पंचारण्य स्थळांमधील हे दुसरं मंदिर आहे. पाडळ पेथ्र म्हणजेच ६३ नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ शिव मंदिरांपैकी पण एक आहे. तामिळनाडूमधल्या पापनाशम तालुक्यामधल्या अवलिवनल्लूर ह्या गावांत स्थित आहे.
मुलवर: श्री साक्षीनाथर
देवी: श्री सौंदर्यनायकी
विशेष देवता: श्री मुरुगन
स्थळ वृक्ष: पीत कर्णफूल
तीर्थ: चंद्र पुष्करिणी
दर्शनाची वेळ: सकाळ
क्षेत्र पुराण:
इथल्या मंदिराचे पुजारी श्री विष्णुशर्मा एकदा आपल्या सुशीला नावाच्या तरुणी पत्नीला घरी ठेऊन काशी यात्रेला गेले. त्यांच्या यात्रेच्या काळामध्ये त्यांची पत्नी आजारी पडली. तिच्या शुश्रुषेसाठी तिची बहीण आली जी दिसायला तिच्या सारखीच होती. श्री विष्णुशर्मा जेव्हा यात्रेहून परत आले तेव्हा त्यांना आपल्या घरी दोन स्त्रिया दिसल्या. एक कुरूप होती तर दुसरी सुंदर होती. कुरुप होती ती सुशीला होती जी आजारपणामुळे कुरूप झाली होती. आणि सुंदर होती ती सुशीलेची बहीण होती. श्री विष्णुशर्मा आपल्या पत्नीच्या आजाराबद्दल माहिती नसल्यामुळे ते सुंदर स्त्रीला म्हणजेच सुशीलेच्या बहिणीला आपली पत्नी आहे असे समजू लागले. सुशीलेनी भगवान शिवाची प्रार्थना केली. भगवान शिव आपली पत्नी श्री पार्वतीसह तिच्या मदतीस आले. त्यांनी श्री विष्णुशर्माला कुरूप असलेली सुशीलाच त्यांची पत्नी आहे हे पटवून दिलं. भगवान शिव इथे साक्षीदार म्हणून प्रकट झाले म्हणून त्यांचं श्री साक्षीनाथर असं नाव प्रसिद्ध झालं.
गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाच्या मागील बाजूस एका पटलावर भगवान शिव आणि श्री पार्वती वृषभावर आरूढ आहेत असं चित्रित केलं आहे. श्री विष्णूशर्मांना सुशीला हीच त्यांची पत्नी आहे हि साक्ष पटवण्यासाठी ते भगवान शिव आणि श्री पार्वती ह्याच रूपात आले.
ज्यांनी इथे आराधना केली त्यांची नावे:
श्री वराह (भगवान विष्णू), अगस्त्य ऋषी, कण्व ऋषी, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री मुरुगन.
भगवान विष्णूंच्या वराह अवतारामध्ये जेव्हा त्यांचं शिंग त्यांनी गमावलं त्यावेळी त्यांनी भगवान शिवांची आराधना करून ते परत मिळवलं.
ह्या मंदिरातील मुर्त्या:
अगस्त्य मुनी, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म. येथील नवग्रह संनिधीमध्ये सर्व ग्रह सुर्याभिमुख आहेत.
मंदिरात साजरे होणारे सण:
थै (जानेवारी-फेब्रुवारी): अमावस्या पूजा
पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंदषष्ठी
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment