Saturday, October 13, 2018

नवरात्रीमधले कुमारीकापूजन

दुर्गादेवीच्या आराधनांमध्ये नवरात्रीमधील आराधनेला विशेष महत्व आहे. ह्या आराधने मध्ये दोन महत्वाच्या पूजा आहेत - कुमारीका पूजन आणि सुवासिनी पूजन.

अंबिकेची कृपा प्राप्त होण्यासाठी बाला त्रिपुरसुंदरीची उपासना श्रेष्ठ मानली जाते. हे तात्पर्य आपल्याला ललितासहस्रनामामधील पुढील ओवीमुळे कळते.

“भण्डपुत्र वधोद्युक्त बालाविक्रमनन्दिता” - बाला ही ललितादेवीची पुत्री. आपल्या आईने खूप थांबवण्याचा करून पण ९ वर्षाच्या बाला त्रिपुरसुंदरीने युद्धभूमीवर जाऊन भंडासुराच्या सर्व पुत्रांचा नाश केला. म्हणूनच अशा ह्या पराक्रमी पुत्रीचे पूजन केले जाते.

नवरात्रीमध्ये आपल्या ऐपतीनुसार ९ दिवसांत ९ कुमारिकांचे पूजन केले जाते. कुमारिकांचं वय २ ते १० मध्ये असायला हवं.

कुमारीकापूजनाचा विधी:

मंगलस्नान
प्रथम कुमारीकेला आसनावरती (पीठावरती) बसवून प्रथम तिला मंगल स्नान घालावे.
वस्त्रार्पण
नंतर तिला नवीन वस्त्र परिधान करून, अलंकार करून, अलंकारांनीं सुशोभित केलेल्या पाटावर बसवावे
पुष्पाभिषेक
नंतर कुमारीकेला पुष्पाभिषेक करावा

अभिषेक मंत्र
ॐ क्लीं कुलकुमारीकायै नमः पाद्यं समर्पयामि - पायावर पाणि वहायचं
ॐ क्लीं कुलकुमारीकायै नमः अर्घ्यं समर्पयामि - हातावर पाणि वहायचं
ॐ क्लीं कुलकुमारीकायै नमः अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि  - हातावर तीन वेळा पाणि वहायचं
ॐ क्लीं कुलकुमारीकायै नमः वस्त्रं समर्पयामि - नवीन वस्त्र अर्पण करावीत
ॐ क्लीं कुलकुमारीकायै नमः गन्धं समर्पयामि - गन्ध लावायचं
ॐ क्लीं कुलकुमारीकायै नमः भूषणादि समर्पयामि - अलङ्कार अर्पण करायचे
ॐ क्लीं कुलकुमारीकायै नमः पुष्पाणि समर्पयामि - पुष्प अर्पण करायचं

षोडशोपचार

*प्रत्येक दिवशी त्या त्या देवीचा मंत्र म्हणावा

दिवस १) ॐ शैलपुत्र्यै नमः
दिवस २) ॐ ब्रह्मचारिण्यै नमः
दिवस ३) ॐ चन्द्रघण्टायै नमः
दिवस ४) ॐ कुष्माण्ड्यै नमः
दिवस ५) ॐ स्कन्दमात्रे नमः
दिवस ६) ॐ कात्यायन्यै नमः
दिवस ७) ॐ कालरात्र्यै नमः
दिवस ८) ॐ महागौर्यै नमः
दिवस ९) ॐ सिद्धिदात्र्यै नमः  
नंतर कुमारीकेचं षोडशोपचारांनी पूजन करावं. डावीकडल्या रकान्यामधील सूचनेनुसार प्रत्येक दिवशी त्या त्या दिवशीच्या देवीचे मंत्र म्हणावेत. उदाहरणार्थ पहिल्या दिवशी सर्व उपचार प्रत्येक उपचाराच्या सुरुवातीला ॐ शैलपुत्र्यै नमः जोडून करावेत. तसेच दुसऱ्या दिवशी सर्व उपचार ॐ ब्रह्मचारिण्यै नमः मंत्र जोडून करावेत.

षोडशोपचार:
ॐ शैलपुत्र्यै* नमः ध्यायामी - कुमारीकेमध्ये शैलपुत्रीचे ध्यान करावे

ॐ शैलपुत्र्यै नमः आवाहयामि - कुमारीकेमध्ये शैलपुत्रीचे आवाहन करावे
ॐ शैलपुत्र्यै नमः आसनं समर्पयामि - कुमारीकेला आसनावर बसवावे
ॐ शैलपुत्र्यै नमः पाद्यं समर्पयामि - कुमारीकेचे पाय धुवावेत
ॐ शैलपुत्र्यै नमः अर्घ्यं समर्पयामि - कुमारीकेच्या हातावर पाणी वहावं
ॐ शैलपुत्र्यै नमः स्नानं समर्पयामि - कुमारीकेला स्नान घालावं

ॐ शैलपुत्र्यै नमः स्नानानन्तरं आचमनीयं समर्पयामि - कुमारीकेला तीन वेळा पाणी अर्पण करावं

ॐ शैलपुत्र्यै नमः गन्धं धारयामि - कुमारीकेला गंध लावावं

ॐ शैलपुत्र्यै नमः हरिद्रा कुंकुमं समर्पयामि - कुमारीकेला हळद कुंकुम लावावं

ॐ शैलपुत्र्यै नमः वस्त्रं समर्पयामि - कुमारीकेला वस्त्र अर्पण करावं
 
ॐ शैलपुत्र्यै नमः पुष्पमालां समर्पयामि - कुमारीकेला पुष्पांचा हार अर्पण करावा

ह्यानंतर खाली दिलेल्या प्रत्येक नावांनी पुष्पार्चन करावं (पुष्प वहावं)

ॐ क्लीं कौमार्यै नमः
ॐ क्लीं त्रिपुरार्यै नमः
ॐ क्लीं कल्याण्यै नमः
ॐ रोहिण्यै नमः
ॐ कामिन्यै नमः
ॐ चण्डिकायै नमः
ॐ शाङ्कर्यै नमः
ॐ दुर्गायै नमः
ॐ सुभद्रायै नमः

ह्यानंतर उर्वरित उपचार म्हणजे धुप, दीप, नैवेद्य करावेत

ॐ शैलपुत्र्यै नमः धूपं समर्पयामि - कुमारीकेवरून अगरबत्ती ओवाळावी

ॐ शैलपुत्र्यै नमः दीपं समर्पयामि - कुमारीकेवरून निरांजन ओवाळावे
ॐ शैलपुत्र्यै नमः नैवेद्यं समर्पयामि - कुमारीकेला जेवण घालावं


जेवण झाल्यावर कुमारीकेवरून आरती ओवाळावी

पूजा समाप्त करताना ॐ तत् सत् ब्रह्मार्पणमस्तु म्हणून पाणि ताम्हणात सोडावे.


ही पूजा पद्धत दक्षिणेकडे प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकेमधील लेखावर आधारित आहे. नियतकालिकाचे नाव “ज्ञानआलयं” म्हणजे ज्ञानाचे देऊळ (ऑक्टोबर १९९९).   

No comments:

Post a Comment