Sunday, May 5, 2024

कांची मयानं

पंच मयानं मंदिरांच्या समुहातील हे पहिलं मंदिर आहे. ह्या मंदिराची माहिती आम्ही श्री कांची एकांबरेश्वर कोविल ह्या शीर्षकाखाली पूर्वीच (डिसेंबर २५, २०२४) प्रकाशित केली आहे.


हे मंदिर २००० वर्षे जुनं असून साधारण ४० एकर एवढा ह्या मंदिराचा पसारा आहे. हे मंदिर पंचभूत स्थळांपैकी पण एक आहे, ज्यामध्ये हे मंदिर पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. मुख्य देवता भगवान शिव आहेत. हे स्वयंभू लिंग आहे ज्याचं नाव पृथ्वी लिंग असे आहे. इथे श्री पार्वती देवींचे नाव श्री कामाक्षी आहे. श्री पार्वती देवींचे इथे स्वतंत्र देवालय नाही. किंबहुना कांचीपुरम मधल्या कुठल्याच मंदिरात श्री पार्वती देवींचं स्वतंत्र देवालय नाही कारण कांचीपुरम मध्ये त्यांना श्री राजराजेश्वरी (राज्ञांची राज्ञी) असं मानलं जातं. ह्या मंदिराची स्तुती श्री अप्पर, श्री सुंदरर, श्री संबंधर आणि श्री माणिकवाचगर ह्या नायनमारांनी केली आहे. 


मंदिराचा पत्ता: अरुलमीगु एकांबरेश्वर कोविल, कांचीपुरम, तामिळनाडू ६३१५०२


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment