आपल्या संस्थेचे ट्रस्टी श्रीयुत धनंजय गोगटे ह्यांच्या पत्नी सौ. उत्तरा धनंजय गोगटे ह्यांनी नवरात्री निमित्ताने लिहिलेला जगन्मातेच्या विविध रुपांची माहिती देणाऱ्या लेखमालेतील हा पहिला लेख.
"नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव" - सौ. उत्तरा धनंजय गोगटे
दुर्गेची तीन मुख्य रूपे महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी ह्यांच्या महापूजेचा उत्सव. हिंदू धर्मातील सर्वच शाखांमधे कुठल्या ना कुठल्या प्रकारात ह्या शक्तीरुपाची उपासना आढळते.
देवी पार्वतीने दुष्टांचा संहार करण्यासाठी विविध दुर्गारुपे धारण केली. देवी भागवत ह्या ग्रंथात समग्र देवीचरित्र संग्रहीत केले आहे.
देवी पार्वतीचे वर्णन अल्लड बालिका, ध्येयासक्त प्रेमिका, परिपूर्ण, संयत, कुटुंबवत्सल ग्रुहिणी, पत्नी, माता आणि अंतिमतः संपूर्ण शक्तीरुप अश्या विविधरुपात आले आहे.
दुष्टशक्तींपुढे इतर सर्व देवता निष्प्रभ ठरल्यावर आणि सर्व सामान्यांप्रमाणे त्यांची त्राही माम् ही स्थिती आल्यावर ही कोमलांगी आपले शांतरुप झुगारून कठोर दुर्गारूप धारण करते. घरादाराला सम्रुद्धी आणणारी ही अष्टलक्ष्मी त्यासाठी नवदुर्गारूप धारण करते. हाती शस्त्र घेत सतत अविश्रांत लढून असूरांचा समूळ नाश करूनच थांबते.
दुष्टांचे निर्दालन करताना सहनशीलता सोडून, हाती शस्त्र धरावे आणि हार न स्विकारता सर्व शक्तीनिशी प्रतिकार करावा आणि त्यांचे निर्दालन करावे हीच शिकवण आई जगदंबा आपल्याला देत आहे. आई अंबाबाई आपणासही शक्ती प्रदान करो ही प्रार्थना.
नवरात्रीच्या निमित्ताने आईच्या विविध रूपांची माहिती करुन देण्याचा हा एक प्रयत्न.
१. शैलपुत्री
वन्दे वान्छीतलाभाय चन्द्रार्धक्रुतशेखराम्।
व्रुषारुढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्।।
आई जगदंबेच पहिलं दुर्गारूप आहे - शैलपुत्री.
व्रुषभावर आरुढ, एका हातात त्रिशूल आणि दुसर्या हातात कमळ धारण केलेल्या रुपातील हीचे वर्णन मनोवान्छीत फळ देणारी असे आहे.
हिमालयाची कन्या म्हणून हिचा अवतार असल्याने नाव आहे शैलपुत्री. पती श्रीशंकराचा पित्रुग्रुही झालेला अवमान सहन न होवून सतीने योगाग्नीद्वारे देहत्याग केला. आणि पुढील जन्मी हिमालयाच्या घरी जन्म घेतला. ह्या जन्मीसुद्धाघोर तप करून पती म्हणून श्रीशंकराची प्राप्ती करून घेतली. अतिशय भावूक पण मानी, कोमल पण कठोर, ईप्सित सिद्धीसाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देणारी ही शैलपुत्री.
नवरात्रीच्या उपासनेला शैलपुत्रीच्या पूजनाने प्रारंभ होतो. या उपासनेत योगी मूलाधार चक्रावर मनाला स्थित करून त्यांच्या योगसाधनेस प्रारंभ करतात. शैलपुत्रीक्रुपेने आपणा सर्वांचे मनोवांछीत साध्य होवो हीच आई जगदंबेकडे प्रार्थना.
२. ब्रम्हचारिणी
दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलू ।
देवी प्रसिदतु मयि ब्रम्हचारिण्यनुत्तमा।।
आई दुर्गेच दुसरं रूप आहे ब्रम्हचारिणी. ब्रम्ह शब्दाचा अर्थ आहे - तप. तपाचरण करणारी - ब्रम्हचारिणी।
"वेदस्तत्वं तपो ब्रम्ह" अस म्हटलच आहे. वेद, तत्व आणि तप म्हणजे ब्रम्ह.
देवीच्या उजव्या हाती जपमाळ आणि डाव्या हाती कमण्डलु आहे. श्री शंकर पती हेच लाभावे म्हणून पार्वतीदेवीने कित्येक हजार वर्षे कठोर तप केले. असे तप कुणालाही कधीही शक्य झाले नाही. अभूतपूर्वच असे हे पुण्यकृत्य केवळ देवीलाच शक्य झाले.
देवीचे हे रूप भक्तांना आणि साधकांना अनन्त फळे देणारे आहे. हिच्या उपासनेमुळे तप, त्याग, वैराग्य , सदाचार आणि संयमाची व्रुद्धी होते.
नवरात्रातील दुसर्या दिवशी हिचे पूजन होते. साधकाचे मन स्वाधिष्टान चक्रावर स्थीत असते. ज्यायोगे आपल्याला क्रुपा आणि भक्ती प्राप्त करता येते.
आई ब्रम्हचारिणी क्रुपेने जीवनातील कठीण क्षणांतही विचलीत न होण्याचे धारिष्ट्य आणि मन कर्तव्य मार्गावरच एकाग्र करण्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होवो हीच प्रार्थना.
३. देवी चन्द्रघण्टा
पिण्डजप्रवरारूढा चन्दकोपास्त्रकैर्युता।
प्रसादं तनुते मह्यम् चन्द्रघण्टेति विश्रुता॥
मस्तकावर अर्धचन्द्र धारण करणारी आणि घण्टानाद करीत आगमन करणारी ती चन्द्रघण्टा। सुवर्णकांती असलेली, दशभूजा आणि दहाही हात विविध अस्त्रांनी विभूषित असणारी माता चन्द्रघण्टा हिचे वाहन आहे सिंह आणि मुद्रा युध्दाला तयार असलेली तरीही सौम्य अशी आहे.
नवरात्रीच्या तिसर्या दिवशी हिची उपासना होते आणि साधक आपले मन मणिपूर चक्रावर एकाग्र करतात. युध्दासाठी तत्पर असणारी ही चन्द्रघण्टा भक्तांचे मनोरथही शिघ्रतेने पुरवते. देवीचे हे रूप भक्तांना कायम निर्भयता आणि शौर्य प्रदान करते.
चन्द्रघण्टा देवी सदैव युद्धासाठी सज्ज आहे. दुष्टशक्तींना घंटानाद करत युध्दासाठी ललकारते आहे. पण तरीही हे रुप भितीदायक मात्र नाही. सौम्य आणि प्रसन्न देवीरूप भक्तांमधे निर्भयता आणि शौर्याबरोबरच विनम्रता आणि सात्विकतेचा विकास करते.
काया, वाचा आणि मनोभावे शुध्द होवून देवीची संपूर्ण शरणागत होत उपासना करावी. असे चन्द्रघण्टेचे भक्त जिथे जातील तिथे लोक सुख आणि पावित्र्याचा अनुभव घेतात. विनम्रता आणि सात्विकता ही भक्तांची कमजोरी नाही तर धैर्य आणि शौर्यामुळे प्राप्त झालेला देवीचा क्रुपाप्रसादच नव्हे का?
अशी चन्द्रघण्टा देवी आपणा सर्वांसाठी परमकल्याणकारी होवो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना।

No comments:
Post a Comment