मंगळ ग्रह मंदिराची माहिती:
मंदिराची माहिती:
मंदिराचे नांव: वैतीश्वरन कोविल [वैद (वैद्य) + ईश्वरन + कोविल (मन्दिर)]
स्थल देवता: श्री वैद्यनाथ
देवी: थैयल नायकी
गणपती: कर्पग विनायक
ग्रहाचे नांव: मंगळ (तमिळ मध्ये चेव्वाय)
गावाचे स्थान: वैतीश्वरन कोविल, तामिळनाडू ६०९११७, भारत
मंदिराकडे जाण्याचा मार्ग:
हे मंदिर शिरकाळी - मईलाडूदुराई महामार्गावर आहे.
वैतीश्वरन चा इतिहास:
पुराणातील कथांनुसार ह्या गावाचं मूळ नांव पुल्लीरुक्कुवेलूर (पुल्ल - जटायूचं एक नांव, इरुक्कु - ऋग्वेद, वेल - मुरुगन/कार्तिकेय स्वामी, उर - गाव) म्हणजे १) जिथे जटायूने सीतेला रावणाच्या तावडीतून सोडविण्यासाठी युद्ध केलं २) जिथे ब्रह्माने ऋग्वेद निर्माण केले आणि ३) जिथे वेलाची (म्हणजे मुरुगन देवाच्या शस्त्राची) पूजा होते.
असं मानलं जातं की सगळे वेद हे सुरुवातीला ब्राह्मण रूपात होते. ऋग्वेदाने या जागी तपश्चर्या करून दोषनिवारण केलं.
प्रभू श्रीरामांनी या जागी जटायूच्या देहाचं दहन करून त्याला मुक्ती दिली. जटायूने या जागी रावणाच्या तावडीतून सीतेला सोडवण्यासाठी त्याच्याबरोबर युद्ध केलं. या युद्धामध्ये जटायू गंभीररीत्या जखमी झाला. जेव्हा प्रभू श्रीराम सीतेच्या शोधात असताना ह्या जागी आले त्यावेळी जटायूने श्रीरामांना रावणाने सीतेला पळवून नेल्याची बातमी सांगितली आणि मग आपला प्राण सोडला.
या जागी मुरुगन स्वामींना (कार्तिकेय स्वामी) त्यांच्या मातेकडून म्हणजेच पार्वती मातेकडून सुरपद्मन राक्षसाचा वध करण्यासाठी वेल (भाला) शस्त्र म्हणून मिळालं. असा समज आहे की मुरुगन स्वामी आणि सुरपद्मन राक्षसाच्या युद्धामध्ये जे देव जखमी झाले त्यांना भगवान शंकरांनी बरं केलं आणि माता पार्वतींनी त्या देवांची सुश्रुषा केली. शंकर-पार्वतींनी इथे वैद्याची भूमिका केली म्हणून या जागेचं नाव वैदीश्वरन (वैतीश्वरन) असं प्रसिद्ध झालं.
असा समज आहे की ह्या ठिकाणी १८ कुंडं (पुण्य तीर्थ) होती. ह्यापैकी सध्या माहिती असलेली तीर्थे:
- सिद्ध अमृत तीर्थ - कामधेनूने निर्माण केलेलं पहिलं तीर्थ
- कोदंड तीर्थ - पुराणांनुसार प्रभू श्रीरामांनी लंकेच्या वाटेवर असताना ह्या ठिकाणी स्नान घेतलं होतं
- गौतम तीर्थ - गौतम मुनींनी निर्माण केलेलं तीर्थ
- बिल्वतीर्थ
मंगळ ग्रहाचा इतिहास:
पुराणांनुसार जेव्हा भगवान शंकर ध्यानामध्ये मग्न असतांना त्यांच्या तिसऱ्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब पृथ्वीवर पडला आणि त्याचं रूपांतर एका अतिशय सुंदर मुलामध्ये झालं. पृथ्वी मातेनी ह्या मुलाचं संगोपन केलं. खूप लहान वयात ह्या मुलाने तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न केलं. भगवान शंकरांनी त्याला दर्शन दिलं आणि त्याला ग्रह बनण्याचं वरदान दिलं. हाच तो मंगळ ग्रह.
मंगळ ग्रहाचे महत्व:
मंगळ ग्रह हा मेष आणि वृश्चिक राशींचा स्वामी आहे. मिथुन आणि कन्या राशींचा तो शत्रू आहे तर धनु आणि मीन राशींचा तो मित्र आहे. कुंडली मध्ये मंगळ ग्रहाचा प्रभाव खालील गोष्टींमध्ये दिसून येतो - भाऊ, जमीन, घर, शत्रूशी सामना करण्याचं धैर्य, युद्धामध्ये विजय, अग्नीमुळे होणारे आजार आणि ऋण.
मंगळ ग्रहाची महादशा ७ वर्ष चालते.
मंगळ ग्रहदोषांपासून निवृत्ती:
कुंडलीमध्ये मंगळ ग्रहदोष असेल (असे दोष असणाऱ्यांना मांगलिक असं पण म्हणलं जातं) त्यांनी
- लाल रंगाचे (रक्तवर्णी) कपडे परिधान करावेत.
- भातामध्ये तूर डाळीचं पीठ मिसळून त्याचा नैवेद्य दाखवावा आणि मग तो प्रसाद म्हणून वितरित करावा. पण भात शिजवलेला नसेल तर तो नैवेद्य दाखवू नये, तो दान करावा.
- कृत्तिका नक्षत्र असलेल्या दिवशी उपवास करून मंगळाला मीठ आणि काळी मिरी अर्पण करावी
मंगळ ग्रहाची वैशिष्ठ्ये:
#
|
वैशिष्ठ्य
|
मंगळ ग्रह
|
१
|
पत्नी
|
शक्ती देवी
|
२
|
कपड्यांचा रंग
|
लाल / किरमिजी
|
३
|
लिंग
|
पुरुष
|
४
|
पंच महाभूतातील घटक
|
अग्नि
|
५
|
देव
|
सुब्रमण्य
|
६
|
वाहन
|
नर शेळी
|
७
|
अधिदेवता
|
मुरुगन / कुमारन
|
८
|
धातू
|
पितळे / तांबा
|
९
|
रत्न (खडा)
|
लाल पोवळे
|
१०
|
अवयव
|
अस्थिमगज (मज्जा)
|
११
|
चव
|
पित्त
|
१२
|
धान्य
|
तूर डाळ
|
१३
|
ऋतू
|
ग्रीष्म
|
१४
|
ग्रहाच्या मुखाची दिशा
|
दक्षिण
|
१५
|
पुष्प
|
चंपा / चाफा
|
१६
|
क्षेत्र वृक्ष
|
बाभूळ
|
१७
|
आठवड्यातला दिवस
|
मंगळवार
|
१८
|
ध्वनी
|
रे
|
मंगळ ग्रहाची रांगोळी:
मंगळाची पूजा करताना काढावयाची रांगोळी:
मंगळ ग्रहाचा श्लोक :
मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ह्या श्लोकाचा जप करावा
ध्यान श्लोक:
धरणीगर्भसंभूतं विद्युत्कान्तिसमप्रभम् |
कुमारं शक्तिहस्तं तं मङ्गलं प्रणमाम्यहम् ||
No comments:
Post a Comment