Thursday, November 28, 2024

Shri Valeeshwarar Temple at Mylapore Chennai

This is the fifth of Sapta Sthana temples around Mylapore. It is located near Karaneeshwarar temple. According to the stone inscriptions in the temple, the present structure is more than 2000 years old. 

Mulavar: Shri Valeeshwarar
Devi: Shri Periyanayaki

Kshetra Purana:

According to Purana, Sage Govardhana had installed the shiva linga at this place.

According to purana, in the tretayuga, King of Vanara named Vali worshiped Lord Shiva at this place. He received a boon from Lord Shiva by which he could acquire 50% of the strength of his opponent when he fought with his enemies. Hence Lord Shiva is praised as Valeeshwarar.

Lord Hanuman had lost the awareness of his strength due to a curse. He worshiped Lord Shiva at this place and got the awareness back.

Those who worshiped here: Sage Gautama, Vali, Hanuman, Siddha, and Sage Govardhana

Special features:

Shiva Linga is believed to be an implied form of Lord Muruga. Hence the shiva linga is also addressed as Dandatheeshwarar. 

The upper portion of the Gopuram resembles that of Kashi temple. 

Lord Ganesha in this temple is known as Avuduyar Ganapati as he is seated on Avuduyar. It implies that he is seating on the lap of Lord Shiva. Hence he is also praised as Shiva Bala Ganapati. 

Lord Shanmukha is praised as Lord Shiva Subramanya. Hence it is obvious that Lord Shiva is present all over the temple at this place. 

Any temple built on a siddha samadhi or peetha is believed to have unique spiritual vibrations around the place. It is believed that it is present in this temple also.


About the Temple:

The temple was constructed during the Chola period. This is an east facing temple. There is no Rajagopuram. The shiva linga is in an east facing sanctum. In the artha mandap we come across an idol of Vali with folded hands worshiping Lord Shiva. Koshta murtis are Nardana Vinayakar, Lord Dakshinamurti, Lord Lingodbhavar, Lord Brahma and Goddess Durga. At the entrance of the sanctum on either side we have idols of Lord Ganesha, Lord Muruga praised as Palani Murugan. There is no dhawajastambha but we come across Balipeeth and Nandi facing the sanctum. Ambika is housed in a separate shrine in the Maha Mandap facing south. Her idol is small. At the entrance of this shrine also we have the idols of Lord Muruga and Lord Vinayakar at the entrance. There is also another Nandi in the Mahamandap. There is a shrine housing Pancha linga. It is believed that under these lingas there is a Jeeva samadhi of a Siddha. It is believed that these lingas came out of the earth. Stucco images of twenty two Siddhas are found on the vimanam which is constructed in the north Indian style. In the outer prakara we have the shrines and the idols of Lord Ganesha, Lord Natarajar with Goddess Shivagami, Lord Chandikeshwarar, Lord Vishnu, Goddess Durga, Lord Subramanya with Lord Ayyapa, Saint Arunagirinathar, Lord Shanishwarar, Navagrahas on their mounts, Lord Veerabhadrar, Lord Bhairavar, Shaiva saints Nalavar, Lord Surya, Lord Chandra and Lord Hanuman. In the outer prakaram a lizard is carved on the wall which indicates it is the parihar sthala. 


Prayers:

Devotees worship here for wisdom, intelligence, and atonement for sins committed knowingly or unknowingly.

Women pray for safe child birth and welfare of children.

Devotees believe that worshiping Lord Valeeshwarar gives mental and physical strength.

Timing: 6.30 am to 11 am, 4.30 pm to 8.30 pm

Address: Shri Valeeshwarar temple, G.N. street, Mylapore, 600004 

Telephone: +91-4424981893

Sunday, November 24, 2024

थिरुक्करवासल येथील श्री कण्णरारियामुडयार मंदिर

सप्त विडंग स्थळांमधलं हे चौथं मंदिर आहे. इथल्या विडंगाचे नाव आदि विडंगर आहे. तसेच हे मंदिर पाडळ पेथ्र स्थळांमधलं पण एक मंदिर आहे आणि हे कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसलं आहे. श्रेष्ठ शैव संत संबंधर आणि अप्पर ह्यांनी त्यांनी रचलेल्या स्तोत्रांमधे ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. ह्या ठिकाणी भगवान शिवांनी जे नृत्य केलं त्याचे नाव कुक्कुट नृत्य असे आहे. तामिळ नाडूमधल्या थिरुवारुर जिल्ह्यातील थिरुक्करईल ह्या गावात हे मंदिर वसलं आहे. 

मूलवर: श्री कण्णयारनाथर

देवी: श्री कैलासनायकी

क्षेत्र वृक्ष: फणस

पवित्र तीर्थ: ब्रह्म तीर्थ, शेष तीर्थ

पुराणिक नाव: थिरुक्करयील, थिरुक्करैवासल

वर्तमान नाव: थिरुक्करवासल

जिल्हा: थिरुवरुर, तामिळनाडू


क्षेत्र पुराण:

हरड्याची पूड पाण्यामध्ये मिसळली कि पाणी स्फटिकासारखं स्वच्छ होतं आणि त्याला औषधी गुण पण येतात. एक व्यापारी होता जो ह्या मंदिरामध्ये औषधी गुण असलेल्या जायफळाची पोती घेऊन आला. भगवान विनायक एका मुलाच्या रूपामध्ये त्या व्यापाऱ्याकडे आले. त्यांनी त्या व्यापाऱ्याकडे त्या पोत्यांमध्ये काय आहे ह्याची चौकशी केली. व्यापाऱ्याला कर भरायचा नव्हता म्हणून त्याने आपल्या पोत्यांमध्ये हरडा आहे असे सांगितले. तो मुलगा म्हणजेच भगवान विनायक परत गेले. जेव्हां त्या व्यापाऱ्याने पोती उघडून पाहिले तर त्याला त्यामध्ये हरडाच दिसला. त्या व्यापाऱ्याला कळून चुकले कि तो मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात भगवान विनायक होते. त्याने मनोमन भगवान विनायकांकडे क्षमायाचना केली. त्या क्षमायाचनेचे फळ म्हणून त्याच्या पोत्यांमध्ये परत जायफळ आले. तेव्हांपासून इथे भगवान विनायकांचे नाव करक्काई विनायक असे प्रसिद्ध झाले.

तामिळ कन्या महिन्याच्या पौर्णिमेला श्री इंद्रदेवांनी इथे भगवान शिवांची पूजा केली.

मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

भगवान विष्णू, श्री महालक्ष्मी, श्री इंद्र देव, पतंजली ऋषी, व्याघ्रपाद ऋषी.

मंदिराबद्दल माहिती:

कण्ण म्हणजे डोळे, अयारिअम म्हणजे सहस्र नयन असलेला, उडयार म्हणजे स्वामी. म्हणजे ह्या मंदिराचा स्वामी म्हणजेच भगवान शिव ह्यांना सहस्र नयन आहेत.

हे मंदिर थिरुवरुर पासून ११४ किलोमीटर्स तसेच मन्नारगुडी पासून ३० किलोमीटर्स वर थिरुथुराईपुंडी मार्गावर आहे. ह्या मंदिराच्या आसपासचा भाग करहील वृक्षांनी घनदाट भरलेला आहे. 

हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्या मंदिराचा व्याप साधारण १ एकर आहे. ह्या मंदिरात राजगोपुर आणि ध्वजस्तंभ नाही. इथले बलीपीठ धातूने आच्छादलेले आहे. इथे श्री नंदि हे थोड्या वरच्या पीठावर आहेत. इथे एक तीन स्तरांचे गोपुर आहे. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर उजवीकडे एक शिलालेख आहे ज्यामध्ये ह्या क्षेत्राची माहिती दिली आहे. हे मंदिर साधारण १७०० वर्षे जुनं आहे.

मंदिरातील इतर मूर्ती आणि देवालये:

इथे परिक्रमेमध्ये भगवान विष्णू, श्री षण्मुख, श्री भैरव, श्री सरस्वती देवी आणि श्री गजलक्ष्मी देवी ह्यांची देवालये आहेत. तसेच बरीच शिव लिंगे आहेत. तसेच येथील उत्सवर, ज्यांचे नाव सुंदरर आहे, त्यांचे पण देवालय परिक्रमेमध्ये आहे.

इथे एक मंडप आहे ज्याचे नाव त्यागराज सभा असे आहे. इथे श्री विनायकांचे नाव प्रमोद विनायक असे आहे (प्रमोद म्हणजे आत्यंतिक आनंद). असा समज आहे कि श्री प्रमोद विनायकांची पूजा जे करतात त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना आत्यंतिक आनंदाची प्राप्ती होते. इथे त्यागराजांचे नाव आदि विडंगर असे आहे. मंदिराच्या उत्तरेला असलेल्या तीर्थाचे नाव इंद्र तीर्थ आहे. श्री ब्रह्मदेवांनी त्यांना मिळालेल्या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी इथे भगवान शिवांची पूजा केली आणि तीर्थ निर्माण केले ज्याचे नाव ब्रह्म तीर्थ आहे. 

पुराणांनुसार सर्पांचा राजा आदिशेष हे एका विहिरीमधून इथे भगवान शिवांची पूजा करण्यासाठी यायचे म्हणून इथल्या विहिरीचे नाव सर्पतीर्थ असे आहे. इथे श्री दक्षिणामूर्तींचे नाव श्री ज्ञान दक्षिणामूर्ती असे आहे. श्री भैरवांचे नाव श्री स्वर्णाकर्षण भैरव असे आहे. असा समज आहे कि श्री स्वर्णाकर्षण भैरव ह्यांची पूजा केल्याने नुकसानाची भरपाई होते. इथे एक श्री विनायकांचे देवालय आहे जिथे श्री विनायकांचे नाव कडुक्कई (हरडा विनायक) असे आहे.

प्रार्थना:

१. भाविक जन इथे आपले गमावलेले ऐवज मिळविण्यासाठी श्री स्वर्णाकर्षण भैरव ह्यांची पूजा करतात. 

२. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी इथे भाविक जन श्री प्रमोद विनायकांची पूजा करतात.

३. पाप आणि शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी इथे भाविक जन स्नान करून भगवान शिवांची पूजा करतात.

४. असा समज आहे कि श्री प्रमोद विनायकांची पूजा केल्याने नेत्ररोग बरे होतात.

पूजा:

१. प्रत्येक तामिळ महिन्याच्या पहिल्या दिवशी विशेष पूजा केल्या जातात. ह्या दिवशी श्री त्यागराज आणि श्री नटराज ह्यांच्यावर अभिषेक केला जातो तसेच गुरु पूजा पण केली जाते. 

२. कार्थिगई ह्या तामिळ महिन्यामध्ये कार्थिगई दीपम ह्या उत्सवाच्या वेळेस पूजा केली जाते

३. कालाष्टमीच्या दिवशी श्री भैरवांची पूजा केली जाते.

४. पौर्णिमा आणि अमावास्येला विशेष पूजा केल्या जातात. 


मंदिराचा पत्ता: अरुलमिगु कैलासनायकी समेध कण्णयारनाथर थिरु कोविल, थिरुक्करवासल, थिरुवरुर जिल्हा, तामिळ नाडू ६१०२०२


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


Thursday, November 21, 2024

Shri Veerupakshishawar Temple at Mylapore

This is the fourth Shiva temple of Sapta Sthana temples of Mylapore. It is situated in Bazar road near Shri Karaneeshwarar Temple. This may be the oldest temple in Mylapore. The present structure must be more than 1000 years old. In the sanctum sanctorum there are stone inscriptions dating to 11th century. 

Moolavar: Shri Virupaksheeshwarar
Devi: Shri Vishalakshi

Kshetra Purana:

This temple is believed to be constructed by Shivanesa Chettiyar. He had a daughter named Angampoompavai. He wanted to get her married to Shaiva saint Thirudnyanasambandhar. But she died of snake bite. Shivanesa Chettiyar took her ashes to Shri Sambandhar who sang a sacred hymn and made her raise from the ashes. Sambandhar refused to marry her stating that he was like her father as he had given her life. Angampoompavai spent rest of her life as an ardent devotee of Lord Shiva. 

Salient features:

1. Shiva linga is comparatively very big.

2. Sage Kutsa worshiped Lord Shiva at this place.

3. Shri Sundarmurty Nayanar had darshan of Tandava nrutya of Nataraja at this place.

About the Temple:

This is a south facing temple with a five tiered Rajagopuram. As soon as we enter we find the Arthamandap. The shiva linga is facing the east. The entrance to the sanctum sanctorum is very small. 

At the entrance on the side of the Rajagopuram we find shrines of Selva Vinayaka and Balaganduda Pani. Virupam means against nature. Lord Shiva has three eyes which is a Virupam and hence he is praised as Virupaksheeshwarar. Akshi means eyes. The shiva linga at this place is presumed to have three eyes. Hence Lord Shiva is praised as Virupaksheeshwarar. The shiva lingam is comparatively big. 

Koshtamurtis are Nardana Vinayaka, Lord Dakshinamurti, Lord Balavinayakar, Lord Brahma and Goddess Durga. Ambika’s shrine is facing  the south in the Arthamandap. There is a Bali peeth in the front of the shrine which is very unique. Lord Brahma and Lord Shiva’s idols are near the Ambika’s shrine. In the prakaram we also come across the shrines of Lord Subramanya with his consorts, Lord Nataraja, shaiva saints Nalavar, Lord Shanishwar, Lord Sandeshwarar. Besides these we find utsav murtis and the shrine of Navagraha in the parikrama. 

Prayers

Devotees believe that taking bath in a temple tank and worshiping Lord Shiva at the temple cures diseases. 

Pooja:

Regular daily, weekly and monthly poojas

Festivals:

Usual festivals that are celebrated in all Shiva temples.

Timing: 6.30 am to 11 am, 4.30 pm to 8.30 pm

Address: Shri Virupaksheeshwarar temple, P.V. Kovil street, Karaneeshwarar Puram, Mylapore 600004

Phone: +91 4424981893

Courtesy: Various websites and blogs

Sunday, November 17, 2024

नागपट्टीनं येथील श्री कायारोहणेश्वरर मंदिर

हे मंदिर सप्त विडंग स्थळांपैकी तिसरं मंदिर आहे. येथील विडंगाचे नाव सुंदर विडंगर असे आहे. नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण हे एक स्थळ आहे. श्रेष्ठ नायनमार श्री थिरुज्ञानसंबंधर, श्री अप्पर आणि श्री सुंदरर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. वर्तमान मंदिर साधारण २००० वर्षे जुनं आहे. हे मंदिर चोळा आणि पल्लव साम्राज्यातील राजांनी बांधलं आणि त्याचा वेळोवेळी जीर्णोद्धार केला. 


मूलवर: श्री कायारोहणेश्वरर

उत्सवर: श्री चंद्रशेखरर

देवी: श्री निलायदाक्षी

पवित्र तीर्थ: पुंडरीकाक्ष तीर्थ

क्षेत्र वृक्ष: आंबा

पुराणिक नाव: नागईकारोणं

वर्तमान नाव: नागपट्टीनं

जिल्हा: नागपट्टीनं, तामिळनाडू


क्षेत्र पुराण:

१. श्री शनिदेव रोहिणी नक्षत्रामध्ये आल्यामुळे दुष्काळ पडेल हे जेव्हां दशरथ राजाच्या लक्षात आले तेव्हां त्यांनी श्री शनिदेवाशी युद्ध करायचे ठरवले. पण श्री सूर्यदेवांनी त्यांना ह्या युद्धापासून परावृत्त करून श्री शनिदेवांना पूजा करून प्रसन्न करण्याचा सल्ला दिला. दशरथ राजाने श्री सूर्यदेवांनी सांगितल्या प्रमाणे श्री शनिदेवांची पूजा करून त्यांना प्रसन्न केले आणि त्यामुळे श्री शनिदेवांच्या प्रभावाची तीव्रता कमी झाली. म्हणून इथे सर्व नवग्रह पश्चिमाभिमुख आहेत.


२. इथे एक कोळी समाजातला अतिपथर नावाचा शिवभक्त होता. मासे पकडल्यावर त्यातील एक मासा तो परत समुद्राला म्हणजेच भगवान शिवांना अर्पण करायचा. एकदा त्याची परीक्षा घेण्यासाठी भगवान शिवांनी अशी लीला घडवून आणली कि अथीपथरला एकच मासा मिळाला. पण त्याने ठरवल्याप्रमाणे तो मासा समुद्राला अर्पण केला. अजून एकदा परीक्षा घेण्यासाठी भगवान शिवांनी परत लीला घडवली आणि अतिपथरला एकच मासा पण तो सोन्याचा मिळाला. अतिपथरच्या एका कोळी मित्राने त्याला तो मासा स्वतःकडे ठेवण्याचा सल्ला दिला. पण अतिपथरने आपल्या प्रतिज्ञेनुसार तोही मासा समुद्राला अर्पण केला. तेव्हा भगवान शिव आणि श्री पार्वती देवी त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला दर्शन देऊन मुक्ती प्रदान केली. अतिपथर नायनार म्हणून प्रसिद्धी पावले. त्यांचं ह्या मंदिरामध्ये स्वतंत्र देवालय आहे. 


३. अळूगुणी सिद्धर:

जसे लहान मूल आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आईसमोर रडते तसेच अळूगुणी सिद्धर हे सिद्ध मुनी श्री पार्वती देवींच्या समोर मुक्ती मिळविण्यासाठी रडायचे. श्री पार्वती देवींनी भगवान शिवांच्या संमतीने ह्या सिद्धमुनींना मुक्ती प्रदान केली. ह्या ठिकाणी अळूगुणी सिद्धर ह्यांची जीव समाधी आहे. वैकासि ह्या तामिळ महिन्याच्या विशाखा नक्षत्र दिवशी तसेच पौर्णिमेला विशेष पूजा केली जाते ज्यामध्ये खीर (पायसम) नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. 


४. पुंडरीकाक्ष ऋषींनी इथे मुक्तीप्राप्तीसाठी तपश्चर्या केली. भगवान शिवांनी त्यांना दर्शन देऊन त्यांना मिठी मारली. सहसा मुक्ती हि आत्म्याला मिळते. पण इथे भगवान शिवांनी मानवी शरीरामध्ये (काया) पुंडरीकाक्ष ऋषींना मिठी मारली (आरोहण) म्हणून इथे भगवान शिवांचे नाव कायारोहणर असे आहे. 


५. एकदा नागांच्या राजाने भगवान शिवांची आराधना केली ज्यामुळे त्याला पुत्री प्राप्ती झाली. ह्या पुत्रीला तीन स्तन होते. भगवान शिवांनी त्याला आश्वासन दिलं कि जेव्हां सूर्य वंशातील राजा इथे भेट देईल तेव्हां त्याच्या पुत्रीचे तिसरे स्तन त्यावेळी ते निघून जाईल. जेव्हां शालीसुहन राजा इथे आला त्यावेळी त्या पुत्रीचे तिसरे स्तन निघून गेले. नाग राजाने आपली पुत्रीचा विवाह शालीसुहन राजाबरोबर केला. इथे नागराजाने भगवान शिवांची आराधना केली म्हणून इथे भगवान शिवांना नागईकारोणं असे नाव आहे.


मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

सप्त ऋषी, मार्कंडेय ऋषी, पुंडरीकाक्ष ऋषी


वैशिष्ट्ये आणि देवालयांबद्दल माहिती:

सुंदर विडंगर: ह्या मंदिरातलं विडंगर अतिशय सुंदर आहे आणि म्हणून त्याला सुंदर विडंगर म्हणतात. भगवान शिवांच्या गाभाऱ्याच्या उजव्याबाजूला श्री त्यागराज ह्यांचं देवालय आहे. सहसा बऱ्याचश्या शिव मंदिरांमध्ये श्री त्यागराजांच्या फक्त मुखाचंच दर्शन होतं. ह्या ठिकाणी वैकासि महिन्यातील विशाखा नक्षत्रावर आणि तसेच मारगळी महिन्याच्या थिरुवथिरा नक्षत्रावर भगवान शिवांना अशा प्रकारे अलंकार केले जातात कि ज्यामुळे श्री त्यागराजांच्या उजव्या हाताचे आणि उजव्या पाऊलांचे दर्शन घडते. उत्सवामध्ये श्री त्यागराजांच्या रथयात्रेमध्ये भाविक अशा प्रकारे नृत्य करतात कि जणू काही ते दृश्य समुद्रातील लाटांसारखं भासतं. 


निलायदाक्षी देवी: असा समज आहे कि ही देवी आपल्या भक्तांना सागरासारखे किंवा सागराएवढे आशीर्वाद देते. हे दर्शविण्यासाठी तिचे नेत्र सागरासारखे निळ्या रंगाचे आहेत. ह्या मंदिरात तिचे स्वतंत्र देवालय आहे ज्यामध्ये ध्वजस्तंभ पण आहे. ह्या ठिकाणी ह्या देवीला कुमारिकेच्या रूपात (लग्न न झालेली) चित्रित केले आहे. ह्या ठिकाणी आडीपुरम उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. चायना क्ले ने बनविलेल्या रथामध्ये तिची रथयात्रा निघते. देवीचा गाभारा रथाच्या आकाराचा बांधला आहे. इथे देवी कुमारिकेच्या रूपात असल्याने भगवान शिवांनी श्री नंदिदेवांना संरक्षक म्हणून पाठवले. पण श्री नंदिदेव भगवान शिवांपासून दूर जायला तयार नव्हते. भगवान शिवांनी श्री नंदिदेवांना देवीबरोबर राहताना त्यांचंच म्हणजे भगवान शिवांचंच दर्शन घ्यायला सांगितलं. त्यामुळे इथे श्री नंदिदेव जरी देवीच्या समोर असले तरी त्यांचं मुख भगवान शिवांच्या दिशेने आहे. त्यांचा डावा डोळा भगवान शिवांकडे आहे तर उजवा डोळा श्री देवींकडे आहे. भाविक जन इथल्या श्री नंदिदेवांची पूजा नेत्ररोगांचं निरसन करण्यासाठी करतात. 


श्री विनायकर: श्री विनायकर हे एका स्वतंत्र देवालयातून भक्तांवर कृपा करतात. त्यांच्या शरीराला एका सर्पाने विळखा घातला आहे तर दुसरा सर्प त्यांच्या डोक्यावर छत्रीसारखा उभा आहे. म्हणून त्यांना नागभरण विनायकर (नागभूषण विनायकर) असे नाव आहे. राहू आणि केतू ग्रहांच्या दोषापासून मुक्तीसाठी भक्त त्यांची आराधना करतात. 


इथे श्री भैरवर देवांचं श्वानाच्या ऐवजी सिंह हे वाहन आहे. श्री भैरवर हे दक्षिणाभिमुखी असून त्यांचं मुखं खूप क्रूर आहे. त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या समोर दोन विनायकर उभे आहेत. 


दक्षिण भारतात अशी प्रथा आहे कि जेव्हां मृत देहाची यात्रा मंदिरासमोरून जाते त्यावेळी मंदिराची प्रवेशद्वारं बंद केली जातात. पण इथे मात्र जेव्हां मृत देहाची यात्रा मंदिरासमोरून जाते तेव्हां भगवान शिवांच्या मंदिरातले हार आणि वस्त्र हे त्या मृतदेहावर पांघरले जातात. कोळी समाजातल्या एका श्रेष्ठ शिव भक्ताचा मान राखण्यासाठी हे केले जाते.


सहसा उत्सवाच्या वेळेस भगवान शिवांची रथयात्रा हि मंदिराभोवतीच्या चार रस्त्यांवरून नेली जाते. सलीसामहाराज जेव्हां गावांत भगवान शिवांची पूजा करून इथे आले त्यावेळी त्यांना भगवान शिवांचे वररूपातले दर्शन झाले. त्यांच्या ह्या दर्शनप्राप्तीच्या आदराप्रीत्यर्थ येथील रथयात्रा नागपट्टीनंच्या आजूबाजूच्या सात गावांमधून ते नेली जाते.


श्री मोहिनी देवींची रथयात्रा: सहसा भगवान शिवांच्या इतर मंदिरांमध्ये प्रदोष काळी भगवान शिवांची रथयात्रा त्यांच्या ऋषभ वाहनावरून काढली जाते. पण इथे ह्या रथयात्रेमध्ये भगवान विष्णूंना त्यांच्या श्री मोहिनी अवताररूपामध्ये बरोबर घेतले जाते. समुद्र मंथनानंतर जेव्हां अमृत बाहेर आलं तेव्हां तें अमृत प्राशन करण्याच्या आधी देवांनी भगवान शिवांची पूजा केली नाही. ह्या त्यांच्या चुकीला क्षमा करण्यासाठी म्हणून भगवान शिवांनी प्रदोष काळ चालू होण्याआधी तांडव नृत्य केले. त्यावेळी भगवान विष्णू श्री मोहिनी अवतारामध्ये प्रकट झाले. म्हणून इथे प्रदोषकाळी श्री मोहिनींचे दर्शन घेता येते. इतर वेळी श्री मोहिनींची मूर्ती भगवान शिवांच्या गाभाऱ्यामध्ये ठेवलेली असते. 


इथे श्री काली देवी (अष्टभुजा अंबिका) ह्यांचे देवालय आहे. ह्या देवालयामध्ये अष्ट भैरव आणि श्री गजलक्ष्मी ह्यांच्या मूर्ती बघायला मिळतात. शिव लिंगाच्या मागे श्री सोमस्कंद ह्यांची मूर्ती आहे, तसेच श्री मुरुगन ह्यांची बारा हातांमध्ये शस्त्र असलेली मूर्ती आहे. 


परिक्रमेमध्ये श्री चंडिकेश्वरर ह्यांची मूर्ती आहे. 


येथील क्षेत्र वृक्षाची म्हणजेच आंब्याचीं फळें गोड, कडू आणि आंबट अशा तीन चवींची आहेत. जेव्हां आपण ह्या वृक्षाकडे आग्नेय दिशेकडून पाहतो तेव्हा हा वृक्ष श्री नंदिदेवांसारखा भासतो.


येथील गाभाऱ्यातील मंडपाच्या छतावर बारा राशींच्या आकृत्यांची शिल्पे कोरली आहेत. ह्या मंडपात भगवान शिवांची पूजा केल्याने ग्रहदोषांचे निवारण होते असा समज आहे.


इथे असे एक शिल्प आहे ज्यामध्ये श्री गजलक्ष्मी ज्यांचे पाय खाली मोकळे सोडले आहेत आणि चार दंत असलेले दोन हत्ती त्यांची पूजा करत आहेत. 


कोष्टाच्या बाहेरील भागात श्री दक्षिणामूर्तींची कोष्ठ मूर्ती आहे. ह्या मूर्तीमध्ये त्यांच्या पायाशी चार ऐवजी आठ शिष्य बसलेले आहेत. 


इथे श्रेष्ठ नायनमार श्री सुंदरर ह्यांना भगवान शिवांची स्तुती गायल्याने मोत्यांचा हार, हिऱ्यांचा हार, कस्तुरी आणि हत्ती ह्यांची प्राप्ती झाली.


मंदिराबद्दल माहिती:

जरी हे शिव मंदिर असलं तरी ते श्री निलायदाक्षी अम्मन कोविल म्हणून प्रसिद्ध आहे. मूळ मंदिर लाकोलिक समाजाच्या लोकांनी बांधलं आहे. ह्या समाजाने अजून एक मंदिर बांधलं ते आहे तामिळनाडूच्या कांचीपुरम मध्ये. हे एक शक्तीपीठ पण आहे. ह्या मंदिराला शिवराजधानी असं पण म्हणतात कारण भगवान शिव इथून राज्य करतात. समुद्र किनाऱ्यावर वसलेलं हे मंदिर नागपट्टीनं ह्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हे लिंग स्वयंभू आहे. सध्या असलेलं शिव लिंग हे मूळ लिंग नाही. मूळ लिंग बऱ्याच काळापूर्वी चोरीला गेलं आहे. सध्याचे लिंग गोमेद पासून बनलं आहे.


येथील राजगोपुर पांच स्तरांचे आहे. येथील परिक्रमेमध्ये बलीपीठ, ध्वजस्तंभ आणि नंदनवन आहे.


पूजा:

दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक पूजा केल्या जातात. रोज सकाळी ९ आणि संध्याकाळी ८ वाजता अभिषेक केला जातो.


मंदिरात साजरे होणारे सण:

आनी (जून-जुलै): ह्या महिन्यातील अयिलं (मराठीमध्ये आश्लेषा) नक्षत्र दिवशी अर्धजाम पूजेच्या वेळेस पुंडरीकाक्ष ऋषींच्या मुक्तीप्राप्तीच्या आदराप्रीत्यर्थ अर्धजाम पूजेच्या वेळेस पूजा केली जाते. हि पूजा दिवसाची शेवटची पूजा असते. 

वैकासि (मे-जून): कल्याण उत्सव (विवाह उत्सव)

आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम उत्सव (पूर्वा नक्षत्रावर उत्सव)

मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि उत्सव

ऎपासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


Thursday, November 14, 2024

Shri Velleeshwarar temple

This is the third temple in the Sapta Sthana Shiva temples of Mylapore. This temple is located very near to Kapaleeshwarar temple in the South Mada street. This is the very old temple rebuild a number of times. In temple we come across the details of those were in charge of the temple in 1875. According to some this temple is as old as Kapaleeshwarar temple but no records or details are available. 

Moolavar: Shri Velleshwarar
Devi: Shri Kamakshi

Kshetra Purana:
According to kshetra purana, King Mahabali had agreed to gift a small piece of land to Lord Vishnu (as Vamana) as a part of yadnya. Asura guru Shukracharya had suspicion that Vamana was none other than Lord Vishnu. Suspecting foul play he tried to stop Emperor Mahabali from donating a land. He blocked the nozzle of Kamandalu by becoming a bee. Lord Vishnu as Vamana picked up a blade of sacred grass (darbha) and inserted into the nozzle which blinded Shukracharya. Shukracharya meditated on Lord Shiva at this place and got his eyesight back. Vellee means Shukra, hence Lord Shiva is praised here as Velleeshwarar.

Those who worshiped at this place:
According to purana, Sage Angirasa worshiped Lord Shiva at this place.

About the temple:
There is no mention of the sacred teertha or the sacred vruksha associated with the temple. The south facing temple has a five tiered Rajagopuram. On the Gopuram we come across stucco images of a mouse worshiping a Shiva Linga, Lord Vishnu as Vamana and King Mahabali. They are depicted as they find a mention in the Kshetra puran connected with the temple. Temple has two prakarams. The shrine facing the entrance is not that of Lord Shiva but that of Lord Ganesha with his consorts Riddhi and Siddhi. He is praised as Selva Vinayaka and is gracing the devotees in standing posture. In the outer prakaram, we have a Nandi mandap who is facing Lord Shiva’s shrine. In the Nandi mandap we come across Dhwajasthambha, Balipeeth and Nandi. Lord Shiva is in the form of a small Shiva Linga in an east facing shrine. We have the Dwarapalakas at the entrance of Lord Shiva’s shrine. Koshta murtis are Lord Ganesha, Lord Dakshinamurti, Lord Lingodbhavar, Lord Brahma, and Goddess Durga. Lord Chandikeshwarar is housed in a small shrine near Lord Brahma. Devi Kamakshi is housed in a south facing shrine to the right of Sanctum. The idol of Ambika is similar to the one at Kamakshi temple at Kanchipuram. In the inner prakaram, we come across the idols of Sapta Matrika. Goddess Varahi is worshiped by a large number of devotees in this place. Behind Lord Shiva’s shrine there is an idol of Lord Vishnu praised as Lord Trivikrama. There is an idol of Durga Devi facing the north. There is a shrine of Lord Muruga. He is praised as Muthukumar Swami. He graces in standing posture along with his consorts Valli and Deivanai. In the outer parikrama there is an idol of Lord Brahma, a newly built shrine of Lord Sarabheshwarar, shrine of Goddess Pratyangara Devi and Shulini devi. There is an idol of Shukracharya worshiping a shiva linga. There are shrines of Shanishwarar and Navagrahas. In the Parikrama, there are idols of Lord Ganesha, Sekkizhar, Meikandar, three other Shaiva saints, Nalavar, Ulagaandha Perumal (Lord Vishnu), Lord Brahma, Lord Surya, Lord Veerabhadra, Goddess Lakshmi and Goddess Saraswati. There is a separate shrines for Utsava murtis of Lord Muthukumar Swami with his consorts and has its own Dhwajasthambha, utsav murtis of Lord Nataraja and Goddess Shivakami, Shaiva saint Manikvasagar, utsav murti of Somaskandha, Lord Vishwanath represented by small shiva linga, Lord Annamalayar represented by a big shiva linga along with Goddess UnnamalaiAmmal in the parikrama. Near the dhwajasthambha there is a stucco image of Ekapad Murti (Lord Shiva) at the center with bust of Lord Brahma and Lord Vishnu on either side. In the shrine of Lord Nataraja we come across small bronze idols of Sage Vyaghrapada and Sage Patanjali. In another large shrine, we come across bronze idols Lord Ganesha, Lord Muruga with his consorts, Lord Nataraja with Goddess Shivagami and Uma with Chandrashekhar. There is a utsav murti of Lord Brahma in this temple which is very rare. 

Festivals
Chitrai (April-May): Chaitra Pournima
Vaikasi (May-June): Vishakha nakshatra festival. Brahmotsav is a main festival, it is held on 8th day of Vaikasi. They enact episode of Shukracharya getting back his eyesight. Idols of Lord Shiva, Lord Brahma, Vamana (Lord Vishnu), and King Mahabali is taken is procession on a stage near the temple where Sukracharya is seen meditating. A person known as Oduvar recites Thirumani verses relating to the restoration of eyesight of Shukracharya. This is followed by a deepaaradhana.
Aani (June-July): Thirumanjanam 
Aadi (July-August): Puram festival 
Aavani (August-Sept): Ganesh chaturthi
Purattasi (Sept-Oct)): Navaratri 
Aipassi (Oct-Nov): Annabhishek and Skandashashthi
Karthigai (Nov-Dec): Thiru karthigai
Margazhi (Dec-Jan): Thiruvathurai
Thai (Jan-Feb): Thai pusam and Pongal, 
Masi (Feb-Mar): Mahashivaratri, 
Panguni (March-April): Panguni Uttaram



Timing: 6 am to 11 am and 5 pm to 8.30 pm

Address: Shri Velleshwarar Temple, 25 T.S.V Kovil street, Shankarapuram, Vinayaknagar Colony, Mylapore TN 600004

Telephone: +91 4424611393

Courtesy: Various websites and blogs

Sunday, November 10, 2024

थिरुनल्लर येथील श्री दर्भारण्येश्वरर

सप्त विडंगम स्थळांमधल्या सात मंदिरातलं हे दुसरं मंदिर तामिळनाडूमधल्या पॉंडिचेरी ह्या केंद्रशासित प्रदेशातील कारैक्कल जिल्ह्यामधल्या थिरुनल्लर गावामध्ये स्थित आहे. ह्या विडंगाचे नाव नगर विडंग असे आहे आणि भगवान शिवांनी इथे केलेल्या तांडवाचे नाव उन्मथ पाद नटनं (एखाद्या मद्यधुंद व्यक्तीने केलेल्या नृत्यासारखं). हे मंदिर नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक आहे. हे शिव मंदिर असलं तरी हे शनी ग्रहाचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. 

मुलवर: श्री दर्भारण्येश्वरर, श्री थिरुनल्लारईश्वरर 
देवी: श्री प्राणांबिका, श्री भोगमार्ता पूंमुलैयल, श्री प्राणेश्वरी
क्षेत्र वृक्ष: दर्भ
पवित्र तीर्थ: नल तीर्थ, ब्रह्म तीर्थ, वाणी तीर्थ. श्री नलविनायकांच्या मंदिरामध्ये असलेल्या विहिरीमध्ये हंस तीर्थ (तामिळ मध्ये वेल्लई अन्नम) आणि गंगा तीर्थ आहे. ह्या शिवाय इथे आठ अष्ट दिक्पाल तीर्थे आहेत.

क्षेत्र पुराण
१. एका आख्यायिकेनुसार सृष्टी निर्माण केल्यावर श्री ब्रह्मदेव सृष्टीभोवती फेरफटका मारायला निघाले. जेव्हा ते इथे दर्भाने भरलेल्या अरण्यामध्ये आले तेव्हां ह्या प्रदेशाच्या सौन्दर्याने ते मोहित झाले आणि त्यांनी इथे राहून येथील स्वयंभू लिंगाची आराधना करून तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिव इथे प्रकट झाले आणि त्यांनी श्री ब्रह्मदेवांना वेदांचे गूढ रहस्य तसेच इतर शास्त्रांचे ज्ञान प्रदान केले. श्री ब्रह्मदेव श्री पार्वती देवी आणि भगवान शिवांची आराधना करत इथे बराच काळ राहिले. त्यांनी श्री पार्वती देवी आणि भगवान शिवांची अनेक मंदिरे बांधली. त्यांनी ब्रह्म तीर्थ निर्माण केले तर श्री सरस्वती देवींनी वाणी तीर्थ निर्माण केले. तसेच अष्टदिक्पाल (आठ दिशा) देवतांनी आणि हंस पक्ष्याने आपापली शिव लिंगे तयार करून त्यांची पूजा केली. इथे प्रथम श्री ब्रह्मदेवांनी पूजा केली म्हणून ह्या जागेला आदिपुरी असे नाव प्रसिद्ध झाले. आणि इथे दर्भ गवत भरपूर प्रमाणात असल्यामुळे ह्याला दर्भारण्यं असे पण नाव प्रसिद्ध झाले. 
२. तसेच नलाने येथे भगवान शिवांची उपासना केली म्हणून ह्या जागेला नल्लर असे नाव प्रसिद्ध झाले आणि भगवान शिवांचे श्री नल्लेश्वर असे नाव प्रसिद्ध झाले आहे. 
३. पुराणांनुसार ह्या ठिकाणी भगवान विष्णूंनी श्री पार्वती देवी आणि भगवान शिव ह्यांची आराधना केली आणि त्याच्या प्रभावाने त्यांना मन्मथ (कामदेव) हा पुत्र प्राप्त झाला. ह्या लाभाच्या कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून भगवान विष्णूंनी सोमस्कंद (श्री पार्वती देवी, भगवान शिव आणि त्यांच्या मध्ये श्री मुरुगन) मूर्ती बनवली. कालांतराने भगवान विष्णूंनी हि मूर्ती श्री इंद्रदेवांना दिली. श्री इंद्रदेवांनी ह्या मूर्तीची पूजा केली आणि त्या पूजेच्या प्रभावाने त्यांना जयंत नावाचा पुत्र आणि जयंती नावाची पुत्री प्राप्त झाली. त्यानंतर श्री इंद्रदेवांनी अजून सहा सोमस्कंद मूर्ती बनवल्या आणि त्यांनी मूळ मुर्तीसकट त्या मूर्ती मुचुगुंद राजाला दिल्या. मुचुगुंद राजाने त्या सातही मूर्ती सात ठिकाणी स्थापन केल्या. ह्या सात स्थळांना एकत्रित सप्त विडंग स्थळे असं संबोधलं जातं. हे ठिकाण त्या सप्त विडंगांपैकी एक आहे. ह्या विडंगाचे नाव श्री त्यागराज विडंग असे आहे. 

मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
भगवान विष्णू, श्री ब्रह्मदेव, श्री इंद्रदेव, श्री सरस्वती देवी, श्री अष्ट दिक्पाल देवता, अगस्ती ऋषी, पुलस्ती ऋषी, हंस पक्षी आणि अर्जुन

मंदिराची वैशिष्ट्ये:
१. हे स्वयंभू लिंग आहे. 
२. पुराणांमध्ये असा उल्लेख आहे कि हे मंदिर दर्भाच्या गवतामध्ये सापडले. ह्या समजुतीला आधार म्हणजे ह्या लिंगावर दर्भाचे ठसे दिसतात.
३. प्रवेशद्वाराजवळ राजगोपुराला नमस्कार करून येताना प्रवेशद्वाराच्या पायरीला स्पर्श करून नमस्कार करण्याची प्रथा आहे. असा समज आहे कि प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात श्री शनिदेवांचा वास आहे. असा समज आहे कि श्री शनिदेवांनी नळ राजाला शिक्षा केली तेव्हा भगवान शिव क्रोधीत झाले. त्यांच्या क्रोधापासून स्वतःला वाचविण्यासाठी श्री शनिदेव ह्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात लपले. 

मंदिराबद्दल माहिती:
ह्या ठिकाणी श्री स्वर्ण गणपती, श्री मुरुगन, श्री नटराज, श्री सोमस्कंद, श्री आदिशेष, नायनमार, श्री महालक्ष्मी ह्यांच्या मूर्ती आहेत. 

ह्या मंदिरातील इतर देवालये:
मुख्य देवालयाच्या दक्षिणेला एक देवालय आहे ज्यामध्ये एक मेंढपाळ, त्याची पत्नीं आणि एक लेखापाल ह्यांच्या मूर्ती आहेत. आख्यायिकेनुसार लेखापालाने मेंढपाळाला मंदिराला पुरविल्या जाणाऱ्या दुधाच्या व्यवहारामध्ये फसवले होते. राजाच्या क्रोधापासून मेंढपाळाचे रक्षण करण्यासाठी तसेच लेखापालाला शिक्षा देण्यासाठी भगवान शिवांनी राजाच्या समक्ष लेखापालावर आपले त्रिशूल फेकले. त्या त्रिशूळाचा मार्ग मोकळा करण्यासाठी नंदि आणि बलीपीठ थोडे वाकले. आजही ह्या ठिकाणी नंदि आणि बलीपीठ सरळ रेषेमध्ये नसून थोडे वाकलेले आढळतात. भगवान शिवांनी आपल्या त्रिशुळाने लेखापालाचा शिरच्छेद केला आणि त्याचबरोबर मेंढपाळाला दर्शन दिले. 

ह्या शिवाय श्री स्वर्ण गणपती, श्री मुरुगन, श्री नटराज, श्री सोमस्कंद ह्यांची देवालये आहेत तसेच श्री आदिशेष, नायनमार, श्री महालक्ष्मी देवी, श्री सूर्य आणि श्री भैरव ह्यांच्या मूर्ती आहेत. नळ राजाची मूर्ती आणि त्याने पूजिलेले शिव लिंग पण इथे आहे. ह्या शिवाय इथे बाकीच्या मंदिरांप्रमाणे कोष्ठ मूर्ती पण आढळतात. त्यागराज विडंग (पाचूचे विडंग) ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे.   

मंदिरामध्ये साजरे होणारे सण:
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): पौर्णिमेला पाचूच्या लिंगाची विशेष पूजा
वैकासि (मे-जुन): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव
श्री शनीदेवाच्या भ्रमणासमयी शनिवारी श्री शनिदेवांची विशेष पूजा

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):


ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.



Thursday, November 7, 2024

Shri Teerthapaleeshwarar temple at Mylapore

This is the second temple to be visited in the Sapta sthana temple yatra of Mylapore. This is located at Triplicane near Mylapore in Tamil Nadu. The present structure is about 500 years old but according to Purana and records, the old structure which existed before the sixth century must have been destroyed by the sea. 

Moolvar: Shri Teerthapaleeshwarar, Shri Agasthishwarar, Shri Sarveshwarar
Devi: Shri Mahatripurasundari
Kshretra Vruksha: Shami
Sacred Teertha: Sea water (bay of bengal)
Puranik Name: Thiruvellikeni

Kshetra Purana:
Large number of Sages, devas and others assembled at Kailash for the marriage of Lord Shiva and Goddess Parvati. This tilted the balance so that the southern part was raised. Lord Shiva directed Sage Agastya to go south to balance the tilt. On his way Sage Agastya reached this place. He was tired and exhausted and became ill. He felt that he could regain his strength by resting under the shami tree. He meditated on Lord Shiva under the shami tree. Lord Shiva manifested in front of him and advised him to take bath in the sea and worship him by doing abhishek with sea water. He assured him that he will become fit to travel further. Sage Agastya followed the instructions and got refreshed. Since Sage Agastya was cured of the illness by doing abhishek with sea water he is known as Shri Teerthapaleeshwarar.

Those who worshiped at this place: Sage Agastya and Sage Atri.

Special features
1. The idols of Goddess Parvati and Lord Shiva are only two feet tall. 
2. The shiva linga is leaning on one side and cucumber shaped.
3. Abhishek of Lord Shiva is done only with sea water. 
4. Lord Ganesha is known as god who gives success in exam.
5. Unique feature is the presence of Lord Dakshinamurti under a tree and Lord Ganesha under a shami tree.
6. The presence of Shiva Linga and Naga idols under a peeple tree.
7. Rays of the Sun fall on the shiva linga on Mahashivaratri day.

About the temple:
There is no Rajagopuram but there is an arch at the entrance. There are stucco images of Lord Shiva and Goddess Parvati on Rishabha vahan, Lord Ganesha and Lord Subramanya on the arch on the entrance. The temple has one inner and one outer prakaram. The idols of Goddess Parvati and Lord Shiva are about 2 feet tall. Lord Shiva seems to be leaning on one side and gives the appearance of a cucumber. According to Kshetra Purana, the lord leaned on one side so that Sage Agastya could perform abhishek. 

Koshta murtis - Nardana Vinayaka, Lord Dakshinamurti, Lord Vishnu, Lord Brahma, Goddess Durga. Devi Tripurasundari is housed in a separate shrine. Lord Ganesha is in a separate shrine and is addressed as Pass granting Ganapati. In the Mahamandapa we come across Lord Narayana with Goddess Mahalakshmi on his lap and a shrine for Lord Surya. The kshetra vruksha in front of Ganesha shrine. There is a tree in front of Lord Dakshinamurti. The students pray for success to the two gods of wisdom in this temple namely God Vinayaka and Lord Dakshinamurti. There is a shivalinga and an idol of Naga under a peeple tree. In the front mandapa we come across the stucco images which describe the Purana connected with sapta sthana shiva temples of Mylapore. In the outer parikrama we come across shrines of Chandikeshwarar, Lord Subramanya with his consorts, Lord Anjaneya, Lord Shanishwar and Navagrahas. It is stated in Purana that there were sixty four sacred teerthas from here to the sea along the path. 

Prayers
1. Devotees worship here for removal of marriage obstacles, for good health and prosperity in life. 
2. Students worship Lord Ganesha for success in exams. 
3. Devotees worship Lord Dakshinamurti for wisdom and knowledge. They offer sweet rice pongal as Naivedya. 

Puja
Daily pujas, pradosha pujas, weekly and fortnightly pujas are performed. 

Some important festivals
Aadi (July-August): A special festival on the Nakshatra puram in the month of Aadi. 
Masi (Feb-March): 1. On Mahashivaratri day a special Surya puja is performed when the Sun’s rays fall on Shiva linga. 2. Teerthawari festival on Magha nakshatra. On this day the utsav murti of Lord Shiva is taken to the sea for Mangala snan. The other utsava murtis of these six temples also follow him. 


Besides this all the festivals associated with Lord Shiva are performed regularly. 

Address: Shri Teerthapaleeshwarar temple, in Triplicane in Chennai

Telephone: 91-4428444054/5322

Courtesy: Various websites and blogs

Sunday, November 3, 2024

श्री अरुलमीगु त्यागराजर कोविल

सप्त विडंग स्थळांमधलं हे पहिलं मंदिर आहे. ह्या मंदिराला श्री त्यागराज मंदिर असं पण म्हणतात. २००० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर तामिळनाडूमधल्या थिरुवरुर ह्या गावात वसलेलं आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावर तंजावूर पासून ७० किलोमीटर्स तर कुंभकोणम पासून ४२ किलोमीटर्स वर थिरुवरुर गाव आहे. हे नायनमारांनी ज्या मंदिरांमध्ये भगवान शिवांची स्तुती केली त्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक स्थळ आहे. तसेच सप्त विडंग स्थळांपैकी पण एक स्थळ आहे. श्री संबंधर, श्री अप्पर, श्री सुंदरर आणि श्री माणिकवाचगर ह्या नायनमारांनी ह्या मंदिरामध्ये भगवान शिवांची स्तुती गायली आहे. 


मुलवर: श्री त्यागराजर, श्री वान्मिकनादर

देवी: श्री कमलांबिका, श्री नीलोत्पलअंबल

पवित्र तीर्थ: कमलालयं, शंख तीर्थ, गया तीर्थ, वाणी तीर्थ

क्षेत्र वृक्ष: पाद्री वृक्ष (मराठी मध्ये टेटू)

पुराणिक नाव: अरूर


क्षेत्र पुराण:

एकदा त्र्यैलोकामध्ये सर्वात न्यायी व्यक्ती कोण आहे असा वाद निर्माण झाला. तेव्हां नारद मुनी म्हणाले पृथ्वीवरील चोळा साम्राज्याचा राजा मनूनिधी हा सर्वात न्यायी आहे. श्री यमदेव मनूनिधी राजाची परीक्षा घेण्यासाठी एका गायीचं रूप घेऊन मनूनिधी राजाची राजधानी थिरुवरुर येथे आले. आपल्याबरोबर ते एक वासरू पण घेऊन आले. त्यांनी थिरुवरुर मध्ये असताना एक लीला घडवली. राजाचा पुत्र रथामधून जात असताना ते वासरू त्या रथाच्या खाली आणवलं त्यामुळे ते वासरू रथाखाली चिरडून मरण पावलं. ती गाय राजाच्या दरबारात न्याय मागण्यासाठी गेली. राजाला गायीचं दुःख लक्षात आलं. त्या गायीला जे क्लेश झाले त्याला न्याय देण्यासाठी म्हणून राजाने आपल्या मुलाला रथाखाली चिरडून मारले कि ज्यामुळे स्वतः राजाला ते क्लेश भोगायला लागले. ह्या राजाच्या न्याय देण्याच्या बुद्धीवर श्री यमदेव प्रसन्न झाले आणि ते त्यांच्या मूळ रूपामध्ये राजाच्या समोर आले. त्यांनी मनूनिधी राजा हाच त्र्यैलोकामध्ये सर्वात न्यायी आहे हे मान्य केलं. 


मंदिराची वैशिष्ट्ये:

भगवान शिवांच्या गाभाऱ्यामध्ये श्री त्यागराज ह्यांची मूर्ती आहे. श्री त्यागराज हे देवाधिदेव आहेत. 


हे मंदिर सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे तसेच सर्वात भव्य मंदिर आहे. 


असा समज आहे की शनिदोषाचे निवारण करण्यासाठी थिरुनल्लर येथील मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर थिरुवरुर येथील मंदिराचे दर्शन घेतल्यानंतरच पूर्ण दोषनिवारण होते. 


पुराणांनुसार सद्यगुप्त नावाचा एक राजा होता. त्याच्या पत्रिकेमध्ये शनिदोष होता. त्याने नवग्रहांबरोबर युद्ध पुकारले. नवग्रहांनी घाबरून भगवान शिवांकडे रक्षणाची याचना केली. भगवान शिवांनी त्यांचं रक्षण केलं. म्हणून इथे सगळे नवग्रह हे सरळ रेषेमध्ये असून ते भगवान शिवांकडे मुख करून उभे आहेत. नवग्रह संनिधीमध्ये श्री गणेशांची मूर्ती आहे. असा समज आहे की ते नवग्रहांवर लक्ष ठेवतात जेणेकरून भगवान शिवांच्या भक्तांना नवग्रह त्रास देणार नाहीत. 


श्री विनायकांच्या ८४ प्रसिद्ध देवालयांपैकी चार देवालये ह्या मंदिरामध्ये आहेत. १) श्री नडूक्कम विनायक २) पश्चिमेकडील गोपुराजवळ श्री मातृ-उरैथ विनायक. भगवान शिव जेव्हा सुंदरर ह्यांना सोनं देत होते त्यावेळी ह्यांनी त्या सोन्याची पवित्रता पारखलीं. ३) श्री मूलाधार गणपती - भगवान शिवांच्या देवालयाच्या पहिल्या परिक्रमेमध्ये हि मूर्ती आहे. पंच मुखे असलेल्या वेटोळे घातलेल्या सापावर श्री गणपती नृत्य करीत आहेत असे ह्या मूर्तीचे दृश्य आहे. ४) श्री वातापी गणपती - श्री मुथुस्वामि दीक्षितर ह्यांनी पूजिलेली मूर्ती.


श्री अष्ट दुर्गा देवी ह्यांच्या देवालयामध्ये श्री मुथुस्वामि दीक्षितर ह्यांनी श्री महालक्ष्मी आणि श्री अष्ट दुर्गा ह्यांची स्तुती गायली आहे. 


ह्या देवालयाच्या वायव्येकडील परिक्रमेमध्ये एक दगडी रथ आहे. श्री इंद्रदेवांकडून मिळालेले विडंग मुचुकुंद राजाने थिरुवरुर येथे स्थापन केले. असा समज आहे की पूर्वे कडून विडंगाची रथयात्रा निघाल्यावर तिथून ते परत मिळविता येईल ह्या आशेने श्री इंद्रदेव पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ थांबतात. म्हणून येथील विडंगाची रथयात्रा पूर्वेच्या ऐवजी ईशान्येच्या प्रवेशद्वारावरून निघते. बहुतेक भक्तजन पूर्वेकडील प्रवेशद्वार टाळतात. 


श्री ललितासहस्रनामामध्ये उल्लेखल्या प्रमाणे श्री कमलांबिका देवी इथे वास्तव्य करतात. म्हणून येथील कमलालयं तीर्थ हे खूप पवित्र मानलं जातं. महामाघम उत्सवाच्या वेळेस कुंभकोणम येथील महामाघम तीर्थामध्ये जेवढं पुण्य मिळतं त्यापेक्षा १२ पटीने जास्त पुण्य ह्या तीर्थामध्ये स्नान केल्यामुळे मिळतं असा समज आहे. ह्या तीर्थाच्या मध्यभागी श्री नागदेवता ह्यांचे देवालय आहे. नागदोषांचे निवारण करण्यासाठी भाविक जन इथे पूजा करतात. 


इथे संध्याकाळी ४.३० ते ६.३० मध्ये प्रदोष पूजा केली जाते ज्याला नित्य प्रदोषपूजा म्हणतात. असा समज आहे की सर्व ३३ कोटी देव ह्या पूजेच्या वेळेस दर्शनासाठी येतात.


भगवान शिव जसे चंद्रकोर धारण करतात तसेच श्री कमलांबिका पण इथे चंद्रकोर धारण करतात. त्यांच्या उजव्या हातामध्ये एक फुल आहे आणि त्यांचा डावा हात कंबरेवर आहे आणि त्या योगासनामध्ये बसल्या आहेत. ह्या मुद्रेमध्ये त्या राज्ञी दिसतात. 


हे मंदिर सर्व मंदिरांमध्ये जुनं मंदिर मानलं जातं. इथला रथ ९० फूट उंचीचा आहे आणि तो तामिळ नाडूमधल्या सर्व मंदिरातल्या रथांमध्ये मोठा रथ मानला जातो आणि आशिया खंडामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा रथ मनाला जातो. असा समज आहे की भगवान शिवांनी येथे ३६४ चमत्कार केले आहेत. असा समज आहे की जे थिरुवरुर येथे जन्म घेतात ते मुक्ती पावतात आणि म्हणून इथे श्री यमदेवांना काही काम नाही. म्हणून श्री यमदेव इथे श्री चंडिकेश्वर ह्यांची भूमिका निभावतात. 


येथील गाभाऱ्याच्या मागे दैव रहस्य आहे असा समज आहे.


हे स्थळ शक्ती पीठांपैकी एक मानलं जातं. ह्याचे नाव कमला शक्ती पीठ आहे.


मंदिराबद्दल माहिती:

ह्या स्थळाला पूर्वी क्षेत्रवरपुरम, देवगयापुरम, मुकुंदपुरम अशी पण नावे होती. 


इथल्या विडंगाचे म्हणजेच शिवलिंगाचे नाव विधिविडंगर असे आहे. इथल्या उत्सवामध्ये इथले शिवाचार्य जे नृत्य सादर करतात त्याचं नाव आहे अजपनटनं म्हणजे जपाशिवाय केलेले नृत्य. अजप म्हणजे जपाशिवाय जप. ह्या स्थितीमध्ये जप केल्याशिवाय जप होतो म्हणजेच भक्त विनासायास भगवान विष्णूंच्या सान्निध्यात म्हणजेच त्यांच्या हृदयात वास करतो. हीच स्थिती श्री त्यागराजांची आहे आणि ती ह्या नृत्यामधून प्रदर्शित होते. 


हे स्थळ मूलाधार चक्राचे प्रतीक आहे म्हणून ह्या स्थळाला मूलाधारस्थळ असं पण म्हणतात. 


वर्तमान मंदिर चोळा साम्राज्यातल्या नवव्या शतकातल्या राजांनी बांधलं. त्या नंतर तेराव्या शतकामध्ये विजयनगर साम्राज्यातल्या राजांनी ह्या मंदिरामध्ये अधिक बांधकाम केलं. पुराणकाळापासून हे मंदिर नृत्य आणि गीतांच्या उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे. 


हे मंदिर साधारण ३० एकरवर पसरलेलं आहे. त्याला चार गोपुरे आहेत आणि चार प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेकडील प्रवेशद्वारावरील गोपुर ११८ फूट उंच असून चार स्तरांचे आहे. ह्या मंदिराच्या संकुलामध्ये बरीच छोटी देवालये आहेत. त्यात सर्वात महत्वाची देवालये श्री त्यागराज (विधीविडंगर) आणि श्री नीलोत्पलअंबल ह्यांची आहेत. मुख्य देवता श्री वान्मिकनादर (भगवान शिव) आहेत. मंदिराच्या आतमध्ये ९ गोपुरे आणि पांच परिक्रमा आहेत. श्री वान्मिकनादर (भगवान शिव) ह्यांची मूर्ती खूप प्राचीन आहे आणि ती वारुळावर आहे. पहिल्या परिक्रमेच्या वायव्य दिशेच्या कोन्यामध्ये नवग्रह संनिधी आहे. इथे सर्व नवग्रह हे सरळ रेषेमध्ये असून ते दक्षिणाभिमुख आहेत. इथे १३ मंडप आहेत. वर्षाच्या प्रत्येक दिवसाचे प्रतीक म्हणून इथे ३६५ शिव लिंगे आहेत. साधारण १०० देवालये आहेत त्यात ८ गणपतीच्या मूर्ती आहेत. मुख्य देवालये - श्री नीलोत्पलअंबल, श्री असलेश्वरर, श्री अडगेश्वरर, श्री कमलांबल आणि श्री अन्नमलेश्वरर. श्री त्यागराजांचे पदकमल हे सतत फुलांनी आच्छादलेले असतात. पंगूनी महिन्यातल्या उत्तरा नक्षत्राच्या दिवशी आणि थिरुवथीराई ह्या उत्सवाच्या रात्री श्री त्यागराजांचे डावे पाऊल मोकळे ठेवले जाते. भाविक जन इथून ३ किलोमीटर्स वर असलेल्या विलमल येथे श्री त्यागराजांच्या पाऊलांचे दर्शन घेऊ शकतात. ह्या मंदिरामध्ये श्री नंदि हे उभ्या मुद्रेमध्ये आहेत. इथे बरेच स्तंभ आहेत ज्यावर दगडाचे कोरीव काम केले आहे आणि भिंतींवर बरीच शिल्पे कोरलेली आहेत. 


मंदिराचे आवार श्री चक्राच्या आकाराचे आहे. यातील दुसरे स्तर श्री चक्राचे सात आधारस्थळं दर्शवते. आतल्या परिक्रमेला ओलांडल्यावर आपल्याला श्री कमलांबल संनिधी दिसते. ह्या देवालयामध्ये एक जागा अशी आहे की जिथे उभे राहिल्यावर सात गोपुरांचं दर्शन घडतं. 


येथील कमलायलं तलाव (तीर्थ) हा देशातला सर्वात मोठा तलाव आहे. 


इथे श्री विधिविडंगर, श्री विनायक आणि श्री अचलेश्वरर ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. 


ह्या शिवाय इथे श्री कमलांबल, श्री नीलोत्पलअंबल, श्री रुद्र दुर्गा, श्री ऋणविमोचनं, श्री दक्षिणामूर्ती, श्री अन्नमलेश्वरर आणि श्री वोट्टू-त्यागराजेश्वरर ह्यांची देवालये आहेत. त्याचबरोबर श्री आनंदेश्वरर आणि श्री सिद्धेश्वरर ह्यांची पण देवालये आहेत. परिक्रमेमध्ये श्री इंद्र, श्री चेरनाथ, श्री पांड्यनाथ, श्री आदिकेश्वरर, श्री पुलस्त्य ऋषी, श्री लंकेश्वर ह्यांनी पूजिलेली शिव लिंगे आहेत. ह्या शिवाय श्री भास्करेश्वरर, श्री विश्वनाथेश्वरर आणि श्री पाडाळेश्वरर ही पण लिंगे आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे राजगोपुराच्या जवळ श्री अंजनेय ह्यांचे देवालय आहे. असा समज आहे की इथे श्री अंजनेयांची पूजा केल्याने गेलेले राज्य परत मिळते. 


श्री देवीच्या देवालयाच्या परिक्रमेमध्ये श्री धर्मशास्ता आणि श्री विनायक ह्यांची देवालये आहेत. 


सहसा जेव्हा मंदिर पूर्वाभिमुख असते तेव्हा रथयात्रा पूर्वेच्या प्रवेशद्वारावरून निघते, पण इथे रथयात्रा ईशान्येच्या प्रवेशद्वारापासून निघते. श्री देवीच्या देवालयामधील श्री दक्षिणामूर्तींच्या मूर्तीमध्ये त्यांच्या बरोबर सहा शिष्य आहेत. सहसा चार शिष्य दाखवतात. श्री नीलोत्पलअंबल ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे. ह्या देवालयामध्ये एका दासीने श्री मुरुगन ह्यांना आपल्या हातामध्ये घेतले आहे असं दृश्य आहे. श्री सरस्वती देवींची मूर्ती अभय मुद्रेमध्ये आहे. ह्या मूर्तीमध्ये त्यांच्या हातात वीणा नसून त्या तपश्चर्या करत आहेत असा समज आहे. श्री हयग्रीवांच्या मूर्तीमध्ये ते भगवान शिवांची पूजा करत आहेत असं चित्रित केलं आहे. श्री आकाशभैरव, जे संरक्षक देव आहेत, त्यांची मूर्ती श्री कमलांबिका देवीच्या देवालयाच्या गोपुराजवळ आहे. इथे श्री भैरवांना श्री सिद्धीभैरव असं संबोधलं जातं. श्री कमलांबिका ह्यांच्या गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला श्री कमलामुनी सिद्धर ह्यांचे पीठ आहे. भगवान शिवांच्या देवालयाच्या परिक्रमेमध्ये श्री सूर्यदेवांची एक उंच मूर्ती आहे. ह्या शिवाय इथे श्री गणपती, श्री आदिकेश्वरर, श्री चंडिकेश्वरर, श्री दुर्गा देवी, श्री कमलांबल, श्री अचलेश्वरर, श्री त्यागराज, श्री वान्मिकनादर ह्यांची देवालये आहेत. तसेच रथ आणि दगडात केलेली कोरीव कामे पण दिसतात. 


हे मंदिर एवढं मोठं आहे की पूर्ण मंदिराचे दर्शन घ्यायला एक पूर्ण दिवस लागू शकतो. 


प्रार्थना:

भाविक जन येथे वरदान प्राप्त करण्यासाठी राहू काळामध्ये श्री दुर्गा देवींची पूजा करतात. पूरत्तासी महिन्याच्या नवमी तिथीला भाविक जन विविध वरदाने प्राप्त करण्यासाठी उदाहरणार्थ शत्रुत्वाचा नाश करण्यासाठी श्री वान्मिकनादर ह्यांची दूध आणि भात अर्पण करून पूजा करतात. तसेच भाविक जन अपत्यप्राप्ती, विवाह, शिक्षणात प्रगती आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी श्री त्यागराजांची पूजा करतात. पर्जन्य प्राप्ती साठी इथे श्री नंदिदेवांची पूजा केली जाते.


पूजा:

दररोज ४.३० ते ६.३० दरम्यान प्रदोष पूजा. इथे श्री त्यागराजांना दररोज अभिषेक होत नाही. श्री इंद्रदेवांनी पुजीलेल्या छोट्या शिव लिंगावर सकाळी ८.३० ला आणि संध्याकाळी ७ ला अभिषेक केला जातो. नंतर हे शिव लिंग फुलांनी आच्छादित चांदीच्या डब्यामध्ये सुरक्षित ठेवलं जातं. हा डबा नेहमी श्री त्यागराजांच्या उजव्या बाजूला ठेवला जातो. 


दिवाळी, पोंगल, मकर संक्रांति, तामिळ आणि इंग्लिश नववर्ष ह्या दिवशी इथे पूजा साजरी होते.


ह्या शिवाय इथे दिवसातून ६ वेळा पूजा केली जाते. 



मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): रथोत्सव

आडी (जुलै-ऑगस्ट): १० दिवसांचा आडी पुरम उत्सव, हा उत्सव श्री देवींच्या उत्सव मूर्तीसाठी साजरा होतो

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): अरुद्र उत्सव. भगवंताच्या पाउलांचं दर्शन ह्या दिवशी मिळतं, थिरुवथीराई उत्सव

मासी (फेब्रुवारी-मार्च): हस्त नक्षत्रावर पंगूनी उत्तरम ह्या उत्सवासाठी ध्वजारोहण साजरं होतं. महामाघम उत्सव

पंगूनी (मार्च-एप्रिल): १० दिवसांचा पंगूनी उत्तरम उत्सव. ह्या उत्सवासाठीचं ध्वजारोहण मासी महिन्यामध्ये हस्त नक्षत्रावर केलं जातं. दहाव्या दिवशी श्री व्याघ्रपाद ऋषींना भगवान शिवांनी दर्शन दिलं हे दर्शविण्यासाठी रथोत्सव साजरा होतो, वसंतोत्सव - हा उत्सव प्रथम श्री मन्मद (श्री कामदेव) आणि त्यांची पत्नी श्री रतीदेवी ह्या समवेत त्यांचं पुनर्मीलन झालं म्हणून श्री त्यागराजांसाठी साजरा केला होता 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.