Thursday, May 10, 2012

Effortless Effort

गुरु योग्य असल्यावरी | वायां न जाई सेवा खरी |
कामधेनु असल्या घरीं | कां न इच्छा पुरतील? ||
                                        -
अध्याय १३ - श्री गजानन विजय

संत सांगतात की ज्यांना आयुष्यात सर्व सुखं विनासायास (effortless) मिळवायची असतील त्यांनी गुरुसेवेचा सोपा मार्ग अवलंबावा. माता पार्वतीने आपल्या मुलांच्या, म्हणजेच साऱ्या विश्वाच्या, काळजीने जेव्हा भगवान शंकरांना विचारले की कुठल्या अशा सोप्या उपायांनी तिची मुलंमुली सर्व दु:खांपासून मुक्त होऊन, सर्वसुखी होऊन, परमपदाला पोचतील, तेव्हा भगवान शंकरांनी सांगितले की गुरुसेवा ह्या एकमेव सोप्या उपायानी सर्व दु:खांची निवृत्ती होऊन न भंगणाऱ्या सुखाची प्राप्ती होते. हा माता पार्वती आणि भगवान शंकरांमधला संवाद गुरुगीता ह्या नावाने प्रसिद्ध आहे.

खऱ्या खऱ्या संतांची | सेवा न जाई वायां साची |
परी निष्ठा मानवाची | जडणे तेथे अशक्य ||
                                          -
अध्याय २० -श्री गजानन विजय

गुरुसेवा घडल्यावर सर्व सुखांची प्राप्ती होते हे खरं असलं तरी माणसाची गुरुवर निष्ठा जडणं हे खूप आवश्यक आहे. प्रथम गुरुसेवा घडायची म्हणजे गुरु पाहिजे. आणि गुरु प्राप्त होण्यासाठी गुरु प्राप्त होण्याची इच्छा पाहिजे. इच्छा तेथे मार्ग अशी मराठीत म्हण आहे. गुरु प्राप्त होण्याची प्रबळ इच्छा असेल तर गुरु कधीना कधीतरी नक्की प्राप्त होतात. माणसाचा पहिला गुरु म्हणजे माता. माता आपल्या मुलामुलींना पिता ह्या गुरूशी ओळख करून देते. माता आणि पिता ह्यांची सेवा घडली की आपोआपच सेवेची वृत्ती वाढते आणि त्यातूनच गुरुसेवेची इच्छा उत्पन्न झाली की गुरूंची प्राप्ती होते. असं म्हणतात की अशी मनाची अवस्था झाली की गुरूच शिष्याला शोधत येतात.

म्हणे दास सायास त्याचे करावे | जनी जाणता पाय त्याचे धरावे ||
                                                                   - मनाचे श्लोक

एकदा का गुरु प्राप्त झाले की त्यांचे पाय कधी सोडू नयेत. सर्व सायास हे गुरूंच्या सेवेसाठी करावेत. आता मुख्य प्रश्न पडतो तो म्हणजे गुरुसेवा कशी करावी. जेव्हा गुरु आपल्या सान्निध्यात असतील तेव्हा गुरूंची सोय पाहणे म्हणजेच गुरुसेवा होय .गुरूंची सोय पाहताना   गुरु हे आपल्या बरोबर अजून अनेक जणांची काळजी वाहत आहेत हे लक्षात घेऊन गुरूंना त्यांच्या सर्वांची काळजी वाहण्याच्या कामात मदत करावी. आपल्याबरोबर बाकीच्यांना पण गुरुकृपेचा लाभ व्हावा अशी इच्छा धरावी. अर्थातच हे सर्व करत असताना गुरूंची मर्जी राखावी. गुरुंसमोर कुठलीही गोष्ट, अगदी आपले गुप्त विचार पण, लपून राहू शकत नाही हे जाणून गुरूंशी प्रामाणिकपणा राखावा. आपल्या वर्तनातून आपण आपल्यापेक्षा लहान व्यक्तींना आणि आपण ज्यांचं हित चिंतितो त्यांना गुरुसेवेचा बोध द्यावा. शब्दांपेक्षा वर्तन पाहून माणूस जास्त लवकर शिकतो.

गुरु सान्निध्यात नसतील तेव्हा गुरूंनी सांगितलेली कामे काटेकोरपणे करणे ह्यालाच गुरुसेवा म्हणतात. गुरु आपल्या शिष्यांना स्वतः शिष्यांपेक्षा जास्त चांगल्या रीतीने ओळखतात. ते प्रत्येक शिष्याचा स्थायी भाव जाणून त्याप्रमाणे त्याला किंवा तिला योग्य अशी उपासना करायवयास सांगतात. ही उपासना काटेकोरपणे नित्य चालू ठेवणे म्हणजेच गुरुसेवा करणे. मग ती उपासना म्हणजे कुठला अध्याय वाचायला सांगितलेला असो किंवा घरच्या देवाला नैवेद्य दाखविण्यास सांगितलेला असो किंवा घरच्या देवासमोर दिवा लावण्यास सांगितलेला असो किंवा मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला सांगितलेलं असो, गुरूंच्या उपदेशावर कुठलीही शंका न घेता ती उपासना काटेकोरपणे नियमित पणे पार पाडावी.

स्वतःच्या कल्पनेनी केलेली उपासना आणि गुरूंनी उपदेशिलेली उपासना ह्यातला फरक लक्षात घेण्यासारखा आहे. गुरूंनी उपदेशिलेल्या उपासनेत गुरूंचे आशीर्वाद अंतर्भूत असतात. त्यामुळे गुरूंनी उपदेशिलेली उपासना अगदी साधी सरळ सोपी असली -उदाहरणार्थ रोज देवापुढे दिवा लावणे  - तरी ती स्वकल्पनेनी केलेल्या उपासने पेक्षा जास्त परिणामकारक असते.ही उपासना करत असताना मनात ही भावना ठेवावी की ही उपासना आपल्या सर्वांगीण विकासासाठी असून, अंती समाधान देणारी आहे. जेवढा विश्वास दृढ तेवढं जास्त समाधान. सुखापेक्षाही समाधान हे जास्त काळ टिकतं आणि सुखापेक्षा अनेक पटींनी जास्त आनंद देतं.

शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी |
                                                                 - साईबाबांची वचने

आत्तापर्यंत योग्य गुरु प्राप्त होऊन त्यांना शरण गेलेल्या माणसाचं आयुष्य वाया गेल्याचं ऐकिवात नाही. किंबहुना गुरूंना शरण न गेल्यामुळे आयुष्य वाया गेल्याची अनेक उदाहरणं इतिहासात सापडतील. आयुष्य खूप छोटं आहे आणि अनिश्चित आहे. सध्याच्या जगात चांगले गुरु भेटणं हे पण कठीण होत चाललं आहे. त्यामुळे योग्य गुरु प्राप्त झाले असतील तर त्यांच्या आज्ञेत राहून त्यांची सेवा करून आपलं आयुष्य सावरणं हाच सुज्ञपणा होय.

माता धन्य पिता धन्य | ज्ञाती कुल वंश धन्य |
धन्य वसुधा देवी धन्य | धन्य धन्य गुरुभक्ती ||
                                                         
- गुरुगीता

खरोखर, ज्या स्त्री पुरुषांच्या हातून गुरूंच्या चरणांची सेवा घडते त्यांचे माता पिता धन्य होत. ते आपल्या वंशाला आणि कुळाला धन्यता आणतात. तेवढंच नव्हे तर ते पृथ्विमातेलापण धन्यता आणतात. धन्य धन्य ते गुरुभक्त आणि धन्य त्यांची गुरुभक्ती.

Sunday, May 6, 2012

Shankar Pindi and Nandi Sthapana

On the anniversary day of Shri Sainath Pranpratishtha, we will be performing sthapana of Shankar Pindi and Nandi

Date: May 11, 2012
Location: Shri Sainath Maharaj Trust, Dapoli, India

Details and photo to follow

Thursday, April 19, 2012

Rejoice, Sing, Dance


Rejoicing, dancing, singing. This is what happens when devotees of God get together to sing the glories of God. They long for an opportunity to sing glories of God and exchange experiences of God. As soon as they get such opportunity they rejoice. They do not need any instruments for singing neither they are concerned if they are following rules of music. Just a clap for a beat is enough. What is more important for them is the feeling of joy that emanates from their heart because they got opportunity to sing the glory of God.


In Gokula every family was experiencing extraordinary joy as all family members – men, women, elders and children – got together every day and loudly sang the glories and the divine names of their beloved Govinda. They had fun in chitchatting about the stories of gopikas complaining to Mother Yashoda that her son Makkhanchor is stealing butter from their homes; they enjoyed watching Mother Yashoda running behind her mischievous kid Yashodanandana to catch him and punish him for his mischiefs; they experienced agony, excitement and extraordinary joy, all at one time, while they watched from the bank of Yamuna river as their beloved Krishna fiercely fought with poisonous serpent Kaliya to make all Gokula residents fearless.

As Shri Krishna was to Gokula residents, so was Shri Saibaba to Shirdi residents, so was Shri Gajanan Maharaj to Shegaon residents, so was Shripad ShriVallabha to Pithikapur residents. As time passes, forms change but the relation remains same – eternal relation between soul and super soul.

Even now, as reading Maha Bhagwat gives the same joy to Shri Krishna devotees, that was experienced by Gokula residents, so does Shri Sai Satcharit to Shri Saibaba devotees, so does Shri Gajanan Vijay to Shri Gajanan Maharaj devotees, so does Shripad ShriVallabha Charitamrut to Shripad Shrivallabh devotees.

In fact reading gives more joy as reading can be repeated as many times as one can.


Thursday, April 12, 2012

An essential item in carry-on bag


Everybody has their own peculiar style of preparing carry-on bag for journey. After putting all essential items, depending on length of the journey and personal interest, everybody keeps an item for entertainment – an audio player and/or a book. In fact long journey is in a way an opportunity to fulfill these entertainment desires. If one has natural interest to entertain themselves by listening to or reading some spiritual content then it can be considered as a blessing.



Fortunate are those who are born in India, the land of Saints. Even more fortunate are those who are born in Maharashtra, where Shri Saibaba performed his leelas (divine sports). Even more fortunate are those who understand language of Marathi and real fortunate and blessed ones are those who have interest in reading or listening Sai Satcharit – a book containing divine stories of Shri Saibaba. They are well equipped to acquire the most precious knowledge on earth.


By reading or listening to stories of Shri Saibaba, one gets all that is required to become happy and content and achieve a long lasting peace. All doubts and fear vanish by putting faith in the discipline of repeatedly () reading these divine stories.

Company matters. To develop the habit of reading these stories the easiest way is to be in company of people who already have established for themselves a discipline of repeatedly reading these stories. The influence of such company is very beneficial and has a long lasting effect. However, to benefit from such company one has to curb the instincts of arguing and finding faults. Arguments end up in chaos and all involved in argument lose the peace of mind.

Sai Satcharit is not a usual book. It is a book that can transform life for the good. In fact it can be considered as literal incarnation of Shri Saibaba, Shri Saibaba himself in the form of a book. Elders are paid respect by offering them a high and comfortable seat. In the same way, after reading, Sai Satcharit should also be kept in good condition and at an appropriate place, usually by the side of idols of Gods.

Wednesday, April 4, 2012

Shri Hanuman Jayanti


("आपले सण - एक सुलभ संकल्पना" - वेदमूर्ती विनायक वासुदेव भातखंडे व विलास मोरेश्वर कर्णिक, एम. ए, ह्यांच्या पुस्तकातून) 

संपूर्ण भारत वर्षात, विशेष करून, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर भारत, बिहार आणि संपूर्ण काशीखंड येथे अत्यंत भक्तीभावाने उपासना केले जाणारे एक प्रमुख दैवत म्हणजेच श्री हनुमान होय. शक्ती, भक्ती, युक्ती, ज्ञान, सेवाभाव हे ज्याच्यामध्ये एकवटले आहेत, असे हे एकमेव दैवत आहे. प्रत्यक्ष शनिदेव सुद्धा ज्याला वचकून आहेत, असा हा पराक्रमी व अखंड ब्रह्मचारी देव, त्याचा जन्मदिवस म्हणजेच हनुमान जयंती सर्वत्र उत्साहाने साजरी केली जाते. 

केव्हा?

चैत्र शुद्ध पौर्णिमेला हा उत्सव असतो व इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये येतो. ही पौर्णिमा सूर्योदयव्यापिनी असते. म्हणजेच सूर्योदयाचे वेळेस पौर्णिमेचे अस्तित्व असावयास लागते. याचे कारण म्हणजे जन्म होताच, हनुमानाच्या उत्पत्ती काळीच, तो सूर्याला फळ समजून त्याच्यावर झेपावतो, हे आहे.  

काय करावे? 

चैत्र शुद्ध पौर्णिमेला ब्राह्ममुहूर्तावर म्हणजेच पाहते साडेचार वाजल्यापासून मारुती मंदिरामध्ये हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. प्रवचनकार प्रवचन रूपाने अथवा किर्तनकार किर्तन रूपाने मारुती जन्माची कथा सांगतात. सूर्योदयाला किर्तन संपवून मारुतीचा जन्मोत्सव साजरा करतात.

मारुतीला तिळाच्या तेलाचा अभिषेक करून, रुईच्या पानांच्या माळा घालतात. उपस्थित भक्त गणांना सुंठवडा, खोबरे व साखर ह्याचा प्रसाद दिला जातो. हनुमानाला हरभरा प्रिय आहे व म्हणूनच दुपारी दाखविण्याच्या महानैवेद्यात भाजणीचा वडा असावयास लागतो. किंबहुना कच्च्या भाजणीच्या वड्याचा नैवेद्य सुद्धा चालतो. संपूर्ण दिवसभर भजने वगैरे धार्मिक कार्यक्रम चालूच रहातात. 

ज्यांचे कुलदैवत हनुमान आहे, त्यांच्या घरी हनुमान जयंती उत्साहाने साजरी केली जाते. सर्वसाधारणपणे रुद्र करून, हनुमानाला अभिषेक करून, पंचोपचाराने पूजा केली जाते. हनुमानास अशोकाचे फुल तसेच दवणा हे प्रिय आहेत. (पौर्णिमेला दवणा वहावा, अशी वहिवाटपण आहेच) हनुमान हा शिवस्वरूप असल्यामुळे अभिषेकापुर्वी रुद्र सांगितला जातो. हनुमान ज्याचे कुलदैवत आहे, त्यांचे घरी पाषाणाची मूर्ती असते. तिला शेंदूर तेलामध्ये कालवून त्याचे लेपन करतात. मंदिराप्रमाणे नैवेद्य व महानैवेद्य दाखविला जातो. 

हनुमानदर्शनाविषयी कथा


हनुमानाचे दर्शन करावयाची एक विशिष्ट पद्धत नमूद करण्यासारखी आहे. त्याचे दर्शन घेताना सर्वप्रथम त्याच्या डाव्या पायावर दृष्टी टाकल्यास भक्तांचे संकट निवारण तो त्वरित करतो, अशी श्रद्धा आहे व त्या विषयीची कथा अशी - 


अहीरावण व महीरावण  या असुरांनी देवीला बळी देण्यासाठी राम व लक्ष्मण यांना कैद केले. ज्या देवळात त्यांना बळी देणार होते त्या जागेविषयीचे ज्ञान हनुमानास झाले. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळेच हनुमानास लहान-मोठे रूप धारण करण्याची शक्ती प्राप्त होती. त्याप्रमाणे सूक्ष्म रूप धारण करून, हनुमान देवीच्या मागे जाऊन बसले. सर्व प्रथम हनुमानाने देवीचा विरोध मोडून काढला. त्यानंतर अहीरावण व महीरावण यांना देवळाच्या गाभाऱ्यात पाचारण करून त्यांचा वध केला. नंतर रामचंद्र व लक्ष्मण यांना पाठविण्याची राक्षसांना विनंती केली. ते आत येताच, रामाला उजव्या खांद्यावर व लक्ष्मणाला डाव्या खांद्यावर बसवून व डावा पुढे टाकून मारुतीने उड्डाण केले. उजव्या खांद्यावर बसलेल्या रामाची नजर हनुमानाच्या डाव्या पायावर प्रथम पडली व रामाने त्याला वर दिला की, जो कोणी तुझ्या डाव्या पायाचे दर्शन घेईल, त्यांचे संकट निवारण होईल.

फलप्राप्ती 

विद्वान, शक्तिशाली, महापराक्रमी, सेवाधर्मी अशा हनुमानाचे पूजन केल्यास, तेच गुण भक्तास प्राप्त होऊ शकतात. संकटग्रस्त भक्तांनी, संकटमुक्त होण्यासाठी रात्री ११.३० ते १२.३० या वेळेस हनुमानचालीसा किंवा रामदासस्वामीविरचित हनुमानस्तोत्र अकरा दिवस अकरा वेळा म्हणावे. रामदास स्वामींनी सुद्धा शक्ती प्राप्त व्हावी, म्हणून अकरा मारुतींची स्थापना केली, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

Wednesday, March 28, 2012

Festival of Ramnavami

("आपले सण - एक सुलभ संकल्पना" - वेदमूर्ती विनायक वासुदेव भातखंडे व विलास मोरेश्वर कर्णिक, एम. ए, ह्यांच्या पुस्तकातून)

जेव्हा-जेव्हा पृथ्वीवर अधर्म थैमान घालतो, तेव्हा-तेव्हा दुष्टांचे पारिपत्य करण्यासाठी श्री विष्णु स्वतः पृथ्वीवर अवतरतात. श्री विष्णूंच्या दहा अवतारांपैकी एक अवतार म्हणजे रघुकुलोत्पन्न श्री रामचंद्र हे होत. त्यांचा जन्म ज्या दिवशी झाला, तोच रामनवमी सोहळा होय.

वाचकांनी हे लक्षात घ्यावे की श्री विष्णुंचा एक अवतार शिल्लक असून तो 'कलंकी' या नावाने योग्य काळी पृथ्वीवर अवतीर्ण होणार आहे. ज्या दिवशी कलंकी अवतार घेतला जाईल, तो दिवस शुद्ध षष्ठी असेल, असे पुराणात सांगितले आहे. जन्मकाळ सायंकाळी असेल.

केव्हा?

रामनवमी म्हणजेच रामजन्म सोहळा चैत्र शुद्ध नवमी या दिवशी होतो. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे मार्च महिन्याअखेर अथवा एप्रिल महिन्याच्या सुरवातीला हा सण येतो.

काय करतात?

रामजन्म सोहळा हा सर्वसाधारणपणे रामाच्या देवळात साजरा केला जातो. एक पाळणा हार-फुले इत्यादींनी सजवून ठेवतात. रामनवमीला सकाळपासून रामजन्मावर कीर्तन केले जाते. हे कीर्तन दुपारी बारा वाजण्याचे आत पूर्ण केले जाते; कारण रामाचा जन्म दुपारी बरोबर बारा वाजता होतो.

बारा वाजण्याचे सुमारास रामाच्या उत्सव मूर्तीस सुवासिक पाण्याने स्नान घालून वस्त्रालंकाराने सजवून बरोबर बारा वाजता पाळण्यात घातले जाते व उपस्थित भक्तगण जन्मोत्सव साजरा करतात. रामाला तुळस व दवणा हे फार प्रिय आहेत. स्त्रिया पाळण्याला झोके देऊन गोड स्वरात पाळण्याची गाणी म्हणतात. त्या दिवशी उपवास करावयाचा असतो.

रामजन्मानंतर विशेष प्रसाद म्हणून सुंठवडा देतात व सायंकाळी कलिंगड व पन्हे देऊन रामजन्म उत्सव साजरा करतात.

अयोध्येला चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामाच्या देवळात कीर्तने चालू होतात व ती रामनवमीपर्यंत चालतात. काही ठिकाणी संपूर्ण रामायणाचे वाचन केले जाते.

रामजन्मानंतर अयोध्येत दहा-दहा मिनिटांच्या अंतराने अनुक्रमे लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे पुत्र सुद्धा दशरथास प्राप्त झाले.

ज्या घराण्याचे कुलदैवत रामचंद्र आहे, त्यांच्या स्वतःच्या घरी देवळाप्रमाणेच उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. 

शिर्डीला श्री साईबाबांनी सुरु केलेला रामनवमी उत्सव आजतागायत नित्यनेमाने चालू आहे.

का करावे?

हिंदू धर्मामध्ये राम हा एकवचनी, संयमी व मर्यादा पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. पराक्रमाबरोबरच प्रेम, भक्ती, विश्वास ह्याचे पण तो प्रतिक आहे. राम जन्माच्या निमित्ताने रामाच्या सर्व गुणांची आपल्याला जाणीव होऊन, त्याच्या सारखे होण्याची प्रेरणा मिळते.

Friday, March 23, 2012

Festival of Gudhi Padava

("आपले सण - एक सुलभ संकल्पना" - वेदमूर्ती विनायक वासुदेव भातखंडे व विलास मोरेश्वर कर्णिक, एम. ए, ह्यांच्या पुस्तकातून)

हिंदू दिनदर्शिकेतील पहिला सण म्हणजेच गुढी पाडवा. हिंदू धर्मातील जे साडेतीन मुहूर्त सांगितले आहेत, त्यातील पहिला पूर्ण मुहूर्त गुढी पाडवा हा होय.

केव्हा ?

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सर्वसाधारणपणे मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा अथवा एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा.

काय करावे ?

चैत्र शुद्ध प्रतिपदेला अरुणोदय व सूर्योदय ह्यांच्या मध्ये म्हणजेच सकाळी ५.४५ ते सुर्योदयामधील काळांत गुढी उभारावयाची असते. गुढी उभी करणाऱ्या पुरुषांनी मंगलस्नान करून नित्य नैमित्तिक पूजा आदि कार्ये आटोपून गुढी उभारण्याचे कार्य करावे.

घराच्या पुढील दारात रांगोळी काढून त्यावर चौरंग अथवा पाट ठेवून त्यावर गुढी उभारावी. हल्ली मात्र जागेच्या अभावी लोक गैलरीत अथवा घराच्या दर्शनी विभागात गुढी उभारतात.

गुढीसाठी वेळू (हिरवा बांबू), कलश, गंध, अक्षता, पुष्प, हळद, कुंकू, सुशोभित कापड, पुष्पमाला, कडूनिंबाची डहाळी हे साहित्य लागते. वेळूवर ठेवण्याचा कलश कुंकवाने अलंकृत करून घ्यावा. कलशामध्ये कापड, कडूनिंबाची डहाळी, पुष्पमाला हे घट्ट बसवून वेळू पाटावर अथवा चौरंगावर उभा करावा. आधार देण्यासाठी सुतळीने तो वेळू खांबाला अथवा योग्य त्या आधाराला बांधावा. कलश हा उपडा असतो, हे लक्षात घेऊन वाऱ्याने अथवा कोणत्याही धक्क्याने पडू नये, म्हणून वेळूला व्यवस्थित बांधावा.

त्यानंतर गुढीची पंचोपचार पूजा करून, उदबत्ती-निरांजन दाखवून दुध-साखरेचा नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे अमृतवृक्षाची म्हणजेच कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन हिंग, जिरे, मीठ, गूळ, मिरे, डाळ हे एकत्र वाटून त्याचे चूर्ण घरातील प्रत्येकाने अनशापोटी भक्षण करावे. ह्याच दिवशी हिंदू धर्माचे नवे संवत्सर सुरु होत असल्याने पंचांगाचीही पंचोपचार पूजा करून पंचांगात सांगितलेले संवत्सर फळ वाचावे अथवा श्रवण करावे.

गुढीच्या महानैवेद्यासाठी वरण-पुरण अथवा पक्वान्नाचे भोजन तयार करावे. हा नैवेद्य दुसरा प्रहर संपल्यावर व तिसऱ्या प्रहराचे सुरुवातीला म्हणजेच १२.०० ते १२.३० च्या दरम्यान दाखवावा. सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवावी. गुढीला सूर्यास्त दिसू देऊ नये. गुढी उतरवताना अक्षता वाहण्याची आवश्यकता नाही. गुढी हा फक्त ब्रह्मदंड आहे, देव नाही, म्हणून गुढीची प्राणप्रतिष्ठा अथवा विसर्जन नसते.

लग्न व मुंज वर्ज्य करता, बाकी कोणत्याही शुभकार्यास गुढी पाडवा हा योग्य मुहूर्त समजला जातो. त्यामुळेच ह्या दिवशी काही न काही खरेदी करण्याची (शक्यतो जमीन-जुमला, सोने, चांदी वगैरे) प्रथा आहे. विवाह नक्की करणे, पत्रिका छापावयास देणे, अशी शुभ कार्ये सुद्धा ह्या दिवशी मुद्दाम केली जातात. तसेच नवविवाहित दाम्पत्याला बोलावून, वराचे श्वशुर दाम्पत्याला योग्य अशी वस्तू देऊन त्यांचा आदराने मान राखतात. 

का?

गुढी पाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का? तर ह्या तिथीला ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करून ब्रह्मदंड उभा केला. ब्रह्मदंड वेळूचा असणे, ह्यामागे सुद्धा कारण मीमांसा आहे. ती म्हणजे वंशवृद्धी (बांबूचा डोळा हा हमखास रुजतोच), खंबीरपणा (बांबू न झुकता उभा असतो) व एकत्र समूहाने जीवन व्यतीत करण्याचे बांबू (बांबूचे बेटवन असते) प्रतिक आहे. ह्याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवासातून अयोध्येला परत येण्याची योजना ब्रह्मदेवाच्या संमतीने केली. त्या दिवसाचा उत्सव म्हणून गुढी उभारून सृष्टीनिर्मात्याला अभिवादन करावे.

हे केल्याचे फळ

गुढी उभारणे तसेच संवत्सर फळ वाचल्याचे फलित म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन वद्य अमावस्येपर्यंत म्हणजेच संपूर्ण वर्ष सुख, समाधान, समृद्धी, शांती, कीर्ती, विजय, आनंद, धनधान्य, पुत्र-पौत्र इत्यादी प्राप्त होतात.