Thursday, January 17, 2019

नवग्रह मंदिरे - गुरु

गुरुग्रह मंदिराची माहिती:



मंदिराची माहिती:



मंदिराचे नांव: आपत्सहायर कोविल, आलंगुडी
स्थल देवता: श्री आपत्सहायर
देवीचे नांव: एलवरकुळाली किंवा उमायम्माई किंवा उमायअम्मन्  
ग्रहाचे नांव: गुरु
गणपती: कात्तविनायगर
गावाचे स्थान: आलंगुडी, तामिळनाडू ६१२८०१, भारत
ऐतिहासिक / पौराणिक नांव:  आपत्सहायर कोविल
मंदिरातल्या इतर देवता: १. रवी, २. सप्त लिंग, ३. मुरुगन्, ४. लक्ष्मी, ५. नवग्रह, ६. काळ भैरव आणि ७. गुरु दक्षिणामूर्ती (मुख्य देवता)


मंदिराकडे जाण्याचा मार्ग:

हे मंदिर कुंभकोणम च्या दक्षिणेकडे, कुंभकोणम ते नीडमंगलम मार्गावर आहे.


गुरु ग्रह मंदिराचा इतिहास:

पुराणांनुसार ह्या मंदिराच्या बाबतीत ३ कथा आहेत


१. एकदा पार्वती देवी फुलांच्या चेंडूबरोबर खेळत असताना तिनें चेंडू उंच उडवला आणि तो झेलण्यासाठी तिने आपले हात वरती केले. सूर्य देवाला वाटले की हा आपल्यासाठी थांबण्याचा संकेत आहे म्हणून तो थांबला. पण ह्याचा परिणाम असा झाला की पृथ्वीवरचं जीवन, जे सूर्याच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणावर अवलंबून आहे, ते विस्कळीत झालं. जेव्हां भगवान शंकरांना हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी पार्वतीदेवीला पृथ्वीवर जन्म घेण्यास सांगितले. असा समज आहे की पार्वती देवीने भगवान शंकरांना परत प्रसन्न करून त्यांच्याबरोबर विवाह करण्यासाठी तपश्चर्या केली. ह्या विवाहाच्या वेळेस सर्व देव उपस्थित होते. हे मंदिर स्वतः पार्वती देवीने निर्माण केले आहे असा समज आहे. ह्या स्थळाला पूर्वी काशीअरण्य असे म्हणत आणि म्हणूनच ह्या स्थळाला काशी इतकेच महत्व आहे.


२. देव आणि असुरांमधल्या सागर मंथनातून बाहेर आलेलं विष जेव्हां भगवान शंकरांनी प्यायलं तेव्हा पार्वतीदेवीने त्या विषाचा प्रवाह थांबविण्यासाठी त्यांच्या गळ्याभोवती आपल्या हाताने दाब दिला. असा समज आहे की हि घटना ह्या स्थळी झाली. म्हणून ह्या स्थळाला आलंगुडी (अलम् = तमिळ मध्ये विष आणि गुडी = तामिळ मध्ये पेय) असं नावं पडलं.


३. गजमुख नावाचा असुर होता जो देव आणि मानवांना खूप कष्ट देत होता. भगवान शंकरांनी आपल्या पुत्राला म्हणजेच गणपतीला गजमुखाला शिक्षा देण्यासाठी पाठवले. म्हणूनंच ह्या स्थळी गणपतीचे मंदिर आहे आणि इथल्या गणपतीला कात्त-विनायगर (कात्त = (रक्षणकर्ता) + विनायक (गणपती) + आकार) असे नांव आहे.


मंदिराच्या आवारात पुढील देवांची मंदिरे आहेत - १. रवि, २. सप्त लिंग, ३. मुरुगन्, ४. लक्ष्मी, ५. नवग्रह, ६. काळभैरव, ७. गुरु दक्षिणामूर्ती (मुख्य मंदिर). दक्षिणामूर्ती म्हणजेच गुरु. इथे गुरु ग्रहाचं वेगळं मंदिर नाही.

ह्या मंदिरामध्ये २८ तुपाचे दिवे लावले जातात. येथील पवित्र वृक्ष - पुलै (तामिळ), कपूर मधुरा


पुण्य तीर्थे: असा समज आहे की इथे १५ पवित्र तीर्थे होती. पण सध्या फक्त ९ तीर्थे मंदिराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये अस्तित्वात आहेत.


नवग्रहांना भेट देणारे यात्रिक बहुतेक वेळा स्वामीमलय (स्वामी - गुरु/देव, मलय - पर्वत) ह्याठिकाणी निवास करतात.


गुरु ग्रहाचे महत्व:

गुरु ग्रह प्रगती, शांती, आरोग्य प्रदान करतो. उच्च शिक्षण, बुद्धी, अध्यात्मिकता, दूरचा प्रवास ह्यांवर गुरु ग्रहाचा प्रभाव असतो. धनु आणि मीन राशींचा तो स्वामी आहे. कर्क राशीमध्ये तो उच्च स्थानी असतो तर मकर राशीमध्ये नीच स्थानी.

गुरु ग्रहदोषांपासून निवृत्ती:

गुरु महादशा १६ वर्षांची असते. गुरु ग्रहदोषांपांसून निवृत्तीचे काही उपाय - गुरुवारी उपवास; हळद, गूळ, मूग, फिकट पिवळ्या रंगाचे कपडे आणि तांबे ह्या गोष्टींचं गुरुवारी दान करावं. खाली दिलेल्या गुरु मंत्राचा गुरुवारी जप करावा.


गुरु ग्रहाची वैशिष्ठ्ये:



#
वैशिष्ठ्य
गुरु ग्रह
पत्नी
तारा
कपड्यांचा रंग
पीत (पिवळा) / सोनेरी  
लिंग
पुरुष
पंच महाभूतातील घटक
आकाश
देव
इंद्र / ब्रह्म
वाहन
हत्ती
अधिदेवता
दक्षिणामूर्ती
धातू
सोने
रत्न (खडा)
पुखराज
१०
अवयव
मेंदू
११
चव
गोड
१२
धान्य
चणे
१३
ऋतू
शिशिर
१४
ग्रहाच्या मुखाची दिशा
उत्तर
१५
पुष्प
मोगरा / जाई-जुई
१६
क्षेत्र वृक्ष
कपूर मधुरा / पुल्लै
१७
आठवड्यातला दिवस
गुरुवार
१८
ध्वनी


गुरु ग्रहाची रांगोळी:



गुरुची पूजा करताना काढावयाची रांगोळी:


गुरु ग्रहाचा श्लोक :



गुरु ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ह्या श्लोकाचा जप करावा


ध्यान श्लोक:
देवानां च ऋषीणां च गुरुं काञ्चनसन्निभम् |
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि ब्रुहस्पतिम् ||




No comments:

Post a Comment