Monday, March 18, 2013

Gayatri Mantra - Mother of all mantras

("श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत" ह्या पुस्तकातून)

गायत्री शक्ति विश्वव्याप्त आहे. तिच्याशी संबंध स्थापित केला असता सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते. तिच्या योगाने भौतिक, मानसिक तसेच आत्म्याशी संबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारची संपत्ति प्राप्त होऊ शकते. आपल्या शरीरात असंख्य नाड्यांचे जाळे पसरले आहे. यातील काही नाड्या जुळल्या असता त्यांना "ग्रंथी" म्हणतात. जपयोगात श्रद्धा / निष्ठा असलेल्या साधकांच्या मंत्रोच्चाराने या ग्रंथी जागृत होऊन त्यातील सुप्त शक्तींचा प्रादुर्भाव होतो.

"ॐ" या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो.

"भू:" या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळ्यावरील चार बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो.

"भुव:" च्या उच्चारणाने मानवाच्या भृकुटीच्या वरील तीन अंगुलीचा भाग प्रभावित होतो.

"स्व:" या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळ्यावरील कपाळाचा चार अंगुली इतका भाग जागृत होतो.

"तत्" च्या उच्चाराने आज्ञा चक्रामध्ये असलेली 'तापिनी' ग्रंथीतील सुप्त असलेली 'साफल्य' शक्ति जागृत होते.

"स" च्या उच्चाराने डाव्या डोळ्यातील सफलता नावाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली 'पराक्रम' शक्ति प्रभावित होते.

"वि" चे उच्चारण केले असता डाव्या डोळ्यामधील 'विश्व' ग्रंथीमध्ये स्थित असलेली 'पालन' शक्ति जागृत होते.

"तु" या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कानात असलेल्या 'तुष्टी' नावाच्या ग्रंथीतील 'मंगळकर' शक्ति प्रभावित होते.

"र्व" या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कानात स्थित असलेल्या 'वरदा' ग्रंथीतील 'योग' नावाची शक्ति सिद्ध होते.

"रे" चा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या 'रेवती' ग्रंथीतील 'प्रेम' शक्तीची जागृती होते.

"णि" च्या उच्चाराने वरील ओठावर असलेल्या 'सूक्ष्म' ग्रंथीतील सुप्त शक्ति 'धन' संध्य जागृत होते.

"यं" या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या 'ज्ञान' ग्रंथीतील 'तेज' शक्तीची सिद्धि होते.

"भ" या अक्षर समुदायाच्या उच्चारणाने कंठात असलेल्या 'भग' ग्रंथीतील 'रक्षणा' शक्ति जागृत होते.

"र्गो" चा उच्चार केला असता कंठकूपात स्थित असलेल्या 'गोमती' नावाच्या ग्रंथीतील 'बुद्धी' शक्तीची सिद्धि होते.

"दे" च्या उच्चाराने डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या 'देविका' ग्रंथीतील 'दमन' शक्ति प्रभावित होते.

"व" चा उच्चार उजव्या छातीच्या वरील भागात असलेल्या 'वराही' ग्रंथीतील 'निष्ठा' शक्तीची सिद्धि करतो.

"स्य" याच्या उच्चारणाने पोटाच्या वरील बाजूस (ज्या ठिकाणी बरगड्या जुळतात) सिंहिणी नावाची ग्रंथी असते. या ग्रंथीतील 'धारणा' शक्ति प्रभावित होते.

"धी" च्या उच्चारणाने यकृतात असलेल्या 'ध्यान' ग्रंथीतील 'प्राणशक्ती' सिद्ध होते.

"म" या अक्षराच्या उच्चाराने आपल्या प्लिहा मध्ये असलेल्या 'मर्यादा' ग्रंथीतील 'संयम' शक्तीची जागृती होते.

"हि" च्या उच्चाराने नाभीमधील 'स्फुट' ग्रंथीतील 'तपो' शक्ति सिद्ध होते.

"धी" या अक्षराच्या उच्चारणाने पाठीच्या कण्याच्या खालील भागात असलेल्या 'मेघा' ग्रंथीतील 'दूरदर्शिता' शक्तीची सिद्धि होते.

"यो" च्या उच्चारणाने डाव्या भुजेत स्थित असलेल्या 'योगमाया' ग्रंथीतील 'अंतर्नीहित' शक्ति जागृत होते.

"यो" च्या उच्चारणाने उजव्या भुजेमध्ये स्थित असलेल्या 'योगिनी' ग्रंथीतील 'उत्पादन' शक्ति जागृत होते.

"न:" या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या कोपरामध्ये असलेल्या 'धारिणि' ग्रंथीतील 'सरसता' शक्तीची सिद्धि होते.

"प्र" या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कोपरात असलेल्या 'प्रभव' ग्रंथीतील 'आदर्श' नावाच्या शक्तीची जागृती होते.

"चो" या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या मनगटात स्थित असलेल्या 'उष्मा' ग्रंथीतील 'साहस' शक्तीची सिद्धि होते.

"द" या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या तळहातावर असलेल्या 'दृश्य' नावाच्या ग्रंथीतील 'विवेक' शक्तीची जागृती होते.

"यात्" या अक्षर द्वयांच्या उच्चारणाने डाव्या तळहातावरील 'निरंजन' ग्रंथीतील 'सेवा' शक्ति सिद्ध होते.

अशा प्रकारे गायत्री मंत्रातील चोवीस अक्षरांचा, चोवीस ग्रंथी आणि त्याच्या चोवीस प्रकारच्या शक्ति यांच्याशी निकटचा संबंध आहे. नऊ ही संख्या न बदलणारी असून ब्रह्मतत्वाची सूचक आहे. आठ ही संख्या माया तत्वाला सूचित करणारी आहे.

गायत्री मंत्र हा कल्पतरुप्रमाणे आहे. यातील ॐ कार भूमीतून वर येणारा कोंब मानला जातो. भगवंत आहे याचे ज्ञान परमेश्वरावरील निष्ठा ॐ कारच्या उच्चारणाने येते. हा कोंब तीन शाखांमध्ये "भू: भुव: स्व:" याच्या रूपाने वाढतो. "भू:" आत्मज्ञान मिळवून देण्यास समर्थ आहे. "भुव:" शरीर धारण करतो तेंव्हा करायचा कर्मयोग सुचवितो. "स्व:" समस्त द्वंद्वाला स्थिरत्व देऊन समाधी स्थिति देण्यास समर्थ करतो. भू: या शाखेतून "तत् सवितु: वरेण्यम्" या उपशाखा उद्भवल्या. शरीरधारकाला जीवाचे ज्ञान करून देण्यास "तत्" उपयोगी आहे. शक्तीला समुपार्जन (मिळविणे) करण्यासाठी "सवितु:" याचे सहकार्य होते. "वरेण्यम्" मानवाला जंतुस्थितीतून दिव्य स्थितीला जाण्यास सहकारी होतो.

"भुव:" या शाखेतून "भर्गो, देवस्य धीमही" या तीन उपशाखा उत्पन्न झाल्या आहेत. "भर्गो" निर्मलत्व वाढवितो. "देवस्य" देवतांनाच केवळ साध्य असलेली दिव्यदृष्टी मिळवून देतो. "धीमही" ने सद्गुणांची वृद्धी होते. "स्व:" यातून "धीयो" मुळे विवेक, "योन:" मुळे संयम, "प्रचोदयात्" मुळे समस्त जीवसृष्टीचा सेवाभाव वाढीस लागतो.

1 comment:

  1. आयातु वरदा देवी अक्षरं ब्रह्म संमितं ।
    गायत्रीम छन्दसां मातेदं ब्रहम जुषस्व मे ।

    ReplyDelete