीचे नाक पूर्ववत झाले. सेरुथोंडर नायनार ह्यांना भगवान शिवांनी ६३ नायनमारांत समाविष्ट केले.

२. स्थळ पुराणानुसार नामिनधी अडिगल नियमितपणे श्री अचलेश्वरर मंदिरात भगवान शिवांची आराधना करत होते. एकदा ते जेव्हा मंदिरात आले त्यावेळी त्यांनी भगवान शिवांच्या पुढे असलेल्या दीपातील तूप संपत आल्याने तो दीप कधी पण विझेल अशा परिस्थितीत आहे असं पाहिलं. त्यांचं घर मंदिरापासून लांब असल्याने घरी जाऊन तूप आणायला खूप वेळ लागेल म्हणून त्यांनी मंदिराच्या जवळ राहणाऱ्या लोकांकडे तुपाची मागणी केली. पण हि लोकं जैन धर्माची असल्याकारणाने त्यांनी उलट अडिगल ह्यांची थट्टा केली. थट्टेच्या स्वरांत ते म्हणाले जर भगवान शिवांच्या हातात अग्नी आहे आणि ते समर्थ आहेत तर मग त्यांना दीपासाठी तुपाची काय गरज? आणि ते पुढे जाऊन अडिगल ह्यांना असे पण म्हणाले कि त्यांची जर भगवान शिवांवरची भक्ती श्रेष्ठ असेल तर ते पाण्याने पण दीप प्रज्वलित करू शकले पाहिजेत. अडिगल ह्यांना ह्या गोष्टीचा खूप राग आला आणि त्यांनी मंदिरात येऊन भगवान शिवांसमोर शोक व्यक्त केला. ते भगवान शिवांना म्हणाले कि ते स्वतः म्हणजे अडिगल हे खूप पापी आहेत कारण त्यांना भगवान शिवांसमक्ष असे शब्द ऐकायला लागले. त्यावेळी आकाशवाणीने अडिगल ह्यांना मंदिराच्या तीर्थातून पाणी आणून दीप प्रज्वलित करण्यास सुचविले. अडिगल ह्यांनी त्या सूचनेनुसार केल्यावर त्यांना दीप पहिल्यापेक्षाही अधिक तेजाने झळकत असल्याचे बघून आश्चर्य वाटले. त्यानंतर त्यांनी मंदिराच्या तीर्थाच्या पाण्याने मंदिरातील सर्वच दीप प्रज्वलित केले. मंदिरात एवढा उजेड झाला कि दिवस आहे असे वाटू लागले. जेव्हा त्या समयी राज्यावर असलेल्या चोळा राजाला हि बातमी समजली तेव्हा त्यांनी अडिगल ह्यांना त्या मंदिराचे मुख्य प्रशासक हि पदवी दिली. तसेच राजाने ह्या मंदिरातील सर्व उत्सव साजरे करण्यासाठी मदतीची व्यवस्था केली. ज्या जैन लोकांनी अडिगल ह्यांची थट्टा केली होती त्यांची मान शरमेने खाली गेली आणि त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. भगवान शिवांनी अडिगल ह्यांना ६३ नायनमारांत समाविष्ट केले.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

सेरुथोंडर नायनार, कळर सिंघर नायनार आणि त्यांची पत्नी, नामिनधी अडिगल, शैव संत अप्पर, शैव संत संबंधर, शैव संत सुंदरर त्यांची पत्नी परवाई नाचियार ह्यांच्या समवेत, राजा चेरामन पेरूमन.

वैशिष्ट्ये:

१. इथले शिव लिंग स्वयंभू असून ते पश्चिमाभिमुख आहे.

२. मूलवरची सावली फक्त पूर्वेकडेच पडते.

३. हे मंदिर तंजावूर येथील बृहदीश्वरर मंदिराच्या आधी बांधले असा समज आहे.

मंदिराबद्दल माहिती:

मंदिरामध्ये गर्भगृह, अंतराळ आणि अर्धमंडप आहेत. गाभाऱ्यावरती तीन स्तरांचं गोपुर आहे. मंदिराभोवती उंच भिंती आहेत. पूर्वेकडचे गोपुर ११८ फूट उंच आहे. सर्व मंदिरच जमिनीच्या पातळीवरती चार फुटावर आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे आणि राजगोपुराच्या डाव्या बाजूला आहे. नंदी, बलीपिठ आणि ध्वजस्तंभ गर्भगृहाच्या समोर सरळ रेषेमध्ये आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशावर द्वारपालक आहेत. 

कोष्ठ मूर्ती: श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री दुर्गा देवी.

प्रकारामध्ये श्री अर्धनारीश्वरर, श्री भिक्षादनर, अगस्त्य ऋषी आणि श्री नटराज आहेत.

प्रमुख देवतेची (मूलवर) सावली फक्त पूर्वेकडे पडते. ह्या मंदिराचे स्थापत्य तंजावूरच्या बृहदीश्वरर मंदिराच्या स्थापत्यासमान आहे.

पूर्वेकडील प्रवेशाकडून प्रवेश केल्यावर प्रवेशाच्या आजूबाजूला श्री विनायक आणि श्री मुरुगन आहेत. 

जसे आपण पुढे येतो तसे आपल्याला श्री विधी विडंग विनायक आणि ब्रह्मा नंदींचे दर्शन होते. अर्ध मंडपामध्ये शिव लिंग आहे आणि वनमाळा बनविण्यासाठी चौथरा आहे. अर्ध मंडपाच्या भिंतींवर आणि छतावर नायक काळातली भित्तीचित्रे आहेत. ह्या स्थळी एका चित्रामध्ये भगवान विष्णू आपले सुदर्शन चक्र श्री विनायकांकडून मिळविण्यासाठी नृत्य करत आहेत असे चित्रित केले आहे. 

छतावर एका चौरस आव्यूहावर सहस्र लिंगे (१००८ शिव लिंगे) चित्रित केली आहेत.

प्रार्थना:

भाविक जन इथे विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी, अपत्यप्राप्तीसाठी तसेच शिक्षणात प्राविण्य मिळविण्यासाठी प्रार्थना करतात.

पूजा:

नियमित पूजा तसेच प्रदोष पूजा केल्या जातात.

मंदिरात साजरे होणारे सण:

त्यागराजा मंदिरात साजरे होणारे काही सण इथे पण साजरे होतात. जसे 

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री 

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक 

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): कार्थिगई दीपम 

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै 

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री 

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरं (उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दिवशी उत्सव)

मंदिराच्या वेळा: सकाळी ५ ते दुपारी १२, दुपारी ४ ते रात्री ९

मंदिराचा पत्ता:

श्री अरनेरी अचलेश्वरर मंदिर,
अरुर अरनेरी,
थिरुवारुर,
तामिळ नाडू ६१०००१

दूरध्वनी: +९१-४३६६२४२३४३, +९१-९४४३३५४३०२ 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


Thursday, September 3, 2026

Shri Araneri Achaleshwarar Temple at Araneri

This temple is located within the famous Tyagaraja Temple at Thiruvarur. The historical name of Thiruvarur is Araneri and Achaleshwaram. This temple is located in the southern parikrama of Shri Tyagaraja temple. This is a Padal Pethra Sthalam of Kaveri revered by Shaiva Saint Appar. Hence this temple must have existed even before the 7th century. There are stone inscriptions in the temple. The original temple is believed to be constructed by medieval Chola kings. The temple was rebuilt by Sembian Mahadevi. The extensions and endowments were made by Nayaks and Chola kings.

Moolavar: Shri Achaleshwarar, Shri Araneri Appar
Devi: Shri Vandarkuzhali, Shri Ambal Achaleshwari
Sacred Theertha: Shankha Teertha and Kamala Teertha
Sacred Vruksha: Padari Tree (Yellow color trumpet flower tree)
Puranik Name: Arur Araneri
Present Name: Araneri

Kshetra Purana:

1. According to Sthala Puran, a Pallava king named Kazhar Singhar came to this place along with his wife for worshiping Lord Shiva. At that time the queen saw the flowers that were kept for Lord Shiva’s worship. As she was attracted by the flowers, she smelled the flowers. This act is considered to be a sacrilege in the worship. A shiva devotee Seruthondar Nayanar who was present, cut the nose of the queen as a punishment. By Lord’s grace the nose was back in place. Later, by the grace and blessings of Lord Shiva, Seruthondar Nayanar became one of the 63 nayanmars. 

2. As per Sthala Puran, Naminadhi Adigal was worshiping Lord Shiva without fail at Shri Achaleshwarar temple. Once when he came to the temple, he found that the lamp was about to get extinguished as there was no ghee in it. He felt if he tried to fetch ghee from his house it would be too late. He decided to approach the people staying very close to the temple. As these people belonged to the Jain community they mocked him and told him that Lord Shiva has Agni in his hand and moreover he was powerful, why he should need ghee for the lamp. They also mocked him by saying if his faith in Lord Shiva was true, he could light the lamp even with water. Adigal was very much annoyed and he came to the temple and lamented to Lord Shiva. He stated to Lord Shiva that he was so sinful that he had to hear such words with Lord Shiva as a witness. A celestial voice directed Adigal to bring water from the temple tank and light the lamp. When he did as directed by a celestial voice, he was delighted to see that the lamp was burning more brightly than before. Then he lit all the lamps in the temple with water instead of ghee or oil. The whole temple became bright as if it was daytime. The ruling Chola king came to know about this incident. He made Adigal the chief administrator of the temple. He also offered to help in conducting all the festivals in the temple. The Jains who had mocked the Adigal were ashamed of their behavior and regretted their attitude. Later on, Lord Shiva made Adigal one of the 63 nayanmars.

Those who worshiped here: Seruthondar Nayanar, Kazhar Singhar Nayanar and his wife,  Naminadhi Adigal, Shaiva Saints Appar, Sambandhar, Shaiv Saint Sundarar with his wife Paravai Nachiyar and the king Cheraman Peruman.

Special Features:

1. The Shiva Linga is a Swayambhu Linga facing west. 

2. The shadow of the moolavar falls only on the east side.

3. This temple is considered to be constructed before Brihadishwarar temple in Thanjavur.

About The Temple:

The temple consists of Sanctum Sanctorum, Anatarala, Ardha Mandap. There is a three tier gopuram over the sanctum. The temple is surrounded by high walls.The east side gopuram is 118 feet tall. The temple itself is constructed on the raised level of about 4 feet from the ground level. This is a west facing temple and is on the left side of the Rajagopuram. Nandi, Balipeeth and Dhwajastambha are in front of Sanctum Sanctorum and are in a straight line. There are dwarapalaks at the entrance of the Sanctum.

Koshta murtis: Lord Vinayaka, Lord Dakshinamurti, Lord Lingodbhavar, Goddess Durga.

Lord Ardhanarishwarar, Lord Bhikshadanar, Sage Agastya and Lord Nataraja are in the prakaram.

The shadow of the presiding deity falls only on the east side. The temple architecture is similar to that of Thanjavur Brihadishwarar temple.

When we come through the east entrance, we come across Lord Vinayaka and Lord Muruga on either side of the entrance. As we move down we come across Vidhi Vidanga Vinayaka and then Brahma Nandi. In the Ardha Mandap, there is a Shiva Linga and a platform for making garlands. 

There are Nayak period murals on the walls and ceiling of the Ardha Mandap. At this place Lord Vishnu is depicted as dancing to get his Sudarshan chakra from Lord Vinayaka. 

On a square matrix on the ceiling, sahasra linga (1008 shiva lingas) are painted.  

Prayers:

Devotees worship at this place for removal of marriage obstacles, child boon and excellence in education. 

Pooja:

Regular pooja, pradosha pooja

Festivals:

Some of the festivals celebrated at Tyagaraja temple are celebrated here as well, such as 

Purattasi (Sept-Oct): Navaratri 

Aippasi (Oct-Nov): Annabhishek 

Karthigai (Nov-Dec): Karthigai Deepam 

Margazhi (Dec-Jan): Thiruvathirai 

Maasi (Feb-Mar): Mahashivaratri

Panguni (Mar-April): festival on the Nakshatra of Uttara Phalguni

Temple Timings: 5 am to 12 noon and 4 pm to 9 pm

Address:

Shri Araneri Achaleshwarar Temple
Arur Araneri,
Thiruvarur,
Tamil Nadu 610001

Phone: +91-4366242343, +91-9443354302

Courtesy: Various websites and blogs


Sunday, August 30, 2026

थिरुपल्ली मुक्कूडल येथील श्री त्रिनेत्रस्वामी मंदिर

हे शिवमंदिर कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर, थिरुवारूरपासून सुमारे ५ किलोमीटरवर वसले आहे. थिरुविरकुडीपासून सुमारे १० किलोमीटर, पल्लिवरमंगलमपासून ३ किलोमीटर आणि केक्कराईपासून २ किलोमीटरवर आहे. सध्या हे स्थान कुरुवी रामेश्वरम् या नावाने ओळखले जाते. थिरुवारूर–केक्कराई मार्गावर पूल ओलांडल्यानंतर सुमारे १ किलोमीटरवर हे मंदिर आहे.

मूळ मंदिर सातव्या शतकापूर्वीपासून अस्तित्वात होते असे मानले जाते. नंतर चोळा राजांनी मंदिराची पुनर्बांधणी केली आणि विजयनगरच्या राजांनी त्याचा विस्तार केला. मंदिरात चोळा काळातील शिलालेख आढळतात. शैव संत अप्पर यांनी या मंदिरातील भगवान शिवांची स्तुती करणारी पवित्र पदिगे गायिली आहेत.

मूलवर: श्री त्रिनेत्रनाथर, श्री मुक्कूडलनाथर, श्री मुक्कोणेश्वरर, श्री त्रिनेत्रस्वामी

देवी: श्री मेय्मेवुकन्नी, श्री अंजाक्षी अंबिका

पवित्र तीर्थ: मुक्कूडल तीर्थम् (षोडश तीर्थम्)

क्षेत्र वृक्ष: बिल्ववृक्ष

पौराणिक नाव: केक्कराई थिरुपल्ली मुक्कूडल, आर्यनपल्ली

वर्तमान नाव: थिरुपल्ली मुक्कूडल


क्षेत्र पुराण:

१. असा समज आहे की हे अशा पवित्र स्थळांपैकी हे एक स्थान आहे जिथे प्रभू श्रीरामांनी पितृतर्पण केले. त्यामुळे या ठिकाणी तर्पण केल्यास गया येथे तर्पण केल्याचे पुण्यफळ मिळते, असे मानले जाते. म्हणून या स्थानाला केक्कराई हे नाव प्राप्त झाले असे सांगितले जाते. गया कराई या संकल्पनेशी या नावाचा संबंध जोडला जातो. 

२. या मंदिरातील तीर्थकुंड श्री गणेशांनी ऋषी भृंगी यांच्यासाठी खोदले, अशीही आख्यायिका आहे.

३. पुराणानुसार, जटायू या पवित्र स्थळी आला आणि त्याने येथे तपश्चर्या केली. त्याने भगवान शिवांकडे अशी प्रार्थना केली की, मोक्षप्राप्तीसाठी त्याला काशी आणि रामेश्वर येथे एकाच वेळी स्नान करण्याची संधी मिळावी. भगवान शिवांनी त्याला दर्शन देऊन सांगितले की, जेव्हा रावण सीतेचे हरण करेल, तेव्हा जटायू सीतेचे रक्षण करण्याचा आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करील. त्या युद्धात रावण जटायूचे पंख छाटेल. त्यानंतर जटायूची प्रभू श्रीरामांशी भेट होईल आणि श्रीरामांच्या चरणी त्याचा प्राणान्त होईल. जटायूने आपल्या मृत्यूपूर्वी प्रयागराज, काशी आणि रामेश्वर येथे स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा भगवान शिवांनी या मंदिराच्या तीर्थकुंडात त्या तिन्ही पवित्र तीर्थांचे आगमन घडवून आणले.

भगवान शिवांनी पुढे सांगितले की, या मंदिरातील तीर्थकुंडात स्नान केल्याने रामेश्वरमधील समुद्रकिनाऱ्यावरील सोळा सेतुसमुद्र स्नानघाटांवर स्नान केल्याचे पुण्य मिळते. त्यामुळे हे तीर्थ षोडश-सेतू-तीर्थ तसेच मुक्कूडल तीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले.

४. पुराणानुसार, एक चोळा राजा भगवान शिवांचा अत्यंत निष्ठावान भक्त होता. भोजन करण्यापूर्वी तो भगवान शिवांची पूजा करीत असे.

एकदा तो या मंदिरात आला असता, उशीर झाल्यामुळे मंदिराचे दरवाजे बंद झाले होते. राजाची भोजनापूर्वी शिवपूजा करण्याची सवय त्याच्या सेवकांना माहीत होती. त्यांनी त्याच्यासमोर घोड्यांना देण्यात येणाऱ्या चाऱ्याची पोती ठेवली आणि ते शिवलिंगासारखे दिसेल अशी व्यवस्था केली. राजाला शिवलिंगाचे दर्शन झाल्याचा आनंद झाला. त्याने त्या पोत्याची शिवलिंग म्हणून पूजा केली आणि त्यानंतर भोजन केले.

दुसऱ्या दिवशी आपली फसवणूक झाल्याचे राजाला समजले. त्याने ते पोते उचलण्याचा प्रयत्न केला; परंतु ते त्याला उचलता आले नाही. कारण ते पोते प्रत्यक्ष शिवलिंगात परिवर्तित झाले होते, अशी आख्यायिका आहे. नंतर राजाने ते शिवलिंग मंदिरात प्रतिष्ठापित केले.

५. स्थळपुराणानुसार, तपोवधानी नावाच्या एका राणीने या मंदिरातील श्री पार्वती देवींची पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली. असे मानले जाते की, श्री पार्वती देवी स्वतः मंदिराच्या तीर्थकुंडात कमळावर तरंगणाऱ्या बालिकेच्या रूपात प्रकट झाल्या. राणीच्या नजरेस ती बालिका पडली आणि तिने तिला आपली मुलगी म्हणून वाढवले. नंतर भगवान शिवांनी तिच्याशी विवाह केला, असा समज आहे.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

प्रभू श्रीराम, जटायू, ऋषी भृंगी, ऋषी मूरक्क, शैव संत अप्पर

वैशिष्ट्ये:

१. मंदिरातील शिवलिंग अत्यंत सुंदर आहे.

२. मंदिरातील तीर्थकुंड हे प्रयागराजच्या त्रिवेणी संगमाप्रमाणे गंगा, यमुना आणि सावित्री या तीन नद्यांचा संगम असल्याचे मानले जाते.

३. प्रभू श्रीराम आणि जटायू यांच्याशी या स्थानाचा संबंध असल्यामुळे हे स्थान कुरुवी रामेश्वरम् म्हणून ओळखले जाते. कुरुवी म्हणजे तमिळ भाषेत चिमणी/लहान पक्षी.

४. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान सूर्याची किरणे शिवलिंगावर पडतात.

५. गर्भगृहासमोर असलेला नंदी किंचित एका बाजूला मान वळवून बसलेला आहे. तो काहीतरी ऐकत असल्यासारखा दिसतो.

६. मंदिरातील सर्व मूर्ती अत्यंत सुंदर आहेत.

७. मंदिराच्या तीर्थकुंडात सोळा विहिरी आहेत, अशी श्रद्धा आहे. या विहिरींमध्ये स्नान केल्यास कुंभकोणम येथील महामाघम तीर्थकुंडात स्नान केल्याचे पुण्यफळ मिळते, असे मानले जाते.

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराला स्वतंत्र राजगोपुरम् नाही. प्रवेशद्वारावर कमानीची रचना आहे. मंदिरात एक प्रदक्षिणामार्ग (प्रकार) आहे. मंदिरात ध्वजस्तंभ नाही. गर्भगृहासमोर बलीपीठ आणि नंदी आहेत. प्रवेशद्वाराच्या कमानीवर प्रभू श्रीराम, जटायू, श्री गणेश आणि श्री सुब्रह्मण्य यांच्या स्टुको प्रतिमा आहेत. गर्भगृहाच्या वर दोन स्तरांचे गोपुरम् आहे. मुख्य शिवलिंग स्वयंभू लिंग आहे.

कोष्ठमूर्ती: श्री गणेश, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मा, श्री दुर्गा देवी.

प्रदक्षिणामार्गात (प्रकारात) पुढील देवता व संतांच्या मूर्ती/देवालये  आहेत: श्री विनायक, वल्ली आणि दैवानै समवेत श्री सुब्रह्मण्य, श्री गजलक्ष्मी देवी, श्री सूर्य, श्री चंद्र, नागदेवता, श्री ब्रह्मा, श्री शनी, शैव संत नालवर, श्री चंडिकेश्वर

अंबिका देवीचे स्वतंत्र पूर्वाभिमुख मंदिर आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्याची किरणे शिवलिंगावर पडतात.

प्रार्थना:

१. असे मानले जाते की, मंदिराच्या तीर्थकुंडात स्नान करून सलग बारा अमावास्यांना भगवान शिवांची उपासना केल्यास विवाहातील अडथळे दूर होतात आणि पुत्रदोष असल्यास तोही दूर होतो.

२. भक्त आपल्या पूर्वजांसाठी येथे तर्पण विधी करतात. येथे तर्पण केल्याने गया येथे तर्पण केल्यास मिळणारे पुण्यफळ प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.

३. मंदिराच्या तीर्थकुंडात सोळा विहिरी असल्याचेही नमूद केले आहे. या पवित्र तीर्थात स्नान केल्यास कुंभकोणमच्या महामाघम तीर्थकुंडात स्नान केल्यासारखे पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे.

पूजा:

नियमित दैनिक पूजा केल्या जातात. तसेच अमावास्या पूजा, प्रदोष पूजा केल्या जातात. भक्त अमावास्येच्या दिवशी विशेषतः पूर्वजांच्या कल्याणासाठी तर्पण व धार्मिक विधी करतात.

मंदिरात साजरे होणारे सण:

आडी (जुलै–ऑगस्ट): आडी पूरम् (पूर्वाफाल्गुनी (पूरम्) नक्षत्राच्या दिवशी उत्सव).

आवनी (ऑगस्ट–सप्टेंबर): गणेश चतुर्थी

ऐप्पासी (ऑक्टोबर–नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर–डिसेंबर): थिरुकार्थिगई

थै (जानेवारी–फेब्रुवारी): मकर संक्रांती

मासी (फेब्रुवारी–मार्च): महाशिवरात्री

मंदिराच्या वेळा: सकाळी १०:०० ते दुपारी १२:००, संध्याकाळी ६:०० ते रात्री ८:००

मंदिराचा पत्ता:

श्री त्रिनेत्रस्वामी मंदिर, 
थिरुपल्ली मुक्कूडल, पोस्ट केक्कराई,
तालुका व जिल्हा थिरुवारूर,
तामिळनाडू – ६१०००२, भारत.

दूरध्वनी: ९८६५८४४६७७, ०४३६६-२४४७१४

पुजारी यांचा संपर्क: श्री गणेश गुरुक्कल +९१-८४२८६०७४४८


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.